सेक्युलॅरिझम आणि भारत – लेखांक तिसरा

डॉ. आंबेडकरांनी सेक्युलॅरिझमचा आशय अगदी योग्य शब्दात कसा स्पष्ट केला आहे ते यापूर्वी आपण पाहिले. परंतु हिंदू आणि मुसलमान या दोन धार्मिक गटांचा संघर्ष हाच सेक्युलरिझमवरील चर्चेचा मुख्य प्रश्न बनला आहे. प्रस्तुत परिसंवादात उपस्थित केलेले बरेचसे प्रश्न या संघर्षाच्या संदर्भातच निर्माण झालेले आहेत. “धर्माचरणाला जीवनमार्ग मानण्याची धारणा जेथे पक्की आहे अशा भारतीय समाजात धर्माचरण घराच्या चार भिंतींपुरते सीमित ठेवण्याचा आग्रह धरणारी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या कितपत सयुक्तिक म्हणता येईल असा एक प्रश्न प्रश्नावलीत येतो. (प्र.३) धर्माचरण चार भितीपुरते सीमित ठेवणे आपल्या देशात शक्य नाही, तसेच इष्टही नाही असा भाव सूचित करून प्रश्नकर्ते सेक्युलॅरिझसची व्याख्या कितपत सयुक्तिक आहे असे विचारतात. पहिली गोष्ट अशी की धर्माचरण घराच्या चार भिंतींपुरते सीमित ठेवावे अशी सेक्युलॅरिझमची व्याख्या ऐकिवात नाही. धर्माचरण चार भितीबाहेर आल्यास संघर्ष निर्माण होतील अशी भीती ज्या सेक्युलॅरिस्टांना वाटते त्यांनी हा ‘चार भिंतींचा आग्रह धरला असावा. त्यांच्या डोळ्यांपुढे हिंदूंच्या सवाद्य मिरवणुकी असाव्यात. सेक्युलरिझमच्या व्याख्येत हा आग्रह नसल्याने व्याख्या सयुक्तिक की अयुक्तिक हा प्रश्नच उद्भवत नाही. विशिष्ट धार्मिक श्रेष्ठ मानवी मूल्यांनी समृद्ध झालेली सेक्युलॅरिझमची संकल्पना बदलवून नवी अधिक धर्माध मनोवृत्ती (obscurantism) दोन्ही जमातींत बाढीस लागून देश मध्ययुगाच्या प्रकार आहे. सेक्युलॅरिझमची संकल्पना सोडून देण्याने हा संघर्ष टळणार आहे काय? उलट भांड्यात वासराचे डोके अडकले असता भांडे फोडण्याऐवजी वासराचे डोके कापण्याचाच सुचविण्याऐवजी सेक्युलॅरिझमचा त्याग करण्याचा मार्ग सुचविणे म्हणजे लहान तोंडाच्या मुळाशी जाऊन त्याची कारणे शोधणे हे पोलिसांचे काम नव्हे, संघर्ष तात्पुरता थांबविणे हे मूर्तिपूजेवर बंदी घालणार काय? दोन धार्मिक गटांमध्ये जो संघर्ष उदभवतो त्याच्या इस्लामला मूर्तिपूजा मान्य नाही. मूर्तिपूजेने मुसलमानांच्या भावना दुखावतात म्हणून आहे हे खरे आहे. पण इतरही अनेक गोष्टी भावना दुखावण्यास कारणीभूत होऊ शकतात.

