राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचे भवितव्य - लेख सूची

राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचे भवितव्य (१)

गेलनर ह्यांनी राष्ट्रवाद हा औद्योगिकीकरणाच्या आणि भांडवलशाहीच्या आवश्यकतेतून जन्मल्याचे मांडले आहे. त्यामुळे राष्ट्रवाद ही आधुनिक संकल्पना आहे व तिचा जन्म औद्योगिकीकरणापासून झाला असा त्यांचा सिद्धान्त त्यांनी Nations & Nationalism ह्या १९८४ साली प्रसिद्ध झालेल्या प्रबंधात मांडला आहे. औद्योगिकीकरणाची परमसीमा गाठली आणि भांडवलशाही पूर्णपणे विकसित झाली तर राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनावर काय परिणाम होतील हा …

राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचे भवितव्य (२)

ह्यापूर्वी उल्लेखिलेल्या सर्व बाबींमुळे आता कंपन्या आंतरराष्ट्रीय न राहता ट्रान्सनॅशनल (राष्ट्रातीत) झाल्या. ह्या कंपन्याची राष्ट्रीय निष्ठा ही भावनिक असत नाही. ती फक्त कायदेशीर असते. कॉम्प्युटरच्या एका बटनवर लंडन, टोकियो किंवा न्यूयॉर्कशी नुसते संबंधच प्रस्थापित होतात असे नव्हे तर क्षणार्धात चलन, स्टॉक्स, शेअर्स आणि वायदेबाजार ह्यांच्यात देवाणघेवाण शक्य झाली आहे. मोठ्या कंपन्याची भांडवलशक्ती, तिच्या मागे असलेली …

राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचे भवितव्य (३)

८. सांस्कृतिक परिणामटेलिव्हिजन, इंटरनेट आणि वृत्तपत्रे ह्यांमुळे जगात घडणाऱ्या घटना काही सेकंदांत जगभर प्रसारित होत आहेत. क्रिकेटचा चालू असलेला खेळ आपण आपल्या दिवाणखान्यात बसून आरामात नित्य बघत असतो. ह्या माध्यमांतून बातम्या, टेलिव्हिजन मालिका, करमणुकीचे कार्यक्रम, खेळ आणि जाहिराती इत्यादींतून अनेक प्रतिमा प्रसारित होत असतात. माध्यमांनी दाखविलेल्या ह्या प्रतिमांत आपण इतके गुरफटून गेलेले असतो की वास्तव …