यमद्वितीयायाः उपायनम्

१९५७ मध्ये संसदेमध्ये हिन्दु-दाय-वितरण-विधेयक Hind code Bill मांडले गेले. त्याच्या योगाने महिलांना पूर्वी कधीही न मिळालेले हक्क प्राप्त होणार होते. त्या विधेयकाचे रचनाकार डॉ. वा. शि. बारलिंगे (त्याकाळचे राज्यसभेचे सदस्य) ह्यांनी त्यानिमित्ताने काही श्लोक रचले ‘ हिन्दु कोड बिला’ ने स्त्रियांना प्राप्त होणारे अधिकार हीच जणू भाऊबीज अशी कल्पना करून त्यांनी त्या श्लोकांना यमद्वितीयायाः उपायनम’ असे संबोधिले. ते पाच श्लोक आम्ही खाली देत आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या देशामधून दारिद्र्य हटवावयाचे असल्यास धनाचे वा मुद्रेचे प्रमाण वाढवीत नेऊन तिचे वितरण करण्याऐवजी उपभोग्य वस्तूंचे वितरण करणे योग्य होईल असा विचार सांगणारे सात श्लोक त्यांनी रचले आहेत. तेहि त्यासोबत प्रकाशित करीत आहोत.
संपादक
आत्मा भवेद्यदि सुतः खलु पुत्रनामा ।
अंगान किं प्रभवतीह सुताऽपि पित्रोः ।।
धर्म्यः पितुर्यदि धनेषु सुताधिकारः । दायं हरेत्र दुहितेति मृषा विवादः ।। १ ।।
धर्मः पुराण इति तत्रियमा अलंघ्या । नाहन्ति दायमबला इति यन्मतं च ।।
जानन्तु तेऽपि परिवर्तयतीह लोकान् । धर्मान्स्तथा बत पुराणतरो हि कालः ।। २ ।।
लोका निसर्गविषमा इलि ये वदन्ति । किं तैरिदं मनसि नैव विचारणीयम् ।।
भूतेषु तिष्ठति समांशतयाऽन्तरात्मा। धर्माधिकारसमता जनतन्त्रमूलम् ।। ३ ।।
स्त्रीदायहेतुरचलस्य पितुर्धनस्य । व्यर्थं नु चेद्विभजनेऽत्यधिका प्रवृत्तिः ।।
लोको भवद्यदि पुनर्वनिताविहीनः । किं दायसंविभजनेषु तदा विरामः ।। ४ ।।
भुजीत दायमबला किल जीवनान्तं । पुंसां तु तेषु निरपेक्षतयाधिकारः ।।
एवं तु चेत् कुटिल दुर्व्यवहारपूर्णा । कौटुंबिकी विषमता कलहस्य मूलम् ।। ५ ।।

द्रविण – सप्तकम् । गुणैर्विभित्रेषु जडेषु संभवेत् । कथं पदार्थेषु समानमूल्यता ।।
अहो नु चित्रं तदपोह मीयते । पदार्थमूल्यं कनक-प्रमाणतः ।। १ ।।
जडेषु मूल्यं परिमाणसाम्यकम् । सुनीति-मूल्यं तु सचेतनेष्वपि ।।
भवेच्च सौंदर्यकलादिमूल्यकम् । किमर्थक मूल्यमिहार्थकल्पितम् ।।२।।
श्रुतं यदध्यस्य बहुत्वमात्मनि । वृथाऽपि जीवेन जगद्विकल्पितम्।।
विभेदभावे ऽपि गुणैक्यरोपणम् ।निदानमर्थस्य मतिभ्रमोऽपरः ।।३।।
मृषात्वमेतजगतो भवेत्र वा । श्रुतेश्च तर्कादनुमीयते यतः ।।
इयं तु माया द्रविणैकरूपिणी । अभावमूलात्यनुभूयते जनैः ।।४।।
अभावमूलं परमार्थतो धनम् । कथं प्रयत्नादपि तस्य संचयः ।।
विहाय वा राज्यबलं स्थितिः कुतः। विनष्टसारं खलु राज्यसंक्षयात् ।।५।।
न केवळं भिन्नगुणैक्यकल्पनात् । सुवर्णमानेष्वनुबन्धनादपि।
श्रिया विहीनं कुविचारसंकुलम् । भ्रमात्मिका श्रीः कुरुतेऽखिलं जगत् ।।६।।
प्रवर्तितोऽयं द्रविणभ्रमो यतः । समाजकार्य सुकरं भवेदिति ।।
विसर्जनं तेष जनेष संपदान् । भ्रमापहारायच लोकशान्तये ।।७।।

(१) जगामध्ये ज्या जड वस्तू आहेत त्यांमध्ये कोणतीहि एक वस्तू दुसरीसारखी असते काय? म्हणूनच ज्याअर्थी एक पदार्थ दुसऱ्यासारखा नसतो त्याअर्थी त्यांची तुलना कोणत्याही एका पदार्थाशी होऊ शकत नाही. सोन्याने कोणत्याहि पदार्थाची किंमत ठरविणे हा मूर्खपणा नव्हे काय? सोन्याची किंमत सोन्यानेच करणे योग्य नाही काय?
(२) एक माणूस नीतिमान् आहे, दुसराही माणूस नीतिमान् राहूं शकतो. सौन्दर्यकलांची किंमत करता येते. सौंदर्य हेच मूल्य हे मला समजू शकते. परंतु पैशाला किंमत आहे असे म्हणणे निरर्थक आहे. तांदूळ हा तांदूळ आहे. त्याला सोन्याच्या तुलनेत मोजणे अयोग्य आहे.
(३) आत्मा एक आहे. त्यावर बहुत्वाचा आरोप करून हे जगत् निर्माण झाले आहे असें आम्ही ऐकतो. परंतु ज्या गोष्टी स्पष्टपणे अलगअलगआहेत त्यांवर एकत्वाचा आरोप करणे हा फार मोठा भ्रम आहे.
(४) हे जगत् खरे आहे की खोटे आहे याबद्दल विवाद असू शकतो. परंतु ही जी द्रव्यरूपी माया आहे ती खरोखर अभावरूप असतांनादेखील तिचा सर्वांना अनुभव येतो.
(५) वास्तविक धन हे अभावमूल आहे. तसे असता त्याचा संचय हा कसा काय शक्य आहे ? त्याच्या पाठीमागे राज्यबळ असल्याशिवाय धनाला काहीच अर्थ नाही. राज्य जर नष्ट झाले तर सर्व धन नष्टच होतें.
(६) त्या सुवर्णमानावर निबंध काहीच नाही. खरें द्रव्य नष्ट होते आणि माणसाच्या मनांत वाईट विचार येतात अशा त-हेने जगामध्ये भांडणे उत्पन्न होतात.
(७) म्हणून ज्यामुळे हा द्रव्यभ्रम निर्माण झाला तो कशासाठी तर सामाजिक कार्ये सुकर व्हावी म्हणून ही जी भ्रमरूपी श्री आहे तिचे विसर्जन करणेच योग्य होय.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.