प्रा. वसंत कानेटकर यांच्या पत्राच्या निमित्ताने

प्रा. वसन्त कानेटकर ह्यांच्या ‘नवा सुधारक’ च्या ऑगस्ट-अंकात प्रकाशित झालेल्या पत्रातील पुर्वाधांच्या संदर्भात (स्त्री – पुरुषांनी आपापांतील मत्सरभाव सहजात आहे, की अर्जित) निरनिराळ्या मानवशास्त्रज्ञांनी केलेल्या अध्ययनाचे काही अंश पुढे दिले आहेत. असेच आणखीही काही उतारे पुढे देण्याचा विचार आहे.

भिन्नभिन्न ठिकाणी आढळणाच्या विवाहसंरधनील वैविध्याकडे केवळ वैचित्र्य म्हणून पाहण्यात येऊ नये. आपल्या जीवनातील समस्या सोडविण्यासाय ह्या पद्धती मानवाने निर्माण केल्या आहेत. अनेक शतके सातत्याने चालत आलेल्या या समाजमान्य रूढी आहेत. त्या त्या प्रदेशात त्या समाजधारणेला आवश्यक मानल्या जातात. समाजधारणेला त्यांच्यामुळे कधीही बाधा आलेली दिसत नाही. आपल्याच प्रदेशातील व आपल्याच समाजातील रूढी योग्य किंवा श्रेष्ठ असा आपला समज असल्यास तो बरोबर आहे की नाही असा विचार या अध्ययनामुळे आपल्या मनात यावा आणि आदर्श विवाहसंस्था कशी असेल — कशी असावी – ह्याविपयी चर्चा सुरू व्हावी म्हणून हा विषय थोडा विस्ताराने मांडला आहे. हा विषय चर्चेचा असल्यामुळे त्यावर वाचकांच्या प्रतिक्रिया अथांतच अपेक्षित आहेत. पहिला उतारा
‘Hindus of the Himalayas’ ह्या Gerald J. Berreman च्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस (मुंबई, १९६३) ने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील पृष्ठ १७१ वरील उतारा कोणत्याही स्त्रीच्या पतीनेच नव्हे तर तिच्या दिरांनीही तिच्याशी पत्नीशी करावा तसा व्यवहार करावा असा येथे परंपरागत प्रधात आहे. एका कनिष्ठजातीय प्रौढाला त्याच्या कुटुंबाविषयी माहिती विचारली असता त्याने स्वत:च्या बायकांबरोबर आपल्या भावांच्या पत्नींचीही नावे आपल्या पत्नीची म्हणून सांगून त्याच्या श्रोत्यांमध्ये खसखस पिकविली होती. तो म्हणाला होता,’मग काय झाले, त्याही मला माझ्याच बायकांसारख्या आहेत.’

ह्या प्रयाताविषयी का स्थानिक माहितगाराशी चर्चा करीत असता तो म्हणाला,’आमच्या यथे कोणतीही वाई आदल्या दिराचा अव्हेर करणार नाही. तिचे त्याच्याशी नवराबायकोसारखेच नाते अगल्याळे त्याच्या सहवासाला नकार देऊन ती आपल्या कुटुंबामध्ये विसंवाद निर्माण करणार नाही.’

आपल्या धाकट्या भावांच्या पत्नीशी आपल्या पत्नीशी करावा तसा लैंगिक व्यवहार करण्याचा प्रत्येक पुरुषाला अधिकार आहे आणि जेथे थोरल्या भावजयीचे वय तिच्या धाकट्या दिरापेक्षा फार जास्त नाही तेथे धाकट्या दिरांनाही तिच्याशी तसाच व्यवहार करण्याचा अधिकार आहे. ह्या कारणावरून येथे कधीही हेवादावा वा कलह निर्माण होत नाही. तो त्यांचा अधिकार आहे आणि तो त्यांनी वापरावा अशी अपेक्षा आहे.

