पत्रसंवाद

जाने २००५ च्या अंकातील “पायवा”तील काही मतांचे स्पष्टीकरण मागतो आहे.
१) अध्यात्मावरील टीकेत “अध्यात्मिक ज्ञान हे केवळ पूर्ण श्रद्धावानासच प्राप्त होऊ शकते असे नमूद केले आहे. येथे आधुनिक भारतीय शिक्षणसंस्थाचा प्रवर्तक मॅकॉले याची एक गोष्ट सांगावीशी वाटते. हा गृहस्थ पूर्णतः भारतीय परंपरागत धर्मशिक्षणाचे (वेदपाठशाला इ.) समूळ उच्चाटण करून त्याऐवजी आधुनिक आंग्लशिक्षणाचे बीजारोपण करताना भारतातील सर्व धर्मशिक्षणकेंद्रे नष्ट करण्याचा प्रयास करी. एकदा आन्ध्रप्रदेशातील मंत्रालयम् येथील “श्रीराघवेन्द्रस्वामी” यांच्या तीर्थक्षेत्री जाऊन तेथील मठाधीन जमीन जप्त करण्यासाठी गेला असता त्यास साक्षात् राघवेन्द्र स्वामींचे दर्शन होऊन त्याने हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा प्रकट केली; तेव्हा स्वामींनी त्यास “प्रथम चांगला ख्रिश्चन हो” असे सांगितले. येथे तर मॅकॉले हा पूर्णपणे अश्रद्ध; नव्हे भारतीय धर्मपरंपरांचा पक्का द्वेष्टा होता हे सर्वविदित आहे. मग त्यास या साक्षात्काराचे कारण काय असू शकेल ? असे अनेक साक्षात्कार अश्रद्धांनासुद्धा होतात.
२) पुढे ‘‘साक्षात्कारासाठी गुरुमुखाद्वारे ‘श्रवण’ करावे लागते….. त्या तत्त्वांचे कैक दिवस चिंतन-मनन केलेल्या एखाद्यास साक्षात्कार होतो.” विवेकानंदांचे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांनी कोणत्याही गुरूकडून विद्या प्राप्त केली नव्हती. तसेच त्यांना साक्षात्कारासाठी प्रदीर्घ कालावधीची वाट पाहावी लागली नाही. समाधी-अवस्था तर लहानपणापासून अधून-मधून सारखी होई मग साक्षात्कारींमध्ये हे असे फरक का असावेत ? साधकासाधकांमध्ये अंतराचे शास्त्रीय दृष्टिकोनातून विवेचन कसे करता येईल ?
३) पुढे अध्यात्मशास्त्रात एकवाक्यता नसून एक दर्शन दुसऱ्या दर्शनाचे खंडन करणारे असल्याचे सांगितले आहे. परंतु ही खंडनप्रक्रिया विज्ञानातील उपपत्तींप्रमाणेच एकापाठोपाठ एक अशा अध्यात्मज्ञानाच्या विकासाची प्रक्रिया आहे,. उदा. सर्वप्रथम शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत प्रकट झाला. ‘जगन्मिथ्या’ या तत्त्वामुळे व्यावहारिक जगातील निर्माण होणाऱ्या अडचणी जाणून पुढे माध्वांचा ‘जगत्सत्यम्’ हा द्वैती सिद्धान्त प्रकट झाला. कर्मकांडामुळे त्रस्त समाजाला तारणारा ‘भागवत’ संप्रदाय पुढे आला. अतः एव सामान्यांच्या सुविधेसाठी प्रत्येक ठिकाणी बदलणारी एकात्महीन दर्शने सूक्ष्मदृष्टीने अभ्यास करता एकच तत्त्व सांगताना दिसतील. ते म्हणजे अध्यात्म – अधि आत्म – स्वतःच चिंतन, मनन, योग इ. करून स्वतःच्या मनाचा अभ्यास करणे व त्याचा विकास करणे.
साक्षात्कारास भ्रम, स्वयंमोहन म्हणणे शास्त्रीयदृष्ट्या अयोग्य आहे. साक्षात्कार हा दारुड्यास, मनोरुग्णास होणाऱ्या भासापासून पूर्णतः भिन्न आहे. Hallusinations, Delusion, Elusions इ.च्या व्याख्येत बसणारे साक्षात्कार मानसोपचारशास्त्राच्या दृष्टीने अद्याप गूढच आहेत. मनाचे (mental apparatus) चे कार्य अजूनही शास्त्रास उमगलेले नाही.
या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याची कृपा करावी. चर्चेतूनच मतवृद्धि व त्यातून आत्मविकास साध्य आहे. यासाठीच हा पत्राचार, कळावे.
या अंकातील पायवा हे सदर पाहावे.
