पत्रसंवाद

केशवराव जोशी, तत्त्वबोध, नेरळ (रायगड) — ४१० १०१
तुम्ही पान ४१५ वर मृतकांची बाबरीनंतरची आकडेवारी मागितली आहे म्हणून हा पत्रप्रपंच करीत आहे. सर्व कमिशननी हिंदूनाच दोषी धरले आहे.
सुरवातीलाच एक स्पष्ट करितो की आम्ही बाबरी मशीद पाडण्याच्या विरुद्ध आहोत. आम्ही बाबराची अवलाद नाही. राजवाडे, पोतदार, पगडी, खरे शेजलकरांचे अनुयायी आहोत आणि जे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकवितात तेवढेच आम्ही मान्य करणार. “आयोध्येला राम जन्मला” व “बाबराने देऊळ पाडले’ असे इतिहासात शिकवत नाहीत.
“श्रीकृष्ण अहवालात’ पान २७ वर माहिती दिली आहे ती अशी आहे:
“मुंबईत डिसेंबर ९२ व जानेवारी ९३ मध्ये ९०० जण मेले. ५७५ मुस्लिम, २७५ हिंदू ४५ जणांचा धर्म समजला नाही व ५ इतर धर्मीय होते. २०३६ जखमी झाले. ११०५ मुस्लिम ८९३ हिंदू व ३८ इतर होते.
हिंदूच्यांमध्ये अनेक वासनाकांडे होऊनसुद्धा असा समज आहे की हिंदू परकिमांवर बलात्कार करीत नाहीत इ.
Times of India 22-12-92. ‘Gruesome tales by Surat Muslim Women’ – — many muslim women were pulled out from the ill-fated Bhusawal bound train on Dec. 10. Some husbands were slaughtered in front of their wives and then gang-raped. Naked women ran shivering and shuddering, children clinging to them.” ___”A visit to Mariaan Shaani Hall where about 1529 terrorstriken are taking shelter is a tragic sight. What is shocking that killers video recorded the incidents. The police should seize video cassettes”.
एक लक्षात ठेवावयास हवे की हिंदू किंवा मुसलमान दंग्यात मेले तरी ते गरीब असतात. श्रीमंत हिंदू किंवा मुसलमान मारला जात नाही. तसेच सैन्यात जाणारे सुद्धा गरिबांपैकीच असतात. त्यांनाच आघाडीवर पाठवतात.
ज्या काळी मार्क्सने मार्क्सवाद लिहिला; त्याचवेळी “विष्णुबुवा ब्रह्मचारीं’नी मार्क्सवादाशी ‘मिळताजुळता’ निबंध लिहिला. मिळताजुळता हे वरवरच खरे आहे. हा एक योगायोग आहे. भारतातली परिस्थिती अनुकूल नसल्याने त्यास प्रसिद्धी मिळाली नाही.
[संदर्भ : ‘विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि त्यांचे विचारधन’ ले. श्री. पु. गोखले, पुणे १९९६]

अतुल सोनक, प्लॉट नं. १३१, अभ्यंकरनगर, नागपूर — ४४० ०१०
फेब्रुवारी २००२ च्या अंकात श्री. अभय विष्णुकांत वैद्य यांची प्रतिज्ञा वाचली. इतकी कलमे असणारी प्रतिज्ञा आजपर्यंत माझ्या पाहण्या-ऐकण्यात आली नाही. वैद्यांच्या प्रतिज्ञेमुळे त्यांना कुठल्याही लग्न, मुंज, इतर धार्मिक विधीला तसेच अंत्यसंस्काराला जायची गरज उरणार नाही, हे स्पष्ट आहे.
