पुस्तक परिचय

पुस्तक परिचय: भारतीय स्त्रीजीवन- ले. गीता साने (मौज प्रकाशन मुंबई)
गीता सान्यांचे ‘भारतीय स्त्रीजीवन’ हे पुस्तक १९८६ साली प्रकाशित झाले असले आणि गेल्यावर्षी त्याला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला असला तरी त्याच्याकडे अजून मराठीतील क्रियाशील आणि चोखंदळ वाचकांचे वाचकाचे म्हणावे तसे लक्ष गेले आहे असे वाटत नाही. कारण त्यात कथन केलेले अनुभव इतके दाहक आणि विचार इतके विद्रोही आहेत की त्याने हा वाचकवर्ग कळवळून उठला तरी असता किंवा खवळून विरोधी गञ्जना तरी करू लागला असता. परंतु गेल्या पाच वर्षात या पुस्तकाच्या अनुषंगाने असली आवाहने किंवा साद-पडसाद कानावर आले नाहीत एवढे मात्र खरे.
गीता साने महाराष्ट्राबाहेर असल्या तरी महाराष्ट्राला परिचित आहेत एक विदुषी म्हणून, लेखिका म्हणून आणि समाजकार्य करणाच्या विचारवंत म्हपान, तशा त्या किंचित आधीच्या पिढीतल्या, १९३४ साली एम्. एस्सी. झालेल्या. ‘चंबळची दस्यभूमी’ हे त्यांचे १९६४ सालचे पुस्तक महाराष्ट्र राज्य सरकारच्या पारितोषिकाचे मानकरी झालेले. त्या आधी दहा कादंबच्या प्रकाशित झालेल्या. १९४८ पासून बिहार ही त्यांची कर्मभूमी, धनबाद परिसरातील खाणकामगारांमध्ये केलेले काम विशेष उल्लेखनीय,
‘भारतीय स्त्रीजीवन’ हा त्यांचा ग्रंथ एक प्रबंध आहे. त्याच्या सिद्धीसाठी त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले आहेत. त्यांनी परिशीलन केलेल्या साहित्यात हिंदी, मराठी, इंग्रजी वर्तमानपत्रातील प्रासंगिक लेख आहेत. मुंबई-कलकत्ता, पाटणा-धनबाद, पुणे येथील नियतकालिकांमधून घेतलेले वृत्तान्त आणि निबंध यांचे दाखले आहेत. ‘स्त्री आणि न्यायव्यवस्था’ या विषयावरचे त्यांचे प्रतिपादन सुमारे ४० खटल्यांमधील निकाल आणि २०-२५ कायद्यांमधील तरतुदी यांच्या अभ्यासावर आधारले आहे. प्रतिपाद्य विषयावरील सुमारे ७५ इंग्रजी, ३० मराठी, २ हिंदी, २ बंगाली ग्रंथाचे संदर्भ त्यांनी पुरवले आहेत, असा प्रचंड अभ्यास, स्वतःचे चार तपांचे काम या आधारावर सज झालेला हा प्रबंध आहे. त्याची संशोधनविषयक गुणवत्ता पाहता विद्यापीठाची डी. लिट् पदवीही अपुरी वाटावी, जे. एस. मिलला त्यांच्या ‘स्त्रियांची परवशता’ (सब्जेक्शन ऑफ विमेन) या ग्रंथाबद्दल नावाजले जाते ते योग्यच आहे. पण खुद्द मिललाही परवश, दीन अबलांच्या दैन्याची नि दुःखाची इतकी जवळून ओळख असणे शक्य नाही. मग त्यांच्यातले एक होऊन त्यांच्या दुःखपरिहारासाठी झटण्याचा अनुभव तर दूरच,
भारतीय स्त्रीजीवनासंबंधी लेखिकेची खंत अशी की औद्योगिकीकरणाने स्त्रीजीवन पालटले खरे, पण त्याच्यात महत्त्वाचे असे परिवर्तन झालेले नाही. स्त्रिया आजहीं वेठबिगारीचे जिणे जगत आहेत. कुटुंबाच्या बंदिवान आहेत. समाजाने त्यांच्यावर तिहेरी, चव्हेरी ओझ लादले आहे. प्रजनन, बालसंगोपन, घराचा सांभाळ आणि होईल तेवढे अर्थार्जन, त्यातून दुर्दैव असे की, खुद्द स्त्रियांनाच आपल्या समस्या नीटपणे उमजलेल्या नाहीत. एरवी औद्योगिकीकरणाच्या प्रभावाने खिळखिळी होत चाललेली कुटुंबसंस्था टिकवून धरण्याच्या कल्पनेला त्या विरोध का करीत नाहीत? परंपरेचा उंबरठा त्या ओलांडत का नाहीत? कुटुंबनियोजनाला एवढे अपयश येते ते का?
