विवेकवाद – १९

मुस्लिम जातीयतेचे स्वरूप : कारणे व उपाय

प्रकरण १८
सुप्रजननशास्त्र

सुप्रजननशास्त्र म्हणजे एखाद्या जीवजातीचा मुद्दाम हेतुपूर्वक वापरलेल्या जीवशास्त्रीय उपायांनी उत्कर्ष घडवून आणण्याचा प्रयत्न. या प्रयत्नाची आधारभूत कल्पना डार्विनवादी आहे, आणि सुप्रजननशास्त्रीय संघटनेचा अध्यक्ष चार्ल्स डार्विनचा पुत्र आहे हे उचितच आहे. परंतु सुप्रजननशास्त्राच्या कल्पनेचा जनक फ्रॅन्सिस गॉल्टन हा होता, गॉल्टनने मानवी संपादतात (achievement) अनुवांशिक घटकांवर विशेष भर दिला होता. आज, विशेषतः अमेरिकेत, अनुवंश (heredity) हा पक्षीय प्रश्न बनला आहे. सनातनी अमेरिकन लोक म्हणतात की प्रौढ मनुष्याचा स्वभाव प्रामुख्याने सहजात गुणांमुळे बनतो; याच्या उलट अमेरिकन आमूलपरिवर्तवाद्यांचे (radicals) म्हणणे असे आहे की शिक्षण सर्व काही आहे, आणि अनुवंश ही गोष्ट शून्यवत् आहे. या दोन्ही टोकाच्या मतांशी मी सहमत होऊ शकत नाही. तसेच त्या दोघांनाही मान्य असलेल्या आधारभूत-मताशी ज्याच्यामुळे त्यांचे परस्परविरोधी पूर्वग्रह निर्माण होतात – म्हणजे इटाली, दक्षिण स्लाववंशीय लोक आणि असेच अन्य वंशांचे लोक अमेरिकेत जन्मलेल्या Ku klux klan वादी लोकांपेक्षा निकृष्ट असतात, याच्याशीही मी सहमत होऊ शकत नाही. मानवाच्या मानस शक्तीपैकी कोणता भाग अनुवंशामुळे निर्माण होतो आणि कोणता शिक्षणामुळे हे ठरविण्याकरिता उपयुक्त होईल अशी माहिती अजून उपलब्ध नाही. या गोष्टीचा निकाल जर वैज्ञानिक पद्धतीने लावायचा झाला तर हजारो एकांडज जुळी (identical twins) घ्यावी लागतील आणि त्यांना जन्मल्याबरोबर एकमेकापासून दूर करून त्यांना शक्य तितके भिन्न शिक्षण द्यावे लागेल. माझे स्वतःचे या बाबतीतील मत अशास्त्रीय आणि केवळ समजुतीवर आधारलेले आहे हे मी कबूल करतो. ते मत असे आहे की वाईट शिक्षणाने आपण जवळजवळ प्रत्येक मनुष्याचा विचका करू शकतो, एवढेच नव्हे तर आपल्यापैकी जवळपास प्रत्येक व्यक्तीचे तेच झाले आहे; परंतु ज्यांच्याजवळ काही सहजात सामर्थ्ये असतात तीच माणसे विविध क्षेत्रात उत्कर्ष पावू शकतात. कोणतेही शिक्षण सरासरी मुलाला पहिल्या दर्जाचा पियानोवादक करू शकेल असे मला वाटत नाही; तसेच जगातील सर्वात उत्कृष्ट शाळाही आपणा सर्वांना आइन्स्टाइन बनवू शकेल असेही मला वाटत नाही. नेपोलियनची सहजात गुणसंपदा त्याच्या शाळासोबत्यांहून अधिक नव्हती, आणि तो युद्धातील व्यूहरचना केवळ आपल्या आईला दांडग्या मुलांना आवरताना पाहून शिकला असेही मला वाटत नाही. माझी अशी खात्री आहे की अशा व्यक्तींच्या बाबतीत, आणि काहीशा कमी प्रमाणात कोणत्याही सामर्थ्याच्या बाबतीत, एखादी सहजात क्षमता असते, आणि शिक्षणामुळे तिच्यातून, सामान्य व्यक्तीच्या बाबतीत होतात त्यापेक्षा मोठे परिणाम होतात. ज्यांच्यामुळे या निष्कर्षाला बळकटी येते अशा कितीतरी गोष्टी आहेत. उदा. एखाद्याच्या डोक्याच्या आकाराकडे पाहून तो मनुष्य हुपार आहे की मूर्ख आहे हे आपण सामान्यपणे सांगू शकतो; परंतु डोक्याचा आकार शिक्षणाने प्राप्त होऊ शकत नाही. तसेच विरुद्ध टोकाचाही विचार करा, म्हणजे मूढता, बालिशचा, आणि मंदमतित्व यांचा. सुज्जननशास्त्राचा कट्टर विरोधकही मूढता सामान्यपणे जन्मजात असते हे नाकारू शकत नाही; आणि ज्याला आकडेशास्त्रीय समांगतेची (statistical symmetry) थोडीही कल्पना आहे त्याच्या विरुद्ध टोकाला असामान्य मानसशक्ती असलेल्या बालकांची संख्या तुल्य असते हे लक्षात येईल. म्हणून मी जास्त आढेवेढे न घेता असे गृहीत धरतो की मानवतापयात सहजात मानराशक्तीत फरक असतो. त्याहून कदाचित् अधिक शंकास्पद अरालेले, तुषार अराणे गंद भराण्यापेक्षा इष्ट असते, हे विधानही मी गृहीत भरतो. या दोन गोष्टी जर मान्य झाल्या तर सुजननशास्त्राचा आधार सिद्ध झाला असे म्हणता येईल. म्हणून सुप्रजननशास्त्राविषयी आपले मत काहीही असले तरी त्या शास्त्राची आपण हेटाळणी करता कामा नये.

