सत्यशोधक वामन मल्हार जोशी

वा.म. जोशी ‘सत्यं, शिवं, सुंदरम’ या तत्त्वत्रयीचे निष्ठावंत उपासक आहेत. सत्यनिष्ठेने जीवनाला भरभक्कम आधार मिळतो. नीतिमत्तेने जीवनाला स्वास्थ्य लाभते, आणि सौंदर्याने जीवनात आनंद निर्माण होतो. मानवतेच्या सर्वांगीण हिताकरिता उपकारक अशी ही तत्त्वे आहेत.

वाड्मयकलाविषयक माझी दृष्टी या लेखात वामनराव जीवनवादी दृष्टीने कलेची मीमांसा करतात. ‘कला हे जीवनाचे एक अंग आहे, पण ते जीवनसर्वस्व नाही’ असे म्हणून नंतर ते सांगतात,’जीवनात कला नसेल तर ते बेचव, नीरस, कळाहीन होईल हे खरे, पण सत्य नसेल तर ते लुळे, आंधळे, पांगळे होईल आणि नीती नसेल तर ते रोगट, कुजके, नासके होईल. अर्थात या तिहींपैकी कोणाचेही अनिर्बध स्तोम माजवण्यात अर्थ नाही.’ अशा नेमक्या शब्दांत मानवी जीवनाच्या संदर्भात सत्य, नीती, कला यांचे मूल्यमापन वामनराव येथे सादर करतात. या तीन तत्त्वांविषयी ते तारतम्याने बोलतात, पण त्यांच्यांत ते श्रेष्ठकनिष्ठभावाची प्रतवारी लावताहेत असे मात्र वाटत नाही. ही तीनही तत्त्वे त्यांना आपापल्यापरीने मोलाचीच वाटत राहतात. केवळ कलानंदासंबंधी बोलताना ते म्हणतात,’आनंद हे कलेचे अवतारकृत्य खरे, पण नीतीच्या नरड्याला नख लावून किंवा सत्य पायदळी तुडवून केला नाच करू लागली तर सात्त्विक आनंद मिळणार नाही’.

आनंदामागील ‘सात्त्विक’ हे विशेषण वामनरावांच्या अभिरुचीचे द्योतक आहे. वामनरावांना समग्र जीवनाचे रान असल्यामुळे जीवनाचेच एक अंग असलेल्या कलेविषयीचा त्यांचा हा विचार मौलिक आहे. जीवनाला सत्याचा आधार असावा, नीतीची निकोपता असावी, सौंदर्याची रसवत्ता असावी असे त्यांना वाटते. सत्य, नीती आणि सौंदर्य ही त्यांची अभिलषिते आहेत. जीवनमूल्ये आहेत.

वामनरावांचा जीवनाभिमुख लेखनात उदात्त तत्त्वांकडे अंगुलिनिर्देश करणारा श्रेष्ठ मूल्यभाव आहे. वाड्मयीन महात्मतेचे एक महत्त्वाचे गमक म्हणून मढेकरांनी मूल्यभावाचा गौरव केला आहेते म्हणतात- ‘मानवी जीवनातील महात्मतेचे मापन कुठल्यातरी मूल्यभावाने, sense of value ने ठरविले जाते…नि:संदिग्ध कैवल्यपूर्ण मूल्यभावाच्या गर्भित सूचनेखेरीज कुठल्याही लिखाणाला सामर्थ्य येणे शक्य नाही.’ उदाहरण देताना मढेकरांनी रंजनवादी ना.सी. फडके यांच्या तुलनेत वामनरावांच्या लेखनात हा मूल्यभाद अधिक असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. हा मूल्यभाव म्हणजे त्या त्या व्यवहारक्षेत्रात संगदी उत्पन्न करारे तत्त्व असते. वामनरावांच्या लेखनात सत्यनिष्ठा, सौजन्य, सौंदर्य था तीन मूल्यांनी एक हृद्य सुसंगती आली आहे, आणि म्हणूनच त्यांचे लेखन वाङ्मयीन महात्मतेच्या कसोटीस उतरणारे आहे.