इस्लामला मूर्तिपूजा मान्य नाही. मूर्तिपूजेने मुसलमानांच्या भावना दुखावतात म्हणून मूर्तिपूजेवर बंदी घालणार काय? दोन धार्मिक गटांमध्ये जो संघर्ष उद्भवतो त्याच्या मुळाशी जाऊन त्याची कारणे शोधणे हे पोलिसांचे काम नव्हे, संघर्ष तात्पुरता थांबविणे हे त्यांचे काम. पण विचारवंतांनी या कारणांच्या मुळाशी जायला नको काय? धर्माचरण चार भिंतीत सीमित करण्याने मूळ प्रश्न सुटणार नाही. आणखी एक प्रश्न असा आहे, आपला आजवरचा अनुभव ध्यानात घेता आपण पुढीलपैकी कोणती भूमिका घ्याल? धर्मनिरपेक्षतेवर आधारित राष्ट्राची उभारणी करण्याचा प्रयत्न आपण सोडूनच द्यायला हवाकी धर्मनिरपेक्षतेची अधिक अर्थपूर्ण व्याख्या करण्याचे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे? सकारण सांगा.हे दोन्ही पर्याय अप्रस्तुत आहेत. ते अमान्यच करावयास हवेत. आहे या स्वरुपातील सेक्युलॅरिझम भारतात यशस्वी होण्याची शक्यता प्रश्नकर्त्यांना दिसत नाही की काय अशी शंका येते. आजवर असा कोणता अनुभव आपणाला आला आहे की ज्यामुळे सेक्युलर राष्ट्रनिर्मितीचा प्रयत्नच आपण सोडावा अथवा या संकल्पनेची नवी अधिक अर्थपूर्ण व्याख्या करावी? भारतीयांच्या ज्या धर्माचरणामुळे, ज्या धर्मश्रद्धांमुळे सेक्युलॅरिझम अयशस्वी होण्याची शक्यता प्रश्नकर्त्यांना वाटते ती धार्मिक मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी धर्मनिरपेक्षताच (सेक्युलॅरिझम) सोडून द्यावी, अगर धर्मनिरपेक्षतेची नवी अर्थपूर्ण व्याख्या करावी असे सूचित करणे म्हणजे धर्मांध मनोवृत्तीपुढे दिलेली शरणागतीच आहे असे खेदाने म्हणावे लागते. ज्या धार्मिक मानसिकतेमुळे सेक्युलॅरिझम अडचणीत आला आहे आणि जातीय धार्मिक संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे त्या मानसिकतेत मूलभूत परिवर्तन करण्याची आवश्यकता प्रश्नावलीकर्त्यांना का वाटू नये? ज्या धार्मिक मानसिकतेमुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे त्या धर्मांध मानसिकतेमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?असा प्रश्न अधिक सयुक्तिक होईल. धर्मांध मानसिकता हाच भारताच्या सामाजिक जीवनात अस्वास्थ्य आणि अशांती निर्माण करणारा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आपल्या या बहुधर्मीय राष्ट्रात सामाजिक-धार्मिक सलोखा निर्माण करून हे राष्ट्र प्रगतीच्या मार्गांवर घेऊन जाण्यास सेक्युलर शासन (स्टेट) आणि सेक्युलर समाज निर्माण करणे हाच एकमेव उपाय आहे. अशा परिस्थितीत धर्मांध मनोवृत्तीत परिवर्तन करण्याचा मार्ग सुचविण्याऐवजी सेक्युलॅरिझमचा त्याग करण्याचा मार्ग सुचविणे म्हणजे लहान तोंडाच्या भांड्यात वासराचे डोके अडकले असता भांडे फोडण्याऐवजी वासराचे डोके कापण्याचाच प्रकार आहे. सेक्युलॅरिझमची संकल्पना सोडून देण्याने हा संघर्ष टळणार आहे काय? उलट धर्मांध मनोवृती (obscurantism) दोन्ही जमातींत वाढीस लागून देश मध्ययुगाच्या दिशेनेच वाटचाल सुरू करील. दुसरा पर्याय म्हणजे सेक्युलॅरिझमची अधिक अर्थपूर्ण व्याख्या करणे. दीड हजार वर्षांच्या संघर्षमय कालखंडात विकास पावत आलेली आणि श्रेष्ठ मानवी