डॉ. स. ह. देशपांड्यांचा राष्ट्रवाद

आजच्या सुधारकच्या मागील दोन अंकांत ‘परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद’ या विषयावरील डॉ.स.ह. देशपांडे यांचे दोन लेख वाचले. त्यात त्यांनी राष्ट्रवादाची जी मीमांसा केली आहे त्यासंबंधी मी माझे विचार मांडीत आहे.
डॉ. देशपांड्यांच्या मते राष्ट्रवाद हा स्पर्धाशील असूनगटस्वार्थाची प्रेरणात्यातप्रधान असते. विशुद्ध भूतदया किंवा मानवी अनुकंपायांसआंतरराष्ट्रीय सहकार्यात फारसा थारा नसतो. पणअंतर्गत व्यवहारात इंग्लंडसारख्या देशात विशुद्ध चारित्र्य जपलेले आहे. राष्ट्रवाद हा प्राधान्याने सांस्कृतिक राष्ट्रवादच असतो. राष्ट्रीय भावना उद्दीपित करण्यासाठी सर्वसामान्य जनतेस जागृत करण्यासाठी स्फूर्तीची केंद्रे उज्जीवित करावी लागतात. इत्यादि, इत्यादि.
गेल्या दोनशे वर्षांच्या राष्ट्रवादाच्या विकासामध्ये स्पर्धा आणि स्वार्थ यांचाच बोलबाला होता असे म्हणणे बरोबर होणार नाही. कारण समाज, भाषा, संस्कृती, सलग भूप्रदेश व आर्थिक हितसंबंधाच्या आधारावर एकत्र येणार्याव राष्ट्रीय समाजांनी आपल्यावर इतरांची जी गुलामगिरीहोती तिला विरोध केलाआणि संकुचित अस्मितांचे महत्त्व कमी करीतराष्ट्राची एक ऐहिक आणिधर्मनिरपेक्ष अस्मिता तयार केली. आशिया आणि आफ्रिकेतील राष्ट्रासस्वातंत्र्याच्या आणि मुक्तीच्या प्रेरणा प्रदान केल्या. भारतातील स्वातंत्र्यचळवळीत भारताची मुक्ती तिसर्याय जगातील इतर देशांच्या मुक्तींची सुरुवात होती. सर्वच राष्ट्रवाद सारखे नसतात. नाझींच्या इटालीतील फॅसिस्टांचा किंवा ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचा राष्ट्रवाद आक्रमक लढाऊव इतरांची साधने ओरबाडणारा होता. तर भारत, इजिप्त, चीन वगैरे देशांतील राष्ट्रवाद साम्राज्यशाही आणिगुलामगिरीविरुद्धचा प्रगमनशील, सर्व शोषितांना एकत्र आणणाराराष्ट्रवाद होता. भारतामध्ये राष्ट्रवादाच्यास्वरूपाबाबत स्वातंत्र्यचळवळीच्या काळात ऊहापोह झाला होता. आधुनिक पाश्चात्त्यराष्ट्रवादाच्या स्वरूपावर गुरुदेवरवींद्रनाथ टागोर यांनी अत्यंत कठोर अशी टीका केली होती. म. गांधींना आधुनिक पाश्चात्त्य राष्ट्रवादाचे आक्रमक स्वरूप मान्य नव्हते. ते ज्या पाश्चात्त्य संस्कृतीवर आधारलेले होते त्यास ते ‘तीन पैशांचा तमाशा’ म्हणत असत. पं. नेहरूंनी राष्ट्रवादाचे विघातक स्वरूप लक्षात घेतले होते. राष्ट्रवाद ही भावना उत्तेजकअसून त्यातधर्म ही भावना मिसळली की ती अधिक तामसी बनते असे विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी म्हटले आहे. आक्रमकता, स्पर्धाशीलत्व आणिगटस्वार्थ याचकेवळराष्ट्रवादाच्या प्रेरणा नसून तोसुजाण परस्पर-सामंजस्यावर, बंधुभावावर आणि मानवी मुक्तीच्या तत्त्वांवर खरे तर अधिष्ठित असतो असे आमचे विचारवंत सांगतात, पणडॉ. देशपांड्यांचे सावरकरीराष्ट्रवादावर पोषणझालेले असल्यामुळेवरील विचार त्यांना मान्य होत नसावेत.
डॉ. देशपांड्यांना असे वाटते की प्रत्येकराष्ट्र आपल्याशेजारच्याराष्ट्रास गिळंकृत करते.पणही। कौटिल्याच्या काळातील गोष्ट झाली. दुसर्या् महायुद्धानंतर अशी परिस्थिती राहिलेली नाही आणि काही अपवाद वगळता सर्वच देश शस्त्रास्त्रांचा वापर इतरांविरुद्ध करीत नाहीत. त्यामुळे शस्त्रस्पर्धाआणि संघर्षअसले तरी प्रत्येक शेजारी राष्ट्र शत्रू म्हणून वागविले जात नाही हे त्यांनी कबूल केले आहे. आज प. युरोपात एकतेची भावना असून अनेक विभागीय सहकार्य व सामंजस्य स्थापन करणार्या. प्रादेशिकसंस्था स्थापनझाल्या आहेत. त्यामुळे केवळ स्पर्धावस्वार्थ हाच आंतरराष्ट्रीयराजकारणाचाआशयराहिलेला नाही..
