सावरकरांचा हिंदुत्वविचार

प्रा. स. ह. देशपांडे यांच्या लेखाला उत्तर(१)

आजचा सुधारकन्या सप्टेंबर-ऑक्टोबर १९९१ च्या अंकातील प्रा. स. ह. देशपांडे यांच्या ‘सावरकरांचा हिंदुत्वविचार’ या लेखात उपस्थित केलेल्या मुद्द्यांसंबंधी माझी प्रतिक्रिया व विचार नोंदवीत आहे.

सावरकर थिोनटिक स्टेटचा पुरस्कार करीत होते असे मी म्हटलेले नव्हतेच. राष्ट्रवादाची कोणती जातकुळी त्यांना अभिप्रेत होती, हा प्रश्न मग उरतो. याच लेखातले आ. देशपांडे यांचे एक वाक्य असे आहे : “सावरकरांच्या मते हिंदुस्थानात हिंदू हाच ‘राष्ट्रीय समाज आहे आणि हा समाज ते इतर समाजापासून धर्माच्या निकपावर वेगळा काढतात.” व्याख्येमुळेच काही समाज कायमचे ‘अराष्ट्रीय ठरतात. भारतातील वन्हंशी सर्व मुसलमान व ईसाई हे मुळातले एतद्देशीयच. तरी ते अराष्ट्रीय ठरतात, केवळ विशिष्ट कर्म स्वीकारल्यामुळे. जातकुळी पुरेशी स्पष्ट होत नाही काय?

सावरकर मूलतत्त्ववादी हिंदुधर्माय नव्हते. एखाद्या मूलतत्त्ववाद्याने प्रतिपादलेल्या राष्ट्रवादाचा आशय ज्या अथनि धर्माधिष्ठित असेल वा धर्मगतांवर आधारलेला असेल त्या अर्थाने सावरकरप्रणीत राष्ट्रवादाचा आशय धार्मिक नव्हता. या भूमीत निर्माण झालेल्या धर्माचा व्यवच्छेदक सुत्र म्हणून वापर करावयाचा, त्या सर्व धमीना हिंदु म्हणावयाचे आणि मग अशा स्वरचित हिंदू धार्मिक अस्मितेच्या आधारे राष्ट्रीय-अराष्ट्रीय असा भेद करावयाचा अशा या प्रकाराला राष्ट्रवादी राजकारणासाठी, राष्ट्रबांधणीच्या राजकारणासाठी लोकांच्या धर्मनिष्ठेचा, धार्मिकतेचा हेतुपुरस्पर वापर असेच म्हणावयास हवे.

जिनांनी इस्लाम धर्माचा, लोकांच्या ठायी असलेल्या कर्मनिष्ठेचा व धार्मिकतेचा वापर नेमका याच हेतूने केला. भारतातील म्हणजे ‘आसिंधु-सिंधुपर्यंत भूमीवर राहणारे हिंदु व मुसलमान हे दोन पृथक राष्ट्रीय समाज आहेत. ते पृधक असल्याने त्यांची दोन वेगळी राष्ट्र राज्ये निर्माण करणेच न्याय्य, इष्ट व तर्कसंगत आहे अशी जिनांची भूमिका पुढे बनली. म ‘हिंदू’च्या पोटात अनेक धर्म येतात व इस्लामचे तसे नाही ह्याने फरक पडत नाही. आणि पडलाच तर, तो थिओक्रटिका स्टेटची निर्मिती इस्लामी राष्ट्र-राज्यात जेवढी सोपी जाईल तेवढी येथे जाणार नाही, या प्रकारचा असेल. राष्ट्रीय समाजाची व्याख्या करण्याच्या व त्या व्याख्येच्या आधारे राष्ट्रवादाची एक विशिष्ट आयडियालॉजी रुजविण्याच्या बाबतीत सावरकर व जिना एकाच माळेचे मणी ठरतात.