लेखिकेला हवे आहे संपूर्ण परिवर्तन. आमूलाग्र नवनिर्माण. नवरचनेचे लहान मोठे तुकडे पुरेसे वाटत नाहीत.
स्त्रीसमस्यचे आणि एकूणच परिवर्तनाचे त्यांचे आकलन असेः
१. परिवर्तन होऊन चुकले आहे हा समज एक आभास आहे. अनुसूचित जातींच्या संघर्षाची धार तीव्रतर झाली आहे.
२. खालच्या थरांना परिवर्तनापासून वंचित ठेवून वरिष्ठ गटांना परिवर्तनाचे फायदे उपटायचे आहेत.
३. समतेचे तत्त्व प्रामाणिकपणे स्वीकारले तर सवलती-अधिकार यांची घेवाण करताना आधी देवाणीचा विचार करावा लागतो, कारण आपल्यापेक्षाही वंचित असणारे अधिक आहेत. संघर्ष वाढला म्हणजे वैचारिक गोंधळ वाढतो. आदिकाळापासून माणसाला मार्ग दाखवणार्‍या सारासारविवेकावरचा विश्वास उडतो. अंधश्रद्धेचा, आध्यात्मिक विचारांचा पगड़ा समाजावर बसतो.
४. स्त्री बुद्धीने पुरुषापेक्षा कनिष्ठ असते हा युक्तिवाद भ्रामक असल्याचे सिद्ध झाले आहे, स्त्रियांच्या दुय्यम स्थानाला निसर्ग जबाबदार नाही. ‘समाजाच्या संकेतांनी स्त्रियांना विवाह आवश्यक केला’… पातिव्रत्य हा सामाजिक संकेत आहे, निसर्गाचा नियम नाही. पतींशिवाय इतरांच्या संभोगाने स्त्रिया विटाळतात त्या समाजाच्या नियमांनी, सृष्टीच्या नियमांनी नव्हे. स्त्रियांच्या मुक्त भाचाराला काय किंवा संचाराला काय निसर्गाचा विरोध नाही, समाजाचा प्रतिबंध आहे.
५. संस्कृती वरिष्ठ वर्गाच्या अनुषंगाने उभी राहिलेली असते, त्याची प्रज्ञा, त्यांचे अनुभव, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन संस्कृतीमधील संकल्पना, तत्त्वज्ञान, परंपरा चरिष्ठ वर्गाला पोषक असतात. उदाहरणार्थ, स्वधर्मान प्राप्त झालेले कर्म हेच विहितकर्म असे डॉ. आंबेडकरांनी मानले असते तर भारताचे संविधान लिहिण्याऐवजी ते एखाद्या खेड्यात रस्ते झाडीत बसले असते. पडता रमाबाई केशवपन करून घेऊन एखाद्या वेदनारायणाच्या घरी पोळ्या लाटत बसल्या असत्या. त्यांचे काय नुकसान झाले असते ते सोडा, पण समाज केवढ्या मोलाच्या कार्याला मुकला असता! उत्तर भारताच्या मागास भागात फिरले म्हणजे फुले, आंबेडकर, रमाबाई यांच्यासारख्यांच्यामुळे सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्राने केवढी प्रगती केली, परिवर्तनाच्या वाटेवर तो किती पुढे गेला याची प्रचीती लेखिकेला स्वानुभवाने आलेली आहे.
