मरू घातलेली जात (The Endangered Species)

‘आजचा सुधारक’च्या संपादकांनी सेक्युलरिझम व मार्क्सवाद या विषयावर आपल्या वाचकांकडून मतप्रदर्शन मागविले होते. यापैकी ‘सेक्युलॅरिझम’वर बोच लेख आले पण मार्क्सवादासंबंधीच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही असे संपादकांनी लिहिले आहे. मार्क्सवादावर लेख का आले नाहीत यावर विचार करताना, मला असे वाटले की ज्यांनी जन्मभर मार्क्सवादाचे कुंकू लावले ते आज मार्क्सवादावर चर्चा करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचा हा आशौचकाल आहे. आशौचकालात गेलेल्या जीबाबद्दल चर्चा करायची नसते. ज्यांनी मार्क्सवादाचे कुंकू लावले नाही अशाही लोकांत मार्क्सवादाबद्दल भयंकर आदर आहे. त्यांनी मार्क्सवादाचे कुंकू लावले नाही याचे प्रमुख कारण मासन धर्माला अफूची गोळी ठरविले. म्हणजे त्यांच्या श्रद्धेवरच सरळ आघात केला. धर्माची ही एक बाब सोडली तर त्यांना मार्क्सचे अर्थशास्त्र – विशेषतः भांडवलशाहीविरुद्धची आगपाखड, त्याची इतिहासमीमांसा, वगैरेबद्दल मनस्वी आकर्षण आहे. रशियामध्ये धर्माचा छळ होत असला व लोकशाही नसली तरी तेथे मधाच्या व दुधाच्या नद्या वाहत आहेत अशी या लोकांची समजूत होती. गेल्या काही दिवसांत मार्क्सवादाच्या प्रयोगभूमीतच लोक नास्तिकतेपासून धर्माकडे वळले एवढेच घडले असते तरया लोकांनी त्या घटनेचे मनापासून स्वागत केले असते. पण कम्युनिझमच्या कर्मभूमीतले लोक केवळ धर्माकडेच वळले नाहीत तर त्यांनी मार्क्सवादाचे अर्थशास्त्र, इतिहासोपत्ती वगैरे सारेच झुगारून देऊन चक्क भांडवलशाहीचा अंगीकार केला आहे, व रशियात मधाच्या व दुधाच्या नद्या वाहत आहेत या स्वप्नरंजनालाच सुरुंग लावला आहे. त्यामुळे मार्क्सवाद्यांप्रमाणेच हे अमार्क्सवादी धर्मप्रेमी लोकही हादरून गेले आहेत, ते चर्चा करण्याच्या मनःस्थितीत नाहीत.

रशियाचे बंड
मार्क्सवादी व अमार्क्सवादी यांच्याहून वेगळा असा कम्युनिष्टद्वेष्ट्यांचा एक वर्ग गेल्या पन्नास वर्षात निर्माण झाला होता. हे लोक मुख्यतः स्टॅलिनच्या अत्याचारांमुळे होरपळलेल्या वर्गातले वा अशा वर्गाच्या अनुयायांपैकी होते. या लोकांनी मार्क्सवादाच्या अर्थशास्त्राचा देखील फेरविचार सुरू केला होता व मार्क्सची इतिहासोपपत्ती पोकळ ठरवली होती. असे लोक आज एका अर्थी ‘जितं मया असे म्हणण्याच्या मनःस्थितीत आहेत. त्यांच्यापैकी एखाद्याने या विषयावर आजचा सुधारक’मध्ये लेख लिहायला पाहिजे होता. पण ‘आजचा सुधारकच्यावाचकवर्गात या वर्गातले फारसे लोक नाहीत असे दिसते. किंवा असले तरी पाच पंचवीस वर्षे जे म्हटले तेच पुनः म्हणण्याचा त्यांना कंटाळा आला असेल.

मी वरीलपैकी कोणत्याही वर्गात मोडत नाही. मार्क्सचे कॅपिटल वाचण्यापूर्वी मला माक्र्सवादाचे आकर्षण होते. ते १९४१ साली पहिल्यांदा व त्यानंतर वेळ पडेल तेव्हा संदर्भासाठी पुढेही मार्क्सचे लिखाण वाचल्यामुळे नष्ट झाले. त्यासाठी स्टॅलिनच्या अत्याचारामुळे होरपळलेल्या लोकांच्या प्रभावाखाली येण्याची मला जरूर वाटली नाही. असे असताही मी संपादकाचे आवाहन वाचून या विषयावर लेख पाठवला नाही. कारण इतर काय लिहितात याची मी प्रतीक्षा करीत होतो. पण आता वाटते की अशी प्रतीक्षा करण्याची जरूर नाही, म्हणून कम्युनिझम व मार्क्सवाद याची सद्य:स्थिती याविषयी मला काय वाटते ते सांगतो.

