र. ग. दांडेकर - लेख सूची

पुस्तकपरिचय पंडित-सुधारक : श्री. म. माटे (1006-1957)

प्रोफेसर माटे यांचा जन्म १८८६ साली दिगंबर-श्वेतांबरी जैन यांचे तीर्थक्षेत्र असलेलया वाशिम जिल्ह्यातील शिरपर (जैन) येथे व्हावा हा विलक्षण योगायोग मानला पाहिजे. कारण जैन तत्त्वज्ञान तत्त्वतः वर्णव्यवस्थेविरुद्ध असलेले वेदांचे प्रामाण्य नाकारणारे नास्तिकदर्शन. प्रोफेसर माटे यांचे जीवितकार्य अस्पृश्योद्धार. त्यांनी अस्पृश्य-दलितांसाठी शाळा चालविल्या; त्यांना आरोग्याचे धडे दिले; त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची प्रसंगी व्यवस्था केली. त्यांच्या व्यथेला वाचा …

‘कर्मसिद्धान्त पंचक’

एक सुखी एक दुःखी। एक गाडीत एक पायी। दुराचारी मौज करी। सदाचारी दुःख करी॥१॥ कुणी महाली एक। कुणी एक झोपडीत॥ कुणी एक दिगंबर। कुण्या दुजास पीतांबर।।२।। एकास ते भोजन। एकासन जेवण। सर्व करा सहन। कर्म अपुले म्हणून ।।३।। तत्त्वज्ञान असले। माणुसकी विसरले॥ कर्मफल समजले। देवावर सोडले।।४।। धिक्कार दैववादाचा। विसर माणुसकीचा॥ माणुसकी एक धर्म। बाकी सारे …

‘टिळक विरुद्ध आगरकर’

सामाजिक सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य यांमध्ये अग्रक्रम कशाला यासंबंधी लोकमान्य आणि आगरकर या मित्रद्वयांमध्ये टोकांचे मतभेद होते हे महाराष्ट्रातील सर्व सुशिक्षित जनांना माहीत आहे. १६ जून १८९५ ला प्रिन्सिपल गोपाळ गणेश आगरकरांना देवाज्ञा झाली. त्यानंतर २१ वर्षांनी मुंबईला त्यांचा स्मरणदिन म्हणून मोठा समारंभ झाला. त्यावेळी प्रसंगाला अनुसरून लोकमान्यांनी ‘आगरकरांची श्राद्धतिथी’ म्हणून केसरीमध्ये जो लेख लिहिला …

ईश्वर, धर्म आणि अंधश्रद्धा

आगरकरांच्या अज्ञेयवादी भूमिकेतून ईश्वरावरील श्रद्धा अप्रमाणितच असते – असिद्धचअसते. आगरकर हे समाजसुधारक असल्याने समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा यांच्यावर त्यांनी सातत्याने प्रहार केले. सती, बालविवाह, बळी देण्याची प्रथा, शिमगा यांपासून तो स्त्रियांचे पोषाख, मृतासंबंधीचे विधि इत्यादि विषयांवर त्यांनी लिखाण केले. सर्वसाधारणपणे समाजासंबंधीचे विधि इत्यादि विषयांवर त्यांनी लिखाण केले. सर्वसाधारणपणे प्रचलित असणार्याे रूढी, पंरपरा, चालीरीती, …