मासिक संग्रह: जानेवारी, १९९८

तीन नवी पुस्तके

१. अग्नी ते अणुशक्ती : मानवाच्या सामाजिक-सांस्कृतिक प्रवासाच्यापाऊलखुणा
(स.मा. गर्गे : समाज, विज्ञान आणि संस्कृती, समाजविज्ञान मंडळ, पुणे; जानेवारी १९९७, पृष्ठे : ११५, किंमत : रु. ८०)
इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र वगैरे विषयांवरील विपुल लेखनामुळे आणि विशेषतः भारतीय समाजविज्ञान कोश या सहा खंडात्मक संदर्भसाहित्याच्या संपादनामुळे स.मा. गर्गे हे नाव मराठी वाचकांना ठाऊक आहे. त्यांनी आपल्या या छोटेखानी पुस्तकात मुख्यत्वे पाश्चात्त्य देशांतील घडामोडींच्या आधारावर मानवी समाजाची जडणघडण व सांस्कृतिक वाटचाल यांचा मागोवा घेतला आहे. पाश्चात्त्य देशांत जे घडले त्याचा प्रभाव जगात सर्वत्र झाला असून आज जग इतके जवळ आले आहे की पौर्वात्य-पाश्चात्त्य अशी तफावत संपलीच आहे अशी लेखकाची भूमिका आहे.

पुढे वाचा

चर्चा

संपादक, आजचा सुधारक
ऑक्टोबर ९७ च्या आजचा सुधारकच्या अंकात प्रा. विवेक गोखले ह्यांचा ‘आस्तिक्य आणि विवेकवाद’ हा लेख वाचला. या लेखातील जगात अशिव असले तरी ते ईश्वराचे अस्तित्व असिद्ध करण्यापेक्षा ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणारेच वाटते’ ह्या विधानाविषयी थोडेसे.
हा युक्तिवाद भासतो तसा नवा नाही. ‘देव करतो ते भल्यासाठीच’हाच त्याचा अर्थ. (Euphemism for a cliche.)
माझे एक अतिशय विद्वान मित्र श्री. धनेश पटेल यांनीदेखील ‘शिव’ हा शब्द ‘शंकर’ आणि ‘मंगल’ ह्या दोन्ही अर्थांनी वापरून दुसर्या महायुद्धानंतर वसाहतवाद कसा संपुष्टात आला याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता.

पुढे वाचा

मानवी शरीर – एक यंत्र वा त्याहून अधिक?

अलीकडे पर्यायी वैद्यकाचा अथवा पारंपारिक उपचार पद्धतींचा बराच गवगवा होऊ लागला आहे. गेल्या २०-२५ वर्षांत आधुनिक पाश्चात्त्य वैद्यकामध्ये प्रचंड प्रगती झाली आहे. मॉल्यिक्यूलर बायॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायो-इंजिनियरिंग ही विज्ञानाची नवी दालने विकसित झाल्यामुळे, लुई पास्टरचे जंतुशास्त्र आणि अलेक्झांडर फ्लेमिंगने पाया घातलेले जंतुविरोधक (antibiotics) औषधशास्त्र यापुढे आधुनिक वैद्यकाने फार मोठा पल्ला गाठला आहे. गुणसूत्रे व जीन्स, नैसर्गिक प्रतिकारसंस्था (immuno-system); रोगनिदानासाठी विविध प्रकारची साधने व पद्धती, उदाहरणार्थ क्ष-किरण, अल्ट्रासाऊंड, कॅटस्कॅन, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, पॉइस्ट्रान इमिशन टोमोग्राफी इत्यादी, तसेच लेसर किरणांचा वाढता वापर या सर्वांमुळे मानवी शरीराच्या रोगांची व बिघाडाची कारणे शोधणे सहजसुलभ झाले आहे.

