पत्रचर्चा

संपादक, आजचा सुधारक यांस, आपल्या २००७ च्या अंकात श्री टी.बी. खिलारे ह्यांचे पत्र प्रकाशित झाले आहे. त्यांचे मला समजलेले मुद्दे खालीलप्रमाणे: १) अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणासाठी कोणताही कालावधी निश्चित केलेला नाही. (ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे ती त्यांनी दिली ह्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.) २) मी आजच्या जातिविषयक वास्तवाकडे दुर्लक्ष करीत आहे. ३) मी पर्यायी व्यवस्था सुचवलेली नाही. ४) आरक्षणाला इतकी वर्षे झाली असूनसुद्धा वरिष्ठ जातींचा कनिष्ठ जातींवरील अन्याय चालूच आहे.
खिलाऱ्यांनी माझे म्हणणे समजून घेण्याचा पुरेसा प्रयत्न केलेला नाही असे मला दुर्दैवाने म्हणावे लागते. माझ्या लेखाचा सगळा रोख हा पर्यायी व्यवस्था कोणती असावी ह्यावर आहे. परंतु तो लेख लिहून झाल्यानंतर मला असे वाटले की मी सुचवलेली पर्यायी व्यवस्था आरक्षणाची आजची व्यवस्था कायम ठेवूनदेखील अंमलात येऊ शकेल आणि तसे केल्यासच आरक्षणाची गरज काही काळानंतर आपोआप कमी होईल. माझी पर्यायी व्यवस्था मला पुन्हा थोडक्यात मांडावी लागेल असे दिसते.
आरक्षणाचे हेतू दोन: आपल्या नागरिकांमध्ये सध्या नसलेलली आर्थिक समता आणणे आणि दुसरा सामाजिक उच्चनीचभाव नष्ट करणे. अशी आहे असे मी समजतो. ही दोन्ही दीर्घकालीन उद्दिष्ट्ये आहेत आणि ती प्राप्त करण्यासाठई आरक्षण हा उपाय आपण धोरण म्हणून स्वीकारला आहे. श्रीयुत खिलारे यांनी जी आकडेवारी दिली आहे त्यावरून सिद्ध होते की इतकी वर्षे आरक्षणाची तरतूद असूनदेखील त्याचे लाभ गरजू लोकांपर्यन्त पोचलेले नाहीत. याचे कारण समता आणण्यासाठी केवळ आरक्षण पुरे पडत नाही हे आहे. त्याऐवजी दुसरे काही उपाय केल्याशिवाय आपल्याला हवा असलेला परिणाम मिळणार नाही असे मला वाटते.
श्रीयुत खिलारे यांनी पुष्कळ विस्तृत आकडेवारी दिली आहे. त्या आकडेवारीच्या खरेपणाविषयी मला कसलाही आक्षेप घ्यावयाचा नाही; फक्त त्यांच्या एका शेवटच्या वाक्याबद्दल थोडेसे.
“झाडूवाला आणि शिपाई ह्यासारख्या वर्ग-४ च्या पदासाठी उच्चवर्णीयांपैकी कोणीही अर्ज करीत नाही.’ असे ते म्हणतात. घटनेमध्ये तरतूद असूनही कारवाई करण्याचा निर्णय केवळ उच्चवर्णीय घेत असल्यामुळे असे होत आहे हा घटनेचा अवमान मानावयास हवा” ह्याविषयी माझी माहिती वेगळी आहे. मी चुकून अशा एका प्रसंगी हजर होतो. (घटना नागपुरातील आहे) एका उच्चवर्णीयाने झाडूवाल्याच्या जागेसाठी अर्ज लिहून आणला होता. परंतु त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. इथपर्यन्त त्यांचे माझे एकमत आहे. पण तो अर्ज नाकारताना जी कारणे देण्यात आली ती अगदी वेगळी होती. “तुम्ही याही जागा उच्चवर्णीयांना दिल्या तर आमच्यासारख्यांनी काय करायचं’ निदान ह्या जागा आमच्यासाठी राखीव राहू द्या. असे राखीव श्रेणीतील लोकांचे म्हणणे मी तेथे ऐकले. आणि एवढ्यामुळेच केवळ आरक्षणाच्या योगाने आपले प्रश्न सुटायचे नाहीत असे मला वाटू लागले.
