पत्रव्यवहार

श्री दि. य. देशपांडे यांस स. न.
आपला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाबद्दलचा लेख वाचला. श्री. रेगे यांनी महाराष्ट्र फौंडेशनच्या बक्षीससमारंभाच्या वेळच्या भाषणात मराठी भाषांतर केलेल्या तत्त्वज्ञान इत्याबद्दलच्या पुस्तकांची आवश्यकता आहे असे म्हटले होते. श्री. भटकळ यांना अशी पुस्तके कॉलेज- विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध करण्यात रस आहे असे मला समजले. (महाराष्ट्र फौंडेशनच्या बक्षिसांची योजना करणार्या श्री. देशमुखांनी मला ही माहिती दिली.)
अशी पुस्तके, म्हणजे जी मराठी माध्यमातून तत्त्वज्ञानासारख्या लिबरल आर्टच्या शिक्षणासाठी वापरता येतील त्यांचे भाषांतर सुरू करण्याची योजना स्पॉन्सर करावी अशी माझीकल्पना आहे.
पण भारतात कुठली पुस्तके, ती वापरली जातील का? कुठल्या विषयांची, कोण भाषांतर करणार, भाषांतराचा दर्जा काय? वगैरे ठरवणारी सुजाण माणसे असल्याशिवाय ही योजना अमलात येणे अशक्य आहे.
सुरवातीला दोन पुस्तकांचे भाषांतर व्हावे असे मी म्हणते. वर मी लिहिलेल्या मुद्द्यांबद्दल तुम्ही काही सुचवू शकाल का? मला प्रकाशन व डिस्ट्रिब्यूशनच्या उद्योगात पडायचे नाही. फक्त भाषांतर करून घ्यायचे व पुढील काम पुस्तकप्रकाशकाचे अशी माझी कल्पना आहे. तसेच ह्या कामाला सुरवातीला sced money लागेल तोही कसा पाठवायचा ते ठरवले की मी पाठ्वीन.
मुख्य म्हणजे हे काम कसे करावे हे ज्ञान असलेली माणसे असल्याशिवाय हे काम सुरू होणार नाही. जर ही योजना अस्तित्वात आली तर इथे आणखी स्पॉन्सर्स शोधता येतील. तत्त्वज्ञान, राजकारण, मानवशास्त्र (anthropology) अशा विषयांच्या अभ्यासातूनच visionary माणसे निर्माण होतात हा माझा विश्वास आहे. म्हणून हा प्रयत्न.
आपली
ललिता गंडभीर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.