हा या बाबतीतल्या वस्तुस्थितीचे ज्ञान होण्यासाठी कम्युनिझमच्या इतिहासाबद्दलचे काही भ्रम दूर केले पाहिजेत. पहिला भ्रम म्हणजे रशियामध्ये झालेली क्रान्ति ही कम्युनिस्ट क्रान्ति होती. हा भ्रम निर्माण होण्याचे कारण झारची सत्ता उलथून पाडली गेल्यावर राजकीय पक्षांमध्ये जो सत्तासंघर्ष झाला त्यात बोल्शेविक विजयी झाले व त्यांनी सर्व सत्ता बळकावली. पण मुळात झारची सत्ता उखडवून लावली ती झारच्याच बंडखोर सैन्याने. त्यात कम्युनिस्टांचा हाल नव्हता. झार सत्तेवर असताना कम्युनिस्टांना लहानमोठे संप करण्यात देखील यश येत नव्हते. शिपायांनी झार.च्या कुटुंबाची कत्तल केल्यावर जर्मन सरकारने स्वतःचे रक्षक देऊन लेनिनला रशियात पाठविले. हेतु हा की झारशाही नाट झाल्यावर कम्युनिस्टांच्या हाती सत्ता येऊन रशियन सैनिकांनी पुनः जर्मनीविरुद्ध शस्त्र उचलू नये. जर्मनीविरुद्ध लढाई झारने पुकारली होती. झारशाही नष्ट झाल्यावर येणाऱ्या लव्या सरकारला झारचा वारसा सांगितल्याशिवाय जर्मनीविरुद्ध युद्ध सुरू ठेवण्याचे काही कारण नव्हते.

मुळात झारच्या शिपायांनी झारविरुद्ध बंड केले ते झारचा अमल वाईट होता व शिपायांना मजुरांचे राज्य आणावयाचे होते म्हणून नव्हे. त्या सैनिकांना जर्मन सैनिकांनी अत्यंत नामुष्कीकारक रीतीने पराभूत केले होते. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी झारने कुमक पाठवून या सैनिकांना पुनः लढायला लावले असते. पण सैनिकांना जर्मनीशी पुन्हा लढण्याची कल्पनाच असह्य होती. लढाई बंद करण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे झारवर उलटणे हा होता, तो कार्यभाग सफल झाल्यावर एखाद्या राजकीय पक्षाची सत्ता कबूल करणे शिपायांना भागच होते. शिपायांची ही गरज लेनिनला जर्मनीत पाठवून जर्मनांनी भागवली, तात्पर्य रशियन राज्यक्रांतीत भांडवलशाहीचे अंडे अति पिकून ते फुटणे व मजुराची क्रांति होणे वगैरे कोणतेही माक्र्सवादी सोपस्कार पुरे झाले नव्हते.

हिटलरच्या सैन्यात ३५००० रशियन
बरे, क्रांती मार्क्सच्या प्रक्रियेप्रमाणे झाली नाही इकडे दुर्लक्ष केले तरी रशियन राज्यक्रांतीने रशियातली भांडवलशाही नष्ट केली. श्रमजीवी वर्गाची हुकुमशाही स्थापन केली, तेव्हा मार्क्सच्या निदानानुसार रशियातील गरिबी नाहीशी होऊन तेथे समता नांदायला पाहिजे होती. पण तसे काही झाले नाही. क्रांतीनंतर तब्बल दहा वर्षांनी, म्हणजे भांडवलशाही नष्ट होण्याचे सुखद परिणाम दिसण्यास पुरेसा वेळ मिळाल्यावर रशियात भयंकर दुष्काळ पडून तीस लक्ष मानव व अठरा कोटी जनावरे मृत्युमुखी पडली. हा दुष्काळ नैसर्गिक आपत्तीमुळे पडलेला नव्हता. शेतीचे राष्ट्रीयीकरण करण्यासाठी कुलक नावाच्या शेतकऱ्यांना जबरदस्तीने परागंदा करण्यात आले व त्यांची सारी मालमत्ता सरकारजमा करण्यात आली. या राष्ट्रीयीकरणाचे भयंकर परिणाम होऊन अनधान्याची पैदास कमी झाली. पुढे जड उद्योगांवर भर दिल्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष झाले व अन्नधान्याची टंचाई हा रशियाचा कायमचाच रोग होऊन बसला. अन्नधान्याबरोबरच रशियाच्या थंड हवेत अत्यंत आवश्यक असलेल्या पादत्राणांची भयंकर कमतरता ही रशियातील हालाची एक नित्याचीची बाब होऊन बसली. पादत्राणाशिवाय राहिल्यास रशियाच्या थंडीने पाय गारठून शीतदंशाने मृत्यू येण्याचा मोठा धोका असतो.

