वर्जेश सोलंकी - लेख सूची

जाफर आणि मी

जाफरच्या घरी रमजानचं शरबत प्यालो त्याच्या निकाहला शाही बिर्याणी त्याची आई माझ्याच आईसारखी घरासाठी खपताना चेहऱ्यावरचे छिलके निघालेली त्याच्या घराच्या भिंती माझ्याच घराच्या भिंताडासारख्या कुठे कुठे पोपडे निघालेल्या त्याचे बाबा हळहळतात माझ्याच बाबांसारखं फाळणीच्या दिवसांबद्दल बोलताना त्याच्या भाजणीतलं मीठ माझ्याच घरातल्या डब्यातल्या मिठासारखं त्याच्या आमटीतलं पाणी एकाच जमिनीतून आलेलं माझ्या तुळशीवर पडलेला सूर्यप्रकाश त्याच्या मशिदीच्या …