कल्पेश केशव जोशी,

जानेवारी २००५ च्या अंकातील ‘विवेक आणि अंतःप्रेरणा’ या लेखाबद्दल
“प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनाच्या तळाशी… अनुभवांचा साठा… मागील पिढीकडून मिळतो.” हे विधान दिशाभूल करते. हा साठा जनुकांच्या स्वरूपात किंवा संस्कारांच्या स्वरूपात मिळत असला तरी बदलत्या परिस्थितीमध्ये त्यांच्यावर नियंत्रण करणे फायदेशीर आणि वैज्ञानिक आहे. (ज्यांना जमेल ते जगतील, जमणे न जमणे काही अंशी जनुकीय आणि काही अंशी परिस्थितिजन्य आहे. तोही एक साठाच!) अनुभवाचा साठा निरुपयोगी असल्याचे सिद्ध झाल्यावर त्याला न त्यागण्याचे कौतुक होऊ नये. लाज बाळगावी. (उपयोगी साठ्याचा अभिमानही नसावा कारण त्यात त्या व्यक्तीचे कर्तृत्व नसते.) उदा. सरीसृप प्राण्यांविषयी उपजत भीती हे मानवसदृश (ळिारींश) प्राण्यांचे लक्षण आहे कारण ज्यांच्यामध्ये म्यूटेशनमुळे अशी भीती निर्माण झाली त्यांचा डायनॉसॉरपासून बचाव झाला. तरीही आता घरातील पालीला घाबरणे मूर्खपणाचे आहे. अशाच प्रकारे लाल रंगाची, हाडांची भीती (=भक्षकाच्या गुहेपासून जेथे हे पदार्थ असतात दूर नेणारी श्रद्धा) अंधाराची भीती (=खड्डे, काटे, निशाचर भक्षक यांपासून दूर नेणारी श्रद्धा). छोट्या टार्सिअरला (ढरीीळशी) फायदेशीर असेलही. आता मात्र प्रत्येक गुणधर्म उपयुक्ततेच्या कसोटीवर मोजावा. भावनांमागे लपू नये. फायदा-तोटा तपासावा.
बरे, या साठ्याला सामाईक म्हणावे तर भिन्नभिन्न धर्म उदयाला आलेच नसते. त्या साऱ्यांमध्ये सामाईक भाग मोठा असला तरी छोटेमोठे फरक आहेतच. हे फरक राजकीय, आर्थिक इत्यादींसह सर्व पर्यावरणाने लादलेले आहेत. अंतर्मनातून न आल्यामुळे ते नक्कीच असमर्थनीय आहेत. याउलट व्यापारी, प्रवासी, स्थलांतरित, आक्रमक, इ. संपर्कामुळे सार्वत्रिक झालेल्या मिथकांना ‘सामाईक त्याअर्थी अंतर्मनातील’ हा दिशाभूलकारक दर्जा मिळाल्याचीही उदाहरणे असू शकतात.
एकाच धर्मातसुद्धा समाजव्यवस्थेनुसार देवांची भूमिका बदलताना दिसते. हे फरक समाजव्यवस्थेला प्रतिबिंबित करतात. त्यांचा मनाच्या रचनेशी किंवा “मागील पिढ्यांकडून मिळणाऱ्या अनुभवांच्या साठ्याशी” संबंध शक्यच नाही.
शास्त्राच्या घोडदौडीला अडथळा करू इच्छिण्यावर आक्षेप असा की जिवंत राहण्याची शक्यता वाढविणारी प्रत्येक कृती वैज्ञानिक असते. जिवंत राहण्याचा हक्क मान्य केला की शास्त्राच्या घोडदौडीला लगाम घालण्याची मागणी करणे अयोग्य होते. (”पुण्य मिळेल” असे सांगून त्यासाठी हातचलाखी करून मांत्रिकाने यजमानाला फसविणे हे वैयक्तिक, तात्पुरते विवेकी, वैज्ञानिक ज्ञानावर आधारित आहे तर यजमानाचे फसणे अविवेकी आहे.) आज जिवंत असलेल्यांपैकी बहुसंख्य लोक शास्त्रांमुळेच (फक्त वैद्यकशास्त्रच नव्हे) जिवंत आहेत. हे चक्रसुद्धा उलटे फिरविल्यास या सर्वांना मरावे लागेल. ही प्रगती येथेच थांबवा असे म्हणणे म्हणजे आज होणाऱ्या सर्व मृत्यूंचे समर्थन ठरेल. मानवी जीवनासाठी धर्म आणि शास्त्र हे दोन्ही आवश्यक आहेत असा दावा वारंवार करताना त्याचे पुष्टीकरण मात्र एकदाही केले गेले नाही. अडचण एम्पथी (शारीिंहू) ची आहे. एम्पथी बाळगणे या कृतीमध्ये दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याच्या कृतींचे मूल्यमापन अपेक्षित असते. (शत्रू राष्ट्राच्या सैनिकाबद्दल एम्पथी बाळगली तरी त्याला युद्धात ठार मारणे गैर मानले जात नाही. अशा प्रकारे एम्पथी ही किमान गरज आहे कारण सिम्पथीमध्ये अपेक्षित, जो कृतीतील बदल तो येथे अपेक्षित नसतो.) अशी जागा बदलताना ज्ञान, परिस्थिती, इ. गुणधर्म जरी