अन्न व पादत्राणे याप्रमाणेच राहण्याच्या जागेची टंचाई हा एक रशियन जीवनाचा अटळ भाग होता. एखाद्या स्त्रीला मूल झाले व तिला राहण्यास घर असले तर अनेक पुरुष ते मूल आपले असल्याबद्दल हक्क मांडीत, कारण ते मूल ज्याचे ठरेल त्याला त्या स्त्रीच्या घरात राहण्याची परवानगी मिळत असे. एका खोलीत दोन वा तीन कुटखे हा तत्कालीन रशियन नाटकांचा एक नेहमीचा विषय झाला होता.
जीवनावश्यक वस्तूंची जीवघेणी टंचाई हाच ‘श्रमिकांच्या हकमशाहीचा एकमात्र परिणाम नन्हता. या हुकूमशाहीखाली रशियन नागरिकांना कोणतेही आचार, विचार व उच्चारस्वातंत्र्य नव्हते. स्वतःचे व स्वतःच्या मुलांचे शिक्षण वा व्यवसाय काय असावा हे आईबाप ठरवू शकत नव्हते. सर्व प्रकाशने सरकारी होती व जे विचार सरकारमान्य नाहीत ते प्रकाशित होऊ शकत नव्हते. सरकारी प्रसारमाध्यमे जे सांगतील तेच बाहेरच्या जगत्तासंबंधीचे ज्ञान. खाजगी संभाषण देखील सरकाला पसंत नसेल तर रात्री घरावर पोलिसांची थाप पडून सैबेरियाच्या यमपुरीत रवानगी होण्याची भीती असे. अशी रवानगी झालेले लिक्विडेटेड म्हणजे निकालात काढलेले समजले जात. सारांश, रशिया हीच एक यातनानगरी झाली होती व रशियन नागरिक रशियाच्या बाहेर पळून जाण्याची संधी शोधत होते. स्टॉलनने पाच कोटी नागरिकांचे खून पाडले असे नुकतेच सांगण्यात आले आहे. यावरून रशियन नागरिक कम्युनिझमखाली सत्तर वर्षे कसे जीवन जगले याची कल्पना येते.
दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा श्रमिकांच्या हुकुमशाहीतून सुटण्याची ती एक संधीच आहे असे रशियन नागरिकांना वाटले व त्यांनी हजारोंच्या संख्येने जर्मन सैन्याचे स्वागत केले. जर्मनांना जाऊन मिळणाऱ्या रशियन सैनिकांची संख्या इतकी मोठी होती की जनरल लॅसाव्हच्या नेतृत्वाखाली त्यांचे एक स्वतंत्र सैन्य बनविण्यात आले. हा क्रम असाच चाल राहिला असता तर चार आठ दिवसांतच रशिया जर्मन आक्रमणाला बळी पडला असता.

पण हिटलरला दुर्बुद्धी सुचली. त्याने स्वतःला मिळणाऱ्या रशियन सैनिकांचा उपयोग करून घेण्याच्या ऐवजी त्यांचा छळ करण्यास सुरुवात केली. या छळाच्या कहाण्या पसरण्यास वेळ लागला नाही व त्यानंतर रशियन सैनिकांनी शरणागति न पत्करता जर्मन आक्रमकांशी निकराने लढा दिला. हुकूमशाही फक्त हुकूमशहाचे हित जोपासते. तरी या निकराच्या लढ्याने जर्मनीविरुद्ध रशियाचा निभाव लागण्याचा संभव नव्हता. जर्मनीच्या मानाने रशिया हा एक मागासलेला देश होता. पण त्याला अमेरिकेने १४०० रणगाडे, हजारोहज़ार विमाने, व इतर सर्व युद्धसाहित्य मुबलक प्रमाणात पुरविले. त्यामुळे जर्मन आक्रमण परतवून लावण्यात रशियाला यश आले.