‘धर्मनिरपेक्ष राज्यकारभार या शब्दप्रयोगाचा अर्थ लावताना एक पायाभूत घोटाळा इहवादी मंडळी सामान्यतः करीत असतात. एके काळी युरोपात राज्यसत्तेवर धर्मपीठाचे सर्वकष नियंत्रण होते. धर्मपीठाचे सार्वभौमत्त्व राजाच्या सार्वभौमत्वाच्याही अतीत होते. राज्यसत्ता व तिचा कारभार यांचे एक स्वायत्त व सार्वभौम क्षेत्र वेगळे करण्याच्या संघर्षामधून ‘धर्मनिरपेक्ष राज्यसत्ता’ ही संकल्पना आकारास आली, राजाचा अधिकार धर्मपीठावरही जेथे चालतो असे एक क्षेत्र वेगळे प्रस्थापित केले गेले. तात्पर्य, व्यक्ती व समूह-जीवनाची अमुक-अमुक अंगे ही राज्यसत्तेच्या नियंत्रणाखालीच असणे योग्य व वैघ आहे. राज्यसत्ता धर्मपीठाच्या पेक्षा उच्चतर अशी सार्वभौम संस्था आहे याला मान्यता मिळाली. गाभ्याचा मुद्दा सार्वभौमत्व व अंतिमतः नियंत्रण व अधिकार कोणाचा हा होता. धर्माचा ‘आधार समाजव्यवहारांना असावा की नसावा हा मुद्दा नव्हता.

वरील अनि राज्यसत्ता’धर्मनिरपेक्ष बनल्यानंतरही दीर्घकाळपावेतो राज्यसत्तेच्या जडणघडणीत, संस्थात्मक मांडणीत व कारभारात धर्माचा, संप्रदायाचा प्रभाव व आधार टिकून होता, परधर्म वा परसंप्रदाय सहिष्णुतेचे मूल्य रुजायला दीर्घ काळ लागला. आजही या बाबतीत तथाकथित सेक्युलर व आधुनिक पाश्चात्य राष्ट्रामध्ये असहिष्णुता पुष्कळ आदळते.

युरोपातील प्रबोधन युगानंतरच्या काळात धर्मश्रद्धा विरुद्ध बुद्धिप्रामाण्य (फेथ’ विरुद्ध रीझन’) अशी मांडणी केली गेली. श्रद्धा ही एक अनिष्ट, मागस, यातक गोष्ट असुन जीवन सर्वस्वी बुद्धीने सिद्ध व प्रमाणित केलेल्या ज्ञानावर उभारले गेले पाहिजे ही भूमिका आग्रहाने मांडली जाऊ लागली. राजकीय व आर्थिक व्यवहारांमध्ये इतके परिवर्तन घडून आले की धर्मग्रंथामध्ये त्यासंबंधीचे मार्गदर्शन शोधूनही मिळत नव्हते. व्यक्तिगत, कौटुंबिक व जमातीय पातळीवर सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे एक क्षेत्र असे उरले की जेथे धर्मग्रंथ व धर्मपीठ यांचा प्रभाव व नियंत्रण टिकून राहिले. इथेही जीवनासंबंधीची आधुनिक धारणा आणि धर्मग्रंथ धर्मपीठ यांची परंपरागत शिकवण यांच्यात अनेक बाबींवरून तणाव व संघर्ष उत्पन्न झाला. सर्वच धर्म व संप्रदाय यांमधील अनेकानेक व्यक्ती ‘निधर्मी बनल्या. अशांच्यासाठी वैयक्तिक व कौटुंबिक बाबींच्या संदर्भात निधर्मी भूमिकेतून आवश्यक तेथे कायदे केले गेले.

वैयक्तिक, कौटुंबिक व जमातीय जीवनाच्या क्षेत्रात निधर्मी भूमिकेमधून बुद्धिप्रामाण्याच्या कसोटीच्या आधारे कायदे करून समाजातील सर्वावर त्यांच्या चालनाची सरसकट सक्ती करणे राज्याच्या स्थैर्याला, शांततेला व सुव्यवस्थेला बाधा आणते, अशी सक्ती पंचमस्तंभी फुटीरतावाद जोपासते, हा घडा युरोपातील राष्ट्र-राज्ये अनुभवाने शिकली. स्वतःचे वेगळे वैशिष्ट्यपूर्ण असे धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक जीवन जगण्यास, स्वतःची अस्मिता राखण्यास व्यक्तींना व समुदायांना पुरेशी मोकळीक ठेवणे हे आपल्याच हिताचे आहे ही गोष्ट ध्यानात आली. अशी मोकळीक ठेवल्यावरच एकाच राष्ट्र-राज्यामध्ये प्रॉटेस्टंट व कॅथॉलिक एकत्र नांदू शकले, ज्यू जमातही त्या त्या राष्ट्र राज्यात सामावून घेतली जाऊ शकली. पुरेसा, योग्य, वैध अवकाश / मोकळीक निश्चित करने हे कधीतरी एकदा पार पाडावयाचे काम नाही. स्थलकालसापेक्ष व बदलती अशी ही गोष्ट राहणार, मुख्य मुद्दा त्या त्या व्यक्ती व समुदायांना आपणास पुरेसा, योग्य प्रमाणात अवकाश ठेवला आहे व हा अवकाश वैध मानला गेला आहे हे आश्वासन मिळण्याचा आहे.