दुसऱ्याचे कल्पिले गेले तरी बुद्धी स्वतःचीच घ्यायची असते. धार्मिक (किंवा इतर कोणत्याही) श्रद्धा बाळगणाऱ्याच्याऐवजी मी असतो तर माझा विवेक आणि त्याच्या परिस्थितीतील अपुरी माहिती यांच्या बळावर मी सुद्धा अशीच श्रद्धा बाळगली असती काय, या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर मिळाल्यास त्यांच्यासाठी मी एम्पथीसुद्धा बाळगू शकत नाही. किमान अशा एम्पथीशिवाय त्यांच्या श्रद्धांना पॅराडाईमचा दर्जा देता येत नाही. (उदा. तत्कालीन उपलब्ध ज्ञानाच्या पार्श्वभूमीवरही आर्यभट्टाचा ग्रहणसिद्धान्त नाकारणाऱ्या वराहमिहिराच्या श्रद्धा असमर्थनीय ठरतात.) पॅराडाईम असंयोज्य नसतात, त्यांच्यात उच्चनीच अशी तुलना करता येते, हे माझे मत निराळेच! पॅराडाईमची तुलना सुरू झाली की कमस्सल पॅराडाईमचे समर्थनही अयोग्य ठरते. (लहान मुलांनी केलेल्या अकुशल चित्रकलेचे त्यांच्या ‘परिस्थितिसापेक्ष’ कौतुक केले तरी त्यांना प्रौढ, प्रगल्भ चित्रकारांएवढी निरपेक्ष किंमत नसते.) सद्यःस्थितीमध्ये उपलब्ध ज्ञान, माहिती आणि विवेक वापरून धर्माने गृहीत धरलेली किती उत्तरे टिकतात. याचे उत्तर कोणी देईल काय ? न टिकणारी उत्तरे ‘तातडीने’ गृहीत धरण्याची घाई का लिहिणे, कोणत्या तरी पुस्तकातून मजकूर चोरून पुस्तक सिद्ध करणे या मार्गाचा अवलंब केला जातो. ‘तर्कशास्त्र’ हे पुस्तक ह्या वृत्तीचेच उदाहरण आहे.
पुस्तकाच्या प्रस्तावनेत दि.ऊ. खडसे ह्यांनी पुस्तकाची, तसेच लेखकाची खूपच प्रशंसा केली आहे. त्यामुळे पुस्तकाविषयी अपेक्षा उंचावल्या. परंतु पुस्तक वाचताना, वाचल्यावर मात्र घोर निराशा झाली. शुद्धलेखनाच्या तर सोडूनच द्या, परंतु आशयाच्या, आकलनाच्याही चुका आहेत. पुस्तकाची भाषा अतिशय बेंगरूळ आहे. विषयाचे आकलन स्पष्ट असेल तरच ते स्पष्ट आणि असंदिग्ध भाषेत मांडता येते.
खरे तर ह्या पुस्तकाविषयी लिहिण्यात मी माझा वेळ, श्रम वाया घालवीत आहे ह्याची मला जाणीव आहे. परंतु अशा त-हेने लिहिली गेलेली पुस्तके जर पाठ्यपुस्तके म्हणून नेमली जात असतील तर हे दुहेरी हानिकारक आहे. एकतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, त्यांना विषय योग्य रीतीने समजणार नाही व दुसरे विषयाच्या दृष्टीने. उद्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ तार्किकांनी लिहिलेले लिखाण चूक वाटण्याचा आणि डॉ. ठाकरे ह्यांचे प्रतिपादन बरोबर वाटण्याचा संभव आहे. विषयाची एक प्रामाणिक अभ्यासक म्हणून ह्या पुस्तकाची दखल घेऊन त्यातील चुका स्पष्ट करणे हे मी माझे कर्तव्य समजते.
ह्या पुस्तकाचे परीक्षण मी दोन भागांत करणार आहे. पहिल्या भागात पुस्तकातील प्रतिपादनात असलेल्या चुकांचे निर्देशन करणार आहे. दुसऱ्या भागात ज्येष्ठ तत्त्वज्ञ प्रा. दि.य.देशपांडे ह्यांच्या सांकेतिक तर्कशास्त्र आणि उद्गमन आणि सांकेतिक तर्कशास्त्र ह्या पुस्तकांतून केलेली उचलेगिरी साधार दाखवणार आहे. भाग १ : पुस्तकात आढळून आलेल्या काही ठळक चुका अशा : (१) पुनरुक्ती : पुस्तकात खूपच ठिकाणी पुनरुक्ती केलेली आढळते. काही उदाहरणे देऊन अन्य पुनरुक्तींच्या संदर्भात केवळ पृष्ठ क्रमांक नोंदवते.
(अ) आधार विधान’ आणि ‘निष्कर्ष विधान’ हे शब्द प्रथम पान १४ वर स्पष्ट केलेले आहेत. नंतर ते पुन्हा पान १९ (ह्याच पानावर दोनदा), पान २० वर स्पष्ट केलेले आहे.
(ब) पान ६४ वर सत्यतासूचीच्या मर्यादा सांगितल्या आहेत आणि तेच विवरण पुन्हा संक्षिप्त सत्यतासूचीचे स्पष्टीकरण करताना दिलेले आहे. पान ६७, पान ७९ ह्याही पानांवरील मजकूराची पुनरुक्ती केली आहे.