“समाजघटकातील ही स्पर्धा भारतीय राष्ट्राच्या ऐक्याला हानिकारक ठरणार आहे. असे श्री खिलारे यांचे वाक्य आहे. पुढे त्यांनी राष्ट्र या संकल्पनेची चर्चा केली आहे. त्यांचा आक्षेप मी मान्य करतो. मला तेथील राष्ट्रीय ऐक्याऐवजी सामाजिक ऐक्य असे म्हणायचे होते असे समजून चालावे. समानता आणण्यासाठी देशातील जनतेने एकमेकांची काळजी घ्यायला हवी असे मी जे पूर्वी सुचवले तेव्हा मला पुन्हा म्हणायचे आहे ही काळजी घेण्याचे एक साधन म्हणजे कोणालाही रोजगार असो वा नसो प्रत्येकाचे राहणीमान जवळपास सारखे असले पाहिजे आणि त्यासाठी पुरेसा बेरोजगार भत्ता आपल्या देशाने म्हणजे सरकारी खजिन्यातून प्रत्येकाला दिला गेला पाहिजे असे करताना कोणाचीही जातपात पाहण्यात येऊ नये.
सरकारचा खजिना हा जनतेच्या करातून भरतो आणि खजिन्यातील रकमेचा विनियोग पुन्हा जनतेसाठीच व्हावयाचा असतो. लोकशाहीमध्ये सरकार जनतेने निवडून दिलेले असते. आणि जनतेच्या इच्छा आकांक्षांचे प्रतिबिंब लोकसभेमध्ये लोकप्रतिनिधींनी दाखवावेत अशी अपेक्षा असते. चांगल्या लोकशाहीत सरकार आणि जनता ह्यांची उद्दिष्टे वेगळी नसतात. आपल्या देशात आपणां सर्वांना सकलांचे हित समजत नाही. जास्तीत जास्त आपापल्या जातीचे हित कळते. म्हणून आपण त्यावर आरक्षणासारखे इलाज करतो. आरक्षणामुळे काही थोड्या प्रमाणात एका जातीच्या जागेवर दुसरी जात स्थानापन्न होते. समता येत नाही. किंवा आपले जातिविषयीचे पूर्वग्रह नष्ट होण्यास ह्या उपायांनी मदत होत नाही. उलट ते पूर्वग्रह अधिक दृढमूल होतात. असा आजवरचा अनुभव आहे. म्हणून ह्यापुढचे जितके काही इलाज करावयाचे ते जातिनिरपेक्ष विचार करून करायला हवेत अशा बुद्धीने मी हा बेरोजगार भत्त्याचा उपाय सुचविला. तो उपाय सुचविल्यानंतर माझ्या अशा लक्षात आले की बेरोजगारी भत्ता आणि आरक्षण दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून चालू शकतात. रोजगार देताना जात पाहिली आणि रोजगार नसताना जात न पाहता पुरेसा भत्ता दिला तर कोणाचेच नुकसान होण्याचा संभव नाही. मात्र त्यासाठी ज्यामुळे रोजगार असलेल्याच्या आणि नसलेल्याच्या राहणीमानात जास्त फरक नसावा. आपण हे साधू शकलो तर ज्यांना रोजगार नाही त्यांना रोजगार असलेल्यांचा हेवा वाटणार नाही. आणि जातीच्या आधारावर रोजगार मिळवण्याची कोणालाही गरज वाटणार नाही. जोपर्यन्त आपण जातिनिहाय विचार करीत राहू तोपर्यन्त जातिभेदाच्या आवर्तनातून आपण बाहेर पडू शकणार नाही. इतक्या बेरोजगारांना भत्ता द्यायला सरकारने पैसा कोठून आणावा ह्याविषयी अगदी थोडक्यात येथे सांगतो त्याचा विस्तार पुढे करू. माझी सूचना अशी की प्रत्येकाच्या हातात रोख रक्कम देण्याऐवजी प्रत्येकाचच्या नावाने क्रेडिट कार्ड द्यावे. हे सध्याच्या संगणकीकृत बँकिंगमुळे सोपे झाले. क्रेडिट कार्ड दिल्यामुळे प्रत्येकाची बाजारातील ऐपत वाढेल. आणि ऐपत वाढल्यामुळे सगळ्या वस्तूंचे वाटप सोपे व्हायला मदत होईल. आज काहींच्या ठिकाणी रोजगार नसल्यामुळे ऐपत नाही आणि ऐपत नसल्यामुळे त्यांना त्यांच्या आवश्यकतेपुरते अन्नधान्यही मिळत नाही. बाजारात अन्नधान्य पुरेसे असून ते सगळ्यांपर्यंत पोचत नाही याचे कारण सगळ्यांच्या ठिकाणी सारखी आणि पुरेशी क्रयशक्ती नाही. रोखीत रक्कम दिल्यास त्या रकमेचा विनियोग योग्य होीलच असे नाही. काही इतरांची लुबाडणूक करतील आणि विषमता कमी होण्यासाठी त्याचा फायदा होणार नाही. जय वस्तूचे व्यसन लागू शकते अशा वस्तूंची विक्री क्रेडिट कार्डवर करता येणार नाही. अशी बंधने आपल्याला टाकता येतील आणि त्यामुळे रोख रकमेचा अपव्यय होण्याची शक्यता टळेल. एकूणच चलनातला व्यवहार कमी होईल आणि भ्रष्टाचारालाही आळा बसेल. नुसत्या आकड्यांचीच देवाणघेवाण होणार असल्यामुळे चलनवाढीचा दुष्परिणाम जाणवणार नाही.