सुप्रजननाच्या विषयावर असाधारण प्रमाणात अनर्थक लिखाण लिहिले गेले आहे. त्याचे बहुतेक पुरस्कर्ते सयुक्तिक जीवशास्त्रीय आधाराला त्याहून कमी निःसंशय अशा समाजशास्त्रीय विधानांची जोड देतात. उदा. सदाचार मिळकतीच्या समप्रमाणात असतो; वडिलाजित दारिद्रय हे जीवशास्त्रीय घटित आहे, कायदाशास्त्रीय नव्हे; आणि म्हणून आपण जर गरीब लोकांऐवजी श्रीमंतांना प्रजोत्पादन करण्यास प्रवृत्त केले तर सर्वच श्रीमंत होतील. श्रीसंतांपेक्षा गरीब लोकांत प्रजोत्पादन जास्त होते या गोष्टीचा मोठा बाऊ केला जातो. मला स्वतःला ही गोष्ट फारशी शोचनीय वाटत नाही, कारण श्रीमंत हे गरीबांपेक्षा श्रेष्ठ असतात असा पुरावा मला मिळालेला नाही, आणि जरी ही गोष्ट शोचनीय असती तरी ती फार चितेची बाब मानण्याचे कारण नाही, कारण श्रीमंत आणि गरीब यांत फक्त काही वर्षांचाच फरक आहे. गरीबांमधील जन्मदरही कमी होतो आहे, आणि आज तो काही वर्षांपूर्वी श्रीमंतांमध्ये होता तितका झाला आहे. आता हे खरे आहे की काही घटक असे आहेत की ज्यांच्यामुळे एका अनिष्ट प्रकारच्या जन्मदरांतील भेदाला उत्तेजन मिळते. उदा. जेन्हा शासन आणि पोलिस संततिनियमनाची साधने मिळविण्याच्या मार्गात अडचणी उभ्या करतात, आणि त्यामुळे ज्यांची बुद्धिमत्ता एका विशिष्ट पातळीच्या खाली असते, त्यांना ही माहिती मिळत नाही; परंतु अन्य लोकांच्या बाबतीत हेअधिकारी अयशस्वी ठरले आहेत. म्हणून संततिनियमनाच्या साधनांच्या प्रसाराला केलेल्या विरोधाचा परिणाम एवढाच होतो की बुद्धिमान लोकांऐवजी मूर्ख लोकांचीच कुटुंबे मोठी होतील. परंतु ही गोष्ट अल्पकालिक राहणार आहे, असे म्हणता येते, कारण लवकरच अतिमूर्ख लोकांनाही संततिनियमनाची माहिती मिळू लागेल, किंवा जे गर्भपात करवितील अशा लोकांचा शोध त्यांना लागलेला असेल. हा शासनसंस्थेच्या तमःप्रियतेचा (obscurantism) सामान्यपणे घडून येणारा परिणाम आहे. नाम सुभजननशास्त्र दोन प्रकारचे आहे, भावात्मक (positive) आणि नकारात्मक, त्यापैकी पहिले श्लेष्ठ वंशाला प्रोत्साहन देते, तर दुसरे निकृष्ट वंशांना हलोत्साह करते. सध्याच्या घटकेला दुसरे अधिक व्यवहार्य आहे. त्याने अमेरिकेतील काही संस्थानांत पुष्कळ प्रगती केली आहे, आणि अक्षम (unfit) व्यक्तीचे प्रजननाक्षमीकरण (sterilisation) इंग्लडमध्ये व्यवहार्य राजकारणाच्या क्षेत्रात आले आहे. या उपायासंबंधी आपल्याला स्वाभाविकपणे वाटणारा आक्षेप माझ्या मते समसर्थनीय नाही. मंदमति स्त्रियांना विपुल बेकायदा संतती असते हे सर्वज्ञात आहे. या स्त्रियांचे बंध्यीकरण केल्यास खुद्द त्याही सुखी होतील, कारण त्या प्रजोत्पादनाच्या इच्छेने गरोदर राहात नाहीत. हीच गोष्ट अर्थात् मंदमति पुरुषांनाही लागू आहे. या व्यवस्थेत अनेक गंभीर धोके अहेत हे खरे आहे. कारण अधिकारीवर्गाची प्रवृत्ती कसलाही असामान्य विचार किंवा अधिकारी वर्गाला केला जाणारा कोणताही विरोध मंदमतित्वाचे लक्षण मानण्याची असते. परंतु हे धोके पत्करणे श्रेयस्कर आहे, कारण मुढ, आणि अतिमंद यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात कमी करणे शक्य आहे हे उघड आहे.