आता प्रा. स. ह. देशपांडे यांनी सांगितलेल्या धर्मानरपेक्ष राज्याच्या लक्षणांकडे वळू, विवाहाचे वय काय असावे हा मुद्दा उदाहरणादाखल घेऊन ते लिहितात, ‘हा प्रश्न मनुस्मृती, कुराण, बायबल इत्यादींची वचने काय सांगतात हे पाहून सोडविला जाणार नाही, तर आरोग्य, लोकसंख्या इत्यादींवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून सोडविला जाईल.’ आपापल्या पवित्र धर्मग्रंथामध्ये लिहून ठेवल्यानुसार वा धर्मपीठाने आदेश दिल्यानुसारच व्यक्तीने अमुक वयाचे झाल्यावर वा होण्याआधी विवाह केला पाहिजे असा कायदा करणारे राज्य हे विओक्रटिक स्टेट या प्रकारात मोडेल. उलटपक्षी, विवाहाचे वय, विवाह विधी, मुलांची संख्या इत्यादी सर्व गोष्टी बुद्धिप्रामाण्यवादी कायद्याने ठरवून देणारे राज्य हे सर्वकष हुकूमशाही वळणाचे असेल; आणि, प्रत्येक सर्वकष हुकूमशाही राज्य हे सूक्ष्म अर्थाने थिओटिक स्टेटच असते, बुद्धिप्रामाण्यवाद देखील पवित्र पुस्तकात ग्रथित धर्माचे रूप घेऊ शकतो, त्याचे एक धर्मपीठ अस्तित्वात येऊ शकते.

धर्मशास्त्रीय घटपटांचे अवडंबर अशा राज्यातही माजू शकतें, धर्मनिरपेक्ष राज्याचे लक्षण पुढीलप्रमाणे विशद करता येईलः कोणत्या वयात व्यक्तीने विवाह करावा वा तिचा विवाह लावला जावा यासंबंधी धर्मपीठ व्यक्तीवर धर्मग्रंथाच्या या धर्माज्ञेच्या आधारे सक्ती करू शकणार नाही, असा दंडक राज्य चालून देईल. श्रद्धापूर्वक जातजमातीय, धार्मिक रिवाज पाळणाऱ्यांच्या राज्यसत्ता कधी आड येईल? कोणत्याही नागरिक व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध, संमती नसताना तिच्या मूलभूत हक्कांवर आक्रमण करणारे वर्तन धार्मिक श्रद्धा वा रीतिरिवाज यांच्या नावे करण्याची मोकळीक नाही, ही धर्मनिरपेक्ष राज्याची भूमिका असेल. वयाला अठरा वर्षे पुरी झाली की व्यक्ती सज्ञान होते अशी आज कायद्यात मान्यता आहे. (व्यहारात जगात सर्वत्र असे दिसते की अनेकानेक मुलेमुली एकदोन वर्षे आधीच स्वतंत्र वागू लागतात, मिळवती होतात.) सज्ञान व्यक्तीच्या संदर्भातच आपण नागरिकत्वाची व मूलभूत हक्कांची गोष्ट पूर्णाशाने करू शकतो या युक्तिवादाचा आधार घेऊन, विवाह दोन सज्ञान व्यक्तींमध्येच व्हावयास हवा ही अट कायद्याने घालणे युक्त होईल. पण समाजात खोलवर रुजलेल्या धारणा जर वेगवेगळ्या असल्या तर कायद्याचे पालन न झालेले राज्याला खपवून व्यायला लागते हा आपला अनुभव आहे. म्हणून सज्ञानपणाचा मुद्दा करावयाचा झाला तरी, शहाणे धर्मनिरपेक्ष राज्य पुढील प्रकारची तरतूद करील. सज्ञान होण्यापूर्वी पालकांनी विवाह लावून दिला असेल तर, सज्ञान झाल्यावर तो विवाह-संबंध मोडण्याचा हक्क पति-पत्नीना, उभयतांना असेल. घटस्फोट मिळविण्यासाठी हे कारण पुरेसे ठरेल.समाजात सार्वत्रिक रुजलेल्या धारणा व व्यवहार वेगळे असताना सज्ञान होण्याआधी झालेले विवाह (व अशा विवाहापासून झालेली संतती) बेकायदेशीर ठरविणारा कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्याचा आग्रह हा असमंजसपणा ठरेल. अशा सर्व राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवहारांचे नियमन मनुष्यबुद्धीला गवसलेल्या ज्ञानाच्या आणि तांच्या साह्याने आणि ऐहिक उद्दिष्टांसाठी करणारे राज्य म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य ही व्याख्या बरोबर नाही. धर्मपीठाचे प्रभाव व नियंत्रणक्षेत्र, तसेच सार्वभौमत्व यांची मर्यादा सुस्पष्ट करणारे राज्य अशी व्याख्या करणे अधिक योग्य ठरेल.