युद्धसमाप्तीनंतर रशियामध्ये युद्धानिमित्त रशियाबाहेरचे जग पाहून आलेल्या रशियन नागरिकानी कम्युनिझमबद्दलच्या प्रचारात्मक भ्रमांना सुरुंग लावण्यास सुरुवात केली. भांडवलशाही देशात भयंकर गरिवी असते हे मुळीच खरे नसून गरिबी जवळ जवळ नष्ट करण्यात फक्त भांडवलशाही देशांनाच यश आले आहे हे या रशियनांच्या निदर्शनास आले. तसेच भांडवलशाही देशातील स्वतंत्र व खुले वातावरण त्यांना फारच स्पृहणीय वाटू लागले. या सर्वांचा परिणाम होऊन कुश्चेवने स्टॉलनच्या अत्याचारांना वाचा फोडली व राज्ययंत्राचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला. खटल्याशिवाय मजूरवाड्यात पाठवण्यात आलेल्या ‘गुलामांना मुक्त केले व मतस्वातंत्र्याचा प्रयोग करून पाहिला. पण हा प्रयोग यशस्वी झाला नाही व त्याला सत्तेपासून भ्रष्ट व्हावे लागले.

तरी रशियन जनतेला कम्युनिझम अमान्य होता ही वस्तुस्थिती होती व तिचा पुढेमागे परिणाम होणे अपरिहार्य होते. हा परिणाम गोर्बाचेव्हच्या धेर्यशाली व तत्त्वनिष्ठ धोरणांच्या रूपाने साकार झाला.

या सर्व प्रकारात काही गोष्टी निश्चित व कोणत्याही विचारवंताच्या सहज लक्षात येण्यासारख्या होत्या. एक म्हणजे मूल्य केवळ मजुरीतून निर्माण होते व भांडवल गुंतवून नफा कमाविणारे लोक मजुरांचे शोषण करून जगत असतात, अर्थात् भाण्डवलशाही हे. गरिवीचे कारण आहे व ती नष्ट केली की गरिबी नष्ट होईल या अत्यंत वेडगळ समजुतीवर आधारलेल्या अर्थरचनेने गरिबीचा प्रश्न सुटण्याऐवजी तो अधिकच बिकट होणार. दुसरे म्हणजे हुकूमशाही श्रमिकांच्या नावाने निर्माण झालेली असो की देवाच्या, ती वस्तुतः हुकूमशहाखेरीज कुणाचेही हित आणत नाही व याच न्यायाने स्टॉलनच्या हाती गेलेली हुकूमशाही स्टॅलिनची सत्ता स्थिर व बळकट करण्याशिवाय दुसरे कोणतेही ध्येय साधण्याचा प्रयत्न करणार नाही.

सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट असणारी ही दोन तथ्ये न ओळखण्यात भारतीय आंग्ल शिक्षितांच्या बुद्धिमत्तेची दिवाळखोरी सिद्ध झाली. रशियन क्रान्तीनंतर दोन तीन दशके साऱ्या जगातच कम्यनिस्ट क्रांती व मार्क्सवाद याबद्दल आकर्षण होते हे खरे आहे. हिटलर व मुसोलिनीच्या मदतीने जनरल फ्रेंको स्पेनमधील राजसत्ता उलथून टाकण्यास निघाला. तेव्हा त्या राजसत्तेला स्टॅलिनचा पाठिंबा होता म्हणून स्पेनच्या राजसत्तेचे रक्षण करण्यासाठी आपले गालिदान करायला निघणारे वीर फक्त नागपुरातच निपजले असे नाही. या शतकाच्या तिसाव्या दशकात या जगातच हे बारे शिरले होते. तसेच शेकडो रशियन रशियातून पळून आले व तेथे चाललेल्या कसाईखान्याची करुण कहाणी सांगू लागले, तरी हे सारे अमेरिकेचे हस्तक आहेत, रशियात आबादीआबाद आहे असे छातीठोकपणे सांगणारे महाभागही फक्त भारतातच होते असे नाही. साऱ्या जगातच ते होते.