वामनराव स्वत:ला अभिप्रेत असलेल्या मूल्यभावानिशी समाजाकडे पाहतात. सत्याची प्रचलित रूपे, नीतीची प्रचलित रूपे, सौंदर्याच्या प्रचलित कल्पना ते न्याहाळतात; त्यातील उणिवा लक्षात घेतात. त्याचप्रमाणे सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक, मानसिक समस्यांचे निरीक्षण करतात. सत्यशोधकाच्या दृष्टीने त्यातील दोष, अधुरेपणा ध्यानात घेतात. त्यांना अपेक्षित असणारा मूल्यभाव कुठेकुठे अन् कसकसा हरवला आहे आणि तो पुनश्च कसा प्रस्थापित करता यईल याचे मार्मिक विवेचन ते करतात. त्यामुळे त्यांच्या लेखनात तेव्हाच्या समाजाचे प्रत्यक्ष स्वरूप आणि वामनरावांना अभिप्रेत असणारे त्या गगजाने र स्वरूप या दोहोंचही स्पष्ट चित्र वाचकांना दिसते.

समाज कसा आहे ते तर दिसतच असते. पण तो कसा असावा यासंबंधी मात्र मतभेद संभवू शकतात. ही मते कित्येकदा परस्परांना छेद देणारी असतात. एखाद्या विषयासंबंधी विविध मतप्रणालीबाबत आस्था दाखविण्याचे सौजन्य वामनरावांच्या ठायी आहे, आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी स्वेतरांचे म्हणणे शांतपणाने ऐकून त्यातील सत्यांश घेऊन आपल्याला भावलेल्या सत्यांशाशी त्याची सांगड घालण्याचे सौजन्य प्रत्येकाजवळ असावे अशी त्यांची अपेक्षाही आहे. कारण या सौजन्याच्या अभावी समाजात संघर्ष माजतो. ताणतणाव निर्माण होतात. मतभेद विकोपाला जातात आणि दोन गटांत वितुष्ट येऊ शकते. वामनरावांना मतभिन्नतेमुळे असे वितुष्ट नको आहे. या सार्‍या मतभेदांची त्यांना सामोपचाराने चर्चा हवी आहे. अशा वादप्रसंगी सामंजस्याने चर्चासत्रे घडवून आणली तर ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’ या न्यायाने काहीतरी तत्त्वबोध हाती लागेल असे त्यांना वाटते. खुद्द वामनरावांच्या लेखनात तत्कालीन परस्परविरोधी विचारप्रवाहांचे सादपडसाद ऐकू येतात. सत्यशोधकाच्या दृष्टीने ते परिस्थितीचा वेध घेतात, उणिवांवर नेमके बोट ठेवतात, आणि समस्यांचे समंजस निराकरण करतात. त्यांच्या सत्यनिष्ठेने, सौजन्यशीलतेने आणि गंभीर, सुसंवादी सौंदर्यदृष्टीने त्यांना हे सारे सहजपणाने साधते.