प्रा. देशपांडे असेही म्हणतात की, शासनाने कायदे, घोरणे, कार्यक्रम इत्यादींसाठी धर्माचा आधार घेता कामा नये.’ विकसित धर्मग्रंथ वा धर्मपीठ यांचा आधार वा नियंत्रण नसावे या अर्थाने म्हणणे ठीक आहे. राष्ट्रातील सर्व लोकांचा धर्म एकच असला तरी हे पथ्य कटाक्षाने सांभाळणे जरूरीचे आहे या अनुभवामधूनच धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना उदयाला आली. पण ‘धर्माचा आधार या शब्दाचा अर्थ उच्चतर पातळीवरूनही केला जाऊ शकतो. बंधुभाव, न्याय, समता, स्वातंत्र्य, मूलभूत हक्क, करुणा, प्रेम, शांती, अशा सर्व नैतिक संकल्पना व मूल्ये याची मांडणी धर्म म्हणूनच प्रथमतः केली गेली आहे. उच्चतर व उपकारक मूल्यांचा, श्रेयकल्पनाचा संस्कार जगातल्या सामान्य माणसांमध्ये रुजलेला आढळत असला तर त्याचे श्रेय बुद्धिनामाण्यवादाला नाही. नीतीचा संस्कार धर्मानी दीर्घकाळ सार्वत्रिक रुजविल्यानंतर व नैतिक मूल्यांना मान्यता प्राप्त करून दिल्यानंतर आज नास्तिक निधर्मी व्यक्तीही नीतिमान असू शकतात ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. उलटपक्षी असे म्हणता येईल की, उद्याच्या जगात बंधुभाव, समता, न्याय, स्वातंत्र्य, शांती या गोष्टी नांदावयाच्या असतील तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रतिपादिला त्या प्रकारच्या सार्वजनिक सत्यधर्माची मांडणी करणे, व त्या मांडणीत धर्मप्रेषित, महात्मे, साधुसंत यांची शिकवण सामावून घेतली जाणे अगत्याचे आहे. मुख्य मुद्दा असा की, ‘धर्माचा आधार घेणारे राज्यही वर स्पष्ट केलेल्या अनि धर्मनिरपेक्ष राज्य असू शकते.

धर्मनिरपेक्षतेसाठी धर्माकडे पाठ फिरविण्याची आवश्यकता नाही. भारतात अनेक धर्माचे लोक राहतात. ते सर्व बव्हंशी एतद्देशीयच आहेत. या वास्तवतेची दखल घेणारे धर्मनिरपेक्ष राज्य प्रा. देशपांडे यांच्या मते, धर्माच्या आधारावर नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही आणि कोणत्याही धर्माला शासन उत्तेजन देणार नाही किंवा त्याला खाली दडपणार नाही. धर्माच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव करण्याची भूमिका सावरकरांची होती हे सत्य प्रा. देशपांडे यांना मुसलमानांच्या संदर्भात स्वीकारावे लागले आहे.