मूल्यांनी समृद्ध झालेली सेक्युलॅरिझमची संकल्पना बदलवून नवी अधिक अर्थपूर्ण व्याख्या करणार म्हणजे काय करणार? धर्माध मनोवृत्तींना गोंजारण्यासाठी बौद्धिक वैचारिक परिश्रमांनी विकसित केलेल्या आणि मानवी मनाला आधुनिक वैज्ञानिक युगात खेचून आणणाऱ्या संकल्पनेची नवी व्याख्या करणार म्हणजे त्या मौलिक संकल्पनेतील (सेक्युलरिझम) आत्माच काढून घेणार? धार्मिकांच्या हट्टी दुराग्रही भावना दुखावू नयेत यासाठी भारतीय समाजाची प्रगती थांबवून धरणार? ऐहिक, पारलौकिक या क्षेत्रांची पूर्ण फारकत करून ऐहिक जीवन पारलौकिकाच्या बंधनांतून मुक्त करणे है जे सेक्युलॅरिझमचे मुख्य उद्दिष्ट त्यात बदल कसा क़राल? सेक्युलॅरिझम निरीश्वरवादीच (बंडलागिअन) असला पाहिजे असा आग्रह धरण्याचे मुळीच कारण नाही. मानवी मनातून धर्मकल्पना पूर्णपणे नाहीशा होतील ही शक्यता मुळीच नाही. सर्वसामान्य जनतेवर निरीश्वरवाद लादता येत नसतो हे इतिहासाने दाखवून दिले आहेच, आज रशियातील घटनांनी हे पुन्हा सिद्ध केले आहे. धर्माच्या आवरणाखाली वावरणारे मानवी जीवनातील सर्व ऐहिक व्यवहार धर्माच्या कक्षेतून काढून घेतल्यानंतर वाटल्यास शुद्ध अध्यात्मविचाराचे spiritualism) चिंतन मानवाने करण्यात कोणतीही अडचण येण्याचे कारण नाही. धमनि लौकिक जीवनात हस्तक्षेप करू नये एवढीच अपेक्षा बाळगणे इष्ट ठरेल. या हस्तक्षेपातूनच सामाजिक समस्या निर्माण होतात. पुरूपाने किती स्त्रियांशी विवाह करावेत, विवाहविच्छेदन कोणत्या पद्धतीने करावे, स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने सर्व मानवी हक्क प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे किंवा नाही, वर्णज्ञातिव्यवस्थेने ज्या समाजावर अन्याय होतो, त्यांना या तथाकथित धार्मिक बंधनातून मुक्त होण्यासाठी विद्रोह उभारण्याचा अधिकार आहे किंवा नाही हे सर्व आणि यासारखेच अनेक प्रश्न पूर्णपणे लौकिक आहेत. त्यांचा अध्यात्मचिंतनाशी काहीही संबंध नाही. धर्मातील लौकिक भाग आणि अध्यात्म ही एकमेकापासून वेगळी करावीत एवढेच सेक्युलॅरिझम सांगतो. धर्मसंप्रदायांचा यालाच जेव्हा विरोध होतो तेव्हा तो विरोध प्रबोधनाने, वैचारिक परिवर्तनाने आणि शेवटी कायद्याने मोडून काढणे मानवाच्या ऐहिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे. भारतामधील हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धार्मिक गडांच्या मानसिकतेचे परिवर्तन करणे, त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाला शिक्षणात महत्वाचे स्थान देणे, सर्व सामाजिक संस्था, शासनसंस्था, विवाहसंस्था, वर्ण-जातिव्यवस्था यांसह- मानवनिर्मित आहेत आणि म्हणून त्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार माणसाचाच आहे, त्यासाठी कोणत्याही धर्मग्रंथाचा अगर प्रेषिताच्या वचनांचा आधार आवश्यक नाही हे समाजाला समजावून देणे, त्याचे प्रबोधन करणे-थोडक्यात सांगायचे म्हणजे धर्मचिकित्सेला माणसांना प्रवृत्त करून धर्मसुधारणेचे युग सुरू करणे हाच धर्माच्या पकडीतून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग आहे. हाच सेक्युलॅरिझमचा गाभा आहे.

