पत्रसंवाद

सूचना
क) काही महिन्यांपूर्वी ‘सायंटिफिक टेंपर प्रमोशन ट्रस्ट’ने आम्हाला रु. ५००/- पुरस्कार दिला होता. आता या संस्थेने दिलेल्या इतर पुरस्कारांची माहिती उपलब्ध झाली आहे, ती अशी—-
१. डॉ. विठ्ठल प्रभु :– स्त्री-पुरुष-संबंधाविषयी वास्तवपूर्ण आणि सडेतोड विचार प्रचारासाठी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी गेली ४० वर्षे अविश्रांत धडपड
२. आजचा सुधारक :– गेली ५ वर्षे सातत्याने वैचारिक आणि संशोधनपर लेख लिहून पुरोगामी विचार प्रसृत करण्याबद्दल
३. मासिक चालना :– जातिभेद नष्ट करणे आणि पुरोगामी विचार गेली ५० वर्षे सातत्याने मांडणे ह्याबद्दल.
४. स्त्रीमुक्ति संघटना :– स्त्रियांचे प्र न झुंजारवृत्तीने सातत्याने मांडून त्याविषयीची जनजागृती करण्याबद्दल
५. लोक विज्ञान संघटना :– लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजविण्यासाठी प्रायोगिक कार्यक्रम आखणे.
६. महालक्ष्मी ट्रस्ट हॉस्पिटल, अर्नाळा, ता. वसई, जि. ठाणे. :- ग्रामीण विभागात मानवतेच्या दृष्टिकोणातून करीत असलेली वैद्यकीय सेवा.
७. स्त्री हितकारिणी :– तळागाळातील स्त्रियांची मानसिकता बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न आणि त्यांना वैद्यकीय मदत देणे.
८. महिला आंदोलन पत्रिका :– डॉ. आंबेडकर रोड, परेल, मुंबई–४०० ०१२. श्रमिक महिलांमध्ये जागृती आणि पुरोगामी विचार रुजविण्यासाठी
९. मिळून साऱ्याजणी :– स्त्री मासिकांतर्फे सामाजिक प्र नांवर जागृती निर्माण करण्यासाठी
१०. चालनाकार :- अरविंद राऊत स्मृती पुरस्कार – दिवंगत श्री. अरविंद राऊत यांचे चिरंजीव श्री. किरण राऊत यांच्या वेळोवेळीच्या सूचनेनुसार पुरोगामी विचारांचे त्या वर्षातील स्तंभलेखक चालनाकार अरविंद राऊत स्मृती पुरस्कार.
११. ज्योतीराव फुले समता प्रतिष्ठान :– सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी जनजागर.

ख) ह्याच संस्थेने मुंबईच्या महापौरांना रस्ते, पूल व चौक यांना नावे देण्यासंबंधी सूचना करणारे एक पत्र पाठविले आहे. त्यातील सूचनांचा गाभा असा, की राजकारण टाळून, अधिकृत नावांवर आग्रह धस्न आणि ज्या व्यक्तीचे नाव दिले जाते तिच्या कार्याचे स्मरण देणारा फलक वापस्नच नावे दिली जावी.

जास्त माहितीसाठी “श्री. म. कृ. सामंत, विश्वस्त अध्यक्ष, सा. टें. प्र. ट्रस्ट, द्वारा चेतना मुद्रणालय, शास्त्रीबिल्डिंग, ३९ ज्ञान मंदिर मार्ग, दादर, मुंबई–४०० ०२८ (दूरध्वनि ४२२२१३/७६७१)” यांच्याशी संपर्क साधावा.