सावरकरांच्या भाषण-लेखनातले काही उतारे उद्धृत करून सावरकरांनी कल्पिलेले हिंदूराष्ट्र हे पूर्ण धर्मनिरपेक्ष राज्या आहे असे प्रा. देशपांडे म्हणतातः व्याख्येनुसार समाजचे समाज, त्या समाजांचे धर्म या भूमीत जन्मलेले नाहीत म्हणून ‘अराष्ट्रीय ठरविणे ही गोष्ट धर्मनिरपेक्षतेशी मुळात कशी काय मेळ खाते ? आणि मुसलमानांच्या बाबतीतला अविश्वास, संशय च दुजाभाव, याचाही मेळ धर्मनिरपेक्षतेशी कसा घालावयाचा?

हिटलरने नाझी जर्मनीमध्ये शुद्ध व श्रेष्ठतम आर्य बंश व संस्कृती यांची कल्पना केली. नाझी जर्मनीचा कारभार एरवी धर्मनिरपेक्षच होता, ज्यूंचे व लक्षावधी जर्मनांचे शिरकाण सुखेनैव करण्यात धर्मनिरपेक्षतेची आडकाठी आली नाही. हिटलरच्या ‘आर्य संकल्पनेचा उपयोग व्याख्येनुसार ‘आर्य नसलेल्यांना वेगळे करून, त्यांना शत्रुस्थानी लेखून त्यांचे निर्दालन करण्यासाठी व्यवस्थित झाला. सावरकरांच्या हिंदू मा व्याख्येचे स्वरूप व प्रयोजन मुसलमान समाजाला अराष्ट्रीय ठरविणे व शत्रुस्थानी त्याची नेमणूक करून हिंदू समाजाला राजकीयदृष्ट्या संघटित, व आक्रमक बनविणे असे होते.

सावरकरांची ‘हिंदू’ संकल्पना ही धर्माचा कसोटी म्हणून हुशारीने वापर करून घेणारी राजकीय संकल्पना होती. ते धर्मनिःपातक होते, त्यांना राज्यकारभार धर्मनिरपेक्ष भूमिकेमधून चालाबा हे अभिप्रेत होते. या दोन्ही म्हणण्यात तथ्य आहेच. पण कडवा मुसलमानद्वेष हे त्यांच्या हिंदुत्वाचे व्यवच्छेदक लक्षण होते हे लक्षात ठेवले तर त्यांची दृष्टी धर्मनिरपेक्ष होती असे म्हणता येत नाही.

एकदा हिंदुराष्ट्र प्रस्थापित झाल्यावर, आपण हिंदुराष्ट्रात राहणार आहोत ही गोष्ट मुसलमानांनी व अन्य अराष्ट्रीय समाजांनी मान्य केल्यानंतर, मग राज्याचा व्यवहार धर्मनिरपेक्ष राहावा इतकेच नाही तर अराष्ट्रिकांच्या बाबतीतही भेदाभेद केला जाऊ नये अशी सावरकरांची भूमिका होती असे म्हणता येईल. जशी पाकिस्तानच्या संदर्भात जिनांची होती. पण संशय, अविश्वास, देव यांची कड़वेषणाने जोपासना करून सत्ता संपादन केल्यावर काय घडते ते आपण पाकिस्तानच्या संदर्भात अनुभवले आहे. ‘अराष्ट्रीय हा शिक्का ज्या समाजावर बसतो तो समाज नेहमीच घोक्यात राहतो. या संदर्भात मी स्वातंत्र्यपूर्वकालीन निजामी राजवटीचे उदाहरण पण देऊ इच्छितो.