भावाच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ते त्याच्या बायकोजवळ जात नाहीत. तो दूर जाण्याची वाट पाहतात; मग तो पाणी आणण्यासाठी का गेलेला असेना. दीर जर आवडीचा असेल तर भावजय आदेवेढे घेत नाही व चटकन हो म्हणते. पण तो तसा नसला तरी तो आग्रह धरू शकतो. अशा वेळी ती त्याच्या बायकोजवळ आपली नाराजी व्यक्त करते व ती दिराची बायको नाराज भावजयोवर स्वत:ला लादल्याबद्दल नवर्‍याची कानउघाडणी करते. पण सहसा दिरांची ही कारवाई आपापल्या बायकांपासून लपूनछपून चालते; कारण नाही म्हटले तरी बायकांना आपल्या जावांबद्दल वैषम्य वाटू शकते. भावांना मात्र ह्या रणासाठी एकमेकांबद्दल मत्सर वाटू नये अशी अपेक्षा असते. एखाद्या स्त्रीला आपल्या दिराबदल अभिलाषा वाटल्यास त्याच्याशी समागम करता यावा म्हणून ती त्याच्या बायकोला काही निमित्त काढून बाहेर पाठविते.
आपल्या पतीच्या वैषयिक इच्छा पूर्ण करणे प्रत्येक स्त्रीचे आद्य कर्तव्य आहे व त्याबाबतीत प्रत्येक स्त्रीवर पहिला अधिकार तिच्या पतीचाच आहे. पण त्याचबरोबर आपल्या दिरांच्या विनंतीचा अव्हेर तिने करू नये अशीही तिच्याकडून अपेक्षा आहे. इतर संस्कृतींमध्ये दीर- भावजयांचा असा संबंध घडल्यास व ती गोष्ट उघडकीला आल्यास त्याचे परिणाम घटस्फोटांमध्ये होऊ शकतात असे तेथल्या जाणकारांना सांगितल्यावर त्यांचा त्यावर विश्वास बसेना. कोणतीही स्त्री पतीच्या इच्छांना अग्रक्रम देऊन त्याचे समाधान करीत असेल आणि त्याचबरोबर पतीच्या गैरहजेरीत वा घराबाहेर, सुज्ञपणे तिच्या दिरांचीही संबंध ठेवीत असेल तर तिच्या नवर्‍याला तिच्याविषयी तक्रार करावयाला कोणतीच जागा नाही असे मानले जाते. पण प्रत्यक्ष व्यवहारात नवरे तक्रार करीतच नाहीत असे नाही. आपल्या भावाचे आपल्या पत्नीकडे फारच जास्त लक्ष आहे असे एखाद्याला जाणवल्यास ती आडपडद्याने ‘माझी विष्ठा खातोस…..’ असे बोलून भावाला रागे भरतो, आणि भावजयीवरचे लक्ष कमी करण्यास बजावतो.

एखाद्या स्त्रीचे कुटुंबाबाहेरील पुरुषाशी विवाहबाह्य संबंध आहेत अशी शंका आल्यास, वा जेथे असे संबंध सहजपणे घडू शकतील अशा रानात ती कामाला जाणार असल्यास, तिची सासू किंवा थोरली जाऊ तिच्या धाकट्या व शक्यतो अविवाहित दिराला त्याच भागात किंवा तिच्यासोबत पाठविते. त्यामुळे दोन गोष्टी साधतात. परक्या पुरुषापासून तिचे संरक्षण होते व तिचे व तिच्या दिराचे आंतरिक संबंध गाढ होण्यास प्रोत्साहन मिळते. “परक्या पुरुषांपासून आमच्या बायकांच्या अब्रूचे रक्षण होते!” प्रत्येक स्त्रीचे तिच्या दिरांशी प्रसंगवशात् संबंध घडले असणार असे येथे सारेजण गृहीत धरून चालतात आणि तारुण्यात प्रवेश करणाच्या मुलांना त्यांच्या भावजया प्रौढांच्या लैंगिक व्यापारातले सुरुवातीचे धडे देतात. दुसरा उतारा हा उतारा Some Indian Tribes ह्या निर्मलकुमार बास ह्यांच्या नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया (१९७२) द्वारा प्रकाशित पुस्तकातील पृष्ठ १२१ वरील आहे. किन्नौर श्री. सेन ह्यांनी अध्ययनार्थ जमा केलेल्या Case records वरून हिमाचल प्रदेशातील किन्नौरांतील बहुपतिकत्वाबद्दल तेथील स्त्रियांचा दृष्टिकोण स्पष्ट होतो:

