श्रीनिवास हेमाडे आणि प्र. ब. कुळकर्णी - लेख सूची

मुक्काम नासिक – १५ एप्रिल २०००

नासिक शब्द कसा लिहायचा? नाशिक, नाशीक की नासिक? नासिका म्हणजे नाक. भौगोलिक संदर्भ घेऊन सह्याद्रीच्या पाच शाखांपैकी एक जी सातमाळा ती नाकासारखी पुढे येऊन हा परिसर झाला असावा. असे अनुमान करता येईल. जुन्या नाशकाचा भाग पन्नास हजार वर्षांपूर्वी जलाशयाखाली होता हे तिथे सापडलेल्या अश्मीभूत (fossils) अवशेषांवरून समजते असे भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात. पण या भौगोलिक म्हणा की …