माधव वझे - लेख सूची

केशकर्तन, रंगमंच आणि पावित्र्य 

महाराष्ट्र नाभिक महामंडळाने नाभिक समाजातील तरुण व्यावसायिकांना प्रशिक्षण मिळावे व रोजगार निर्माण व्हावा, या उद्देशाने सलून आणि ब्युटी पार्लरबाबत एक आधुनिक प्रशिक्षण शिबिर, पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये अलीकडेच आयोजित केले होते. त्या शिबिराच्या वेळी रंगमंचावर केस कापण्याचे प्रात्यक्षिक, अर्थातच, दाखविले गेले. त्यामुळे रंगदेवतेच्या पावित्र्याचा भंग झाल्याची तक्रार मराठी नाट्य व्यवस्थापक संघाने केली असून, यानंतर अशा …