इंग्रजी शिक्षणाने विचारशक्तीचे वन्ध्याकरण
साऱ्या जगात व भारतात फरक याबाबतीत होता की भारत सोडून बाकीच्या जगात याबाबतीतले सत्य जाणणाराही एक वर्ग होता. सर्वसाधारण बुद्धिमतांना मार्क्सवादाने भुरळ पाडली तरी मार्क्सने ज्या क्षेत्रात भरमसाठ मते मांडली त्या अर्थशास्त्र, इतिहास व तत्वज्ञान या क्षेत्रात काम करणा-या बुद्धिमतांना मार्क्सवादाचा पोकळपणा तेनहाच दिसून आला होता. तत्त्वज्ञानाच्या इतिहासात मार्क्सवादाचे नाव सहसा आढळत नाही व कोणताही जगन्मान्य इतिहासकार मार्क्सची इतिहासोपपत्ती मानीत नाही, व नव्हता. अर्थशास्त्रामध्ये मार्क्सच्या विचारांची चर्चा आदळते, पण ते विचार बहुधा अमान्य केले जातात. अर्थशास्त्र व इतिहास यांचे तज्ज्ञ म्हणून समजले न जाणारे, पण जगातील विचारवंतांत ज्यांचे स्थान अग्रगण्य मानले जात होते अशा एच जी. वेल्स व बर्ट्रांड रसेल यांनी मार्क्सवादाचे यथार्थ मूल्यमापन केले होते. “एक जण श्रीमंत झाल्यामुळे दुसरा गरीब होतो” ही भाबडी समजूत समाजवादाच्या मुळाशी आहे. गरिबीची कारणपरंपरा एवढी सोपी नाही असे एच्. जी. वेल्सने साऱ्या जगात मार्क्सवादाचा उदो उदो होत असताना आपल्या ‘मानवाचे काम, सुख व संपत्ति’ या ग्रंथात उद्गार काढले. रशियन क्रांतीनंतर लगेच रशियाला भेट देऊन आल्यानंतर बर्ट्रंड रसेलने “बोल्शेनिझम, तत्व व आचार” हा ग्रंथ लिहिला. त्यात त्याने कम्युनिझमची तुलना इस्लामशी केली आहे. कम्युनिझम हे विज्ञान नसून इस्लामसारखा एक धार्मिक उन्माद आहे असे त्याचे मत होते. “इस्लामला अमेरिकेसारख्या एखाद्या बलसंपन्न राष्ट्राचा मुकाबला करावा लागला नाही, पण कम्युनिझमला तो करावा लागणार आहे. या मुकाबल्यात कम्युनिझमला हार खावी लागेल. याची यूरोपवर काही मात्रा चालणार नाही व मग तो चीनसारख्या पूर्वेकडील देशात हातपाय पसरेल” अशी भविष्यवाणी त्याने या ग्रन्थात ग्रंथित केली आहे. ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली. जिवंत देशामध्ये माक्र्सवादाची अशी खरी पारख करणारे विचारवंत निघाले.

पण भारतीयांची विचारशक्ति पारतंत्र्यामुळे व इंग्रजी शिक्षाणामुळे इतकी पंगू झाली आहे की मार्क्सवादाची चिकित्सा करू शकणारा एकही सखीचा लाल येथे निघाला नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर कम्युनिस्ट द्वेष्ट्यांचा एक वर्ग आपलाशक्षितांत निघाला. पण तो देखील स्टॅलिनच्या अत्याचारामुळे होरपळलेल्या पाश्चात्य विचारवंतांचे अनुकरण करणारा होता, मार्क्सच्या ग्रंथाची स्वयंप्रज्ञ चिकित्सा करून सिद्ध झालेला नव्हता. आज ज्योति बसू म्हणत आहेत की रशियात झालेल्या घडामोडींनी मार्क्सवाद खोटा ठरला नसून रशियात माक्र्सवादाची अंमलबजावणी ठीकपणे झाली नाही एवढेच स्पष्ट झाले आहे. यावर प्रश्न असा उपस्थित होतो की ज्योती बसूना रशियात मार्क्सवादाची अंमलबजावणी ठीकपणे होत नाही हे गोर्चाचाव्हच्या आधी का कळले नाही? तसेच मार्क्सवादाची अमंलबजावणी ठीकपणे न करणाऱ्या स्टॅलिनची ते तरफदारी का?

या एकूण मार्क्सवादाच्या बोजवाऱ्याने आंग्लशिक्षित भारतीयांना विचारशक्ति नावाचा अवयव नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.