प्रजननाक्षमीकरणाचा (Sterilisation) उपाय माझ्या मते फक्त अशा व्यक्तीपुरताच सीमित ठेवला पाहिजे की जे मानसिक दोषांनी पीडित आहेत. उदा. इडाहो संस्थानातील पुढील कायद्यासारखे कायदे मला मान्य नाहीतः ‘मानसिक दोषांनी युक्त, एपिलेटिक लोक, अट्टल गुन्हेगार, नैतिक दृष्ट्या पतित, आणि विपरीत लैंगिक व्यवहार करणारे यांना प्रजननाक्षम करणे कायदेसंमत आहे. वरील यादीतील शेवटचे दोन वर्ग अतिशय संदिग्ध आहेत, आणि त्यांचा निर्णय भिन्न देशांत भिन्न कसोट्यांनी केला जाईल. इडाहोतील कायद्याने सक्रिटीस, प्लेटो, जूलियस सीझर आणि सेंट पॉल या सर्वांचे निर्बीजीकरण समर्थनीय मानले गेले असते. शिवाय धंदेवाईक गुन्हेगार हा एखाद्या व्यापारिक माचिजक आजाराचा (functional nervous disorder) बळी असेल, आणि हा आजार, निदान तत्त्वतः, मनोविश्लेषणाने बरा होण्यासारखा असेल, आणि कदाचित् तो आनुवंशिक नसेल. इंग्लंड आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी या विषयीचे कायदे मनोविश्लेषणशास्त्राच्या अज्ञानावस्थेत केले जातात, आणि म्हणून ते अतिशय भिन्न आजारांचा समावेश, त्यांची काही लक्षणे समान असतात या कारणास्तव, एकाच यादीत करतात; याचा अर्थ ते कायदे निदान तीस वर्षे काळाच्या मागे आहेत, स्थिर निष्कर्षाप्रत, म्हणजे जे निष्कर्ष निदान काही दशके अनाव्हानित राहिले आहेत, अशा निष्कर्षाप्रत विज्ञान पोचेपर्यंत, त्यासंबंधी कायदे करणे धोक्याचे आहे याचे हे उदाहरण आहे, कारण नाही तर असत्य कल्पनांचे कायद्यात ग्रथन होते, आणि त्या दंडाधिका-यांना प्रिय होतात, आणि त्याचा परिणाम असा होतो की हितावह कल्पनांच्या व्यवहाराला प्रतिबंध होतो. माझ्या मतानुसार मानसिक विकलता ही या प्रकरणातील एकमेव गोष्ट पुरेशी निश्चित आहे. आणि त्यामुळे कायदे करण्यास ती आधारभूत होऊ शकते. एखाद्या मनुष्यात मानसिक विकलता आहे की नाही हे वस्तुनिष्ठ पद्धतीने निश्चित होऊ शकते आणि तिच्या संबंधी अधिकारीवर्गाचे एकमत होऊ शकते. परंतु नैतिक अपकृष्टता (moral dageneracy) म्हणजे काय ही गोष्ट विवाद्य आहे. ज्याला एक मनुष्य नैतिक अपकृष्टता म्हणतो त्याला दुसरा मनुष्य क्रांतदर्शित्व म्हणतो. कायद्याचा याहून अधिक विस्तार पुढे मागे करता कामा नये असे मी म्हणत नाही. मी फक्त एवढेच म्हणतो की आपले विज्ञान अजून या कामाला पुरेसे नाही, आणि एखाद्या समाजाने आपल्या नैतिक नावडीला विज्ञान म्हणून मिरवू देणे धोक्याचे आहे. अमेरिकेतील संस्थानात हे झाले आहे.