६. परिवर्तन हे नव्या समाजरचनेचे डोहाळे आहेत. सामान्य माणसाला या नवरचनेचे स्वागत करावयाचे असेल तर त्याने जीवनाची सुरक्षित चाकोरी सोडायची तयारी ठेवावी. परिवर्तनासाठी नैतिक मूल्य जपणारी माणसे पुढे यावी लागणार आहेत. ती स्त्रियांमधूनही यावी लागतील. भारतात स्त्री-स्वातंत्र्याची चळवळ नाही. स्त्री-स्वातंत्र्याबद्दलचे आमचे विचार पुरेसे विकास पावलेले नाहीत. ‘आज एका स्त्रीलिंगापुढे स्त्रियांचे इतर सारे गुण कुढल्याही विकट प्रसंगी मातीमोल ठरत आहेत.’
ही परिस्थिती अनिष्ट आहे. एक माणूस म्हणून जगण्याचे, समाजात निर्भयपणे वावरण्याचे अधिकार मिळविण्यासाठी स्त्रीलिंगी समाजगटाच्या समस्यांचा सर्वांगीण विचार आवश्यक आहे. प्रस्तुत प्रबंध ह्या प्रकारचा विचार आहे. ह्या पाश्र्वभूमीवर ‘स्त्री आणि भारतीय न्यायव्यवस्था’, ‘स्त्री आणि भारतीय अर्थ-व्यवस्था’, ‘वेश्यासंस्था: व्यवसाय आणि व्यापार आणि शेवटी स्त्री आणि कुटुंबसंस्था’ या प्रश्नांचा विचार केला आहे.
या सर्वात शेवटच्या प्रकरणात त्यांनी जो निष्कर्ष काढला आहे. तो सामान्य वाचकाला मोठा हवालदिल करणारा आहे. त्यांचे अवलोकन असे की समाजाच्या अध्यअधिक वर्गात म्हणजे गरीब वर्गात कुटुंबसंस्था ही ‘बायको या गुलामाद्वारे नवे गुलाम पैदा करण्याचे साधन बनली आहे.’ त्याहून बरच्या वर्गात म्हणजे मध्यमवगत -तोही समाजाचा बराच मोठा भाग आहे- काळजीपूर्वक इन्जिली जाणारी मुल्ये विषमतेची जपणूक करणारी असतात. आता आपल्या समाजाला समता, स्वतंत्रता या मूल्यांची खरोखर आवश्यकता पटली असेल तर विषमता प्रस्थापित करणारे कुटुंब मूलभूत परिवर्तनाने बदलावे लागेल अथवा त्याला पर्याय शोधावा लागेल .
प्रस्तुत परिचय-लेखात या संबंधी लेखिकेचा युक्तिवाद थोडा विस्ताराने पाहू. समाजातील एकूण कुटुंबांपैकी दारिद्रयरेषेखाली असणार्‍यांची संख्या अधिक आहे. व मुख्यतः भूमिहीन आहेत. खेड्यात आहेत. अनुसूचित जाती जमातींचा भरमा माघिक आहे. या धरातले पुरुष जीवन- संघर्षात हार मानलेले असतात. बाप मुताना मायला समर्थ नसतो. पण कुटुंबावरचा अधिकार मात्र तो कसोशीने वापरतो. मल सात आठ वर्षाचे झाल्यावर त्याला काम लावून दिले जाते. वर्षाकाठी दीड दोन मण धान्य व पंधरावीस रुपये हा सालदाचा रेट (सुमारे वीस वर्षांपूर्वीचा-आता त्यात महागाईच्या मानाने वाढ झाली असणार) मुलाला मिळेल त्या कामावर पाठवले जाते. खेड्याबाहेर काम मिळाले तर तेही बापाला हवे असते. पण ठरलेल्या वेळी पगार घ्यायला मात्र तो हजर होतो, मुलींची स्थिती जास्तच वाईट कारण कन्याशुल्क घेऊन तिला एकदाच विकायची संधी, त्यामुळे मुळात मुलगी नको असते. तिच्या संगोपनात साहजिकच दुर्लक्ष होते. थोड्या वरच्या थरात गुंठा दोन गुंठे जमीन असते. तेथे संततिनियमनाला साहजिकच विरोध असतो. बायकोमले राबतील आणि खातील’ असा विचार असतो. बालश्रमिकांची संख्या १९७९ साली दीड ते पावणे दोन कोटी होती.