युरोपमध्ये रेनेझान्स-रेफरमेशनपूर्व मध्ययुगात जी धांधता ख्रिस्ती मनाला ग्रासून राहिली होती, तिचा लोप पंधराव्या शतकाच्या सुमारास प्रबोधनयुगात झाला. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उदय होताच बुद्धिवाद, इहवाद, मानवतावाद-विश्वविषयक मानवकेंद्री दृष्टिकोन, धर्मनिरपेक्ष समान नागरिकत्व या संकल्पनांचा झपाट्याने विकास झाला. धर्माकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन बदलू लागला. हे या पूर्वीच्या लेखांत पाहिलेच आहे. इन्कविझिशनसारखे रानटी प्रकार हळूहळू कमी झाले, बायबलमधील धर्ममतांविरुद्ध विचार व्यक्त केल्याबद्दल माणसाला जिवंत जाळण्याची शिक्षा पूर्वी पोपकडून दिली जाई; हे क्रर अमानुष प्रकार बंद झाले. हे सर्व परिवर्तन ज्या धर्मविषयक वैचारिक क्रांतीने झाले ती वैचारिक क्रांती, ते प्रबोधनयुग भारतात १९ व्या शतकात अवतरले. भारताने नच्या ज्ञानांचा, निरनिराळ्या विद्याशाखांचा स्वीकार करून आधुनिक युगात प्रवेश केला. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, आगरकर, म.फुले, रानडे, दयानंद सरस्वती, यांसारख्या परिवर्तनवादी समाजधुरीणांच्या मार्गदर्शनाने धर्मसुधारणेची आंदोलने सुरू झाली. ही प्रबोधनप्रक्रिया इस्लामिक जगात सुरू न झाल्याने जगाचा हा महत्त्वाचा भाग अद्यापि मध्ययुगातच राहिला आहे. भारतीय मुस्लिमांचे धार्मिक प्रेरणाकेंद्र मध्य आशियात (अरबस्तान-इराण) असल्याने प्रबोधनयुगाचा धर्मसुधारणाविषयक विचारांचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. सर सय्यद अहमद या पाश्चात्यविद्याविभूषित मुस्लिम नेत्याने मुस्लिम मन मध्ययुगातून आधुनिक युगात आणण्याचा प्रयत्न करूनही त्यात त्यांना फारसे यश आले नाही. मुल्ला मौलवींनी (फंडामेंटलिस्ट) सर सय्यद यांनी सुरू केलेल्या मुस्लिम प्रबोधनाला, मुस्लिम मानसिकतेच्या आधुनिकीकरणाला, सक्रिय विरोध केला. या पुढील ५०-६० वर्षे मुस्लिम समाजाचे नेतृत्व देवबंद धर्मपीठातील कडव्या मुल्लामौलवींच्या हातीच राहिल्याने मुस्लिम मानसिकतेत परिवर्तन करू शकणारे कोणतेही पुरोगामी वैचारिक आंदोलन होऊच शकले नाही. भारतात सेक्युलॅरिझम यशस्वी न होण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे. खिलाफत चळवळीने सर्व कट्टर मुल्लामौलवींचे माथेफिरूपण (फॅनॅटिसिझम) वाढविण्याचेच कार्य केले. भारतातील सर्वात जास्त जातीय दंगली आणि भीषण हत्याकांडे (कोहट, मोपला ही हत्याकांडे) खिलाफत आंदोलनानंतर लागलीच झाली ही गांधीजींसारख्या युगपुरुषाची शोकांतिकाच आहे. येथे सेक्युलर पक्षाची-विचारवंतांची, अडचण सुरू होते. मुस्लिम धर्मश्नद्धांना, त्यांच्या मानसिकतेला धक्का कसा लावायचा ही ती अडचण होय. धर्मचिकित्सेला प्रारंभ झाल्याशिवाय धर्मसुधारणा सुरूच होऊ शकत नाही. मुस्लिम धर्माची