आता मी भावात्मक सुप्रजननशास्त्राकडे येतो. त्यात अनेक महत्त्वाच्या शक्यता आहेत; परंतु अजून त्या भविष्यात आहेत. सुप्रजननशास्त्राचे प्रमुख उद्दिष्ट इष्ट व्यक्तींना विपुल संतती निर्माण करण्यास प्रोत्साहित करणे. सध्या याच्या नेमकी विरुद्ध परिस्थिती आहे. प्राथमिक शाळेतील एखादा अतिहुशार मुलगा पुढे प्रशिक्षित व्यवसायांत (professional classes) खूप उंच चढेल, आणि बहुधा वयाच्या पस्तीस-चाळिशीत लग्न करील. उलट त्या शाळेतील विशेष बुद्धिमान नसणारी मुल पंचविशीत लान करतील. प्रशिक्षित व्यवसायाच्या क्षेत्रात शिक्षणाचा खर्च हे एक फार मोठे ओझे असते, आणि त्यामुळे त्या क्षेत्रातील लोक आपले कुटुंब मर्यादित ठेवतात. त्यांची बौद्धिक सरासरी अन्य वषिक्षा बहुधा काहीशी जास्त असते, आणि त्यामुळे ही मर्यादा शोचनीय ठरते. या समस्येला तोंड देण्याचा सोपा उपाय या वर्गातील मुलांना विद्यापीठीय शिक्षणापर्यंत सर्व शिक्षण मोफत देणे हा असू शकेल. याचा अर्थ असा की शिष्यवृत्या मुलांच्या कर्तबगारीच्या नव्हे, तर आईबापांच्या गुणांच्या आधारे द्याव्यात. याचा एक आनुपंगिक फायदा असा होईल की घोकंपट्टी आणि अतिश्नम ही नाहीशी होण्यास मदत होईल; कारण सध्या अतिहुषार मुलांचे बौद्धिक आणि शारीरिक असे द्विविध नुकसान वयाच्या एकविसाव्या वर्षांच्या आत अतिताणामुळे होते. परंतु इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेत ज्याने प्रशिक्षित व्यवसायांतील लोकांना मोठी कुटुंबे निर्माण करण्यास प्रोत्साहित होतील असा उपाय योजणे बहुधा अशक्य होईल. त्याला अडथळा होईल लोकशाहीचा. सुप्रजननशास्त्राची कल्पना मनुष्य असमान असतात या गृहीताबर आधारलेली आहे, परंतु लोकशाही मात्र सर्व मनुष्य समान आहेत या गृहीतावर आधारली आहे. म्हणून लोकशाही देशात सुप्रजननशास्त्रीय कल्पना प्रत्यक्षात उतरविणे राजकीय दृष्टीने अतिशय कठीण आहे, कारण त्या कल्पना फक्त असे सुचवीत नाहीत की लोकसंख्येचा एक अल्पसंख्य वर्ग निकृष्ट लोकांचा असतो, तर त्या असेही सुचवितात की एक अल्पसंख्य वर्ग श्रेष्ठ लोकांचा असतो. त्यांपैकी पहिली गोष्ट बहुसंख्येला प्रिय आहे, पण दुसरी अप्रिय आहे. म्हणून पहिलीवर आधारलेल्या उपायांना जनतेचा पाठिंबा मिळू शकतो, पण दुसरीवर आधारलेल्या उपायांना मिळू शकत नाही.

तरीसुद्धा ज्याने या विषयाचा थोडाही विचार केला आहे अशा प्रत्येक मनुष्याला हे माहीत असते की जरी आजच्या घडीला सर्वोत्कृष्ट वंश कोणते हे ठरविणे कठीण असले तरी या क्षेत्रात काही भेद निःसंशय असतात आणि विज्ञान त्याचे मोजमाप लवकरच करू शकेल. एखाद्या शेतकऱ्याला आपल्या सर्व नर वासरांना समान संधी द्यायला सांगून पाहा.

