सुनील सुळे - लेख सूची

लोकशाहीच्या जिवावर बेतले होते तेव्हा

२०२४ च्या जानेवारी महिन्यात एका दुपारी आमच्याच आसपास राहणारे पांढरपेशे स्त्री-पुरुष भगवे नेसून एखाद्या टोळीसारखे अक्षता वाटत दारात येऊन उभे राहिले. त्यांनी देऊ केलेल्या अक्षता नाकारायची इच्छा असूनही मी हात पुढे केला तेव्हा, मला स्वतःचीच शरम वाटली. ते दारावर ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’चे स्टिकर चिकटवून, झेंडा देऊन निघून गेले. त्या अक्षता टाकून देताना, …

शहाण्यांचा मूर्खपणा अथवा आमचे प्रेतसंस्कार

काही महिन्यांपूर्वी एका जीवश्चकंठश्च मित्राला अखेरचा निरोप देण्याचा दुर्दैवी अनुभव घेतला. त्यावेळी मनात आलेले विचार अस्वस्थ करून गेले. ते समविचारी बुद्धिमंतांसमोर ठेवण्यासाठी हा लेखनप्रपंच. माझा मित्र अत्यंत श्रद्धाळू, देवभक्त आणि सर्व कर्मकांडांवर ठाम विश्वास ठेवणारा होता. त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार पारंपरिक पद्धतीने होणार याविषयी मनात काही संदेह नव्हता. तरीही तो सर्व प्रकार पाहून गलबलून आले. मित्राच्या …