भाऊ महाजन - लेख सूची

‘गुजराथ्यांचे (गुरु)महाराज’

कोणाचेहि वास्तविक दोष काढून दाखविणे म्हटले म्हणजे मोठे कठीण काम होय. जरी आपण त्यांचे हित इच्छून प्रीतीने उपेदश केला तरी तो त्यांस कडू लागेलच. तथापि परस्परांस सन्मार्गास लावण्यास प्रयत्न करीतच असावें; हा आपला धर्म आहे, असें जाणून कोणाची भीड न धरितां आपलें काम बजवावें. या मुंबईत गुजराथी लोकांचे गुरु जांस साधारण शब्दकरून महाराज असी संज्ञा …