दर ५ वर्षांनी येणार्‍या निवडणुकीत समतेची आठवण त्यांना सुखावते. मात्र स्वतःसाठी समता मागताना दुसर्‍यांना समतेने वागवणे त्यांना सुचत नाही आणि कोणी शिकवीत नाही. घरातील स्त्रियांना समतेची वागणूक देण्याचे या पुरुषांच्या मनातही येत नाहीं. तात्पर्य स्त्रियांची वेठबिगार पुर्वीसारखीच राहते. समाजाच्या या थरांत एकच मूल्य असते, कसेतरी करून पोटाला दोन घास मिळवायचे. त्यांना परंपरागत जीवनातच सुरक्षितता वाटत असते. म्हणून तेच परिवर्तनाचे अडसर बनतात, समाजातील याच्या वरचा थर मध्यमवर्गाचा, ह्यात मुख्यतः उच्च जाती येतात. येथे शिक्षण आहे. महत्त्वाकांक्षा आहे. राज्यकारभारात सहभाग आहे. पण यातील कत्य माणसांची मती भगलेली आहे. परिवर्तनाच्या आजच्या काळातही या वर्गात मुजी होतात, लग्नात कन्यादाने होतात. मृत्यूनंतर सुतक पाळले जाते. आले होतात. चतुर्थी, शिवरात्रीची व्रत-वैकल्ये केली जातात, गणेशोत्सव साजरे होतात. या कटुंबातील मूल समज येताच विषमतेचे धडे शिकते. आईबाबांची कामे वेगळी, अधिकार वेगळे हे त्याला समजते. वडीलकीला आपोआप मान द्यायचा धड़ाती घेतात. आपले घर बाबांचे आहे. नंतर माझे आहे. मात्र ताईचे नाही ही भावना त्याच्या मनात रुजते. वयाने मोठे नोकर चाकर असले तरी त्यांना ” अरे-तुरे’ म्हणायचे, खालच्या जातीतले लोक वरिष्ठ अधिकारी बनून घरी आले तर त्यांची वर-वर करायची. याप्रमाणे सत्ता व श्रीमंतीपुढे लांगूलचालन करण्याचे धडे मिळतात, आज्ञाधारकता हा मोठा सदगुण ठरतो. देवाबद्दलची अंधश्रद्धा निर्माण होते. भक्ती आणि भीती या येथे जुळ्याबहिणी असल्याचे दिसून येते. वयाची पहिली ५-६ वर्षे मुलांसाठी अत्यंत संस्कारक्षम काळाची असतात त्यावेळी विषमतेचे बीज त्यांच्या मनात कुजवले जाते ते कुटुंबसंस्धतच, हृल्लीचे कुटुंबाचे वळही लहान झालेले असते. स्त्रीला पोटच्या पाराशिवाय बाकीची मते ‘लोकांची’ चाटतात. माजाबद्दन बांधिलकीचा विचार नसल्यामुळे रुजाचे विचार सर्वस्वी आपल्या मुलांचर केद्रित होतात. ज्या जीवनाला ती वंचित असते ते मुलांच्या रूपाने जगण्याची तिची धडपड असते. के. जी. पासून निरर्थक अभ्यासाचा तडा मुलाच्या मागे लागतो. विचाराला चालना देण्यापेक्षा पाठांतरावर भर देणारा अभ्यास असतो. स्पर्धा तर्काच्या मर्यादाबाहेर जाते. आपले मूल वर्गात पहिले यावे असे तिला वाटते. पण प्रत्येक वर्गात एकच मूल पहिले येऊ शकते हे तिला उमजत नाही.
ही कुटुंबे अंधश्रद्धांचे मळे ठरतात. समतेऐवजी विषमता, स्वतंत्रतेऐवजी आज्ञाधारकता हा येथील परिपाठ बनतो. सबंध भारतीय समाजाबद्दल एकात्मता वाटायच्या ऐवजी संकुचित स्वार्थाची लागवड यात होते. शाळेतले वातावरण कुटुंबातली परंपरानिष्ठ मनोवृत्ती घोटून पक्की करणारे असते. विज्ञानाचा अभ्यास केला तर तांत्रिक शिक्षणाची द्वारे उघडतात आणि चटकन् श्रीमंत करणारे व्यवसाय करता येतात, म्हणून विज्ञानाचे माहात्म्य! निसर्गाबद्दल जिज्ञासा हे खरे कारण नाही. विज्ञानाला अंधश्नचे वावडे आहे हे विसरले जाते. चांगली नोकरी मिळाली की सत्यनारायणाच्या पूजा होतात. लग्नासाठी पत्रिका पाहिल्या जातात.
