पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक,
यांस,
जुलै १९९७ च्या आजचा सुधारक च्या अंकात ‘वैज्ञानिक रीत’ हा डॉ.र. वि. पंडित यांचा लेख वाचण्यात आला. या लेखात डॉ. पंडित यांनी विश्वाबद्दलची त्यांची धारणा मांडताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांविषयी थोडेसे.
र. वि. पंडित ह्यांचे ‘विश्व बहुतांशी खगोलशास्त्रज्ञांना आज तरी तत्त्वतः मान्य नाही. आजमितीस विश्वाची उत्पत्ती ही एका प्रचंड स्फोटामुळे झाली असे शास्त्रज्ञ मानतात. त्यानंतर विश्व हळूहळू थंड होत गेले आणि त्याचे आजचे तपमान -२७०° से. (कोबे उपग्रहावरील प्रयोगातून मोजलेले) आहे.
डॉ. र. वि. पंडित ह्यांची संकल्पना ही हॉईल-नारळीकर यांच्या ‘जैसे थे’ (steady State) संकल्पनेसदृशआहे.
डॉ.पंडित पुढे लिहितात की ‘काळ, अंतरेववेगही परिमाणेतर माणसाच्या बुद्धीने उत्पन्न केली आहेत. ती विश्वाला लागूनाहीतच….माझ्या मते काळआणि अंतर ह्या विश्वाच्या दोन महत्त्वाच्या गुणधर्मावरील चर्चाहा वैज्ञानिकरीतीच्याच नव्हे मानवी बुद्धिमत्तेच्याइतिहासात एक महत्त्वाचा टप्पाआहे. किंवा सापेक्ष Relativity तर वाद ही भौतिकशास्त्राची शाखा ह्यातूनच जन्माला आली.
डॉ.र. वि. पंडित आणि हेमंत आडारकर ह्या दोनव्यक्तींना जर भेटायचे असेल तर ठरविलेल्या ठिकाणी ठरविलेल्या वेळेवरच भेटावे लागेल. नाहीतर New Yorker या मासिकातील व्यंगचित्रानुसार Prof. Einstein was usually three miles late for his meetings अशी गत होईल.
तेव्हा काल आणिअंतर ही परिमाणे विश्वालालागूनसतील, तर ‘सब मायाहै’ असेच म्हणावे लागेल.
ह्या शेवटी, डॉ. पंडित ह्यांनी वापरलेल्या ‘bodies of mass, whiffs of energy’ ह्या शब्दांच्या व्याख्या देऊन मला व ‘आजचा सुधारक’च्या वाचकांना नवीन ज्ञान द्यावे ही विनंती. तसेच मूलभूत भौतिक नियम कोणते हेही थोडक्यात सांगावे.
डॉ. हेमंत आडारकर
२०२, रामनिमी
८ मंडलिक रोड कुलाबा, मुंबई ४००००१

संपादक, आजचासुधारक
स्वतःला विज्ञानवादी म्हणवणान्यांनी विज्ञानाच्या फिजिक्स केमिस्ट्री व बायॉलॉजी (यांत बॉटनीवझुआलॉजीया उपशाखा आहेत) याशाखांच्या मूल-तत्त्वांशी तरी तोंडओळखकरून घ्यावी. आस्साइडघेऊन पुढे गेलेल्यांना हे मूलभूत ज्ञानचनसते, त्यामुळे विज्ञानाचा कैवार घेणारे लिखाण जेव्हा ते करतात तेव्हा कित्येकदा हास्यास्पद विधाने त्यांच्याकडून केली जातात. नुकसान होते ते विज्ञानवादाचे, आणि तसे होणे वाईट–एवढेच मला सांगायचे आहे.
आपला
पुणे ३० माधव रिसबूड

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.