सामान्यांची दृष्टी नेहमीच धर्म, परंपरा, चालीरीती या झापडांनी बंदिस्त झालेली असते. या दृष्टीला जे दिसते त्याचे बौद्धिक स्पष्टीकरण त्यांना देता येत नाही. ही मर्यादित दृष्टी तिच्या कक्षेत नसलेल्या सत्याला पाहू शकत नाही. त्यामुळे मला दिगते तेन तेवढे खरे ही वृत्ती समाजात काळते. ‘मतामतांचा गल्बला। कोणी पुरोना कोणाला।’ असा प्रकार बहुधा समाजात आढळतो. ‘माझ्या अनुभवाचे आणि विचाराचे सार’ या लेखात सत्याच्या व्याप्तीसंबंधाने यापनराव म्हणतात — ‘पूर्ण सत्य कोणाही एका व्यक्तीच्या, इतिहासकाराच्या, दर्शनकाराच्या वा धर्मसंस्थापकांच्या हाती लागलेले नाही’ — यापैकी प्रत्येकाला सत्याचा एखादा दुसरा अंश तेवढा दिसू शकतो. वामनरावांचे सत्यदर्शन आध्यात्मिक पातळीवरचे नाही तर ते ऐहिक आहे. ‘नीतीचा देह आणि नीतीचा आत्मा’ या लेखात त्यांनी ‘देह’ आणि ‘आत्मा’ हे शब्द वापरले आहेत, पण त्यांनी दर्शविलेला नीतीचा देह आणि नीतीचा आत्मा आपल्याला या भौतिक जगातच अनुभवता येतो. ‘प्रत्यक्ष कमपक्षा नीतिमत्ता ही अंतस्थ हेतूवरून जोखावी’ असे ते म्हणतात, आणि एरवी आपल्याला दिसू न शकणाच्या नीतीच्या अंतरंगावर ते प्रकाश टाकतात. नीतीचे प्राणतत्त्व कोणते आणि तिचे चलनातील रूप कोणते व कसे ते वामनराव या लेखात मर्मज्ञतेने दर्शवतात. त्यांचे तत्त्वचिंतन असे प्रगटले आहे. याच लेखात ते म्हणतात — ध्येय हे एखाद्या तान्याप्रमाणे आकाशात राहून चालावयाचे नाही; ते या कर्मभूमीवरील व्यवहारात उतरलेच पाहिजे. सुशीलेचा देव या कादंबरीत त्यांनी देवालाही ध्येयाच्या रूपात उभे केले आहे. दगडाला देव मानण्यापासून तो ध्येय हाच देव मानण्यापर्यंत सुशीलेची देवविषयक संकल्पना या कादंबरीत उत्क्रांत होत जाते, आणि वामनरावांना अभिप्रेत असणारा देव मानवी ध्येयाच्या रूपात दिसू लागतो.
वामनरावांच्या काळात स्त्री परंपरेच्या जोखडातून मुक्त होत होती. शिक्षणामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत होता. त्यामुळे सामाजिक, कौटुंबिक समस्या निर्माण होत होत्या. स्त्रीची कलानिष्ठा आणि तिचे कौटुंबिक कर्तव्य, प्रेमविवाह, विधवाविवाह —- त्यातून उद्भवणारे काही प्रश्न, परकीय सत्तेमुळे देशभक्ती, देशभक्तीपायी घरादाराकडे दुर्लक्ष, देशभक्तांच्या स्त्रियांच्या समस्या — अशा कितीतरी बाबींची चर्चा वामनरावांनी आपल्या रतनातूर केली. समस्यांना समर्पक उत्तरे सुचविली आहेत. त्यांच्या कादंबच्यातील खूपसा भाग रात्विक चर्चानीच व्यापला आहे. प्रारंभी क्रांतिकारक वाटणारे बंडखोर, प्रसंगी अनीतीचे वाटणारे विचारही वाचकांच्या विवेकबुद्धीला पेलतील अशा रूपात मांडले आहेत. बधवापुनर्विवाह आणि त्याहीपेक्षा अपवादात्मक परिस्थितीत द्विपतिकत्वही समर्थनीय असल्याचा क्रांतिकारक विचार ते ‘आश्रमहरिणीत’ अतिशय प्रभावीपणे मांडतात. एखाद्या प्रश्नाच ते साकल्याने विचार करतात आणि त्यांना भावलेले शुद्ध उत्तर कितीही लोकविरुद्ध असले तरी त्याचा ते खुशाल उच्चार करतात. त्यामुळेच त्यांच्या कादंबच्यातील चर्चा अधिकाधिक विशाल सत्याची ओळख पटवीत राहतात. ‘रागिणी अर्थात काव्यशास्त्रविनोद’ हे शीर्षकच त्या कादंबरीतील चर्चावर प्रकाशझोत टाकणारे आहे. स्त्रीस्वातंत्र्यासारखे सामाजिक प्रश्न तर या चर्चामध्ये आहेतच, पण ‘ब्रह्म निर्गुण की सगुण ?’ ‘अंत:स्फूर्त ज्ञान श्रेष्ठ की तर्क श्रेष्ठ ?’ ‘जग आनंदरूप की दुःखरूप?’ यांसारखे मानवी जिज्ञासेला सदैव जागे ठेवणारे तात्त्विक प्रश्नही या कादंबरीत चर्चिले गेले आहेत. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील या प्रश्नांचीही काही समाधानकारक उत्तरे सापडतात का यासाठी या चर्चा आहेत.