दिवाकर मोहनी, ५, चारुश्री, दुसरा माळा, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर.

नास्तिक, निरीश्वरवादी व्यक्तींसाठी ‘विचारधारा विवाह मंडळ’ वाचून बऱ्यापैकी करमणूक झाली. आपल्या मराठीत म्हण आहे. “अति झालं अन् हसू आलं.” आतापर्यंत ‘गौड सारस्वत ब्राह्मण वधुवर सूचक मंडळ’ ‘क-हाडे ब्राह्मण’, ‘शहाण्णव कुळी’ अशा प्रकारच्या जाहिराती वाचण्यात आल्या. त्यात आणखी एका जातकुळीची भर पडली. फक्त प्रतिज्ञापत्रात लिहून द्यायचं, मी कुणालाच मानीत नाही, देवाशप्पत ईश्वरालादेखील ! लग्न जमलंच. Very intersting! मानसिकता ही नाही. आजही डॉ. आंबेडकर महात्मा गांधी, फुले, टिळक यासारख्या नेत्यांच्या पुतळ्यांच्या विटंबनेने आम जनता पेटून उठते कारण त्या पुतळ्यांच्या मागचा इतिहास, त्या व्यक्तींचे कर्तृत्व, त्यांचा त्याग देशप्रेम यांना ठेच पोहोचते. माणूस पूजा ‘गुणांची’ करतो. आणि पूजा म्हणजे तरी काय ? गुणांवरची श्रद्धा, विश्वास आदर.
आपल्याला मोठी वाटणारी व्यक्ती किंवा आवडलेली-मानवणारी विचारप्रणाली तिच्यावरचा अंधविश्वास माणसाला थांबवतो. त्याच्या पुढच्या मार्गातील अडसर बनतो. निरीश्वरवादी समजणाऱ्यांना मी असंमजस, एकच प्रश्न विचारते. शेंदूर लावलेल्या दगडाला तुम्ही नमस्कार करणार नाही. किंबहुना करून नका. श्रद्धा असेल तेथेच नम्रता स्वीकारावी. पण शेंदूर फासलेला दगड तुमच्या मार्गात आला तर तो दगड तुम्ही पायाने बाजूला कराल ? नक्कीच नाही. मला तशी खात्री आहे. कोणत्याही संकटाला तोंड देण्याएवढे मानसिक बळ असलेले नास्तिकत्व आपल्यात असल्याची खात्री तुम्हाला वाटते का? माझ्या अनेक शंकांपैकी एकदोन शंकांची उत्तरे मिळालीत तरी खूप मदत होईल.
(१) माणसाच्या जन्माची कथा समजली. स्त्री-बीज पुरुष-बीज एकत्र आले. फलित झाले गर्भ तयार झाला. विज्ञानाच्या मदतीने गर्भातील त्याची वाढ, वजन, हृदयाचे ठोके, लिंग आपल्याला जन्मापूर्वीच कळण्यास मदत झाली आणि नको असलेल्या लिंगाचा गर्भ दूर करण्याचीही सोय झाली. पण या चिमुकल्या कुडीत ‘प्राण’ आला कोठून ? हा प्राण आहे कसा ? कोठून येतो? कोठे जातो? विज्ञानाला तो प्रयोगशाळेत तयार करता येतो का ? गर्भधारणा सहजसुलभ असतांना एखादी पतिपत्नी मेडिकली पूर्ण फिट असताना अपत्यसुखाला वंचित का राहतात?