प्रतिज्ञेत नमूद केलेल्या लग्न, मुंज किंवा इतर धार्मिक विधीतील अनिष्ट/अन्याय्य चालीरीती, प्रथा निश्चितच निषेधार्ह आहेत. त्यामुळे अशा प्रथा आजच्या विज्ञानयुगात बंद व्हायला पाहिजेत परंतु उच्चविद्याविभूषित डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक आणि इतरही लोकांच्या लग्न, मुंज किंवा इतर धार्मिक कार्यांत सर्रास सर्व काही केले जाते. सर्व सोपस्कार पार पडल्याशिवाय लग्न किंवा कोणतेही कार्य झाल्यासारखे वाटत नाही ना? ।
परंतु अशा कार्यांवर बहिष्कार टाकल्याने काय साध्य होईल? वैद्यांच्या बहिष्कारामुळे किती लोक अशा अनिष्ट प्रथा टाळतील? वैद्यांसारखी प्रतिज्ञा किती लोक करू शकतील? किंवा केलीच तर पाळू शकतील? महात्मा फुले, डॉ. आंबेडकरां-सारख्या महामानवांनी अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठविला परंतु आपल्या समाजातील परंपरावाद्यांनी त्या प्रथा बंद पडू नये म्हणून कायम देवाधर्माचा बागुलबुवा उभा केला आणि त्या प्रथा कमीअधिक प्रमाणात तशाच सुरू ठेवण्यात परंपरावादी यशस्वी ठरले. सुधारणावादी लोकांचे प्रयत्न कमी पडले म्हणा, किंवा सुधारक कमी पडले म्हणा, संगणकयुगातही इंटरनेटवरून गणपतीला अभिषेक करणारे लोक आहेत. तेव्हा अशा प्रतिज्ञा केल्याने आपला समाज बदलणार नाही याची मला खात्री आहे, कारण प्रतिज्ञा ऐकून लोक आपल्या धार्मिक कार्यक्रमांत बदल करणार नाहीत. पण वैद्यांनी म्हटले की माझ्या घरची गणपतीची मूर्ती दूध पिते आहे तर त्यांच्याकडे लोकांची तोबा गर्दी होईल.
अज्ञानमूलक व अर्थशून्य विधी करण्यातच ज्या समाजाला धन्यता वाटते, त्या समाजामध्ये नुसती प्रतिज्ञा कस्न भागणार नाही. समाजामध्ये विवेकवादी विचार रुजवण्यासाठी ज्याप्रमाणे आजचा सुधारक हे मासिक गेली बारा वर्षे सुरू आहे तशाच पद्धतीने विवेकवादी लोकांनी सुधारक नावाची एक संस्था काढून समाज-प्रबोधन करायला पाहिजे. समाजातील विवेकवादी विचारवंतांनी जिथे जिथे अशा प्रकारचे अनावश्यक धार्मिक कार्यक्रम सुरू असतील तिथे तिथे जाऊन लोकांना समजावून सांगायला पाहिजे. असे कार्य कोण करू शकतील? आणि त्यासाठी वेळ कसा देता येईल? सध्याच्या धकाधकीच्या जीवनात, नोकरी-धंदा सांभाळून हे कार्य करता येईल काय? जरूर करता येईल. प्रत्येक शहरात-खेड्यात विवेकवादी लोकांनी गट स्थापन कस्न दिवस वाटून घ्यावेत किंवा गटात जास्त लोक जमल्यास दिवसाचे काही तास वाटून घ्यावेत आणि त्या कालावधीत जिथे अनावश्यक-अनिष्ट धार्मिक कार्य सुरू असेल तिथे ज्याची पाळी असेल त्याने किंवा इतरांना वेळ असल्यास इतरांनीही जाऊन तसे कार्य करणाऱ्यांना ते अनावश्यक कार्य करण्यापासून परावृत्त करता येईल. त्या लोकांना आपण समजावून सांगू शकलो तर ठीक, अन्यथा प्रयत्न केल्याचे तरी समाधान होईल. ज्येष्ठ विवेकवाद्यांनी अशा प्रकारचे गट स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मी आजचा सुधारकचे माध्यमातून विनंती करतो.
अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता, लोकसंख्या नियंत्रण, नैतिकता, मानवता, पर्यावरण संरक्षण, संपत्तीचा नाश किंवा अपव्यय टाळणे, काटकसर, जातिव्यवस्था-उच्चाटन व बुद्धिप्रामाण्यवाद ही तत्त्वे प्रतिपादित करणाऱ्या अभय वैद्यांनीच सुधारक गट स्थापन करण्यास पुढाकार घ्यावा. आजचा सुधारक चे अनेक वर्गणीदार या उपक्रमाला साथ देतील अशी मला खात्री आहे. मीसुद्धा माझ्या वाट्याला येणारे काम आनंदाने करण्यास तयार आहे. वैद्यांनी हवे तर आम्हालाही प्रतिज्ञा घ्यायला लावावी.