(२) अर्थशून्य वाक्यरचना : पुस्तकात अनेक ठिकाणी अर्थशून्य वाक्ये आहेत.
(अ) पान ४७ : ‘विधान क मध्ये उत्तरांगात पूर्वांगाचा तार्किक निष्कर्ष आहे.’ म्हणजे काय ? लेखकाला असे म्हणावयाचे आहे की “विधान क मध्ये उत्तरांग हे पूर्वांगाचा तार्किक निष्कर्ष आहे.’ (ब) पान ६० : ‘सत्यता सूचीने सहाय्याने युक्तिवादाची वैधता’ हे अर्थशून्य शीर्षक दिलेले आहे. कंसात ‘तरश्रळवळीं ष ीसीशपी लू ीींह ढरलश्रश’ असे लिहिले आहे.
त्याच्याऐवजी, ‘सत्यतासूचीच्या सहाय्याने युक्तिवादाची वैधता तपासणे’ (झी
तर्कशास्त्र : पूर्णपणे फसलेले लिखाण (भाग २)
निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’ हायवे, नेरळ (रायगड), ४१० १०१.

या दुसऱ्या भागात डॉ. ठाकरे ह्यांनी कोणताही ऋणनिर्देश न करता ज्येष्ठ तत्त्वज्ञ प्रा. दि. य देशपांडे ह्यांच्या पुस्तकातील मजकुराची केलेली उचलेगिरी मी साधार दाखविणार आहे. काही ठिकाणी सबंध विवेचन तर काही ठिकाणी मधून मधून वाक्ये उचललेली आहेत.
येथे मी ‘अ’ आणि ‘ब’ असे दोन भाग करीन ‘अ’ भागात प्रा. दि. य. देशपांडे ह्यांच्या पुस्तकात कोणत्या पानावर कोणता मजकूर आहे त्याचा निर्देश करून ‘ब’ भागात डॉ. ठाकरे ह्यांच्या पुस्तकात तोच किती पृष्ठक्रमांकावर आलेला आहे त्याचा निर्देश करीन.
(अ) (१) पान १-२ तर्क (किंवा अनुमान) ही एक बौद्धिक क्रिया असून तिच्या साह्याने विद्यमान ज्ञानातून नवीन ज्ञान प्राप्त होते. —प्रत्येक तर्कात किंवा अनुमानात दोन घटक असतातः (१) ज्यावरून आपण तर्क करतो तो. त्यापैकी दुसऱ्याला निष्कर्ष अशी संज्ञा असून पहिल्याला साधक अशी संज्ञा आपण देऊ. त्यांना इंग्लिशमध्ये अनुक्रमे उपवश्रीीळेप आणि झीशाळीश अशी नावे आहेत. (२) पान २-३ प्रत्येक अनुमानात साधके निष्कर्षच पुरावा देत असली तरी तो पुरावा निष्कर्ष सिद्ध करण्याइतका सबळ असेलच असे नाही.—ज्यातील साधके निष्कर्षाचा निर्णायक पुरावा देतात आणि म्हणून निष्कर्ष सिद्ध करतात आणि (राज्यातील साधकांनी दिलेला पुरावा निष्कर्षास पोषक असूनही निर्णायक मात्र नसतो. पहिल्या प्रकाराच्या अनुमानांना निर्णायक किंना निगामी (वशीलींळेप) अनुमाने असे नाव असून दुसऱ्या प्रकारच्या अनुमानांना संभाव्य किंवा उद्गामी (ळपर्वीलींळींश) अनुमाने असे नाव आहे.) (३) पान ५ आकार फक्त विस्तारयुक्त पदार्थांनाच असू शकतो असे आपल्याला साहजिकच वाटेल, आणि अनुमान ही गोष्ट विस्तारयुक्त आहे असे म्हणता येणार नाही. परंतु विस्तारयुक्त वस्तूचा तरी आकार म्हणजे काय ? याचे उत्तर ‘तिच्या घटकांची मांडणी किंवा रचना असेच द्यावे लागेल. एकाच द्रव्याची मांडणी वेगळी केल्याबरोबर वेगळा आकार तयार होतो. एका मातीच्या गोळ्याला आपण कुंभाचा किंवा सुरईचा, विनायकाचा किंवा वानराचा आकार देऊ शकतो. तेव्हा एखाद्या पदार्थाचा आकार म्हणजे त्याच्या द्रव्याची (रारीींशी)मांडणी अशी व्याख्या आपण देऊ शकतो. (४) पान ५— विधानांचे गट पाहा. (१) (अ) सर्व मनुष्य मर्त्य आहेत.
(आ) एकही मनुष्य मर्त्य नाही. (इ) काही मनुष्य मर्त्य आहेत.
(ई) काही मनुष्य मर्त्य नाहीत. (२) (अ) सर्व मनुष्य मर्त्य आहेत.
(आ) सर्व कावळे काळे आहेत. (इ) सर्व गायी चतुष्पाद आहेत.