हैदराबाद संस्थानाचे अधिपती मुसलमान होते. पण राज्यकारभार कुराणाला अनुसरणारा नव्हता वा धर्मपीठाचे/ मुल्लामौलवींचे नियंत्रणही कारभारावर नव्हते. ‘इस्लामिक स्टेट अशी ओळखही नव्हती. म्हणजे व्यवहारात ते धर्मनिरपेक्ष राज्य होते. हिंदू व्यक्ती उच्च पदांवर, अगदी सी.आय. डी. सारख्या खात्यांमध्येही काम करीत. आर्यसमाज व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे कार्यही, हैदराबाद शहरातदेखील, चाले. उघडपणे हिंदूंचा छळ होत नव्हता. त्यांना मालमत्ता पण धारण करता येत होती. आणि तरीही तेथील हिंदु समाजाला राज्य मुसलमानी आहे व आपले स्थान अंतिमतः दुय्यम आहे, याचे भान राखावे लागत होते. ही वस्तुस्थिती होती म्हणूनच निजाम हैदराबादचे स्वतंत्र राष्ट्र-राज्य निर्माण करणाच्या गोष्टी करू शकला. सावरकरांना अभिप्रेत असलेले हिंदुराष्ट्र इतके मवाळ खासच असणार नाही. रझाकारांचा जाच सुरू झाल्यानंतरची हिंदूंची स्थिती त्यांच्या हिंदुराष्ट्रात मुसलमान समाजाची राहील-असुरक्षित व भयग्रस्त.

त्यांचा (सावरकरांचा) राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रसंबंधित तत्त्वज्ञान, धर्मावर म्हणजे धर्ममतावर आधारलेले नाही’ असे प्रा. देशपांडे यांनी म्हटले आहे. ‘सावरकरांचे हिंदुराष्ट्र पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आणि लोकसत्ताक आहे असेही ते म्हणतात.

सावरकरांचा राष्ट्रवाद धर्मावर म्हणजे धर्ममतावर आधारलेला नव्हता या म्हणण्याशी विसंगत अशा तथ्यांचा स्वीकार प्रा. देशपांडे यांनी याच लेखात केला आहे त्याचे काय ? पुढील तीन विधाने पहा : (१) ‘हिंदू अस्मितेत ते धर्माचा समावेश करतात. पण गौणत्वाने.’ (२) ‘सावरकरांच्या मते हिंदुस्थानात हिंदू हाच “राष्ट्रीय समाज” आहे आणि हा समाज ते इतर समाजांपासून “धर्माच्या निकषावर वेगळा वाढतात. ह्या अनि, आणि केवळ ह्याच अर्थाने, सावरकरांनी “धर्माधिष्ठित राष्ट्रवादाचा पुरस्कार केला असे पळशीकर म्हणत असतील तर ते बरोबर आहे. (३) सावरकरांनी राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येसाठी धर्म हा निकष वापरला आहे हे स्पष्ट आहे.

‘सावरकर, “हिंदू” या शब्दाला फार व्यापक अर्थ देतात हे प्रा. देशपांडे यांचे मत आपण स्वीकारू शकतो का? काही एतद्देशीय समाजामा अराष्ट्रीय ठरविणारी संकुचित, कोती व्याख्या करूनच सावरकर आरंभ करतात!’

ज्या सर्व समाजाचा ते “हिंदू” या संज्ञेमध्ये समावेश करतात त्यांच्यासाठी ते कोणता व्यापक अर्थ सांगतात? प्रा. स. ह. देशपांडे यांच्या मते सावरकर “धार्मिकता” वजा करतात. राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येसाठी निकष म्हणून धर्माचा (वा धर्माचा) वापर केल्यावर धार्मिकता वजा करतात म्हणजे धर्म हा शब्द सोयिस्कररीत्या वापरून घेण्यासाठी अर्थशून्य बनवतात. भारतात निर्माण झालेल्या अनेकानेक धर्माच्या गुणवैशिष्ट्यांच्या, शिकवणुकीच्या, परंपरांच्या आधारे निवड करून एका उन्नत स्वरूपात उच्चतर सर्वसमावेशक हिंदू धार्मिकतेची मांडणी सावरकर करीत नाहीत. हिंदू या शब्दाला व्यापक अर्थ द्यायचा तर हा मार्ग त्यांनी अनुसरायला हवा होता. भारतात निर्माण झालेले हे जे नाना धर्म आहेत, त्या धर्माचे पालन करणारे जे सर्व प्रकारचे जनसमूह आहेत त्या सर्वांना समान काय आहे ? समान धर्मतत्त्व नाही. ‘एक विशिष्ट संस्कृती या सर्वांना समान आहे, असे प्रा. देशपांडे म्हणतात. हे सावरकरांचे पण उत्तर आहे असे ते सूचित करतात. ‘हिंदू’ या शब्दाला व्यापक अर्थ कोणता दिला ते मात्र प्रा. देशपांडे सांगत नाहीत. “हिंदुत्व या ग्रंथात या मुद्याचे विस्तृत विवेचन आहे एवढे सांगण्यावर समाधान मानतात.

