सुशीलेचा देव: एक टिपण

‘सुशीलेचा देव’ ही कादंबरी पुन्हा वाचताना या कादंबरीत सुशीलेच्या आणि इतर पात्रांच्या देवविषयक कल्पनांच्या बाबतीतली क्रांती दाखवणे हा वामन मल्हारांचा या कादंबरीच्या लेखनामागचा हेतू खरोखरीच आहे का असा प्रश्न पडला. सुशीला हे या कादंबरीतले मध्यवर्ती पात्र. बाळू, सुनंद, रावबा हे तिचे बाळपणापासूनचे. सवंगडी, विनायकराव हे सुशीलेचे वडील आणि गिरिधरराव हे विबाचे वडील. ही कादंबरीतली पात्रे आहेत का? कादंबरी हे एक कल्पित विश्व असते. पात्रे, प्रसंग, घटना यांनी घडलेले, स्वयंपूर्ण असे कल्पित जग. ही कादंबरी वाचताना असे वाटते की हे कल्पित जग नाही. हे समाजाचे प्रातिनिधिक चित्र आहे. ही कादंबरीतली पात्रे नसून या प्रवृत्ती आहेत. लहानपणी दगडाला देव मानणारी सुशीला, आमचा देव सगळ्यांत मोठा, तो खात्रीने बाबांच्या देवाला पाडील – अशी आपल्या देवाच्या मोठेपणावर श्रद्धा ठेवणारी सुशीला ही सुशीला नावाची लहान मुलगी नसून समाजातल्या एका प्रवृत्तीची प्रतिनिधी आहे. ही प्रवृत्ती समाजात अस्तित्वात असते. समाजमनाच्या प्राथमिक अविकसित अवस्थेचे ते एक रूप असते. समाजात एकाच वेळी, स्पेन्सर वादी गिरिधरराव, उदारमतवादी विनायकर , देशासाठी कोणतेही साहस करायला सिद्ध असलेला राष्ट्रवादी, क्रांतिकारी सुनंद, समतोल विचाराचा बुद्धिमान बाळू, चुकीचे संस्कार आणि अहंकार यांच्यामुळे सहज स्खलनाकडे जाणारा रावबा, भाबडी आणि मर्यादितपणे व्यवहारी असणारी सुशीलेची आई आणि नवर्‍याचा बडेजाव सहन करणारी रावबाची आई — अशा विविध वृत्तीप्रवृत्तींची माणसे असतात. समाजातल्या या विविध वृत्तींची ही प्रातिनिधिक चित्रे वामन मल्हारांनी वाचकांसमोर कशासाठी उभी केलेली आहेत? जीवनाचे सुखदु:खात धाग्यांनी विणलेले महावख वाचकांसमोर वामनमल्हारांनी उलगडलेले नाही. त्या प्रकारची तटस्थ कलात्मकता त्यांच्यात नव्हती. वामन मल्हार हे विचारवंत होते. समाजाची एक आदर्श विकसित अवस्था त्यांनी कल्पिलेली होती. प्रत्यक्षातला समाज हा विरूप, विखुरलेला विविध दु:खांनी भरलेला ते पाहात होते. हे विरूप, ही दु:खे नष्ट करण्यासाठी या समाजातल्या माणसांनी बदलले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती. वामन मल्हारांच्या सर्व लेखनात नीतिमूल्यांची चर्चा आहे. ईश्वराचे अस्तित्व, धर्म, पाप पुण्य, ज्ञान इत्यादी विषयांचा ऊहापोह आहे. हे सारे विषय अंतिमत: माणसांच्या – नव्हे मानवसमूहाच्या — समाजाच्या सुखाशी निगडित आहेत. सुख म्हणजे वैयक्तिक सौख्याची भावना नव्हे, तर समाजाच्या कल्याणाची भावना, ‘स्व’ कडून ‘सर्वांकडे’ जाणे हे आत्मिक उन्नयन बामनमल्हारांना अपेक्षित आहे. सुशीलेचा देव या कादंबरीतले प्रत्येक महत्त्वाचे पात्र ‘स्व’कडून बहुतांच्या हिताच्या भावनेकडे विकसित होत जाते. दगडाला देव मानणे, आपला देव दुसर्‍यांच्या देवापेक्षा मोठा आहे, तो मला पास करील असे मानणे, पती हाच देव आणि तोच पूज्य मानणे — आणि हरएक देव आपण निर्माण केले आहेत आणि त्यांना आता जलसमाधी देण्याची वेळ आली आहे असे म्हणणे ही सुशीलेच्या ‘देव’ विषयक विचारातली क्रांती नाही, तर वैयक्तिकतेकडून व्यक्तिनिरपेक्षतेकडे, स्व-कडून समाजाकडे तिने केलेला तो प्रवास आहे. या प्रवासाची सुरुवात तिच्याशी अत्यंत दुष्ट वर्तन केलेल्या तिच्या पतीला तिने केलेल्या क्षमेपासून होते. ‘अहं’ तिथे गळून पडतो आणि एक उदार क्षमाशील दृष्टी आणि त्यातून येणारा सेवाभाव उरतो. जीवनकलहात टिकेल तो खरा, टिकणार नाही तो फुकट – भौतिकशास्त्राच्या नियमनाशिवाय दुसरे नियमन नाही – सुखाशिवाय दुसरे साध्य नाही – अशा विचारांचा रावबा आणि त्याचा जडवाद या सुशीलेच्या सौजन्यापुढे आणि परिणत, प्रगल्भ व्यक्तिमत्त्वापुढे पराभूत होती, असे दाखवताना जड़वादी तत्त्वज्ञान, जर ते केवळ वैयक्तिक सुखाचा विचार करीत असेल तर ते निरुपयोगी आहे. एवढेच नव्हे तर इतरांच्या दु:खांना कारण ठरणारे आहे, केवळ स्वत:चा किंवा व्यक्तीचा विचार करणे इतरांना दु:खद असू शकते हे वामनमल्हारांना सुचवायचे आहे.