(ई) सर्व झाडे सपर्ण आहेत. गट (१) मधील विधानांचा विषय (द्रव्य) एकच आहे मनुष्य आणि मर्त्य. मग त्यात भेद आहे चो कसला? गट (२) मधील विधानांचे विषय वेगवेगळे आहेत. तरीही त्यांच्यात साम्य आहे. ते कोणते ? या दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकच आहे. ते म्हणजे
आकार. (५) पान ५—आपल्या भाषेतील शब्द विश्वातील विविध वस्तूंची त्यांच्या गुणांची, क्रियांची, त्याच्या परस्परांशी असलेल्या संबंधाची नावे असतात.—परंतु काही शब्द असे असतात की ते विश्वातील कोणत्याही घटकाचे किंवा अंगाचे वाचक नाहीत. उदा. ‘आणि’, ‘किंवा’, ‘जर-तर’, ‘आहे’, ‘नाही’, ‘सर्व’, ‘काही’, ‘इत्यादि’, या शब्दांचे कार्य विधानांना आकार देते हे आहे. म्हणून या शब्दांना ‘आकार वाचक शब्द’ (षीरश्रीवी) म्हणतात. यांनाच ‘तार्किकीय शब्द’ अशीही संज्ञा आहे.
(६) पान ४ ‘वैध’ आणि ‘अवैध’ ही अनुमानांची विशेषणे आहेत. वेध अनुमान म्हणजे बरोबर किंवा बिनचूक अनुमान. ‘वैध’ आणि ‘अवैध’ ही विशेषणे केवळ अनुमानांसंबंधीच आपण वापरू शकतो, एकेकट्या विधानासंबंधाने नाही. उलट ‘सत्य’ व ‘असत्य’ ही विशेषणे आपण केवळ विधानांस बंधाने वापरू शकतो, अनुमानासंबंधाने नाही. (७) पान ९-१० विधानांचे विषय असंख्य असतात म्हणून कोणतेही विधान सत्य की असत्य हे ठरविणे जर तार्किकाचे काम असेल तर त्याला सर्वज्ञ व्हावे लागले. ते अर्थातच अशक्य आहे. म्हणून तार्किक विधानांची सत्यासत्यता तपासत नाहीत. ते फक्त अनुमानांची वैधता तपासतात.—एखादे अनुमान वैध ठरविण्याकरिता त्याची साधके किंवा निष्कर्ष सत्य की असत्य हे ठरविण्याची मुळीच जरूर नसते— म्हणून तर्कशास्त्राचा विषय सत्य नाही, वैधता आहे. (८) पान १५ विधानांची सत्यता किंवा असत्यता यांना त्या विधानाची ‘सत्यतामूल्ये’ (र्षीपलींळेप) असे नाव आहे. कल्पना गणित शास्त्रातून घेतलेली आहे. ज्यावेळी एका व्ययाचे मूल्य दुसऱ्या व्ययाच्या मूल्यावर अवलंबून असते. तेव्हा त्याला दुसऱ्याचे फल असे म्हणतात. उदा. क्ष = २य या समीकरणात य चे मूल्य निश्चित झाल्याबरोबर क्ष चे मूल्य ठरते. तसेच काहीसे सत्यताफलात्मक विधानांचे आहे. (९) पान ४०-४१ उक्तवचनी औपाधिक विधाने – जेव्हा एखादे औपाधिक विधान उक्तवचनी असते तेव्हा त्याला उक्तवचनी औपाधिकविधान असे म्हणतात. पुढील उदा. पाहा. (१) प फ (पृथ्वीगोल आहे सूर्य उष्ण आहे)
(२) फ (प फ) (१) हे द्रव्यात्मक औपाधिक () विधान आहे. ते सत्य आहे की असत्य हे त्याचे पूर्वांग व उत्तरांग सत्य की असत्य याने ठरेल –परंतु (२) हे विधान घटक वाक्यांच्या कोणत्याही सत्यातामूल्यसंहतीच्या प्रकरणी सत्यच असते. अर्थात् ते उक्तवचनी आहे. अशा उक्तवचनी औपाधिक विधानांना अनुमानांच्या विवेचनात फार महत्त्व आहे.— काही सममूल्यी विधाने अशी असतात की त्यांची घटक वाक्ये सत्य असोत की असत्य असोत, ती सदैव सत्यच असतात. उदा. पुढील विधानाकार पाहा : (प. फ) …. ससस स स अ अ अ सअअ स अ अ स स अअस स अ स स अ अअअस अ स स स । वरील सत्यतासूचीमध्ये ‘ या चिन्हाखाली सर्व ‘स’ च आले आहेत. अर्थात हे विधान उक्तवचनी आहे. अशा प्रकारच्या उक्तवचनी सममूल्यी विधानांचेही निगमनात अतिशय महत्त्व आहे. (१०) पान ६५ —कोणत्याही अनुमानापासून आपण असे एक औपाधिक विधान तयार करू शकतो की ज्यांचे पूर्वांग म्हणजे त्या अनुमानाच्या साधकांचा संयोग आणि ज्याचे उत्तरांग म्हणजे त्या अनुमानाचा निष्कर्ष अशा औपाधिक विधानात आपण त्या अनुमानाचे प्रतियोगी औपाधिक विधान असे नाव दिले आहे, आणि त्याच्यासंबंधी पुढील महत्त्वाचा नियम सिद्ध केला आहे : ज्या अनुमानाचे प्रतियोगी औपाधिक उक्तवचनी असते ते अनुमान वैध, (११) पान ६८ — -युक्लिड अशी कल्पना करतो की दिलेले प्रमेय असत्य आहे ; आणि ते असत्य असेल तर त्यातून वैध अनुमानांच्या नियमांनी व्याघात निष्पन्न होतो.