वरिष्ठवर्ग मध्यमवगापिक्षा लहान आहे, यांच्या कुटुंबात संपत्ती असते, सत्ता असते. मुलांचे संगोपन नौकांच्या भरवशावर असते, अंधश्रद्धा, भूतप्रेते यांची छाप आपोआप मुलांवर पडते. या कुटुंबामधील मुले लहरी, आप्पलपोटी व इतरांबद्दल बेपर्वा बनतात. या वर्गात पुननिर्माणाला आवश्यक अशी समता व स्वतंत्रता ही मूल्ये आढळली तरच नवल. ही मुले जुनीच मूल्ये कवटाळून बसतात. मुलांपेक्षा मुलींवर परंपरांची पकड अधिक असते.
याप्रमाणे निष्क्रिय बहुजनवर्ग, जुन्या श्रद्धांना चिकटून बसलेला मध्यमवर्ग परिवर्तनाला विरोधी असतो, तसाच व्यापार-उदमी लोकांचाही एक वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त नफा हे एकच मूल्य यांनी स्वीकारले आहे. यांना कोणतीही गोष्ट निषिद्ध वाटत नाही. हाच वर्ग मुलांना गुन्हेगारीकडे वळवतो. समाजजीवनात पैशाचे महत्त्व अवास्तव वाढवतो, या वर्गातील खालच्या थरात शिक्षण, विद्वत्ता, संशोधन यांच्याबद्दल तुच्छतेची भावना आहे. साहजिकच हा गट परिवर्तनविरोधी असतो. या थरातल्या स्त्रिया अजून मध्ययुगीन जीवन जगत आहेत.
याप्रमाणे समाजामध्ये आढळणाच्या सर्व थरांतील कुटुंबामध्ये वाढणारी मुले समता आणि स्वतंत्रता या दोन मुल्यांना वचित असतात. आपल्याला हवे असलेले सामाजिक परिवर्तन याच मूल्यांवर आधारलेले आहे. त्यामुळे लेखिका वाचकाला अशा निष्कर्षावर आणून सोडते की,”तुम्हाला समता, स्वतंत्रता या मूल्यांची खरोखर आवश्यकता पटली असेल तर विषमता प्रस्थापित करणारे मध्यमवर्गीय कुटुंब किंवा वरिष्ठ वर्गातील कुटुंब मूलभूत परिवर्तनाने बदलावे लागेल अथवा त्याला पर्याय शोधावा लागेल.”
मध्यमवर्गाच्या खालचा आणि दारिद्रय रेषेच्या आसपास असलेला भारतीय समाजाचा अर्धा अधिक वर्ग परिवर्तनातला अडसर बनून राहतो. त्याच्यासाठी कुटुंबसंस्था ही कदंब राहिलेली नसते. समाज व व्यक्ती यांमधील दुवा, समाजाची कार्यकारी व्यवस्था असे ते राहिलेले नसते. “तर बायको या गलामाकरवी नवीन गुलाम पैदा करण्याचे साधन झालेली आहे.”
अ. ब. कुळकर्णी
१६ शांतिविहार,
सिव्हिल लाईन्स, नागपूर.

नरक-सफाईची गोष्ट: लेखक – अरुण ठाकूर आणि महमद खड्स (प्रकाशक – संजय में, गो. आणि मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई, मूल्य रू. ४०/-).