राजीव जोशी, तत्त्वबोध, चेक नाका, हायवे, नेरळ, जि. रायगड – ४१० १०१
TOI 19-02-2002 Business मध्ये लक्ष्मी मित्तल ह्यांना ७० दशलक्ष पौंडांचे कर्ज मिळविण्यासाठी ब्रिटिश सरकारने कसे सहाय्य केले हे वृत्त आले आहे. इंग्लंड एक (बऱ्यापैकी) आर्थिक महासत्ता आहे. लोकशाही कित्येक शतके रुजलेली आहेच परंतु लोकशाहीचा आदर्श प्रकार–द्विपक्षीय लोकशाही-अस्तित्वात आहे. नागरिक जागरुक आहे. तेथे सुद्धा नागरिकांच्या पैशातून कर्ज दिले जाते इतकेच नव्हे तर हा मार्ग सुकर व्हावा म्हणून अमेरिकन प्रशासनाकडून (अर्थात नियमबाह्य) दबाव आणला जातो. Enron ची अमेरिकन प्रशासनाशी अधिक व जवळीक होती. त्यामुळे या प्रकरणी भारतावर सुद्धा असा दबाव आला असणार हे उघड आहे. जागतिकीकरणाचा अर्थ जागतिक स्तरावर धूळघाण असा होत आहे.
आर्थिक धोरणांचे सामाजिक मनोवृत्तीवर परिणाम याबाबत आपण फेब्रुवारी २००२ च्या आ.सु. मध्ये माझेपत्रही प्रसिद्ध केले आहे.
सामाजिक/राजकीय जागृतीची लढाई सर्व परिवर्तनवादी पक्षांनी/संघटनांनी एकत्रितपणे लढली पाहिजे.
आर्थिक धोरणे अशीच राहिली तर त्यांचा सामाजिक मनोवृत्तीवर अधिका-धिक परिणाम होऊन राजकीय सत्ता मिळण्याचे परिवर्तन वाद्यांच्या स्वप्न अधिकाधिक दूर राईल.

श्याम कुळकर्णी, डी ५/४ सुंदर गार्डन, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे–४११०५१ हिंदू-मुसलमान दंगे
फेब्रुवारी २००२ च्या आजचा सुधारक मधील “सांप्रदायिक दंगे — एक अभ्यास’ या लेखात अधिक विवरण हिंदू-मुसलमानांतील दंग्यांविषयीच असल्याचे लेखाचे शीर्षक सरळसरळ हिंदू-मुसलमान यांच्यातील दंगे असेच हवे होते असे वाटते. लेखातील आकडेवारीवरूनही हेच सिद्ध होते.
हिंदू–मुसलमानांचे दंगे ही आजची बाब नसून ‘सुधारक’ का आगरकरांच्या काळापासून वा त्याही पूर्वीपासून ते चालूच आहेत. आगरकरांनी या विषयावर लिहिलेल्या व आगरकर वाङ्मय खंड २ मध्ये समाविष्ट केलेल्या सहा लेखांतील काही भाग उद्धृत करत आहे व आगरकरांसारख्या समतोल विचारी माणसाचे ते मत असल्याने पूर्वग्रहदूषित म्हणून ते दुर्लक्षित करता येणार नाही.
आगरकर म्हणतात, (कंसांतील शब्द पत्रलेखकाचे)
“हिंदू लोकांशी त्यांचे (मुसलमानांचे) जे वारंवार भांडण होतें तें त्यांच्या (मुसलमानांच्या) धर्मवेडामुळे होते. —- हिंदू लोक जात्या गरीब आहेत. ते आपण होऊन विनाकारणच कोणाच्याही अंगावर तुटून पडावयाचे नाहीत . . . तथापि जोपर्यंत दुसऱ्या लोकांची (म्ह. मुसलमानांची) डोकी धर्मवेडाने भणभणून गेली आहेत तोपर्यंत त्यांच्याशी संबंध पडणाऱ्या लोकांतही धर्माभिमानाचे थोडेसे वारे असले पाहिजे. हिंदु लोकांचा धर्माभिमान इतक्यापुरताच आहे व तो
लाध्य आहे.’ . . . हिंदू लोक मुसलमानांच्या कुठल्याही गोष्टींत नाक खुपसत नसतांना मुसलमानांनी त्यांचा द्वेष का करावा? असा प्र नही आगरकरांनी उपस्थित केला आहे.