चिकित्सा कोणी करायची? हमीद दलवाई, न्या. छागला यांसारखे चार दोन अपवाद वगळता या महत्त्वाच्या प्रश्नाला कोणीही चालना अद्यापि दिलेली नाही. tra हिंदू समाजाचेही आधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. प्रचंड असा बहुजनसमाज अद्यापि मूढ अंधश्रद्धा, मनुष्यत्वालाही काळिमा लावणाऱ्या देवदासीप्रथेसारख्या धर्माच्या नावाने मानवी मनावर सत्ता गाजविणाऱ्या रूढी, यांच्या विळख्यातून सुटलेली नाही. तरीही गेल्या शंभर दीडशे वर्षांत अनेक लहान मोठ्या हिंदू विचारवंतांनी हिंदू धर्माची, हिंदू धर्मश्रद्धांची अत्यंत कठोर चिकित्सा केली आहे. अगदी चिरफाड केली आहे. या परिवर्तनवादी चिकित्सकांचा यापूर्वी उल्लेख केलाच आहे. हिंदू समाजसुधारणेच्या दृष्टीने अत्यंत मौलिक असे हे कार्य आहे. या धर्मचिकित्सेचा, प्रबोधनकार्याचा हिंदू मानसिकतेचे आधुनिकीकरण साधण्याच्या दण्टीने बराच परिणाम झालेला आहे. हिंदु समान मूलतःच परिवर्तनशील असल्याने त्याने बऱ्याचशा सुधारणा थोडीफार खळखळ करीत का होईना स्वीकारल्या आणि पचविल्या. सतीबंदी, विधवा पुनर्विवाह, संमतिवयाचा कायदा, सारडा (शारदा) बिल, अस्पृश्यतानिवारण, मंदिरप्रवेश बिल, हिंदूकोड बिल, यासारखे हिंदू समाजव्यवस्थेत महत्त्वाचे बदल घडवून आणणारे, पण धर्माच्या कक्षेत येणारे अनेक प्रश्न कायद्याच्या साहाय्याने सोडविण्याला हिंदू समाजाने मान्यता दिलीच ना. हिंदू समाजातील हे धार्मिक-सामाजिक (socio-religious) परिवर्तन जर प्रश्नावली तयार करणाऱ्या विचारवंतांनी ध्यानात घेतले असते तर मुस्लिम मानसिकतेत परिवर्तन करण्याची आवश्यकता आणि शक्यता त्यांना जाणवली असती. हे परिवर्तन का होत नाही हे शोधायचे तर इस्लामची चिकित्सा करावी लागेल. त्यापेक्षा सेक्युलॅरिझमची संकल्पनाच सोडून देण्याचा अथवा या संकल्पनेची अधिक अर्थपूर्ण व्याख्या करण्याचा पर्याय त्यांनी वाचकांपुढे ठेवला, याचे कारण काय असावे ? संपूर्ण प्रश्नावलीत इस्लामी आचारविचारांच्या परिवर्तनाचा दूरान्वयानेही उल्लेख नाही. भारतातील सेक्युलॅरिझम, इस्लामचा धार्मिक परिवर्तनाला जो कडवा विरोध आहे. त्यामुळेच अपंग झाला आहे. म्हणून सेक्युलरिझमवरील चर्चेत-परिसंवादात इस्लाममधील धार्मिक परिवर्तन हाच मध्यवर्ती विषय असला पाहिजे. धार्मिकांच्या भावना दुखावण्याच्या भीतीने विचारवंत मंडळी जर चर्चेच्या मध्यवर्ती प्रश्नावरच मौन पाळणार असतील तर सेक्युलॅरिझमवरील चर्चेत स्वारस्य ते काय? इस्लाममधील तलाक पद्धती, साक्षीपुराव्यात स्त्रीचे केले जाणारे अवमूल्यन, बहुपत्नीकत्वाला धार्मिक मान्यता, शहाबानो प्रकरणातील पोटगीचा प्रश्न आणि शेवटी समान नागरी कायदा हे व यासारखे आणखी बरेच प्रश्न धर्मपरिवर्तनावर अवलंबून आहेत. फंडामेंटलिझम-मग तो कोणत्याही धर्माचा असो, देशाच्या एकात्मतेला विघातक आहे.