श्रीराम गोवंडे
18 Indian Run Rd., Princeton Jct, NJ 08550-1406, U.S.A.
आडनावे टाकली तरी मनुष्याच्या बोलण्यावरून साधारण ढोबळ जात लक्षात येते. ‘पानी’ मागणाऱ्याची जात लपत नाही, भले त्याचे आडनाव माहीत नसले तरी. जोपर्यंत आपल्या समाजात जातिभेदामुळे होणारे संस्कार कायम आहेत तोपर्यंत जात लक्षात येणे थांबेल का? परंतु जातिभेदाच्या वेताळापासून सुटका करायची असेल, तर सुस्वात “आडनाव नको” ने व्हायला हरकत वाटत नाही. पुढची पायरी म्हणजे ‘नचिकेत वर्षा विजय’ हा हिंदू असणार आणि ‘नचिकेत वर्षा पीटर’ हा मिश्र विवाहातून जन्मलेला मुलगा असणार हे—-तर त्याचे काय करायचे? पण हा प्र न निर्माण होण्याइतकाच आपण मजल मारली तरी खूप प्रगती झाली म्हणायचे. वसंत कानेटकरांचे आ.सु. विरोधकांची पर्वा करीत नाही असे म्हणणे दिसले पण पटले नाही. आजपर्यंत आ.सु.शी सहमत नसलेल्यांची अनेक पत्रे-लेख आ.सु.त वाचल्याचे आठवते. आ.सु. वरील प्रखर टीका वाचल्याचे पण आठवते. आणि त्यावर आ.सु.ची योग्य शब्दांत, without toxicity in words, उत्तरे पण स्मरणात आहेत. मोकळेपणे विचारांची देवाणघेवाण करणे बंद करून, आमचेच ‘ism’ हे पूर्ण आणि वादातीत आहे, असे म्हणणे म्हणजे बायबल, कुराणच्या पंक्तीत नसणे नव्हे काय? जेव्हा स्वतःचे विचार आणि कल्पना हे विवेक, ज्ञान व समंजसपणावर आधारलेले असतात तेव्हा विरोधकांचा जाच न वाटता त्यांच्या आक्षेपांना ‘शांत शब्दांत’ (versus प्रक्षोभक शब्दांत) प्रत्युत्तर देता येते हे आ.सु. च्या दि. य., प्र. ब. आणि मंडळींनी वारंवार दाखवलेले आहे. विरोधकांचे लिखाण वयं न मानता त्यातील निवडक लेख प्रसिद्ध करण्याची प्रथा आ.सु.ने चालू ठेवावी असे वाटते, असो.

जातींचा उगम–एक दृष्टिकोण हा लेख वाचला. त्यावरून जाती ह्या अनेक शतकांत evolve झाल्या असे लेखकाचे म्हणणे आहे असे वाटले, आणि पुढील विचार सुचले. जाती evolve होत असतानाच जातिभेद आणि त्यामुळे होणारी बहुजन समाजाची मुस्कटदाबी ह्या गोष्टी पण evolve होत असल्या पाहिजेत. ह्याचाच अर्थ हजारो वर्षे बहुजन समाज, त्याच्यातल्याच काही घटकांकडून होणारा अन्याय सहन करत आला, असा होतो. आणि हे पटत नाही. इतिहास, सहन करण्यापलिकडचा अन्याय फार काळ टिकत नाही, कारण ग्रस्त लोक त्याविरुद्ध बंड करतात, हे अनेक वेळा दाखवून देतो—-गुलामगिरी, colonizations जाति-भेदामागे वंशभेदाचा मोठा वाटा असावा असे वाटते. त्याचप्रमाणे एकेकाळी, त्या काळच्या आर्थिक घडणीमुळे, जातिभेदाचे महत्त्व/त्रास वाटत नसावा पण समाजाची जशी आर्थिक घडण बदलली आणि तदनुसार काहींच्या जातिनिगडित व्यवसायांना बरकत आली तेव्हा ते लोकांच्या डोळ्यात आले असणार आणि तोपर्यंत ‘चालून जाणारा’ जातिभेद असह्य वाटायला लागला असणार अशी पण शक्यता मनात येते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.