पुढे वाचा

स्पार्टाची लोकशाही

ग्रीस हा देश अनेक बेटांचा, उंच डोंगर व खोल दन्यांचा आहे. ह्या देशाला वेडावाकडा समुद्रकिनारा आहे. परिणामी जरी ग्रीक स्वत:ला “एकच विशिष्ट जमात’ असे मानत असले तरी सगळ्या ग्रीसला एकाच राजवटीच्या अंमलाखाली आणणे कुणाला जमले नाही. ख्रिस्तपूर्व ५०० सनाच्या सुमाराला ग्रीसमध्ये फक्त एकाच शहराचा देश (city state) असे ३०० देश स्थापन झालेले होते.
ह्या सर्व देशांत स्पार्टा (Sparta) व अथेन्स (Athens) हे सर्वांत प्रसिद्ध आहेत. त्यांत स्पार्टा ह्या देशाचे पायदळ (land force) सगळ्या राष्ट्रांत बलाढ्य होते. स्पार्टा हे अक्षरशः लष्करी राष्ट्र होते.

पुढे वाचा

विश्वाची उत्पत्ती

विश्वाच्या (ब्रह्मांडाच्या) स्वरूपाविषयी डॉ. र.वि. पंडित यांनी (आ.सु. ८.७; २०७-२०८) बरेच प्रश्न विचारले आहेत. त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी हा लेख.
प्राचीन मते :
विश्वाच्या पसाच्याबद्दल, त्याच्या उत्पत्तीविषयी धर्मग्रंथात आणि तत्त्वचिंतकांमध्ये विविध मते होती. मनुष्याची दृष्टी मर्यादित असल्यामुळे दृष्टीस पडलेल्या घटनांच्या आधारावर प्रतिपादन केलेली विचारसरणी संकुचित स्वरूपाची नसती तरच नवल. बायबल, कुराण यांसारख्या धर्मग्रंथांत विश्वाची आणि सर्व सृष्टीची परमेश्वराने कशी आणि केव्हा निर्मिती केली आहे याचा तपशील दिला आहे. दुसर्याण बाजूने साध्या डोळ्यांना विशाल गगनांत ग्रहांच्या गतीव्यतिरिक्त इतर कोणतेही बदल दिसत नसल्यामुळे आणि तारे अतिशय दूर असले तरी किती अंतरावर आहेत याचे ज्ञान नसल्याकारणाने हे विश्व अनंत आहे, अफाट आहे अशी कल्पना प्रसृत झाली.

पुढे वाचा

विवाहाचा रोग

विवाह हा समाजाला जडलेला एक रोग आहे, आणि त्याच्या परिणामी उत्पन्न होणारी विवाहसंस्था ही जुलमी राज्यकारभाराला पोषक होते हे माहीत असूनही राजकीय जुलमाविरुद्ध झगडणारे लोक तिकडे लक्ष देत नाहीत. राजकीय जुलमाच्या ज्या ज्या पद्धती आहेत, त्या सर्व बीजरूपाने कुटुंबसंस्थेत आढळतात.
अनियंत्रित सत्ता, सत्ताधान्याची प्रचंड शक्ती, शिक्षणाच्या व न्यायाच्या सबबीवर केलेले कायदे आणि शिक्षा, मृत्युदंडाचा अधिकार, इतकेच काय पण कर घेण्याची योजना, या सर्वांचे मूळ कुटुंबसंस्थेत सापडते, आणि झोटिंगशाहीत राहण्याचे शिक्षण प्रथम कुटुंबात मिळते, आणि सर्व प्रकारचा जुलूम विवाहसंस्थेत पाहायला मिळतो. तनुविक्रय, मर्जीविरुद्ध समागम, या गोष्टींमुळे वेश्यावृत्ति मात्र वाईट समजतात, आणि याच गोष्टी विवाहात असूनही त्या मात्र कायदेशीर, इतकेच नव्हे तर पवित्र समजायच्या!

पुढे वाचा