श्री. राय यांना दंगे सुरू कोण करते याविषयी वाद होईल असे वाटते, पण ‘आगळीक मुसलमानांकडूनच अगोदर होते’ असे आगरकरांनी स्पष्ट नमूद केले आहे. तरीहि ‘सखोल’ अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला निरनिराळी वृत्तपत्रे पाहून याचा शोध घेऊन त्यावर प्रकाश टाकणे सहज शक्य होते. दंग्यास तात्कालिक कारण काय घडले व ते बहुतांशी मुस्लिमबहुल शहरांत वा वस्त्यांतच का घडले याचाही शोध राय यांनी घेणे आवश्यक होते.
दंगलीत मुसलमान लोकच अधिक का मेले याचे कारण उघड आहे. दंगल मुस्लिमबहुल वस्तीतच घडते. उदा. मुंबईत भेंडीबाजार, मस्जिद इ. त्यात सहभागही मुस्लिम लोकांचाच अधिक असतो. त्यामुळे पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडणारांचे व नंतर पकडले जाणाऱ्यांत त्यांचेच प्रमाण अधिक असते. कारण पोलिसांच्या गोळी-बारांत दंगलीत हिंदू बहुसंख्य असतानाही फक्त मुस्लिम व्यक्तींना टिपून मारण्याइतकी शिस्तबद्धता नसते, त्यामुळे दंगे-खोरीत पुढे कोण असते याविषयी श्री. राय यांचा निष्कर्ष अगदी चुकीचा ठरतो.
१९४६ मध्ये बिहारात झालेल्या दंगलीतील मृत्यू पावलेल्या मुसलमानांच्या आकड्याविषयी सुद्धा शंका वाटते. कारण बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यावर उसळलेल्या दंग्यांत सोळा राज्यांत मिळून सुमारे २००० लोक (एकूण) ठार झाले (संदर्भ पुरोगामी जमातवाद-प्रतिक्रिया–रा. प. नेने मिळून साऱ्याजणी’ दिवाळी २००१) आणि बिहारात बऱ्याच अंशी मुस्लिमधार्जिणे ब्रिटिश सरकार असताना एवढ्या प्रमाणात मुस्लिम मरतात यावर विश्वास बसणे कठीण. शिवाय एवढ्या प्रमाणात मुस्लिमसंहार झाल्यावर आज बिहारमध्ये औषधालाही मुस्लिम सापडावयास नको. (जी परिस्थिती आज काश्मिरी पंडितांची आहे) पण तसे काही दिसत नाही—-उलट नोआखालीत मात्र हिंदू अगदीच कमी प्रमाणात मनही आजही त्यांची संख्या तेथे नगण्यच आहे.
मुसलमान मुख्य प्रवाहात सामील होत नाहीत या हिंदुत्ववाद्यांच्या मुद्द्यास राय यांनी ही मुख्य धारा कोणती याचा निर्णय अजून हिंदुत्ववाद्यांनाच करता आला नाही असा शेरा मारला आहे. पण मी हिंदुत्ववादी नसूनही वंदे मातरम्, समान नागरी कायदा ही गोष्ट ‘मुख्य धारेचा’ महत्त्वाचा भाग आहे असे समजतो व यास विरोध करणे म्हणजे मुख्य प्रवाहात सामील न होणे असे मला ही वाटते. मुसलमानांना आपले वेगळेपण जपावे वाटते हा सार्वत्रिक अनुभव आहे. फारच थोडे मुसलमान ज्या राज्यात राहतात त्या राज्याची भाषाच वापरतात. मोडकेतोडके का होईना उर्दू वापरण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. मूळ हिंदू असणाऱ्या धर्मांतरित मुस्लिमांना ताबडतोब नामांतरही करावे लागते. शिवछत्रपतींचे नातेवाईक बजाजी निंबाळकरसुद्धा यातून सुटले नाहीत. याबाबतीत ख्रि चन लोकांनी मात्र आपली मूळ हिंदू नावेच कायम ठेवली आहेत. एवढेच काय पुढच्या पिढ्यांनीही तीच परंपरा पाळली आहे असे दिसते. (उदा. : रे. टिळक, शाहू मोडक इ.)
श्री. राय यांच्या प्रबंधातील निष्कर्षांचा फोलपणा यातून सहज समजून येतो.

