विषय «लोकशाही»

मनुस्मृती दहनाची १०० वर्षे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या मनुस्मृती दहनाला ९८ वर्षे, आणि भारतीय संविधानाच्या घोषणेला ७६ वर्षे झालीत, त्यानिमित्ताने.

मनुस्मृती हे हिंदू धर्मशास्त्र आहे असे म्हटले जाते. “श्रुतिस्तु वेदो विज्ञेयो धर्मशास्त्रं तु वै स्मृतिः”––श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती म्हणजे धर्मशास्त्र. वेदांमध्ये मनूचे नाव येत असले तरी वेदांनंतर खूप कालावधी गेल्यानंतर स्मृतिग्रंथांची निर्मिती झाली. मनुस्मृती ही इ. स. पू. २०० ते इ. स. २०० या कालखंडात लिहिली गेली असे मानले जाते. स्मृतिग्रंथ आणि स्मृतिकार अनेक झाले, पण मनुस्मृतीला सर्वाधिक महत्त्व आहे. विष्णू, पराशर, दक्ष, संवर्त, व्यास, हारीत, शातातप, वसिष्ठ, आपस्तंभ, गौतम, देवल, शंख, लिखित, भारद्वाज, उशना, शौनक, याज्ञवल्क्य इत्यादी प्रसिद्ध स्मृतिकारांची नावे व वचने ‘मन्वर्थमुक्तावली’ या टीकाग्रंथात मिळतात.

पुढे वाचा

खरंच भारतात नक्षलवाद हा फार मोठा धोका आहे का?

संपूर्ण भारतातील आदिवासी समाजाच्या सुमारे १०% लोकसंख्या असलेल्या, १५%, दलित, ५०% महिला आणि १५% अल्पसंख्याक मिळून ९०% समाजघटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीच्या गेल्या ५५ वर्षांच्या सामाजिक जीवनात विविध अनुभव गोळा झाले आहेत. त्या अनुभवांच्या आधारे केलेल्या अभ्यासाकडे मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो. आपल्या देशात सुरू असलेल्या आदिवासी असंतोषाकडे भारतसरकारने केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहणे बरोबर होणार नाही. ह्या असंतोषाच्या परिस्थितीचा मुळापासून अभ्यास करणे, हाच ह्या प्रश्नाला सोडविण्यासाठी योग्य उपाय होऊ शकतो. 

भारतीय कम्युनिस्ट चळवळीचा इतिहास
भारतात कम्युनिस्ट पक्षाची अधिकृत स्थापना कानपूर येथे काही कम्युनिस्टांनी डिसेंबर १९२५ मध्ये केली असून सांप्रत वर्ष कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष आहे.

पुढे वाचा

ग्रामस्वराज्याचा शिल्पकार

उन्नत आदर्शांचे आकर्षण करोडो लोकांना असते. पण आयुष्यात उतरवणे अशक्य वाटून ते आदर्श केवळ पुस्तकी आहेत, असे ठरवून ते त्या आदर्शांचा पिच्छा करणे सोडून देतात. त्या आदर्शांवर जगण्याची इच्छा बाळगून त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणारेदेखील लाखो असतात. संपूर्ण जग ज्या दिशेने जात आहे, त्या प्रवाहाच्या विपरीत पोहतांना नाकातोंडात पाणी जाऊन दमछाक झाल्यामुळे, कालांतराने प्रवाहासोबत वाहू लागणारेही अनेक असतात. पण काही मोजकेच, कितीही संकटे आली, तरी आपल्या आदर्शांवर ठाम विश्वास ठेवून त्या दिशेने मार्गस्थ होतात. अशाच एका दुर्मिळ ध्येयवेड्याने शतकभरापूर्वी आपल्या ह्या जिद्दीमुळे जगभरातील अनेकांना वेड लावले.

पुढे वाचा

मेंढा ग्रामसभा – दशकांपासूनचा संघर्ष

ग्रामसभांचे बळकटीकरण, त्यात महिलांचा-तरुणांचा सक्रीय सहभाग, अभ्यासमंडळांची निर्मिती आणि सर्वसहमतीने निर्णय ह्या सगळ्यांतून मेंढाच्या ग्रामसभेला आदर्श ग्रामसभा बनविण्यासाठी सातत्याने झटणारे व्यक्तित्व म्हणजे देवाजी तोफा. देवाजी तोफांच्या नेतृत्वात आदिवासी समुदायाने केलेल्या संघर्षामुळे गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा गाव बांबूसाठी ट्रान्झिट पास जारी करण्याचे अधिकार मिळवणारे देशातील पहिले गाव ठरले. वन कायदे खऱ्या अर्थाने लागू करण्यामागे आदिवासींच्या ह्या चळवळीचे मोठे योगदान आहे. ही चळवळ काही दशकांपासून सुरू आहे. आजही सरकारशी अनेक पातळ्यांवर लढावे लागत असताना ग्रामस्वराज्याचं आजचं स्वरूप, त्याची उपयोगिता, त्याविषयीचे कायदे, त्यातून वाढलेल्या शक्यता, नवीन पिढीकडून अपेक्षा ह्यांविषयी देवाजी तोफा ह्यांच्या मुलाखतीतील हा निवडक अंश.