खरी गोष्ट अशी आहे की पुढील पिढीचा जो जनक होणार आहे असा पुंगव त्याच्या पूर्वज गायींच्या दूध देण्याच्या शक्तीच्या आधाराने काळजीपूर्वक निवडलेला असतो. (जाता जाता आपण हे लक्षात घेऊ या की या जातीत विज्ञान, कला आणि युद्ध या गोष्टी अज्ञात असल्यामुळे लक्षणीय श्रेष्ठता फक्त माद्यांमध्येच असते, आणि नर फक्त मादीच्या श्रेष्ठतेचा वाहक असतो., सर्वच गृह्य प्राण्यांत वैज्ञानिक प्रजननामुळे खूपच सुधारणा झाली आहे, आणि म्हणन मनुष्याची देखील हव्या त्या दिशेने प्रगती करता येईल ह्यात शंका नाही. आपल्याला मानवांत कोणते गुण हवे आहेत हे तरविणे अर्थातच कठीण आहे. आपण जर शारीर शक्तीकरिता प्रजनन केले तर मानसिक शक्ती कदाचित् कमी होईल हे शक्य आहे. तसेच जर आपण त्यांचे प्रजनन मानस शक्ती वाढण्याच्या दृष्टीने केले तर होणारी प्रजा कदाचित् विविध रोगांना सहज बळी पडणारी निपजेल. जर आपण भावनिक समतोल निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित् कला नष्ट होईल. म्हणून भावात्मक सुप्रजननाच्या क्षेत्रात आजच्या क्षणी तरी काही करणे इष्ट नाही. परंतु हे सहज शक्य आहे की येत्या शंभर वर्षांत अनुवंशशास्त्र आणि जैवरसायनशास्त्र (Biochemistry) या दोन्ही शास्त्रात एवढी प्रगती होऊ शकेल की जिच्यामुळे आजच्या विद्यमान वंशांपेक्षा निःसंशय श्रेष्ठ असा वंश निर्माण करणे शक्य होईल.

जी या प्रकारच्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग करण्याकरिता आपल्या कुटुंबाची या पुस्तकात आतापर्यंत सुचविलेल्या रूपालरांहून अधिक मूलगामी उलथापालथ व्हावी लागेल. जर पूर्ण वैज्ञानिक प्रजनन करायचे असेल तर प्रत्येक पिढीतील सुमारे १०% पुरुष आणि २५% स्त्रिया वेगळ्या काढाव्या लागतील. यौवनारंभी स्त्रीपुरुषांची बहुधा एक परीक्षा घ्यावी लागेल, आणि या परीक्षेत जे अपयशी होतील त्याना प्रजननाक्षम केले जाईल. सध्या एखाद्या चळूचा आपल्या अपत्यांशी असतो तेवढाच संबंध पित्याचा अपत्यांशी यापुढे असेल. माता अन्य सर्व स्त्रियांहून आपल्या जीवनक्रमामुळे वेगळी असलेली एक विशेषज्ञ व्यावसायिक असेल. अशी स्थिती कधी काळी येईल असे मी म्हणत नाही, आणि ती यावी अशी इच्छाही मला नाही. तिची मला जुगुसा वाटते हे मी कबूल करतो. परंतु जर या गोष्टीचा निर्विकार मनाने विचार केला तर या योजनेने काही लक्षणीय गोष्टी साध्य होतील असे आपल्याला दिसेल. आपण असे समजू या की या योजनेचा जपानने स्वीकार केला, आणि त्यामुळे तीन पिढ्यांनंतर जपानमधील बहुतेक माणसे एडिसनइतकी बुद्धिमान आणि मल्लासारखी मजबूत निपजली आहेत. परंतु या काळात जगातील अन्य देश आतापमाणे नैसर्गिक रीतीने प्रजनन करीत राहिले, तर त्यांचा जपान्यांपुढे युद्धात निभाव लागणार नाही, जपानी लोक मात्र या अवस्थेला पोचल्यानंतर अन्य देशांतील माणसे सैनिक म्हणून ठेवू शकतील, आणि आपल्या वैज्ञानिक ज्ञानाच्या बळावर सर्वत्र जय मिळवू शकतील. अशा व्यवस्थेत शासनसंस्थेची अंधभक्ती तरुणांमध्ये रुजविणे सहज शक्य होईल. अशा प्रकारची स्थिती भविष्यात घडून येणे अशक्य आहे असे कोणी म्हणू शकेल काय?