—दिलेले प्रमेय असत्य मानल्याने जर व्याघात निष्पन्न होत असेल तर आपले मूळ गृहीत (म्हणजे दिलेले प्रमेय असत्य आहे हे) चूक होते हे सिद्ध होते. अर्थात ते प्रमेय सत्य आहे हे सिद्ध होते. (१२) पान ६८ — अनुमानाच्या निष्कर्षाचा निषेध एक जास्तीचे साधक म्हणून घ्यायचे असते. आणि नंतर मूळ साधके आणि हे नवे साधक यावरून व्याघात निष्पन्न होतो असे दाखवायचे असते. (१३) पान ६९ याप्रमाणे अप्रत्यक्ष सिद्धता देणे म्हणजे दिलेल्या अनुमानाच्या साधकात निष्कर्षाच्या निषेधाची भर घातल्यास स्पष्ट व्याघात निष्पन्न होतो एवढेच दाखविणे नव्हे ; तर त्या अनुमानाच्या खुद्द निष्कर्षाचे त्या व्याघातावरून प्रत्यक्ष निष्पादन करून दाखविणे. (१४) पान १२५-१२६ दैनंदिन व्यवहारात किंवा विज्ञानात जी अनुमाने करतो ती नुसती वैध असून आपले समाधान होत नाही. त्यांचे निष्कर्ष सत्य असते पाहिजेत असाही आपला आग्रह असतो.— उद्गामी अनुमानात आपण सत्य विधाने मिळविण्याचा प्रयत्न करतो. ही सत्य विधाने अनेक तन्हांची असतात. ती जशी, या प्रकारची एकवचनी विधाने असतात— तशीच ‘सर्व गायी चतुष्पाद आहेत’ अशी सार्विकही असतात. अशा प्रकारची सत्य विधाने प्राप्त करून घेण्याचा उपाय म्हणजे उद्गमन— उद्गमनाचे वर्णन ‘वैधानिक पद्धतीचा अभ्यास’ असेही करण्याच येते. त्याचे कारण असे आहे की विज्ञानाचे कार्य निसर्गनियम शोधून काढून ते काटोकोरपणे ग्रथित करणे आहे. ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’, ‘उष्णतेने पदार्थ प्रसरण पावतात’, “पाणी १००० सेंटिग्रेड पर्यंत तापविले की ते उकळते’, ही सर्व वैज्ञानिक सिद्धांताची उदाहरणे आहेत. (१५) पान १३० निसर्गात आपण पाहिलेली बहुविध नियमितता आहे किंवा निसर्गाचा क्रम नियमबद्ध आहे असे आपण सर्वच मानतो. वैज्ञानिकही असेच समजून आपले कार्य करतो. जे नियम त्याला शोधायचे असतात, ते अगोदरच निसर्गात आहेत अशी त्याची श्रद्धा असते. —निसर्ग नियमबद्ध आहे, त्यात अनियमित असे काही नाही, ही जी श्रद्धा आहे तिला ‘उद्गमनाचे पूर्वगृहीत’ ( झीळींळेप ष ळपर्वीलींळेप)— अशी नावे दिली गेली आहेत.—सबंध निसर्गात नियमांचे साम्राज्य आहे हे गृहीत धरावे लागते, कारण ते गृहीत धरले नाही, तर ज्या ठिकाणी नियमितता नजरेस पडत नाही त्या ठिकाणी ती शोधण्यास कोणी उद्युक्तच झाला नसता. आणि म्हणूनच तिला पूर्वग्रहीत म्हटले जाते, म्हणजे ते अगोदर गृहीत धरण्याशिवाय वैज्ञानिक उद्गमनाच्या कार्याचा आरंभच होऊ शकत नाही. तिला पूर्वगृहीत म्हणण्याचा आणखी आशय असा की निसर्ग नियमबद्ध आहे ही गोष्ट सिद्ध करणे अशक्य आहे. (१६) पान १३१-१३२ उद्गमनाच्या पूर्वगृहीताचे प्रतिपादन ‘प्रत्येक घटनेला कारण आहे’ असेही केले जाते. प्रत्येक घटनेला कारण आहे’ या नियमाला कारणाचा नियम असे नाव आहे. काही तार्किकांच्या मते निसर्गात जी नियमबद्धता आहे ती सर्व कारणकार्यसंबंधातूनच निर्माण झालेली आहे. आपण ‘कारण’ हा शब्द एकाच अर्थाने वापरीत नसून अनेक अर्थांनी वापरतो. (१) कारण = कर्ता. या अर्थी आपण ईश्वराला जगताचे कारण म्हणतो. म्हणजे ईश्वराने हे जग निर्माण केले किंवा तो त्याचा कर्ता आहे, म्हणून तो जगताचे कारण आहे. तसेच कुंभार हा घटाचे कारण असे आपण म्हणतो. (२) कारण = हेतू किंवा प्रयोजन ‘आपण येथे येण्याचे कारण काय ?’ या प्रश्नात ‘कारण’ या शब्दाने हेतू किंवा प्रयोजन असा बोध होतो. ‘आपण येथे कोणत्या हेतूने आलात ?’ असा त्या प्रश्नाचा अर्थ आहे. (३) परंतु ‘कारण’ हा शब्द आपण वरील दोहोंहून भिन्न अशा तिसऱ्याही अर्थी वापरतो. येथे ‘कारण’ या शब्दाचा अर्थ हेतू किंवा प्रयोजन नाही हे उघड आहे. त्याचा अर्थ अशी घटना की जी घडल्यानंतर दुसरी एक घटना घडल्याशिवाय राहत नाही’ असा आहे. (१७) पान १३७ काहीही सिद्ध करायचे तर आपल्याला युक्तिवाद वापरावा लागतो, आणि कोणताही युक्तिवाद एकतर निगामी असेल किंवा उद्गामी असेल. निगामी युक्तिवादाने उद्गमनाचे पूर्वगृहीत सिद्ध करता येण्यासारखे नाही, ते ज्यांच्यावरून निगमानाने वैधपणे निष्पन्न होऊ शकेल अशी सत्य साधके सापडत नाहीत. (१८) पान १३८ उद्गमनाचे पूर्वगृहीत— निगामी किंवा उद्गामी अनुमानांनी सिद्धही करता येत नाही. मग ते निराधार म्हणून आपण टाकून देण्यास काय हरकत आहे ? — ते टाकूनही आपले चालत नाही. ते टाकून दिले तर सबंध विज्ञान टाकून द्यावे लागेल, एवढेच नव्हे तर सामान्य व्यवहारही त्याच्या अभावी अशक्य होऊन बसेल. जर निसर्गातील वस्तूंचा व्यवहार नियमित आहे असे मानले नाही तर मनुष्याला जगणे ही अशक्य होईल. कारण अन्नाने शरीरपोषण होते, पाण्याने तहान भागते— या नियमांवर जर आपण विश्वास ठेवला नाही तर आपल्याला एक पाऊलही पुढे टाकता येणार नाही. म्हणूनच या तत्त्वाला ‘पूर्वगृहीत’ असे नाव दिले आहे.
आणखीही काही उचलेगिरीची उदाहरणे देता येतील. परंतु मी येथेच थांबते. प्रा. दि. य. देशपांडे ह्यांच्या पुस्तकातून मजकुराची चोरी केली आहे हे सिद्ध करण्यास पुरेसा पुरावा नमूद केला आहे.
या निमित्ताने माझे तरुण प्राध्यापक मंडळींना एवढेच सांगणे आहे की पुस्तक जरूर लिहा. परंतु पूर्ण अभ्यास करून लिहा. लिहिलेला मजकुर जाणकारांकडून तपासून घ्या. कोणत्याही पुस्तकातून मजकुराची चोरी करू नका. ऋणनिर्देश करा. तर्कशास्त्रासारख्या विषयात स्वतःचे योगदान (जीळसळपरश्र उपीळीींळेप) देणे कठीण आहे. त्यामुळे इतर लेखकांनी लिहिलेली पुस्तके अभ्यासून आपल्या भाषेत लिहा. त्वरित मान्यता (ळपीरपी शिलेसपळींळेप) मिळविण्याचा मोह ठेवू नका. तुम्ही प्रामाणिकपणे आपले काम करा. प्रसिद्धी, मान्यता तुम्हाला आपोआप मिळेल. ती मिळविण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही.
पुस्तकाचे नाव तर्कशास्त्र लेखक डॉ. संतोष ठाकरे प्रकाशक कुंभ प्रकाशन मूल्य नब्बद रूपये
सुनीती नी देव नागपूर – १२
प्रा. दि. य. देशपांडे – (१) सांकेतिक तर्कशास्त्र
(२) सांकेतिक तर्कशास्त्र आणि उद्गमन.
भाग ब (१) पान १९ तर्क किंवा अनुमान ही एक बौद्धिक क्रिया असून तिच्या साह्याने आपण विद्यमान ज्ञानातून नवीन ज्ञान प्राप्त करीत असतो. अनुमानात वा युक्तिवादात दोन घटक असतात. एक, ज्यावरून आपण तर्क करतो ते ज्ञान. दोन, ज्याचा आपण तर्क करतो ते ज्ञान. यापैकी पहिल्यास साधक अथवा आधार विधान (शिाळीश) तर दुसऱ्यास साध्य अथवा निष्कर्ष विधान (लेपलश्रीीळेप) असे म्हटले जाते.