(२) अमूक व्यक्ती स्वर्गवासी झाली. तिची प्राणज्योत मालवली. देहावसान झाले म्हणजे नेमके काय झाले ? ___ या शक्तीला, चमत्काराला काय म्हणायचे, तिला मानायचे की नाही याचे व्यक्तिस्वातंत्र्य आपल्या लोकशाही भारतात नक्कीच आहे. माझे म्हणणे आपल्यापुरते येथेच संपते.
मला वाटते ईश्वरवाद, निरीश्वरवाद, बुद्धिवाद असे गट करून मान्य नसलेल्या जातिसंस्थेत आणखी भर आपण तरी घालू नये. यावर विश्वास ठेवू नका, हे नाकारा ते नाकारा असा नकारात्मक विचार आपण नकोच ठेवू या. असे वेगळे गट करून राहण्यापेक्षा आपण काही वेगळे काम करू या. अगदी निर्हेततूकपणे. आपल्याकडे घरकाम करणाऱ्या बाईच्या मुलीचा रोज किमान १ तास तरी अभ्यास घेऊ या. एखाद्या अंधाला एकदा तरी चौक पार करण्याकरिता मदत करू या. एखाद्या सेवाभावी संस्थेत किंवा सार्वजनिक आरोग्य केंद्रात फक्त अर्धा तास वेळ काढू या. तिरस्कार वाटणाऱ्या गोष्टी विचारायची इच्छाच उरणार नाही. इतकी चांगली कामे आपली वाट बघताहेत. आपले दोनही हात आणि आयुष्य पुरे पडणार नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होणार नाही याची काळजी आपण घेऊ या.
दादासाहेब पंडित आजीवन सर्वोदयी कार्यकर्ते आणि चालताबोलता ज्ञानकोष. ते सांगायचे. “तू भांडी घासतेस. चकचकीत करतेस. एका सरळ रेषेत लावतेस. तेव्हा देव त्या चकाकीतून तुझ्याकडे बघून हसतो. तुला आनंद मिळतो तोच ईश्वर. असा ईश्वर
आपण शोधू या.
‘विचारधारा विवाह मंडळ’ वाचून सहजपणे मला जे सुचले ते मांडण्याचा प्रय्तन केला आहे. त्यात कोणाला
ही, कोणत्याही विचारप्रणालीला दुखवण्याची भावना प्रय्तन केला आहे. त्यात कोणालाही, कोणत्याही विचारप्रणालीला दुखवण्याची भावना मनात नाही. फक्त असाही एक विचार असू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न.
नास्तिकता, निरीश्वरवाद इत्यादींवर पत्रलेखेिचे आक्षेप लोकप्रसिद्धच आहेत. त्यांना आमची उत्तरे याआधी अनेकदा देऊन झाली आहेत. मात्र निरर्थक प्रश्नांची काथ्याकूट करीत बसण्यापेक्षा काही विधायक कामे करण्यासारखी आहेत हे पत्रलेखिकेचे म्हणणे पटण्यासारखे आहे यात शंका नाही. सं.]
पुष्पा हातेकर, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर.

विचारधारा विवामंडळाचे स्वागत करू या.
एप्रिल २००७ च्या अंकातील विचारधारा विवाहमंडळाची बातमी वाचली. नेत्रदानाची सर्वसामान्य लोकांना माहिती देण्याचे कार्य श्री. वि. आगाशे गेली पंधरापेक्षा अधिक वर्षे करीत आहेत.