एक प्रकारचे सुप्रजननशास्त्र विशिष्ट मनोवृत्तीच्या राजकारण्यांना अतिशय प्रिय आहे. त्याला आपण वांशिक सुप्रजननशास्त्र (recc-eugenics) असे नाव देऊ, या प्रकारच्या सुप्रजननशास्त्रात असा दावा असतो की एक बंश किंवा राष्ट्र (हे अर्थात त्या लेखकाचा वंश किंवा राष्ट्र असते) अन्य सषिक्षा अतिशय श्रेष्ठ आहे, आणि त्याने आपल्या सैनिक बळाचा उपयोग अन्य निकृष्ट वंशांपेक्षा आपल्या वंशाच्या वृद्धीकरता केला पाहिजे. याचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे संयुक्त संस्थानांत चालू असलेला Nordic प्रचार आणि त्याला देशांतरवासविषयक कायद्यात immigration law) मिळालेली मान्यता. या प्रकारचे सुप्रजननशास्त्र डार्विनच्या क्षमतमांच्या टिकावाच्या सिद्धांताचा आधार घेऊ शकेल. परंतु त्याचे सर्वात उत्साही समर्थक डार्विनवादाचे अध्यापन बेकायदेशीर ठरवावे या मताचे आहेत हे चमत्कारिक आहे. वांशिक सुप्रजननशास्त्राशी संबंद्ध राजकीय प्रचार बहुधा अनिष्ट प्रकारचा असतो. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करू आणि या प्रश्नाचा विचार त्याच्या गुणावगुणावरून करू.

अगदी टोकाची प्रकरणे घेतली तर एक वंश दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो याबद्दल फारशी शंका संभवत नाही. उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशाचे नागरणाला होणार उपदान तेथे जर मूळ आदिवासी वस्तीच राहिली असती तर झाले असले त्याहून अधिक आहे हेही निःसंशय. सामान्यपणे बोलायचे तर नीग्रो गोऱ्या माणसापेक्षा कमी क्षम असतो असे म्हणणे रास्त होईल; परंतु उष्ण कटिबंधांत काम करण्याकरिता त्यांच्यावाचून चालणे अशक्य आहे, आणि म्हणून त्यांचा निवेश होणे (मानवतावादी विचार बाजूला ठेवूनही) अनिष्ट होईल. पस्तु युरोपातील बंशामध्ये जेव्हा श्रेयकनीय असा भेद केला जातो तेव्हा राजकीय पूर्वग्रहांच्या मदतीला पुष्कळसे व्याज किंवा लटके विज्ञान आणावे लागते. तसेच पीतवर्णीय वंश आपल्याहून निकृष्ट आहेत असे मानायला मला कसलेही सयुक्तिक कारणा सापडत नाही. या सर्व प्रकरणी वांशिक सुप्रजननशास्त्र हा अतिरेकी राष्ट्रप्रेमाने पांघरलेला एक बुरखा असतो.

ज्यूलियस वुल्फने ज्या देशातील आकडे उपलब्ध आहे त्या सर्व देशातील दरहजार लोकसंख्येत मृत्यूपेक्षा जन्माचे आधिक्य दाखविणारे एक कोष्टक तयार केले आहे. त्यात फ्रान्सचा नंबर सर्वात खाली (१.३) असून नंतर संयुक्त संस्थाने (४.००), मग स्वीडन (५.८), ब्रिटिश हिंदुस्थान (५.९) स्वित्झरलंड (६.२), झलंड (६.२), जर्मनी (७.८), इटाली (१०.९), जपान (९४.६), रशिया (१९.५), आणि शेवटी इक्वांडोर (२३.१) असा क्रम आहे. चीनविषयी माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्याचा समावेश यात नाही. यावरून वूल्फ असा निष्कर्ष काढतो की पाश्चात्य जगावर पौर्वात्य जग (म्हणजे रशिया, चीन आणि जपान) कुरघोडी करील. याचा प्रतिवाद करण्याकरिता मी इक्वांडोरवर भिस्त ठेवणार नाही. त्याऐवजी मी लंडनमधील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील तौलनिक जननप्रमाणाकडे लक्ष वेधतो. आपल्याला असे दिसते की आज गरीबांतील जननप्रमाण श्रीमंताच्या काही वर्षांपूर्वीच्या जननप्रमाणापेक्षा कमी आहे. हीच गोष्ट पूर्वेच्या बाबतीतही खरी आहे. ती जसजशी पश्चिमाळेल तसतसा तेथील जन्मदरही अपरिहार्यपणे पडेल. कोणताही देश औद्योगीकरणावाचून सैनिक दृष्ट्या भयावह होऊ शकत नाही आणि औद्योगिकीकरणाबरोबर कुटुंब मर्यादित ठेवण्याची मनोवृत्तीही वाढीला लागते. त्यामुळे आपल्याला असा निष्कर्ष काढावा लागतो की ज्या पूर्वेच्या आधिपत्याची पाश्चिमात्य युद्धखोरांना भीति वाटते असे ते म्हणतात,तेघडून आले तरी ते मोठे दुर्दैव असणार नाही, एवढेच नव्हे तर ते घडून येईल असे मानायला कसलेही सयुक्तिक कारण दिसत नाही. तरी सुद्धा युद्धखोर लोक या बागुलबोवाचा उपयोग करीत राहतील हे संभवते. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय शासन भिन्न राष्ट्रांना अनुज्ञेय संख्यावाढीची कमाल मर्यादा ठरवून देत नाही तोपर्यंत हे चालू राहील.