स्वातंत्र्यपूर्वकाळात मुसलमानांमध्ये जो अलगतावाद पोसला गेला तोच अलगतावाद १९४७ नंतर जशाचा तसा संधीची वाट पहात अगदी अगदी उघडपणे वावरतो आहे. एका बाजूला मुस्लिमांचा सेक्युलॅरिझमला कडवा विरोध आहे, तर दुसऱ्या बाजूला इस्लामिक धर्मशास्त्रातील संभाव्य परिवर्शन टाळण्यासाठी भारतीय घटनेतील सेक्युलरिझमचा ते उपयोग करतात. सेक्युलर स्टेटला धर्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही हा युक्तिवाद मुस्लिम पुढारी नेहमी पुढे करतात. मुस्लिम समाजाचा हा अलगतावाद राष्ट्रीय एकात्मतेला विघातक आहे हे ध्यानात येऊनसुद्धा सर्व सेक्युलर पक्ष व विचारवंत त्याकडे डोळेझाक करून मतासाठी मुस्लिमांचा सतत अनुनय करतात व एकतर्फी सेक्युलरिझमचा घोष करून केवळ हिंदु समाजाला दोषी ठरविण्याचा प्रयत्न करतात. त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंदुसमाजात आज धर्मांध प्रवृत्ती वाढत आहेत. यातून मंदिर मशिदीचे प्रश्न निर्माण होत आहेत. इतिहासातील थडगी उकरून काढू नयेत हे म्हणणे अगदी योग्य आहे. ज्यांना एकत्र राहावयाचे आहे त्यांनी पूर्वीची वैरे विसरायला शिकले पाहिजे, पण ज्यांना एकत्र राहायचेच नव्हते त्यांचा इतिहास सहजासहजी कसा विसरता येईल? तोही विसरता येईल; पण तो इतिहास रानटी, जंगली कृत्यांनी भरलेला असेल तर आजच्या त्यांच्या वंशजांनी आपल्या पूर्वजांच्या या रानटी जंगली कृत्यांबद्दल निदान खेद व्यक्त करून नवा मैत्रीचा, सहभावनेचा इतिहास निर्माण करण्याचा दिलासा दिला पाहिजे. मुस्लिम राजवटीतील कृत्यांबद्दल योजिलेले रानटी, जंगलीहे शब्द माझे नव्हेत, अगर एखाद्या कडव्या हिंदुत्वनिष्ठाचे नव्हेत. कट्टर सेक्युलर, सोशॅलिस्ट विचाराच्या गुरुशिष्यांचे डॉ. लोहिया आणि मधु लिमये यांचे आहेत. डॉ. लोहिया म्हणतात: मुसलमानातील रझिया, शेरशहा, जायसी रहिमान या व्यक्ती आणि हिंदूंमधील विक्रमादित्य, अशोक, हेमू प्रताप हे हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मीयांना सारखेच पूज्य वाटले पाहिजेत. तसेच या दोघांनीही गझनी, घोरी, बाबर हे लुटारू आक्रमक रानटी लोक होते असेच मानले पाहिजे”. (मूळ लेख. पुनर्मुद्रण मराठवाडा, ३१ मार्च ) मंदिरे, चर्चेस आणि मशिदी यांचा मध्ययुगीन इतिहास सांगताना मधू लिमये म्हणतात, भूतकाळात धर्मांधांनी केलेल्या जंगलीपणाचे उत्तर वर्तमानकाळातील भविष्यकाळातील जंगलीपणाने देण्याची धमकी भारताच्या प्राचीन परंपरेशी सर्वथा विसंगत आहे. धर्मांधता जुनी वैरे ही गाडली पाहिजेत. ती उकरून काढणे इष्ट नाही. धर्मांध मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दुष्कृत्यांबाबत शाही इमाम शहाबुद्दीन यांना काय वाटते ते मला ठाऊक नाही. पण अनेक सुबुद्ध मुसलमानांनी माझ्याजवळ अशा कृत्यांबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. (म.