त्यांनी नास्तिक तरुण-तरुणींसाठी विचारधारा विवाहमंडळ सुरू केले आहे त्याचे आपण सर्वांनी स्वागत करावे. नास्तिक व्यक्ती जीवनात येणारी व्यक्तिसुखदुःखाला आत्मविश्वासाने सामोरी जाते. आपल्या विचारांचा जोडीदार मिळाला तर जीवनात आकाश ठेंगणे वाटते. विवेकवादी विचारासोबतच मानवतावाद महत्त्वाचा. नास्तिकतेसोबतच अधिक चांगला माणूस. सुजाण प्रेमळ प्रियकर, खेळकर पिता, जबाबदार पालक होणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
१८५७ चे स्वातंत्र्यसमर
१८५७ साली भारतात ब्रिटिश राज्यकर्ते आणि एतद्देशीय फौजांत झालेले युद्ध हे स्वातंत्र्यसमर होते यात मुळीच शंका नको! त्यात दोन्ही बाजूला सेना होत्या, रणधुमाळी होती, युद्धाचे ज्वलंत कारण होते, डावपेच होते आणि हारजीत होती अगदी निखालसपणे ते युद्द होते. मग इंग्रजी इतिहासकार तला कितीही शिपायाचे बंड (Sepoy’s Mutiny) म्हणोत ! मार्च १८५७ पासून एप्रिल १८५९ पर्यंत ते चालले. साधे बंड इतके अखंड चालते काय ? भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे प्रेम जागले होते आणि त्यांना गुलामगिरीत ढकलणाऱ्या जुलुमी राजवटीविरुद्ध ते उभे ठाकले होते हे कबूल करमे पक्षपाती इंग्रज इतिहासकारांना कमीपणाचेच वाटावयाचे!
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात, भारतीयांची सकृद्दर्शनी हार झाली असली तरी त्याने भारतीयांच्या मनात स्वातंत्र्येच्छेचा स्फुल्लिंग फुलविला. मंदिराचा कळस एकदम नजरेस भरत असला तरी पायातल्या चिऱ्यांचे महत्त्व कमी नसते. आज २००७ साली १८५७ च्या स्वातंत्र्यसमराला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने भारतातील तो रक्तरंजित इतिहास ताजा झाला. तो स्वातंत्र्यसंग्राम ही साधीसुधी घटना नव्हती. तिने कितीतरी प्रश्न उभे केले आहे. काही अनुत्तरितही आहेत. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी विचारमंथन झाले तर आपलाच इतिहास आपल्याला नव्याने कळू लागेल.त्या इतिहासावर १८५७ चे स्वातंत्र्यसमर हा मोठा उद्बोधक ग्रंथ स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी वयाच्या २५ व्या वर्षी लिहिला. त्यांच्या नसानसांतून दौडणारे स्वातंत्र्यप्रेम त्याच्या पानापानांतून प्रतीत होते. या ग्रंथाबद्दल बाळशास्त्री हरदास म्हणतात, “सत्तावनच्या क्रांतियुद्धासारखा विषय व वीर सावरकरांसारखा नवक्रांतीचा निर्माणता लेखक अशा विलक्षण संयोगातून निर्माण झालेला हा तेजस्वी ग्रंथ ‘क्रांतिकारकांची गीता’ म्हणून अनन्यसामान्य ठरला.” (भारतीय)
१. १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची प्रेरणाः
मनुष्याच्या मनात अखंड वसत असलेली स्वराज्य आणि स्वधर्माची प्रीती हीच या १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची मुख्य प्रेरणा होती, असे सावरकर म्हणतात. स्वराज्य आणि स्वातंत्र्य, हा मनुष्याचा जन्मसिद्ध हक्क आणि त्याची निसर्गदत्त मूलभूत प्रेरणा आहे. दिल्लीच्या बादशहाने व अयोध्येच्या नबाबाने काढलेल्या जाहिरनाम्यात ते स्पष्ट म्हटले आहे. या दोन्हींना साधणारे एकच समान तत्त्व म्हणजे स्वातंत्र्य हे होय.
अमेरिकेत वसलेल्या ब्रिटिशांनी तर त्यांचा व ब्रिटनचा धर्म एक असूनही केवळ स्वराज्यासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध स्वातंत्र्यलढा पुकारला. पण भारतात परकीय सत्तेविरुद्ध स्वराज्यासाठी दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याला धर्माचीही जोड मिळाली. त्यामुळे भारतीयांची अंतःकरणे भारून गेली असल्यास नवल ते काय ? ‘मारो फिरंगीको’ या घोषणेने त्यांच्यात स्फूर्ती संचारत होती. उत्तरेतून निसटून तात्या टोपे दक्षिणेत जेथे गेला तेथे लोकांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले व सैन्य त्याला मिळत गेले. अगदी हैद्राबादेतही निजामाची आज्ञा मोडून निजामाचे सैन्य त्याला मिळाले.