मराठी साहित्य-दालनात नरक-सफाईची गोष्ट’ सारखं पुस्तक वेगळ्याच अर्थानं महत्त्वाचं ठरतं. या दृष्टीनेच लोकांच्या आरोग्यासाठी रौरवात खितपत पडलेल्या भंगी” जातीची अभ्यासपूर्ण माहिती श्री. अरुण ठाकूर आणि श्री. महमद खड्स या लेखक-द्वयाने प्रस्तुत पुस्तकाच्या रूपानं करून दिलेली आहे. ही माहती मिळविताना फक्त ऐकीव गोष्टींवर विसंबून न राहता १९८३ ते ८५ या काळात जवळ जवळ चौतीस गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष भंगी जमातीतील ३३७ स्त्री-पुरुषांच्या मुलाखती घेऊन, शिवाय तद्विषयक अनेक ग्रंथांचे व अहवालांचे वाचन करून अभ्यासपूर्ण निष्कर्ष काढले आहेत. लेखकांनी अभ्यासार्थ घतलेली सर्व गावे निपाणीसह महाराष्ट्रभर विखुरलेली आहेत. म्हणून हा ग्रंथ या समाजाचे सर्वांगीण दर्शन करून देणारा ग्रंथ झाला आहे.
‘भंग’ व्यवसाय फक्त भारतातच नसून तो जपानमध्ये ‘एटा’, चीनमध्ये ‘चिअन’, तिबेटात ‘राग्याप्पा’ या नावांनी ओळखला जातो. सर्वप्रथम या विषयावर आगरकरांनी ६ फेब्रु. १८९३ साली सुधारकात स्वच्छतेसाठी घाणेरडा विषय’ हा लेख लिहिला होता. कोटयवधींच्या ‘इनेजेस बांधून स्वच्छतेचा प्रश्न सुटणार नाही असं आगरकरांचं मत होतं. त्यानंतर या चळवळीत सेनापती बापटांनी हे काम केले.
मोजोदारो संस्कृतीत मलवाहिन्यांची माहिती आढळते. धर्मानंद कोसांबी यांच्या ‘बौद्ध संघाचा परिचय’ या पुस्तकात ‘सुनीत’ हा भंगकुळातील पुरुष असल्याचा उल्लेख येतो. ‘पुष्क-छड़क’ असा त्याचा उल्लेख आढळतो. विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘भंगी’ चाल मुसलमान या देशात आल्यावरच आली असावी असे म्हटले. यावरून मुस्लिम स्त्रियांच्या गोषा-प्रथचा ‘पायखाना’ या संस्थेशी संबंध असावा असा निष्कर्ष लेखकांनी व्यक्त केला आहे. पू. ३८), हा व्यवसाय करणार्‍यांना जातिसंस्थेचे रूप अलिकडच्या काही शतकांतच मिळालं असावं, कारण ‘मनुस्मृतीत’ या व्यवसायाचा उल्लेख नाही. एन्थोनवेनच्या कोशात उच्च जातीतील सामाजिक बंधने, आचारसंहिता मोडणारे लोक जातिबहिष्कृत करून ‘भंगी’ झाल्याची नोंद असून वृद्ध भंगीही हेच कारण सांगतात.
शहरे वाढली आणि या व्यावसायिकांची गरज समाजाला अधिक वाटू लागली. नाशिक नगरपालिका १८६४ साली ४१.६८ इतकी रक्कम भंग्यांवर खर्च करीत होती. (१) सार्वजनिक सफाई कामगार आणि (२) शौचालये साफ करणारे कामगार असे दोन वर्ग तेव्हापासूनचे आहेत. महारांचा दर्जा निमसरकारी व गावमुकादम’ असा भाते, त्यांना जमिनी मिळाल्या त्या सरकारी कामाबद्दल. गावजोश्यापेक्षाही त्यांना अधिक होनातं मिळत असे. चावडीसमोरची साफसफाई तेवढी त्यांना करावी लागे (पृ. ४५).
