इतर

आम्ही आग्न्याचा किल्ला बघायला गेलो, वाटाड्याने आम्हाला सुंदर बागबगीचे, महाल, कलाकुसर दाखविली. पण ह्या बाह्य देखाव्याने माझे समाधान झाले नाही. मला तिथली तळघरे पाहायची होती. पण तिथला रक्षक ते दाखवेना. तेव्हा मी त्याला पैसे देऊन तळघरांत प्रवेश मिळविला. राजाच्या मर्जीतून उतरलेल्या स्त्रियांना तेथे कोंडून ठेवून त्यांचा छळ केला जात असे. आम्ही त्या अंधाच्या कोठड्या पाहिल्या. माझ्या मनात आले, ह्या तुरुंगाच्या भिंती बोलू लागल्या तर किती क्रौर्याच्या करुण कहाण्या कानावर येतील! लोक इथल्या कलाकुसरीच्या, सौंदर्याच्या आठवणी घेऊन जातात. मला त्यापेक्षा तिथल्याअंधारकोठड्याच आठवत राहिल्या! …… हिंदू धर्माच्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाच्या बाह्य मोठेपणावर भाळून त्याचे गोडवे गाणार्याच माझ्या पाश्चात्त्य मित्रांना मी विनंती करते की हिंदू तत्त्वज्ञानावरील व्याख्याने ऐकून भारून जाऊ नका. ह्या हिंदुबुद्धिमत्तेच्या स्मारकाखालचे चोर-दरवाजे उघडून बघा, म्हणजे ह्या उदात्त तत्त्वज्ञानाचे व्यवहारातले विकृत रूप दिसून येईल. तुमच्या ह्या अशा गुणगायनाने सुधारणेच्या दिशेने पावले टाकू लागलेल्या हिंदी बांधवांना पुन्हा परंपरेचे प्रेम उफाळून येईल. स्त्रियांच्या प्रगतीच्या किलकिल्या होऊ लागलेल्या वाटा पुन्हा गुलामगिरीच्या झापडांनी अंधारून जातील. All is not poetry with us. The prose we have to read in our lives is very hard.”