भारतभूमीत जन्माला आलेल्या सर्वांना समान असलेल्या संस्कृतीचा मध्यवर्ती गाभा जातपात व स्पृश्यास्पृश्यता यावर आधारित ग्राम व समाजव्यवस्था हा आहे. कमीअधिक घट्ट विणीच्या स्वरूपात सर्वत्र आढळून आदळून येणारी व जीवन व मानस घडविणारी, त्यांना नियंत्रित करणारी ही व्यवस्था आहे.. एतद्देशीयांच्या ती इतकी हाडीमांसी मुरलेली आहे की, जातिव्यवस्था व तिच्या बुडाशी असलेले तत्वज्ञान यांच्याविरुद्ध बंडखोरी करणारे धर्म व संप्रदायदेखील तिने ओतप्रोत आहेत. हे विदारक सत्य डॉ. आंबेडकरांनी अनुभवले. जातपात व स्पृश्यास्पृश्यता ही कसोटी पाळावयाची ठरविल्यास सावरकरांना धर्म बदलल्याने हिंदूपण जात नाही इतके ते खोलवर रूजलेले आहे असे म्हणायला लागले असत. पण मग ‘हिंदू’ या शब्दाची व्याख्या त्यांनी व्यापक केली की संकुचित?

भारतीय/हिंदी माणूस जगभर कोठेही वेगळा ओळखू येत असे तो त्याच्यावरील ‘आध्यात्मिक संस्कारामुळे, हे आध्यात्मिक संस्कारांचे श्रेय प्राचीन ‘आर्य संस्कृतीला वा तदनंतरच्या ब्राह्मणांच्या प्रभुत्त्वाखालील धर्म व संस्कृतीला नाही. त्याचे प्रमुख श्रेय ब्राह्मण वर्चस्वाविरुद्ध उभे ठाकून ज्यांनी धर्मचक्रप्रवर्तन केले त्या भगवान बुद्ध, तीर्थकर महावीर यांच्या सारख्यांचे ते आणि सामान्य जनांमध्ये जाऊन, जातपात व स्पृश्यास्पृश्यता यांच्या पलीकडे नेणारी नीती व सुसंस्कृती यांची खरी शिकवण देणा-या अगणित संत-महात्म्यांना व साधुपुरुषांना आहे.
हिंदुस्थानच्या चार कोपऱ्यांमध्ये मठ स्थापन करून एकात्म असे सांस्कृतिक-धार्मिक विशाल भौगोलिक क्षेत्र आरेखित करणाऱ्या आद्य शंकराचार्यांचे उदाहरण जरी घेतले तरी, त्यांच्या कार्याला बुद्धोत्तर परिष्कृत साधारण धर्माचे अधिष्ठान होते हे मान्य करावे लागते.

या गोष्टी वगळून सावरकर हिंदू या शब्दाचा व्यापक अर्थ लावत असले तर या मातीतली संस्कृती बाजूला ठेवून ते आपला उपक्रम पार पाडीत होते असे म्हणायला लागेल. ‘हिंदू’ या शब्दाची विशिष्ट व्याख्या करण्यामागचे सावरकरांचे प्रयोजन लक्षात घेतले तर याचा उलगडा अधिक नीष्टपणे होऊ शकतो. त्यांना हिंदू राष्ट्रवादांची कडवी, आक्रमक आयडियाजी रुजवायची होती. आधुनिक पाश्चात्य धर्तीच्या राष्ट्रवादाची बांधणी ही सत्ताकारणाची राजकारणी प्रक्रिया आहे. जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील धर्म, संस्कृती, इतिहास व परंपरा यांचा उपयोग व्हायच्या ऐवजी त्यांचा अडसरच होतो. राष्ट्र-राज्याच्या स्वरूपात केंद्रीभूत सर्वकष सत्तेची बांधणी करण्यासाठी राष्ट्रवादी विचार प्रणाली युरोपात वापरली गेली. कोणाला तरी शत्रुस्थानी बसविणे, त्या शत्रूचे भय घालून ढेप व त्वेष निर्माण करणे, अहंगड रुजेल व फोफावेल असे इतिहास, संस्कृती व परंपरा यांचे सोयिस्कर पुनलेखन करणे, विस्तारवादी उद्दिष्टे रुजविणे या गोष्टी राष्ट्रवादाच्या बांधणीची साधने म्हणून वापरली गेली आहेत, पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्यांनी हीच साधने वापरली आणि सावरकर तीच साधने वापरतात. दोघांचेही उद्दिष्ट एकच होते हे याचे साधे सरळ स्पष्टीकरण आहे.