भंगी जातीत सर्व धर्माचे लोक आहेत. आधी ते प्रतिलोम संततीचे असावेत. अनार्यापैकी असावेत, आणि नंतर ते ‘दलित’ (भगी ) झाले असावेत. पण अशी संतती पूर्वी ‘ चांडाळ’ संबोधली जायची. खरं म्हणजे सर्व जातिबहिष्कृत ‘भंगी’ समाजाच्या आश्रयाला येतात, असा उल्लेख करून लेखकानाजात-मवेशाच्या निधीची माहिती दिलेली आहे. जातपटेलच्या मान्यतेने प्रवेशदूंचं डोकं तासलं जातं. मेहेतरांच्या पाण्यानं त्याला आंघोळ घातली जाते आणि नवागतानं जातपटेलला सात रुपये द्यायचे असतात. मग अशा व्यक्तीला परत आपल्या मूळच्या जातीत जाता येत नाही. राजारातील भंगी समाजाला ‘अस्पृश्य मानलं जातं. वाकर, चांभार हे त्याच्याशी संबंध टाळतात, त्यांचा विटाळ मानतात. स्पश्य हिंदूंपेक्षाहीं तीव्र प्रतिक्रिया या बाबतीत हे वग व्यक्त करतात, गुजराथमधील चाकर महाराष्ट्रात येऊन भंग झाले. छप्पनिया (१८५६) ष्काळात ही मंडळी महाराष्ट्रात आली.
दि. २ आक्टोबर १९६३ पर्यंत मैला वाहून नेणं बंद करण्याची प्रतिज्ञा महाराष्ट्र सरकारनं केली तरी ती पूर्णत्वास गेली नाही. एवढेच नव्हे तर भग्यांना स्पर, रबरी हातमोजे, खराटे, साबण ही साधनही सरकार,नं उपलब्ध करून दिली नाहीत ही वस्तुस्थिती आहे, आप्पासाहेब पटवर्धन म्हणाले होते – ‘मंग्यांच्या कामातील लाचारी, अपमान व घाण ही तीन दुःखे नष्ट झाली तर मग हा पेशा राहिला तर त्यांना हरकत नाही.’ यंत्राद्वारे स्वच्छता करून भंगी-व्यवसाय संपणार नाही, त्यांच्या निवासाचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. इबड़ा चाळीत ते राहतात किंवा राहण्याच्या सोयी जिथं असतात तिथं घर कायम राहावं म्हणून घरातील अन्यांना तेच काम करावं लागतं. कारण नोकरी मिळणं च घर टिकून राहणं ह्या दोन्ही गोष्टी त्यामुळे साधतात. पण त्यामुळे ब्यवसामरित्तनाची संधी दात नाही.
महाराष्ट्रात आता ज्ञात ही शिक्षणात अडथळा ठरत नाही. शिक्षणाचे महत्त्व या समाजाला हळहळ पदं लागलं आहे. मुस्लिमांमध्येही काही प्रमाणात असमानता आळते. ‘बिरादरी’ या शब्दातूनही जातीची वैशिष्ट्ये दिसतात. (१) बिरादरीचे सदस्यत्व जन्मानं प्राप्त होतं. (२) बिरादरीची मर्यादा अंतरसंबंधी विवाहातून कायम राखली जाते. मुस्लिम मंगसुद्धा कनिष्ठच मानले जातात असे लखकाचे निरीक्षण आहे.
मलकाना व लालबेगी यांच्यावर हिंदू व मुस्लिम दोन्ही कामांचा प्रभाव आढळतो. त्यांचे गुरु हुसेनी-ब्राम्हण दोन्ही धर्म पाळतात.
महाराष्ट्रातील दलित सर्व सवलती, सर्व इम्या जातात अशी प्रतिक्रिया मुलाखतीत व्यक्त करण्यात आली (पृ. १३३). इतर वगना या स्पर्धेत टिकणं अशक्य होत असावं. त्यामुळे शेवटी सर्व उपाय थकल्यावर घडीभरकी बेशरमी दिनभरकी आराम ही भूमिका स्वीकारली जाते, आणि भंग्यांचा सुरक्षित व्यवसाय करण्याची पाळी त्यांच्यावर येते.
भंगी समाजात एकाच घरातील तीनचार सदस्य नोकरीत असतात. परंतु कर्ज आणि व्यसने यामुळे पैसा पुरत नाही. शिवाय काही अंधश्रद्धाही असतातच. लग्न मर्तिक गावी जाणे, नवस इ. कारण पैसा अपुरा पडण्यास कारणीभूत ठरतात. ‘श्री वाल्मीकी सरभंग जाती मतभेद’ या पुस्तकात भंगी हे भगवतांचं नाव असल्याचा उलेख आहे. भंगी में गंगा पाप झालनाचे कार्य करीत असल्यानं ती दोघे भाऊ-बहीण! वरुण ऋषीच्या वार्यापासून झालेल्या तीनमुलांपैकी एक मुलगा ‘क्रथनी’ नावाच्या भगिणीनं साभाळला. हाच चाल्मीकी होय. क्रथनी ही भगौण म्हणून वाल्मीकी हा भंग्यांचा गुरु मानला जातो. वाल्मीकींवर शीख धर्माचा प्रभाव आढळतो.
