सुधीर भावे - लेख सूची

भारताचे मानसिक आरोग्य: आज आणि उद्या

भारतात जन्मलेल्या आणि भारतात कार्यरत असलेल्या मनोरोग-तज्ज्ञाच्या भूमिकेत एक महत्त्वाचा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो तो असा की एका सर्वसाधारण भारतीयाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या परदेशी बांधवांपासून कोणत्या दृष्टीने भिन्न असते व ह्या विशिष्ट ‘भारतीय व्यक्तिमत्त्वाचा’ परिणाम त्याच्या मानसिक आरोग्यावर व मानसिक रोगांवर कशा प्रकारे पडतो? आपली ‘भारतीयता’ आपल्याला मानसिक आरोग्याकडे नेते किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. …