‘आश्रमहरिणी’च्या निमित्ताने

आश्रमहरिणीही वामन मल्हार जोशी यांची एक वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी. वामनरावांची कलात्मकता, त्यांची वैचारिकता आणि त्यांची प्रागतिक सामाजिक विचारसरणी या कादंबरिकेत प्रभावीपणे प्रगटली आहे. धौम्य-सुलोचना – भस्तिगती यांची त्रिकोणी प्रेमकथा एवढाच या कादंबरीचा आशय नाही, तर विधवापुनर्विवाह आणि अपवादात्मक परिस्थितीत द्विपतिकत्वही समर्थनीय ठरू शकते असे प्रतिपादन करणारी ही कादंबरी आहे.
बालविवाहाचा निषेध आणि विधवा-पुनर्विवाहाचा पुरस्कार एकोणिसाव्या शतकापासूनच सुधारक समाजापुढे मांडत आले होते. तरीसुद्धा अजून विधवा पुनर्विवाहाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी निकोप नव्हती. ही समाजाची परंपराप्रियता वामनरावांनी हेरली. त्याचबरोबर पौराणिक वर्णन – पद्धतीचा चतुराईने वापर करून आश्रमहरिणत पोथीचा आभास त्यांनी निर्माण केला. ‘सत्याभासा’चा एक उत्कृष्ट नमुना म्हणून आश्रमहरिणकडे सहज बोट दाखविता येते. ‘अध्याय पहिला, श्रीगणेशाय नमः ।’, ‘श्रीपाराशर उवाच ।’ असा प्रत्येक अध्यायाचा प्रारंभ करून ‘इति श्रीपाराशपुराणे…नाम…अध्यायः समाप्तः । शुभं भवतु ।’ असा पोथीला साजेसा अध्यायांचा शेवट करून अकरा अध्यायांत त्यांनी या पोथीरूप कादंबरीची बांधणी केली. पोथीला भावेल, पुराणांच्या पार्श्वभूमीला शोभेल अशी निवेदनशैलीही त्यांना अवगत होती. म्हणून मग नारद अला, हिरण्यगर्भ राजा आला आणि ऋषिमुनींचा अवतार या अवनीवर झाला अशी त्यांनी कथेची गुंफण केली. वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य कथेच्या या बाह्यरूपात नसले तरी पुराणपात्रांच्या तोंडी असलेल्या सद्य:स्थितीतील विचारविलसितांनी वाचक मंत्रमुग्ध होऊन जातो. ही किमया वामनरावांतील कल्पकतेची तर आहेच, शिवाय त्यांच्या वैचारिक स्रोताचेही ते एक फलित आहे. पुरोगामी विचार समाजाच्या पचनी पडेल, समाजाला रुचेल अशा रीतीने त्यांनी बुद्धिपुरस्सर या कादंबरीची रचना केली. कारण या रूढिप्रिय, परंपरागत समाजमनाची आपले वेद, उपनिषदे, पुराणे यांवर अढळ श्रद्धा आहे, अतीव भक्ती आहे. ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति ।’ हे मनूचे वचन ‘मनुस्मृती’तले वचन म्हणूनच आजवर शिरोधार्य मानले गेले, हजारो वर्षे त्याचाच पाठपुरावा केला गेला. जे पुराणांतरी आहे ते ते डोळे मिटून आचरावे ही समाजाची एक चिवट वृत्ती आहे. म्हणून वामनरावांनी या छोटेखानी कादंबरीला पोथीचा साज चढवला आणि आपला स्त्रीविषयक दृष्टिकोण मांडून समाजमनाला अंतर्मुख करण्याचा यथाशक्ति प्रयत्न केला. म्हणून मग त्यांनी या एकादशाध्यायीच्या सुरुवातीला आणि समारोपातही पोथीसदृश वाक्ये पेरली. अधूनमधून ‘येथील श्लोक ग्राम्य दिसतो व पुरा लागलाही नाही म्हणून गाळला आहे’, ‘येथे बाल सुलोचनेच्या सुंदर लोचनांचे व इतर अवयवांचे नेहमीच्या पद्धतीचे लांबलचक जे मुळात वर्णन आहे ते गाळले आहे, ‘पोथीचे पान फाटले असल्यामुळे येथील दोन तीन श्लोक गाळले आहेत’, ‘या चारपाच श्लोकांतील श्लेष व विरोधाभास हे अलंकार भाषान्तरात चांगले साधणे शक्य दिसत नाही’, ‘या कृत्रिम भाषाशैलीवरून हे पुराण बाणाच्या काळचे (शे-दोनशे वर्षांनी मागचे पुढचे) असावे, असे वाटते,’ ‘मुळात असा असा शब्द आहे’, ‘मुळातील काही श्लोक येथे गाळलेले आहेत’ अशा कितीतरी तळटीपा दिल्या. जणू खरोखरी एखाद्या जुन्या संस्कृत पुराणाचे मराठीत अक्षरश: भाषांतर करीत आहेत असे वाचकास वाटावे. या साच्या विचारविनिमयात ‘स्वीधर्मविषयक प्रश्न’ हा मूळ आहे. सुलोचनेच्या रूपात येथे तो प्रश्न उभा आहे. या संदर्भात वा.