दलित चळवळीत हा वर्ग जाऊ इच्छितो. पण ‘बौद्ध झाल्यास बौद्ध आपली मुलगी थोडीच देणार!’ असे नागसेन चव्हाणसारख्या व्यक्तीला वाटतं, आज फक्त बौद्ध चळवळ आहे, दलित चळवळ नाही, कारण सर्व दलितांचा पाठिंबा ती मिळवू शकलेली नाही, हा निष्कर्ष बराच बोलका आहे. स्थानिक पातळीवर तर हे नेतृत्व अधिकच जातिनिष्ट होत असल्याचा अनुभव अनेक उदाहरणांवरून लोकांना आल्याचं दिसतं ( पृ. १६०),
उत्पादन-तंत्राचं कितीही आधुनिकीकरण झालं तरी समाजव्यवस्थेत मूलभूत संघटन ज्ञात हेच राहातं असं आढळतं. समाजात वेगवान परिवर्तनाचे प्रवाह सुरू झाले आहेत हे खरे, पण या प्रवाहाची दिशा उभी, खालून वर नसते, तर आडवी-क्षितिज-समांतर अशी असते. या प्रवाहाची दिशा बदलू नये यासाठी जातिव्यवस्थेचं एक प्रकारचं स्वयंचलित अंतर्गत नियमन (internal mechanism) असतं त्यामुळे दलित जातीत उत्थानापेक्षा घसरणीचाच अनुभव जास्त येतो (पृ. १६५)
“बेकारांचे समूह परस्परांच्या जातगटांत झुंजत आहेत.” ही जाति-संघर्षाची ठिणगी आता हळूहळू वरून खाली येत आहे. दलित जाति-समूहामध्येही तणाव निर्माण होत आहे. यावर उपाय सुचविताना “जातीचा पाया सोडून व्यापक पायावर कष्टकर्‍यांच्या हितसंबंधावर आधारलेल्या चळवळीत सामीलझाल्यासच ही विकासाची लढाई लढता येईल ” (पृ. १६६ ). हा निष्कर्ष वस्तुस्थितीला धरूनच आहे.
‘जात हेच समाजातील मूलभूत संघटन सध्या तरी आहे. सर्वच जातींमध्ये आज वेगवेगळे आर्थिक स्तर तयार झाले असून भिन्न आर्थिक स्तरांवरील समाज जातगटांच्या सदस्यांची एकजूट अजूनही टिकून आहे. याचे मुख्य कारण आंतरसंबंधी विवाह, सांस्कृतिक जीवन, पूर्वपरंपरा व दैवते हे आहे. त्यामुळे परस्परविरोधी हितसंबंध असूनही इथे शोषकांनाच शोषितांच्या निष्ठा मिळू शकतात….’ (पृ. १६६ )
‘स्वातंत्र्यानंतर भायाची मुलगी राष्ट्रपती होईल व हरिजन पंतप्रधान होईल’ हे म. गांधींचं स्वप्न आजही पूर्ण झालेलं नाही, राष्ट्रपती तर दूरच पण भंगी जातीला पुरेसं शिक्षणही मिळू शकलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. ठाकुर व खडस यांनी पूर्वग्रहरहित दृष्टीने केलेल्या या संशोधनाला माणुसकीच्या मूल्यांचं अधिष्ठान आहे. १९८९ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचं ऐतिहासिक व सामाजिक दस्तऐवज म्हणून जसं महत्त्व आहे, तसंच समाजप्रबोधन घडून येण्याची नितांत आवश्यकताही त्यातून सूचित झालेली आहे. धनंजय गोवर्धन व अरुण घाटे यांच्या मुखपृष्ठानही ‘भगी’ जातीच्या किळसवाण्या कामाची कल्पना वाचकांना येते.
आरती कुलकर्णी
प्रशांतनगर, नागपूर १५

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.