‘सुशीलेचा देव’ या कादंबरीतला मोठा भाग समाजाच्या दु:स्थितीचे चित्रण करणारा आहे. एखाद्या आदर्श तत्त्वज्ञानाचा स्वत:च्या सोयीने संकुचित अर्थ करणारी गिरिधरराव किंवा रावबा ही माणसे, लोणावळ्याच्या वसतिगृहाशेजारी पाले टाकून जगणारी, अज्ञान, दारिद्रय, रोगराई सहन करणारी माणसे, गिरणीतले संप करणारे मजूर, अस्पृश्यता, दुष्काळ, प्लेगसारख्या साथी, त्यांचा फायदा घेऊन गरिबांना नाडणारे संधिसाधुः गरिबांविषयी कळवळा दाखवणारे पण त्यांना आपल्या धर्माच्या कळपात ओढू पाहाणारे मिशनरी — या साऱ्यांची वर्णने या दुःस्थितीचे चित्रण करणारी आहेत. ‘आपल्या चालीरीती, आपले विचार, आपला धर्म, सर्व काही rotten झालेले आहे – कुजलेलं आहे —– पार सगळी ही घाण काढली पाहिजे’ — असे आवेशाने म्हणणारी शुशीला म्हणजे ही दु:स्थिती नष्ट झाली पाहिजे अशी निर्धाराने व्यक्तिगत सुखे बाजूला ठेवून वाटणारी, ते अज्ञान, अंधकार आपल्यापरीने दूर करू पाहणारी एक अशी व्यक्ती आहे, जी आईच्या किरणासारखी वामन मल्हाररांनी स्वत:ला दिसलेली आहे! ‘समाजातल्या क्षुद्र स्वार्थीपणाचा, संभावित ढोंगीपणा , स्वयंसंतुष्ट भांडवलशाहीचा, सदाचारहीन धार्मिकतेचा —- तिला अगदी वीट आला होता’ या शब्दांत दामनमल्हारांनी स्वत:च्याच अस्वस्थतेचे चित्रण केलेले आहे. परंतु ही है चित्रण प्रचाराचा सूर धरीत नाही हे विशेष. या कादंबरीचा आणखी एक विशेष म्हणजे तिच्यातील वास्तववाद. या कादंबरीतली सर्व पात्रे, खरीखुरी, भोवताली रात, (ती कल्पित नाहीत खरीखुरी आहेत हे वाचकांना पटवण्यासाठी वामनमल्हारांनी चरित्र लिहिणारा लेखक, त्याने मांडलेल्या गोष्टींमध्ये दुरुस्ती करून स्वतःचा काही मजकूर लिहिणारी सुशीला, आणि पात्रांनी एकमेकांना पत्रे लिहून घडलेल्या क्रीगरी, विचार कळविणे —- असे ‘तंत्र’ वापरले आहे.) हे लेखन समाजहिताच्या तळमने केलेले असूनही उपदेचा वास मारीत नाही, आदर्शाची ओढ व्यक्त के ही स्वप्नरंजनात्मक वाटत नाही, ही कठी गोष्ट वामन मल्हार सहजगत्या करू इक याचे कारण ही कादंबरी लिहिताना त्यांची भूमिका विचारवंताचीच राहिली. विचारातून स्फुरलेले आणि विचार मांडणारे हे लेखन ललित कृतीपासून मिळणार ‘कल्पिता’चा आनंद बा रोमांचकारिता देणारे नसेल, पण ते वाचकाला अंतर्मुख बनवते आणि विचार करायला लावते हे निश्चित. हरिभाऊंपेक्षा वामन मल्हारांमध्ये वाचकांना अंतर्मुख बनवण्याची ताकद अधिक आहे. आता, शीलेची देव पुन्हा, या जाणत्या वयात वाचताना वाटले, वामनमल्हारांचे सर्व साहित्य पुऩ्हा एकदा वाचले पाहिजे!

२४ न्यू शेल्टर, ‘बी’ रोड, चर्चगेट, मुंबई ४०००२८

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.