लेखनातील अशा चर्चाप्रसंगी परस्परविरुद्ध मतांचा ऊहापोह करण्यात वामनराव कमालीचे चातुर्य प्रगट करतात. सर्व बाजूंचा विचार करीत करीत त्यांना समाधानकारक सत्यापर्यंत पोचायचे असते. एका प्रश्नाच्या अनेक बाजू ते सारख्याच समर्थपणाने मांडू शकतात, आणि त्यातील अधिक सत्य बाजूबद्दल नि:शंक कौल देऊ शकतात. कारण सत्य हे एकेरी वा एकांगी नसून त्याचा प्रकाश अनेक ठिकाणाहून येत असतो यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे वाङ्मयानंदाची कारणमीमांसा असो, अलीकडे महाकाय व निम्पा होत नाही यासारखा प्रश्न असो, पक्षभेद-पक्षद्वेष पसरवा व्यावहारिक कारणाचा विषय असो.ते भरतेने आतिन्दजिज्ञासू वृत्तीने त्याच्या कन हान. त्यांची ही चचप्रवण व ‘ज्ञान हे विश की अमृत?’, यात सर्वांगान्धी प्रगटली आहे. ‘ज्ञान है विषासारखे धातक आहे’ या पूर्वपक्षाची बाजू त्यांनी वकिली दाण्याने प्रथम डली आणि उत्तरपति या मताकी मर्यादा त्यांनी तेवढ्याच कौशल्याने स्पष्ट केली, आणि तर न्यायाधीशांच्या भूमिकेतून ज्ञान हे अमृतासारखे चिरंजीवित्व देणारे आहे हा उत्तरपक्ष त्यानी साधार सिद्ध केला. ज्ञानप्राप्ती ही मानवतेला नि:संदिग्धपणाने उपकारक आहे हे सत्य त्यांनी निखळ चर्चात्मक पद्धतीनेच वाचकांपुढे ठेवले.

भिन्न भिन्न मतांतील ग्राह्यांश वामनराव नेमका ओळखू इकतात. त्याचा आदर करतात अग्रि त्यानंतर त्याचे मूल्यनही करतात. त्यामुळेच त्यांना आपल्या लेखील चर्च यस्तीपणाने रंगवता आल्या आहेत. त्या चर्चातून प्रतिभा विषयाची त्यांना बसलेलं राः अंगे उजळून निघतात. प्रश्न उलगडले जातात. व्यापक सन्याच्या आधाराने समस्या अधिक मोकoया होतात. चिंतनशील सत्यशोधकाच्या स्वाभाविक वृत्तीमुळे त्यांचे मार लेखन असे चवप्रवण आणि वेधक झाले आहे. वैचारिकतेच्या पायावर उभे रान उन्याकडेन्यः लेखनाची चिरंतन परिणामकारकता सांगताना व.ल. कुळकर्णी म्हणतात —- ‘वामनरावांचे लिखाण वाचल्यावर चित्तवृत्ती स्थिरावतात. मनाला प्रसन्नता येते. अंत:करणातील सत्प्रवृत्तींना नवी पालवी फुटू लागते. जीवनावरील विश्वास वृद्धिंगत होता. वृत्ती अंतर्मुख परंतु आशायुक्त बनते.’

अशारीतीने एकाच वेळी चित्ताला, मनाला, अंत:करणाला तोषविणार हे लेखन आहे, आणि त्याचवेळी वाचकाला जीवनसन्मुख करण्याचे सामर्थ्यही या लेखनात आहे. सत्यशोधक वामनरावांच्या लिखाणातून सत्याचे मूलभूत रूप, नीतीचे अंतस्थरूप आणि कलानंदाची साविका यासारख्या या जगातल्याच, पण गाभ्याच्या जागा अधोरेखित होतात. हीच या लेखनाची यशस्वित!

‘ज्ञानपीठ’, राठीनगर, अमरावती ४४४६०३

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.