ल, कुळकर्णी म्हणतात, “एकाच वेळी आपण कालिदासाच्या ‘शाकुंतला’चा व शेक्सपियरच्या ‘A Midsummer Night’s Dream’चा आस्वाद घेत आहात असे वाटते. त्यात काय आहे, तितकाच वास्तवाचा भाग आहे.” (जामन मल्हार – वाड्मयदर्शन: पृष्ठ ४८), आश्रमहरिशील काही घटनांची कल्पना वामनरावांना एनॉक ऑरडनवरून सुचली असे अनेक टीकाकारांचे म्हणणे आहे. मी आणि माझी पुस्तके या भाषणात खुद्द दामनरावांनीही कबुली दिली की,’आश्रमहरिणीतील पोथीची कल्पना आपल्याला प्रो. देन यांच्या तत्समन कल्पनेवर आधारलेल्या लघुकादंबर्‍यावरून सुचलेली असण्याचा संभव आहे. या तंत्रविशेषापेक्षाही या कादंबरीचा आणखी एक महत्त्वाचा विशेष म्हणजे, पहिल्या आवृत्तीत गभस्तिगती व सुलोचना यांचा त्यांनी सर्पदंशाने मृत्यू होतो असे दाखवून पुढचा सारा पात्रांच्या दृष्टीने, भावनिक संघर्षाचा भाग आणि वाचकांच्या समाजदृष्टीला धक्का देणारा द्विपतिकवाना प्रसंग टाळला आहे. पण पुढील आवृत्तीत मात्र त्यांनी आकस्मिक मृत्युचा प्रसंग वगळला. त्याऐवजी धौम्य — गभस्तिगती — सुलोचना हे जिघर्ही आनंदाने उर्वरित आयुष्य घालवतात असा शेवट केला आहे. पहिल्या आवृत्तीत केवळ निवदनशैलीचे नावीन्य आणि विधवाविवाहाचा प्रश्न प्रगटला, तर दुसरीत वामनरावांची प्रागतिक विचारसरणी रामाजाला मानवणाच्या पुराणप्रियतेच्या आभासातून यशस्वीपणे व्यक्त झाली. रूद कल्पनांना हादरा देण्याचे दामनरावांचे मनोधैर्य दुसर्‍या आवृत्तीपर्यंत वाढले असावे. मध्यंतरीचा काळ सुलोचना या पात्राप्रमाणेच त्यांनीही दोलायमान अवस्थेत घालवला असावा. पण त्यांनी केलेला हा बदल त्यांच्या तत्त्वप्रवण वृत्तीवर प्रकाश टाकणारा झालेला आहे. मानवतेला सुखावह होईल अशा प्रकारांनी सामाजिक समस्या सोडवल्या जाव्या, सायांनाच सुख लाभावे, स्वास्थ्य लाभावे असा त्यांचा समाजहितपर दृष्टिकोण पावन सिद्ध होतो. सबंध कथाप्रवाहात ‘नियमांना अपवाद’ या संकल्पनेचा सतत पाठपुरावा करण्यात येऊन ‘तडजोड’ हा जीवनप्रवाहाचा एक भाग म्हणून येथे स्वीकारला आहे. साधक-बाधक विचारांती ‘अपवादा’चा समावेश मुख्य धारेत केला आहे. त्यासाठी जागजागी संस्कृत श्लोकांचा आधार दिला आहे. मानवी जीवनाच्या सुखद यशस्वितेसाठी नियम आणि अपवाद एकमेकांवर आगपाखड न करता सहजगत्या खेळीमेळीने हातात हात घालून कसे वावरतील याची दक्षता येथे घेतली आहे. येथील पार्श्वभूमीच मुळी निसर्गाश्रयी आहे; नयनरम्य आहे. ही भूमी परतत्त्वाचा स्पर्श लाभलेली आहे. त्याला शोभेसे पूर्णप्रज्ञ कुलपती येथे आहेत; गभस्तिगती — थौम्यादी तत्त्वनिष्ठ ऋषी आहेत; कलागुणांची मूर्तिमंत पुतळी, लावण्यमूर्ती सुलोचना इत्यादी पात्रे येथे आहेत. पण बा.ल. कुळकर्णी म्हणतात त्याप्रमाणे ‘है स्त्रीपुरुष त्यांच्यातील पावित्र्यामुळे, शुद्ध धर्मभावनेमुळे, सात्त्विकतेमुळे जितके आपणापासून वेगळे भासतात तितकेच त्यांच्या ठायी असलेल्या मनुष्यसुलभ विकारांमुळे, लहानमोठ्या भावगुणांमुळे ते आपणास जवळचे वाटतात. वामन मल्हार वाङ्मयदर्शन, पृ. ४५)
समाजाच्या पोथीनिष्ट पुराणप्रियतेचा आधार घेऊन तत्कालीन सामाजिक प्रश्नांवर वामनरावांनी मनोज्ञ प्रकाश टाकला आहे. सुलोचनेची निव्र्याजता, गभस्तिगतीची सात्त्विकता आणि त्यागशील वृत्ती व धौम्याची विनोदप्रियता, धाडस, संवेदनशीलता या साच्या स्वभावगुणांचा वाचकांवर खोलवर परिणाम होतो. या व्यक्तिचित्रांच्या भावजीवनात राजाच्या जुलूमजबरदस्तीपायी जे वादळ माजले ते नाहीसे होण्याकरिता वामनरावांनी सांगितलेले पर्याय मानण्यात काहीही गैर नाही असे वाचकांनाही शेवटी वाटते आणि हीच या कादंबरीची यशस्विता आहे. एकीकडे मोहक तंत्र आहे अन् दुसरीकडे सामान्यांना पेलू न शकणारा । विचार आहे. या दोहोंचीही युती या कांदबरीइतकी अन्य कोणत्याही कादंबरीत साधलेली नाही. कलात्मकतेच्या अधाराने दामनरावांची तत्त्वसिद्धी या कादंबरीत प्रगटली. तर तत्त्वसिद्धीकरिता कलात्मकता साधनभूत ठरली आहे, आणि म्हणूनच ही वामनरावांची एक वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी असे म्हणावेसे वाटते.
‘आशीर्वाद’, स्टेट बँक कॉलनी
केशवनगर, अकोला ४४४००४