अंतर्गत व्यवहारात राष्ट्रवाद हा आक्रमक आणि जुलमी बनू शकतो. कारण जगातील सर्वच देशांतअंतर्गत एकजिनसीपणास्थापनझालेलानाही.इंग्लंडसारखी एकात्मराज्यव्यवस्थाअसणार्याव देशास उत्तर आयर्लंडचा प्रश्न सोडवता आलेला नाही. तेथेही स्कॉटिशनॅशनल पार्टीचा प्रभाव वाढत आहे. अंतर्गत व्यवहारात वेगवेगळ्या भाषिक आणि प्रादेशिक गटांना स्वयंनिर्णयाचा अधिकार देऊन त्यांचा आर्थिक व सांस्कृतिक विकास घडवून आणणे हायावरील एक उपाय आहे. आजराष्ट्रवादापुढील खरे आव्हान अंतर्गत बंडखोरीतून निर्माण झाले आहे, कारणराष्ट्रवादाच्या नावाखाली वरिष्ठ गट, वर्ग व जाती आपले शोषण करीत आहेत असे दबलेल्या राष्ट्रगटांचे म्हणणे आहे. हा प्रश्न अंतर्गत व्यवहारात विशुद्ध चारित्र्य जपण्याचा नसून समाजाच्या व राष्ट्राच्या विविध घटकांत आर्थिक आणि सांस्कृतिक अधिकारांच्या समान वाट्याचा आहे. पण या प्रश्नांकडे प्रा. देशपांडे यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.
राष्ट्रवादाच्या भावनेच्या वाढीमध्ये धर्म व परंपरा यांची काय भूमिका असावी हा वादाचा मुद्दा आहे. केवळ एकधर्मवसंस्कृती यांच्याअहंकारावर उभाराहिलेलाराष्ट्रवाद हासंकुचितराष्ट्रवाद असणे आणि त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय क्षेत्रात युद्धखोरी आणि अंतर्गत क्षेत्रात दबलेल्या राष्ट्रगटांची बंडखोरी हे असतात. त्यातून देशाची खराबी होते. त्यामुळे समान भाषा, संस्कृती, सलग भूप्रदेश व आर्थिक हितसंबंधातून राष्ट्राची धर्मनिरपेक्ष अस्मिता निर्माण होणे आवश्यक असते. ही अस्मिता जर विशिष्ट धर्म, जात व संस्कृतीवर आधारलेली असेल तर त्यातून आपला’ व ‘परका असे भेद देशांतर्गतच निर्माणहोतात. १९९२-९३च्या मुंबईतील जातीय दंगलीच्यावेळी पोलिस याचशब्दांचा वापर हिंदुव मुसलमानांबाबत करीत होते.
राष्ट्रवादाच्या विकासासाठी परंपरेतीलअभिमानाची वस्फूर्तीची केंद्रे उज्जीवित केली पाहिजेतअसे देशपांडे सांगतात. मुळातच जर राष्ट्रवादाची भावना बळकट नसेल तर ‘स्फूर्ती’चे टॉनिक देऊनही ती बळकट होणार नाही. अनेकस्फूर्तीची केंद्रे समाजात विभाजन करणारी, द्वेषभावना निर्माण करणारी असतात. जी केंद्रे सर्वसमावेशक असतात ती तितकीशीस्फूर्तिदायक असतीलच असे नव्हे! अभिमान निर्माण करून सामान्य जनतेला आक्रमक करण्याचे प्रकार युद्धकाळात झालेले आहेत. पण हा ज्वर कायम टिकविता येत नाही हे पाकिस्तानातील घडामोडींवरून सिद्ध झाले आहे. जनतेला ‘नोबललाय’ सांगणेअंतिमतः कोणासही उपयोगाचे ठरत नाही; कारण अशाप्रकारच्या मिथकातून निर्माण करण्यात आलेल्या ‘तप्त भावनिक स्थितीचे परिणाम कशात होणार हे सांगावयास पाहिजे असे नाही.
डॉ. देशपांडे यांच्या विवेचनात एक प्रकारचे द्वैत आहे. त्यांना विवेकनिष्ठा हवी आहे त्याप्रमाणे तप्त भावनिकराष्ट्रवादही हवा आहे. विवेकनिष्ठेच्या विरुद्ध असली तरी ऐतिहासिक सत्याशी फारकत असणारी मिथके त्यांना हवी आहेत. त्यासाठी राजकीय नेत्यांनी सामान्य जनतेसअसत्य सांगितले तरी हरकत नाही असे त्यांना वाटते कारण ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धा व नैतिक अराजक यांच्या वातावरणात जगण्याचा व टिकण्याचा प्रयत्न करताना विवेकनिष्ठेस काही प्रमाणात तिलांजलि देणे आवश्यक असते असे त्यांचे मत आहे.
डॉ. देशपांडे यांच्याया मताशी कोणताही विवेकशील मनुष्य सहमत होणार नाही. याचे कारण असे की जी गोष्ट राष्ट्रनेत्यांसाठी योग्य आहे तीच गोष्ट सामान्य जनतेसाठीही योग्य आहे; कारण सर्वसामान्य जनतेच्या नैतिक उन्नयनातून संपूर्ण राष्ट्राचे उन्नयन होणार आहे.विवेकनिष्ठा केवळ मूठभरांसाठी आवश्यक नसून ती सर्वांसाठीच आवश्यक असते. समाज विवेकशील, धर्मनिरपेक्ष, सहिष्णुबनण्यात राष्ट्राचे मोठेपण आहे. त्यातूनच खयाअथनिनैतिक अराजकसंपणारे आहे. ‘नोबल लाय’ मुळे नैतिक अराजक वाढेल हे डॉ. देशपांडे लक्षात घेत नाहीत.
सर्वसमावेशक, प्रगमनशील, सहिष्णु आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद आणि विवेकनिष्ठा यांत मूलभूत भेद नाही; आणि ही गोष्ट लक्षात घेतली तरच डॉ. देशपांडे यांच्या विचारांतील विसंगती व द्वैत दूर होईल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.