रोहित गोडबोले - लेख सूची

नास्ति(ऐ)क्याची गोची!

नास्तिक म्हणून काहीही लिहिताना दहा वेळा विचार करावा लागतो. प्रथम “लिहायची गरज आहे का? सगळे तेच तेच तर लिहितात!” ही स्वतःलाच बजावणी! घरच्यांना सांगितल्यावर “तुला काय करायचे ते उद्द्योग कर बाहेर, आम्हांला नको सांगू, तुमच्या पापात आम्ही सहभागी नाही” अशी आपण वाल्मिकी होण्याची कोणतीही शक्यता नसतानाही वाल्या-कोळ्यास कुटुंबाकडून मिळालेली सणसणीत प्रतिक्रिया आपणास देतील का? तरीही …