केस पहिली
यांकित (वय ३१) ही गियालबो (४०) आणि जोरीराम (३८) ह्या दोन भावांची सामाईक पत्नी आहे. तिला तीन अपत्ये आहेत. ‘जोरीरामला दुसरे लग्न करण्यापासून तू कसे परावृत्त करशील?’ असा प्रश्न तिला विचारला असता ती म्हणाली,’जोरीरामच्या सगळ्या गरजा मी पुरविते, इतकेच नव्हे तर त्याच्या सुखपाईंकडे मी लक्ष देते. ह्याउपर जर जोरीरामला दसरे लग्न करावयाचे झाले तर तो वेगळा झाल्यावरही आमच्या आतापर्यन्त जन्मलेल्या तीनही मुलांच्या खावटीसाठी त्याला खर्च करावा लागेल; कारण तो आमच्या परंपरेप्रमाणे त्या मुलांचा कनिष्ठपिता आहे. आणि जर हे घर त्याच्या वाट्याला गेले नाही तर त्याला त्याच्या कुटुंबीयांसाठी वेगळे नवीन घर बांधावे लागेल. केवळ आपणाला स्वतंत्र बायको असावी एवढ्यासाठी कोणीही पुरुष इतकी मोठी दगदग करणार नाही.’ बहुपतिकत्वापासून तुला कोणते फायदे होतात असे विचारले असता यांकित म्हणाली,'(१) माझे दोनही नवरे माझ्या इच्छा पुरविण्यासाठी झटतात आणि माझ्या मोयी बघतात. (२) माझ्या मुलांच्या वाट्याला माझ्या दोन नवर्‍यांनी जमविलेली संपत्ती येणार आहे. आणि (३) दोन नवर्‍यांची बायको म्हणून माझा जो मान आहे तो माझ्या नवर्‍यांनी वेगवेगळ्या बायका केल्या तर कमी होईल.’

केस दुसरी
पालझोर (३४) ग्यान (३१) आणि उदय (१८) ह्यांची डोलमा (२८) ही सामाईक पत्नी आहे. पालझोरची ६० वर्षांची आई आणि २४ वर्षांची बहीण उपती ह्या त्यांच्याच बरोबर राहतात. पालझोर त्यांच्या शेतीकडे पाहतो, म्यान जनावरांच्या पाठीवर सामान लादून त्याची ने-आण करीत सतत गावोगाव हिंडतो आणि उदय शेळ्यामंढ्या चारण्यासाठी डोंगरावर आणि दर्‍याखोर्‍यांतून हिंडत नवीन नवीन कुरणांमध्ये राहून वर्षातला पुष्कळ काळ बाहेरच घालवितो. उंपती आणि तिची आई डोलमाला घरकामात आणि शेतीतसुद्धा सगळी मदत करतात. डोलमाला दोन अपत्ये आहेत. दोनही पालझोरची मानली जातात, कारण तोच त्यांचा ‘सामाजिक बाप’ आहे. ग्यान डोलमाला लोकांच्या देखत ‘भाभी’ म्हणतो. टोलमाशी पुष्कळ चर्चा केल्यानंतर तिने सांगितले की तिच्या धाकट्या, एक वर्ष वयाच्या मुलाचा खरा, वास्तविक बाप ग्यान आहे. पालझोरला ही गोष्ट माहीत आहे काय असे विचारल्यावर ती म्हणाली,’अर्थात त्याला ठाऊक आहे!’ उदयशी तिचा लैंगिक संबंध आलेला नाही. ‘जेव्हा ग्यान मुक्कामाला येथे असतो तेव्हा मी दरवाजा आतून लावून घेत आणि पालझोर बाहेर झोपतो. ह्या घाटीमध्ये आम्हा बायकांना ही मोकळीक आहे. आणि कोणीही पुरुष त्याबद्दल तंटे-झगडे करीत नाही.’ (तत्रैव, पृष्ठ १२६-१२८)

तिसरा उतारा
(हा स्त्रियांना एकमेकींविषयी वाटणार्‍या मत्सराबद्दल आहे.) हा Tibetan Frontier Families ह्या बार्बरा निमरी अझझ ह्यांच्या विकास पब्लिशिंग हाउस, नवी दिल्ली (१९७८) द्वारा प्रकाशित पुस्तकातील पृष्ठ १५१ वरील आहे.

‘भागिनेय बहुपत्नीकत्वाविषयी मी जी माहिती मिळविली आणि निरीक्षणे केली त्यांमध्ये सपत्नी म्हणून एकत्र राहणार्‍या भावांपेक्षा बहिणीबहिणी सवती म्हणून एका ठिकाणी चांगल्या राहतात असे मला आढळले, सवती म्हणून दोन बहिणी जेथे जेथे नांदतात अशा बर्‍याच ठिकाणी त्या एकान छत्राखाली, एकच चूल मांडून एकमेकींची मुले वाढवीत गुण्यागोविंदाने नांदतात. दोघींनाही त्यांची मुले ‘ना-मा’ म्हणतात, व दायींच्याही मुलांचे अधिकार समान असतात.