टा. सप्टें. ) या खाजगी खेदाभिव्यक्तीला काहीही महत्त्व नाही. भारतातील पंधरा प्रसिद्ध मुस्लिम व्यक्तींनी यात बुखारी, शहाबुद्दीन, बनातवाला, ओवेसी, मुस्लिम मशावरतचे अध्यक्ष, इस्लामिक स्टूडंटस असोसिएशनचे अध्यक्ष, जमाते इस्लामीचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध सेक्युलर इतिहास पंडित नुरुल हसन आणि बाकीचे सात उत्तर प्रदेशातील देवबंद, नडवद इत्यादी धर्मपीठांचे प्रमुख धर्मगुरू यांनी इतिहासातील या अप्रशस्त (रानटी) कृत्यांबद्दल खेद व्यक्त करून हिंदू भावनेचा प्रतीकात्मक आदर व्यक्त केला, तर मंदिर मशिदीचा प्रश्न मैत्रीपूर्ण वातावरणात सोडविण्यात यश येऊ शकेल याची मला खात्री वाटते. यासाठी हिंदू आणि मुस्लिम जनतेमध्ये वैचारिक क्रांती होणे महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे धर्माकडे पाहण्याची चिकित्सक प्रवृत्ती दोन्ही समाजात निर्माण होणे आवश्यक आहे. हिंदू समाजात हे कार्य पुष्कळच प्रगतावस्थेत आले आहे. परंतु मुस्लिम समाजात या विचाराची बीजे अद्यापि रुजलेली नाहीत. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बुद्धिवाद यांच्या साहाय्याने धर्मचिकित्सा करायला या समाजातील सुशिक्षितांना प्रवृत्त करणे हे महत्त्वाचे आहे. मराठी माणसाला समजणाऱ्या भाषेत सांगायचे तर भारतातील सर्व राज्यांतील मुस्लिम समाजात अनेक हमीद दलवाई आणि . बी. शहा निर्माण झाले पाहिजे. तरच भारतात सेक्युलॅरिझम यशस्वी होईल

स्वातंत्र्योत्तर काळात या दृष्टीने फारसे काम झालेच नाही. मौ. मौदुदी यांच्यासारखे मुस्लिम धर्मपंडित मुस्लिम समाजाला मध्ययुगात घेऊन जाण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत करीत राहिले. पार्लमेंटमध्ये बंगालमधून निवडून आलेले सय्यद बहुहुजा यांचे सेक्युलॅरिझमबद्दलचे विषदिग्ध भाषण ऐकून गृहमंत्री गुलझारीलाल नंदा क्षणभर हादरून गेले. सय्यद बहुहुजा म्हणाले : “Secularism is a share and delusion, it is a fraud and a deception… Secularism! Thy name is hypocricy, thy name is treachery, thy name is corruption, thy name is bribery… filth, and abomination. Thy name is exploitation of the minorities, particularly of the religous Muslim minority, spoliation and ruination of the Muslim minority…” मती गुंग झालेल्या नंदांना क्षणभर काय बोलावे तेच कळेना.

पण स्वतःला सावरून गृहमंत्री म्हणाले “I wonder how, in a few minutes… one could pour so much venom गांधीजींच्या मागनि अगर मार्क्सवादी मागनिही मुस्लिम मानसिकतेचे आधुनिकीकरण होणे कठिण आहे. या विषयावर लिहिताना सुप्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात : “TT India is ever to be the home of a nation able to keep peace within and guard the frontiers, develop the economic resources of the country and promote art and science, then both Hinduism and Islam must die and be born again. Each of these creeds nust pass through a rigorous vigil and penance, each must be purified and rejuvenated under the sway of reason and science.”

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.