यापूर्वी दोन वेळा आपण पाहिल्याप्रमाणे याही वेळी आंतरराष्ट्रीय अराजक कायम असेपर्यंत विज्ञानाच्या प्रगतीने उभे केलेले संकट आपल्यापुढे उभे राहते. विज्ञान आपल्याला आपली उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करते. परंतु आपली उद्दिष्टे जर अनिष्ट असतील तर त्यातून अनर्थच उद्भवेल. जर जगात देष आणि दुष्टपणा भरलेला राहिला तर विज्ञानाची जितकी प्रगती होईल तितकी की अधिकाधिक भयावह होईल, म्हणून या विकारांची तीव्रता कमी करणे मानवी प्रगतीकरिता अत्यावश्यक आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात हे विकार चुकीची लैंगिक नीती आणि चुकीचे लैंगिक शिक्षण यातून निर्माण झाले आहेत. नागरणाच्या (civilization) भविष्यासाठी एक नबी आणि चांगली लैंगिक नीती आवश्यक आहे. त्यामुळेच लैगिक नीतीची सुधारणा ही आपल्या काळाची अतिशय महत्त्वाची गरज आहे.

व्यक्तिगत नीतीच्या दृष्टीने जर लैंगिक नीती विज्ञाननिष्ठ आणि अंधश्रद्धामुक्त असेल तर ती सुप्रजननाला आद्य स्थान देईल. म्हणजे सदसद्विवेकी पुरुष आणि स्त्रीआपली अपत्ये कोणत्या लायकीची होतील याचा गंभीर विचार केल्याशिवाय प्रजननाचा व्यवहार करणार नाहीत. संततिप्रतिबंधक साधनांनी आई किंवा बाप होणे ही गोष्ट आपल्या इच्छाधीन झाली आहे, तो लैंगिक संबंधाचा अपरिहार्य परिणाम राहिलेला नाही. आपण पूर्वी विचारात घेतलेल्या अनेक आर्थिक कारणांमुळे भविष्यात अपत्याचे शिक्षण आणि संगोपन यातील पित्याचे महत्त्व पूर्वषिक्षा कमी होईल असे दिसते. त्यामुळे एखाद्या स्त्रीने आपल्या अपत्याचा पिता म्हणून आपला प्रियकर किंवा मित्र निवडण्याचे कसलेही सयुक्तिक कारण उरणार नाही. आपल्या अपत्यांचा पिता म्हणून एखाद्या पुरुषाची निवड सुप्रजननाच्या दृष्टीने करावी, आणि आपल्या खाजगी भावनांला, आवडीनिवडींना सामान्य लैंगिक व्यवहारात मुक्तद्वार हाने हे स्त्रियांना सहज शक्य होईल. पुरुषांना आपल्या अपत्यांची माता म्हणून स्त्रीची सुप्रजननदृष्ट्या निवड करणे आणखी सुलभ असेल. समाजाचा लैंगिक व्यवहाराशी संबंध त्यात अपत्यसंभव शक्य असेल तरच येतो असे माझ्याप्रमाणे जे मानतात त्यांना या सिद्धांतावरून भविष्यातील नीतीसंबंधी पुढील दोन निष्कर्ष काढावे लागतील. (१) अपत्यसंभवाची शक्यता नसेल तर प्रेम मुक्त असावें, परंतु (२) प्रजननाचा व्यवहार सध्या आहे त्याहून नैतिक विचारांनी अधिक बद्ध असावा, मान्न हे नैतिक विचार आज आपण मानतो त्याहून काहीसे भिन्न असतील. एखादे प्रजनन नैतिक होण्याकरिता पुरोहिताने काही मंत्र उच्चारले पाहिजेत, किंवा रजिस्ट्रारने त्याची नोंद केली पाहिजे हे आवश्यक राहणार नाही; कारण अपत्याचे आरोग्य किंवा बुद्धिमत्ता आवर त्यांचा काही परिणाम होतो असा कसलाच पुरावा नाही. एखादी स्त्री व एखादा पुरुष यांची स्वतःची सहजात गुणसंपदा आणि आपल्या अपत्यानत संक्रांत होणारी त्यांची आनुवंशिक गुणसंपदा ही अपत्ये इष्ट प्रकारची निपजतील अशी असावी एवढेच प्रजननाकरिता आवश्यक असेल, जेव्हा आज शक्य आहे त्याहून अधिक निश्चितपणे या प्रश्नावर विज्ञान निर्णय देऊ शकेल, तेव्हा समाजाची नीतियुद्धी आता आहे त्यापेक्षा सुप्रजननाच्या प्रकरणी अधिक करडी बनेल. ज्यांची आनुवंशिक गुणसंपदा उत्तम आहे अशा पुरुषाला पितृत्वाकरिता मागणी वाढेल, आणि इतर पुरुष जरी प्रियकर म्हणून स्वीकरणीय असतील, तरी पिते म्हणून त्यांच्या अव्हेर होईल. आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या विवाहसंस्थेत अशा योजना करणे अशक्य होते, आणि त्यामुळे सुप्रजननशास्त्राच्या व्यावहारिक शक्यता मर्यादित आहेत असे मानले गेले. परंतु मानवी स्वभाव तशा प्रकारचा अडथळा उभा भविण्यात करील असे मानण्याचे कारण नाही; कारण संततिप्रतिबंधक उपायांनी प्रजनन आणि अपत्यहीन लैंगिक संबंध यांना विभक्त केले आहे. विवाहाला नीतिमार्तडांनी जे गांभीर्य आणि उच्च नैतिक प्रयोजन अवश्य मानले होते, ते जर जग अधिक विज्ञाननिष्ठ झाले तर फक्त प्रजननालाच अवश्य मानले जाईल.