“इतकेच नव्हे तर त्या बहिणींमध्ये लैंगिक मत्सराचे वा पक्षपाताचे नावनिहाण आढळत नाही. ह्या उलट ज्या घरांमध्ये बहुपतिकत्व आहे तेथे धीपुरुषांचे भावनिक आणि लैंगिक संबंध बदलते राहिल्यामुळे पुष्कळ ताण अनुभवास येता.” तत्रैव, पृष्ठ १७९

चौथा उतारा
“लग्नानंतरच्या गुरुवातीच्या वर्षात आपले घर हेच ना-माचे कार्यक्षेत्र असते. घरामध्ये वत:चा अधिकार निर्माण करणे, आपल्या तरुण नवग्याला आपल्या मुटीत आणणे अशा कामांत ती गुंतलेली असते. पण तिची मुले थोड़ी मोठी झाल्यावर तिची परिस्थिती विवाहबाह्य संबंधाचा लाभ घेण्याला अनुकूल होते. मात्र हे संबंध उघड नसावेत. असे स्वातंत्र्य उपभोगत आहेत असे ज्यांच्याविषयी ठाऊक असते किंवा ज्यांना ‘मित्र’ आहेत असा ज्यांच्याविषयी संशय असतो अशा प्रौढ विवाहित स्त्रियांवर कोणी गंभीर टीका केल्याचे भी ऐकले नाही. ‘ती जे करते ते तिला गरज असल्यामुळेच करते’ आणि ‘आपला नवरा सांभाळण्याइतकी आणि आपल्या भानगडी निस्तरण्याइतकी ती मोठी आहे’ असा तिच्याकडे पाहण्याचा एकूण दृष्टिकोण असतो. तिचे तारतम्य कायम असेल तोवर तिच्या अशा वागण्याचा कोणी बाऊ करीत नाही. (तत्रैव, पृष्ठ १८०)

“तिबेटी समाजाचे अध्ययन करणाच्या पाश्चात्य निरीक्षकांना जी एक गोष्ट सतत जाणविली आहे ती म्हणजे तिबेटी पतिपत्नींच्या परस्पर संबंधातील समता. नामाचे तिच्या घरातील स्थान प्रारंभी जरी क्षीणबल वा कमजोर असे असले तरी तिचे घरातले वजन उत्तरोत्तर वाढत जाते आणि ज्याला काहींच्या मते आधिपत्य म्हणता येईल असे स्थान पुढे तिला तिच्या घरात प्राप्त होते.”

पाचवा उतारा
हा उतारा The Lepchas of Silkkim (Himalayan Village) ह्या Geoffray Gorar ह्यांच्या Cultural Publishing House, Delhi 7, ह्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातील पृष्ठ ३२७ वरील आहे.
“लेपचा जमातीतील बहुतेक पुरुषांना खीसमागमाचा पहिला अनुभव (स्वत:च्या लग्नाच्या स्त्रियांकडून नहे, तर) त्यांच्या संभाव्य पत्नींकडून प्राप्त होत असतो. या ‘मंभाव्य पत्नी’ म्हणजे त्यांच्या ‘काकी’ किंवा ‘थोरल्या भावजया’ असतात. त्याच बहुधा त्यांच्या संभाव्य पतींना (potential levirate Spouse) आपल्या शय्येवर बोलविण्यात स्वतः पुढाकार घेतात आणि त्यांचा ह्या विषयात प्रवेश करून देऊन त्यांचे शिक्षण करतात… कोणत्या स्त्रियांशी समागम करण्याचा त्यांना अधिकार आहे ते बाप आपल्या मुलांना सांगतात, तसेच नात्याने समागमयोग्य असल्या तरी त्यांच्या बापाने स्वत: त्यांच्याशी समागम केलेला असल्यामुळे मुलांसाठी वयं कोणत्या तेही सांगतात. मोठे भाऊ आपल्या लग्नानंतर धाकट्या भावांना आपल्या पत्नींशी समागम करण्याची औपचारिक परवानगी देऊन ठेवतात. हे सारे वैध समागम बहुतकरून खर्‍या नवर्‍यांच्या तात्पुरत्या गैरहजेरीत तारतम्याने घडत असतात.”

दिवाकर पुरुषोत्तम मोहोनी
धरमपेठ, नागपूर -४४००१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.