सेडी प्लँट - लेख सूची

एक यंत्र आणि स्त्रियांचे काम

कार्यालयीन यंत्रांमुळे सध्याच्या कामांचे स्प जास्त वेगवान, बिनचूक, नियमित आणि कार्यक्षम व्हावे, अशी अपेक्षा होती. टंकलेखक (typewriter) म्हणजे नवा आणि सुधारित कारकून. गणनयंत्र (calculator) म्हणजे नवा आणि सुधारित हिशेबनीस—-जो माणसांची हिशेबाची कामे आ चर्यकारक वेगाने आणि कार्यक्षमतेने, विद्युद्वेगाने करील, असा. आणखी हत्यारे, आणखी अवजारे, आणखी पुरुष कर्मचाऱ्यांसाठी. पण जेव्हा टंकलेखक, झेरॉक्स यंत्रे, टेलेफोन स्विचबोर्ड्ज, गणनयंत्रे, …