पुढे वाचा

जहाँ समाज का अपना राज है, समाज के लिए है, समाज से है

‘ग्राम स्वराज’ और उससे जुड़ी शब्दावली वहाँ नहीं मिलती. फिर भी पीढ़ियों से राज-समाज, आस्था-व्यवस्था के जिन तरीकों पर झारखंड के कई समाज चलते आ रहे हैं, उनमें इस विचार की बहुत पुरानी समझ है. समय ने करवट जरूर ली है. इसके मायने बदले. महत्त्व, मान्यताएँ, रीतियाँ, नीतियाँ, प्रणालियाँ बदलीं. गांधी ने कोशिश की कि समाज अपने मूल में रह कर ही विकास करे. सभी गाँवों की अपनी आस्था हो, अपनी व्यवस्था भी. यह कायम रह न सका. अब हम नारों में, सिद्धांतों में, कानून में ग्राम स्वराज को बताना चाहते हैं, लागू करना चाहते हैं.

पुढे वाचा

महाग्रामसभा : ग्रामसभांच्या स्वायत्ततेची चळवळ

स्वायत्तता म्हटल्यावर सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे सर्वसहमती आणि सहभाग. मोहन हिराबाई हिरालाल ह्या कार्यकर्त्या अवलियाने काही दशकाअगोदरच ह्याचे समर्थन करणारे एक पुस्तक लिहिले होते, Consensus Decision Making. ह्या पुस्तकातून त्यांनी सर्वसहभागितेची आणि स्वायत्ततेची मुळे खोलवर रुजवून ठेवली आहेत. हे तत्त्वज्ञान नसून अनुभवांच्या आधारावर अधोरेखित केलेली पुढची दिशा आहे. मेंढालेखा ग्रामसभेसोबत मोहनकाकांनी अनेक प्रयोग केले. त्यातील मूळ गाभा मात्र सर्वसहभाग आणि सर्वसहमतीचा होता. तोच स्वायत्ततेच्या मार्गावर घेऊन जाणारा नैसर्गिक मार्ग आहे. कदाचित हे रूप समकाळाच्या संदर्भाने खूप व्यापक आणि दूरदृष्टीपूर्ण आहे.

पुढे वाचा

ग्राम स्वराज का जादुई काढ़ा

“काल है ईसा से ५० साल पूर्व. समूचा गॉल देश रोमन साम्राज्य के कब्जे में आ चुका है. अरे!…समूचा नहीं! एक छोटे-से गाँव में रहने वाले अजेय गॉलवासी अभी भी आक्रान्ताओं का डट के मुकाबला कर रहे हैं. जो रोमन छावनियाँ उस गाँव को घेरे हुए हैं, उनके सैनिकों का जीवन आसान नहीं है…” 

ये शब्द फ्रांस में बनी ‘ऐस्ट्रिक्स’ कॉमिक्स के हर अंक के पहले पन्ने पर होते हैं. नये पाठकों को इस काल्पनिक संसार का परिचय देते हैं. कुछ वैसे ही जैसे ‘विक्रम और वेताल’ की हर कड़ी की शुरुआत एक ही दाँव से होती है.

पुढे वाचा

राज्य का प्रतिरोध, स्वराज का साधारण आधार

समय-समय पर कुछ ऐसे विद्वान होते हैं जो शास्त्रीय ज्ञान को साधारण लोगों के साथ जोड़ देते हैं. उनका काम यह सिद्ध करता है कि समाजशास्त्र जैसी कठिन विधा को अकादमिक दायरों से बाहर ला के समाज में रखा जा सकता है. जेम्स सी. स्कॉट ऐसे ही राजनीतिशास्त्री थे. आधी शताब्दी में फैले उनके अध्ययन के केंद्र में समाज और राज के संबंध ही रहे. 

जब जुलाई २०२४ में उनका देहान्त हुआ, तब तक वे अपनी विधा को अभिजन और शासक वर्ग की सीमा से बाहर खींच लाये थे.

पुढे वाचा

मेंढा (लेखा) व ग्रामसभा

  • महाराष्ट्र राज्यात पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात, गडचिरोली शहरापासून साधारण ४० किलोमीटर अंतरावर, जगाने आदर्श घ्यावा असे १००% आदिवासींचे मेंढा गाव वसलेले आहे. गावाभोवती पसरलेले घनदाट जंगल ह्या गावाचे खरेखुरे वैभव असून गावातल्या माणसांसाठीची ही विशाल शिक्षणसंस्थाही आहे. ह्या जंगलातील झाडे, वेली, पशू, पक्षी, कीटक एकंदर सगळ्या सजीव आणि निर्जीव घटकांच्या सान्निध्यात गावातील मुले जे मूल्याधिष्ठित शिक्षण घेतात, ते कोणत्याही शाळेत उपलब्ध नाही. ह्या माणसांच्या सहवासात आणि गावासह गावाभोवतीच्या सबंध परिसरात जंगलच मानवाचा मूळ अधिवास आहे, ही हरवलेली जाणीव जिवंत होते. चंगळवादाच्या झगमगाटात गळून पडलेली माणसाची नाळ पुन्हा जंगलाशी (मानवाचा मूळ अधिवास) जुळते.
पुढे वाचा

“ग्राम स्वराज आदिवासी परंपरा है. पेसा कानून इसकी आधुनिक कुंजी है.”

हिंद स्वराज में महात्मा गांधी ने वकालत की गहरी आलोचना की. उसे केवल “एक कमाई का रास्‍ता” बताते हुए कहा कि “वकील का स्‍वार्थ झगड़ा बढ़ाने में है”. यह भी कि “अगर वकील वकालत करना छोड़ दें…तो अंग्रेजी राज एक दिन में टूट जाए.” झारखंड के आदिवासी यह बात बहुत पहले से जानते आ रहे हैं. इसकी झलक मिलती है उन विशेषणों और गालियाँ में, जो वे वकीलों के लिए इस्तेमाल करते हैं. किंतु झारखंड के आदिवासियों को एक ऐसा वकील भी मिला जो इंसान है, जिसमें इंसानियत है.

पुढे वाचा