दि. ना. वाळिंबे, उमा अपार्टमेंटस्, निरंजन पार्क, माणिकबाग, सिंहगडरस्ता, पुणे–५१
श्री वैद्य यांची ‘माझी प्रतिज्ञा’ दि.१–१२–९८ ची आहे. म्हणजे तीन वर्ष पूर्ण झाली. मला वाटते. उक्तीत आणि कृतीत जर सातत्य व प्रामाणिकपणा असलाच, तर बहुतेक त्यांना कोणत्याच शुभ अगर अशुभ कार्यक्रमाला जावे लागले नसेल, कारण त्यांच्या अटींपैकी एखादीतरी अट मोडलेली असणार असे माझी अल्प बुद्धी सांगते. ते स्वतः विवाहित आहेत काय? असल्यास त्यांनी सर्व अटींच्या अधीन राहूनच विवाह केला का? त्यांच्या पत्नींचे त्यांना वैचारिक संपूर्ण सहकार्य आहे का? असो, वैयक्तिक गोष्टींत शिरू नये हेच बरे.
एक खरे, जावयाला भेटवस्तु, देणे म्हणजे लाच देणे असे म्हणणारे महाभागही अपवादला का होईना आढळतात. दुसरे असे या सद्गृहस्थांना कोणाकडे जाण्यायेण्याची दगदग नाही. खर्च नाही. त्यांनी असेही म्हणावे, दोन माणसे भेटली म्हणजे त्यांनी कशाला चहा घ्यावा. नाहक खर्च.
माणूस समाजप्रिय असतो असे म्हटले जाते. ते खरे आहे असे आपणासही पटत असावे, अन्यथा आपण संधी आली की परस्परांना भेटतो, क्षेमकुशल विचारतो. किमान फोनवर चौकशी करतो. असे न होते.
ही १-१२–९८ ची प्रतिज्ञा इतकी उशीरा का छापली लौकर छापली असती तर लवकर प्रबोधन झाले असते. ही घोषणा निरनिराळ्या मासिक/साप्ताहिकां-तून यावी.
गं. रा. पटवर्धन, पुणे — ४
(१) श्री. भ. पां. पाटणकर (पृ. ४३९) यांनी प्रतिक्रियात्मक टिप्पणी नकोत, तत्त्वचर्चा हवी व उपयोजनावर भर देऊ नये, असे सुचविले आहे. पण मला मात्र उपयोजनपर लेख योग्य वाटतात आणि त्यांना जरूर स्थान असावे. तत्त्वचर्चा दर महिन्याला करावी लागेल इतके मौलिक लिखाण उपलब्ध नसते. मागील विचारांची पुनरुक्ति कंटाळवाणी वाटू लागते.
(२) मार्क्सचे अर्थशास्त्र दास कॅपिटलच्या १ ल्या व ३ या खंडांतून आले आहे पण त्यांत सुसूत्रता व संगति न लागल्यामुळे पुष्कळ वादविवाद झाले. रोनाल्ड मीक यांनी अर्थ लावून दाखवण्याचा बराच प्रयत्न केला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी G.D.H. Cole यांचे What Marx Really Meant हे पुस्तक बरेच सरळ होते, क्लिष्टता नव्हती. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपमधील तत्त्वज्ञ तरुण मार्क्स विरुद्ध पोक्त मार्क्स अशी फारकत कस्न १९ व्या शतकातून २० व्या शतकात पोचले. वाचनालयातून धूळ खात असलेल्या Classics मध्ये त्याचा समावेश करण्यास हरकत नाही. समाजवादाला किंवा विवेकवादाला त्याने उणेपण येणार नाही.

श्री. गो. रानडे, १२१२/ब, आपटे रोड, पुणे — ४
आपलेकडे देवाची वा राष्ट्रपुरुषांची जयंती वा पुण्यतिथी सातरी करण्याची पद्धत आहे. म्हणजे आपण भूतकाळात वावरण्याचे पसंत करितो.
पण आता मात्र आपण वर्तमानकाळकडे जास्ती लक्ष देतो. साखरसम्राट, शिक्षणमहर्षि, मंत्री तसेच लुंगे सुंगे पुढारी. आपला ३३ वा असो किंवा ५३ वा असो. वाढदिवस साजरा करण्यासाठी आटापिटा करतात. गुणगानाने रकानेच्या रकाने जाहिरातीच्या दराने छापवून आणतात. मित्र मंडळांचे (म्हणने चमच्यांच्या) यादीनिशी, फोटोही छापले जातात. म्हणजे तेवढीच सवंग प्रसिद्धी!!! नुकतेच पुण्याच्या एका प्रसिद्ध दैनिकात अशाच एका ‘बर्थडे बॉयचे’ दहा फोटो व गुणगान एकाच अंकात छापलेले वाचले! हे बदलायला नको काय? प्रसिद्धीच्या हावेला काही तरी लिमिट नको का?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.