ह्या सुप्रजननदृष्टीचा आरंभ जरी काही विशेषेकरून विज्ञाननिष्ठ मंडळींच्या व्यक्तिगत जीतीचा भाग म्हणून झाला, तरी तिचा विस्तार होईल आणि शेवटी ती कायद्यात ग्रथित होईल असा संभव आहे. या कायद्याचे स्वरूप इष्ट मातापित्यांना द्रव्यरूपी प्रोत्साहन आणि अनिष्ट मातापित्यांना द्रव्यरूपी दंड असे असू शकेल.

विज्ञानाला आपल्या गार व्यक्तिगत प्रवृत्तींशी ढवळाढवळ करण्याची परवानगी देणे हे मुगुप्साजनक आहे यात शंका नाही, परंतु ही ढवळाढवळ आपण धर्माची जी ढवळाढवळ युगानुयुगे सहन करीत आलो आहोत त्यापेक्षा खूपच कमी असेल. विज्ञान अजून नवे आहे) आणि धर्माला परंपरा आणि त्याच्या बाल्यावस्थेतील प्रभावामुळे आपल्यापैकी बहुतेकांवर प्राप्त झालेला अधिकार विज्ञानाला अजून नाही. पण तो अधिकार आणि तीच मान्यता प्राप्त करण्याची क्षमता त्यात आहे. सरासरी मनुष्याला त्याच्या आवेगशील क्षणात आवरण्याकरिता आपल्या पुत्रपौत्रादिकांच्या हिताचा विचार पुरेसा होत नाही हे खरे आहो पण जेन्हा तो विचार मान्य नैतिकतेचा भाग म्हणून स्वीकार्य ठरेल, आणि त्याला स्तुतिनिदेबरोबर द्रव्यरूप बक्षिसे आणि दंड यांची जोड मिळेल, तेव्हा त्याला एवढी प्रतिष्ठा प्राप्त होईल की त्याकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही सुशिक्षित मनुष्याला परवडेनासे होईल. इतिहासपूर्व काळापासून धर्म अस्तित्वात राहिला आहे. तर विज्ञान उणीपुरी चारशे वच अस्तित्वात आहे. पण जेव्हा विज्ञान प्रौढ आणि आदरणीय होईल, तेव्हा ते धर्माप्रमाणेच आपले जीवन नियंत्रित करील. मला तर असेही दिसते की एक वेळ अशी येईल की जेव्हा सर्व स्वातंत्र्यप्रेमी लोकांना विज्ञानाच्या जुलमांविरुद्ध बंड करावे लागेल. असे असले तरी जर जुलूम होणारच असेल तर तो विज्ञाननिष्ठ असलेसा बरा.

१. अमेरिकेतील काळ्या लोकांचे शत्रुत्व करणारी एक संघटना

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.