शब्दांना, संकल्पनांना कडवे, संकुचित व एकमुखी अर्थ कृत्रिमरीत्या हेतुतः प्राप्त करून देणारी ही प्रक्रिया आहे. अर्थ व्यापक व उन्नत करणारी ही प्रक्रिया नाही.

स्वदेशनिष्ठा व आधुनिक पाश्चात्य राष्ट्रवाद या दोन गुणात्मकदृष्ट्या अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. शिवाजी महाराजांनी स्वदेशनिष्ठा निर्माण केली. शक्तिशाली बनविली. उपटपक्षी, त्याच मुगल साम्राज्यसत्तेविरुद्ध संघर्ष करण्याच्या ओघात शीख पंथाच्या नंतरच्या गुरूंनी धर्माधिष्ठित राष्ट्रवाद जोपासला. याच प्रकारचा कडवा राष्ट्रवाद १९३० नंतरच्या काळात मुस्लिम लीगच्या नेत्यांनी जोपासला आणि सावरकरांनी हिंदुराष्ट्रवाद्यांनी जोपासला, तर राष्ट्रसभेने (इंडियन नेशनल काँग्रेसने) राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी लढा देत असताना स्वदेशनिष्ठा जोपासली, पण पाश्चात्य धर्तीच्या राष्ट्रवाद जोपासला नाही.

जिनांच्या जीवनात ब व्यक्तिमत्त्वात आपणास आढळणारे दुभंगलेषण याच मुद्यांवरून निर्माण झाले. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्यत्व अभिमानाने सांगणारे जिना स्वदेशनिष्ठेला प्राधान्य देणारे होते. तर इस्लाम खतरे में है या घोषणेभोवती मुस्लिम समाजाला संघटित करणारे कागदे आझम जिना हे कडवे राष्ट्रवादी होते. सावरकरांच्या आयुष्यात व व्यक्तिमत्त्वातही हे दुभंगलेपण आढळते. १९०७ साली १८५० चे स्वातंत्र्यसार’ लिहिणारे सावरकर आणि हिंदु महासभेचे अध्यक्ष सावरकर ही दोन वेगळी व्यक्तिमत्त्वे आहेत.

पाश्चात्य आधुनिक राष्ट्रवादी विचारप्रणाली ही एक ना एक शत्रू कल्पून त्याविरुद्ध द्वेष निर्माण करणारी, कड़वी, युद्धखोर विस्तारवादी गोष्ट आहे. याचा प्रत्यय जगभर गेली दोनशे वर्षे येतोच आहे. पाकिस्तानचे वर्तन, खलिस्तानवाद्यांची दहशतवादी चळवळ यांमध्येच याचा पडताळा मिळतो आहे.

भारतभूमीत जन्माला आलेले व न आलेले अशी भेरेषा प्रस्थापित करून सावरकर हिंदुराष्ट्रवादाची मांडणी करून भारतातही या युद्धखोर, विस्तारवादी राष्ट्रवादी भूमिकेवर समाज संघटित करू पहात होते. या जातकळीचा राष्ट्रवाद पाकिस्तानात जेवढा हिंस्त्र आक्रमक व अन्याय्य सिद्ध झाला आहे तेवढाच ते भारतात ठरणार.

आधुनिककालीन पाश्चात्य राष्ट्रवादात ही एक विध्वंसक, हिंस्र व असंस्कृत अशी प्रणाली आहे. जगाला ती एक वरदान नसून शाप आहे. जगात शांती व सद्भाव नांदायचा असेल तर या जातकुळीच्या राष्ट्रवादाचा अव्हेर करून स्वदेशनिष्ठा रुजविता आली पाहिजे. याची अत्यंत दूरदर्शी मांडणी कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर यांनी १८९९ सालीच केलेली आहे.

(अपूर्ण)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.