(२) पान २० प्रत्येक युक्तिवादातील आधार विधाने निष्कर्षास पुरावा देत असतात. तरी तो पुरावा निष्कर्ष सिद्ध करण्यास सबळ असेलच असे नाही. ज्या युक्तिवादातील आधार विधाने निष्कर्षाकरीता निर्णायक पुरावा देतात त्यांना नैगमनिक युक्तिवाद (वशीलींळींश रीसशिपीं) वा निर्णायक युक्तिवाद असे म्हणतात. तर ज्या युक्तिवादातील आधार विधाने निष्कर्षाकरीता पोषक पुरावा देतात त्यांना वैगमनिक युक्तिवाद (ळपर्वीलींळीश रीसशाशपी) वा संभाव्य युक्तिवाद असे म्हणतात. (३) पान २१ — आकार फक्त भौतिक वस्तूंनाच असतो. तेव्हा युक्तिवादाला आकार कसा असेल असा प्रश्न पडतो. त्याकरता प्रथम वस्तूंचा आकार तसेच आशय म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. त्याआधारे मग युक्तिवादाचा आकार आणि आशय स्पष्ट होईल. उदा. मूर्तिकार एकाच साच्यातून (आकार) वेगवेगळ्या द्रव्याच्या (आशय) मूर्ति बनवतो. म्हणजेच माती, पितळ, तांबे, मेण ही द्रव्ये तो एकाच आकाराच्या मूर्तीकरीता वापरू शकतो. तर ‘माती’ या एकाच द्रव्याचा तो वेगवेगळ्या आकारांच्या मूर्तिकरीता वापर करू शकतो. उदा. मातीपासून ‘गणपती’, ‘माकड’, ‘कुंभ’, बनवितो. यावरून वस्तूचा आकार म्हणजे त्या द्रव्याची विशिष्ट मांडणी. ”
याचे उत्तर कोणी देईल काय ? न टिकणारी उत्तरे ‘तातडीने’ गृहीत धरण्याची घाई का असावी ? नम्रपणे ‘मला माहिती नाही’ असे म्हणून उत्तरे शोधणे हे खोट्या उत्तरांना जोंबाळण्यापेक्षा नक्कीच फायदेशीर ठरेल.
धर्माशिवाय माणसाचा निभाव लागणार नाही हे विधान नास्तिकांचे अस्तित्व नाकारते. ‘नास्तिकांचे अस्तित्व’ हा वरील विधानाचा खोडताळा ठरतो.
लेखामध्ये विधान आहे. “शास्त्रीय निरीक्षणे आणि मीमांसा यांची गरज अश्मयुगीन प्राथमिक हत्यारे बनविण्यासाठी होती.” याचा अर्थ असा की त्यापूर्वी आणि त्यानंतर अशी गरज नव्हती. त्यानंतरच्या काळासाठी हे विधान चूक ठरविणे सोपे आहेच, परंतु विज्ञान ही काही नवीनच, अश्मयुगात उदयाला आलेली संस्थाही नाही. सजीव सभोवतालचे निरीक्षण करून भविष्याविषयी ज्ञान मिळवितात. त्यासाठी, भिन्न भासणाऱ्या घटनांमधील सामाई क घटक सापडणे आवश्यक असते. अशा घटकाला नियम म्हणता येते. असे ज्ञान सापडण्याची सर्वांत पुरातन प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती होय. प्रस्थापित जनुके म्हणजे सभोवतीशी वागण्याचे ज्ञान असून, म्यूटेशनमध्ये सजीवांच्या सभोवतालविषयी श्रद्धा बदलतात. ही पायरी अंतःप्रेरणा होय. ज्या सजीवाला अचूक नियम सापडतील तो जगतो. असा सजीव जगून (योग्य गृहीतकांचा स्वीकार) इतर मरणे (अयोग्य गृहीतकांना अव्हेर) हा विवेक होय. ही प्रक्रिया खर्चिक आहे. (मेंदू या अवयवामध्ये ही प्रक्रिया एकाच सजीवाच्या आयुष्यात अनेकदा घडविता येते. त्यासाठी मेंदूचे डावे आणि उजवे अर्धगोल विवेक आणि अंतःप्रेरणेची कामे बघतात असा संशय आहे.) या अर्थाने विज्ञानाची सुरुवात सजीवसृष्टीच्या सुरुवातीसोबत झाली.
थोडक्यात, विज्ञान आणि धर्म या दोघांच्याही सुरुवातीसाठी अंतःप्रेरणा आवश्यक असते. प्रस्थापित संकल्पना, रचना यांमधील एक बदल (पहिली पायरी) अंतःप्रेरणा असते. (बदल जनुकांमध्ये झाला तर त्याला म्यूटेशन म्हणतात. मेंदूमध्ये झाला तर त्याला सृजनशक्ती म्हणतात.) या बदलांना निकषांवर, उदा. जिवंत राहण्यासाठी उपयुक्तता, घासून जो बदल योग्य असेल तोच निवडणे (दुसरी पायरी) हा विवेक आहे. विज्ञान दोन्ही पायऱ्या वापरते. धर्म दुसरी पायरी टाळतो. अर्थात वरील दोन परिच्छेदातील माहिती न वापरताही लेखावर त्यावरील परिच्छेदांतील आक्षेप घेता येतात.
समन्वयवादी लोक हे अविवेकी लोकांपेक्षा अधिक वाईट असतात. मूर्ख मित्र शहाण्या शत्रूपेक्षा तर उपद्रवी असतोच पण मूर्ख शत्रूपेक्षासुद्धा अधिक उपद्रवी असतो.
सुनीती देव

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.