स्वातंत्र्य हे उच्च व उदात्त मूल्य आहे यात वाद नाही. १८५७ चे युद्ध ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठीच झाले यात वाद नाही. पण इथे दोन प्रश्न उभे राहतात एक म्हणजे संबंध उत्तर भारतात इतके उग्र युद्ध पेटले पण दक्षिण भारतात मात्र सामसूम होते, असे का ? उत्तर भारतातील युद्ध आटोपत आल्यानंतर तात्या टोपे दक्षिणेत पळून गेला आणि थोडीफार जमवाजमवी करून त्याने काही लढाया मारल्या. पण त्याने फारसा फरक पडला नाही. उत्तर व दक्षिणेतला हा विरोधाभास फार खटकतो. उत्तरेत स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्यांची नुसती झुंबड उडाली. पण दक्षिण मात्र तटस्थ राहिली.दक्षिणेत स्वातंत्र्याचे मूल्य नव्हते काय ?
दुसरा प्रश्न आहे स्वधर्मरक्षणाचा. सावरकरांच्या म्हणण्याप्रमाणे भारतीयांना स्वधर्माशिवाय स्वराज्य तुच्छ व स्वराज्याशिवाय स्वधर्म बलहीन होता. स्वधर्मासाठी त्यांना स्वराज्य व स्वातंत्र्य हवे होते. या स्वातंत्र्यसमराला सुरुवात होण्यासाठी निमित्त मिळाले तेही काडतुसांना लावलेल्या गाईच्या व डुकराच्या चरबीचे, म्हणजे धार्मिकच! मग प्रश्न उठतो की, स्वधर्मरक्षणाची इतकी आस लागावी असे ब्रिटिशांनी हिंदुमुसलमानांच्या धर्मावर कोणते आक्रमण केले होते ? ब्रिटिशांचे आर्थिक व राजनैतिक आक्रमण जरूर होते. पण धार्मिक नव्हते. ब्रिटिश राज्यकर्ते किंवा मिशनरीसुद्धा धर्माची सक्ती करीत नसत. धर्मासाठी उघड आक्रमण हिंदूंनी मुकाट्याने का सोसले ? स्वधर्मरक्षणासाठी स्वराज्या स्थापणारे एकटे शिवाजीमहाराज होते. ते सोडले तर बाकी संपूर्ण भारतात स्वधर्मरक्षणासाठी कोणीही तरवार उपसली नाही. राणा संग किंवा महाराणा प्रताम यांचे युद्ध धर्मापेक्षा राजनैतिक कारणांसाठी अधिक होते. मग अवघ्या १०० वर्षांत धार्मिकतेच्या बाबती फारशा आग्रही नसलेल्या ब्रिटिश सत्तेविरुद्ध एवढे मोठे युद्ध धर्माच्या नावाने पुकारले जावे हे विसंगत वाटते. शिवाय नेपाळ हे हिंदुराज्य व काश्मीरचा राजा हिंदू, पण त्यांनी इंग्रजांना मदत केली ती का?
१९५७ चा स्वातंत्र्यलढा सुरू होम्यास निमित्त मिळाले ते काडतुसा लावलेल्या गाईच्या व डुकराच्या चरबीचे. पण ते केवळ जुजबी निमित्त होते. ढहश श्रीं सीरु प हिश लराशश्री लरलज्ञ म्हणतात तसे. हा उठाव काडतुसांच्या चरबीमुळे झाला असता तर गव्हर्नर जनरलने ती न वापरण्याचा हकूम दिल्याबरोबर तो थांबला असता किंवा ज्यांचा या काडतूसांशी अर्थाअर्थी संबंध नाही अशा नानासाहेब, झाशीची राणी, बादशहा बहादूरशहा जफर, बांद्याचे व अयोध्येचे नबाब या मंडळींनी त्यात उडी घेतली नसती. तो वणव्यासारखा संपूर्ण उत्तरभारतात पसरला नसता. एखादे दारूगोळ्याचे कोठार ठासून भरलेले असावे व ठिणगी पडताच भडका उडावा असे झाले. ठिणगी हे निमित्त पण बिरूद भरलेलीच होती. हे इंग्रजी इतिहासकारांना कळले नाही असे नाही. ब्रिटिशांशी मग्रुरी व डलहौसी, हेस्टिंग्ज, वेलस्ली प्रभृती गव्हर्नर जनरलांनी भारतभूचे लचके तोडताना केलेले अनन्वित अत्याचार, पायदळी तुडविले जाणे अपरिहार्य होते. ब्रिटिशांच्या या जुलुमी व अनीतिमूलक कारगीर्दीमुळे भारतीयांच्या मनांत स्वातंत्र्यप्रीतीचा उद्रेक झाला ण्हणजे एका अर्थी या राज्यक्रांतीसाठी ब्रिटिशांची पाशवी सत्ताच कारणीभूत ठरली. वीर सावरकर म्हणतात, “ह्या स्वातंत्र्यसंपादन संकल्पनाला इतर कोण्तयाही गोष्टीपेक्षा इंग्रजांचेच जंगी साह्य झालेले आहे. हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यातून भयंकर क्रांतियुद्धाची बीजे इंग्रज लोक एकसहा पेरीत चाललेले होते!’ (१८५७ चे स्वातंत्र्यसमर, पान १४) तरीही प्रश्न उरतोच. इंग्रजांनी जे अत्याचार व अन्याय केले ते बहुतेक लष्करी व राजनैतिक होते. साधारणपणे जेते ते करतातच. डलहौसीसारख्या उन्मत अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने संस्थाने खालसा केली. तह मोडले. उदाहरणार्थ अयोध्येच्या नबाबाशी किंवा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांशी केलेला तह मोडला. दत्तक अमान्य केले. जसा झाशीच्या राणीचा दत्त किंवा नानासाहेब पेशवे हे दत्तकपुत्र मानले नाहीत. जहागिरी घेतल्या म्हणून संस्थानिकांचा त्यांच्यावर राग होणे स्वाभाविक आहे; आणि १८५७ च्या क्रांतियुद्धाचे ते एक कारण होते. पण युद्धाचा जो भयानक भडका उडाला त्यासाठी ते पुरेसे वाटत नाही. पंजाबातील रणजितसिंहावरही अन्याय झाला होता. मग शीख इंग्रजांच्या बाजूने का लढले?
अन्याय व अत्याचाराचीच गोष्ट करावयाची तर मुसलमानांनी हिंदूंवर काय कमी अत्याचार केले ? याबाबतीत मुसलमान इंग्रजांपेक्षा कांकणभर जास्तच होते असे म्हटल्यास हरकत नही. इंग्रजांनी हिंदुमुसलमानांच्या मुलीबाळींना तरी हात लावला नाही. मुसलमानांनी तर हिंदूंच्या किती बायकामुली पळविल्या व आपल्या जनानखान्यांत कोंबल्या! पण हिंदूंचे रक्त पेटून उठले नाही. मग १८५७ मध्येच एवढे काय झाले ते कळत नाही.
राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपेची तारीफ तर खुद्द इंग्रजांनीही केली आहे. सावरकर लिहितात, ‘इंग्रजी योद्धे मी मी म्हणणारे, पण रणलक्ष्मीने बेजार केले. राणी सर्वांच्या पुढे तळपत चाललेली दिसे! तिच्या भंगलेल्या सैन्यास पुन्हा गोळा करीत व शौर्याचे उत्कर्ष गाजवीत रणावलेली दिसे! असे इंग्रज इतिहासलेखक म्हणतो’. (१८५७ चे स्वातंत्र्यसमर पान २६२). तात्या टोपे इंग्रजांना हुलकावणी देण्यात इतका चतुर होता की मॅलेसन म्हणतो, “It is impossible to withold admiration from the peritinacity with which this scheme was carried out’. १७ जानेवारी १८५९ च्या cichla saya forest TÈ, “Tatia Tope is too troublesome and clever an enemy to be admired’. (१८५७ चे स्वातंत्र्यसमर पान ३९०).
पण या प्रचंड रणयज्ञासाठी जर कोणती कमतरता असेल तर ती या अध्व! ऋत्विजाची. युद्धामध्ये अनेक लढाया होतात आणि प्रत्येक लढाईला स्वतंत्र सेनापती असणे गरजेचे असते. सेनेच्या चाली आणि हालचाली ठरविणे हे सेनापतीचे काम असते. त्यावर लढाईचे यशापयश अवलंबून असते. पण क्रांतिकारकांच्या ज्या अनेक लढाया झाल्या, त्या बहुतेक निर्णायकी होत्या. त्यांची सेना इंग्रजांच्या तालमीत शिकलेली, शिस्तबद्ध कवायतीत तयार झालेली होती, त्वेष, जोश आणि शौर्य भरपूर होते; नव्हते त्याला योग्य मार्गाने नेणारे सेनापती. ही सेना इंग्रजी अधिकाऱ्यांकडून ऑर्डर्स घेण्यात तरबेज होती. पण तिच्यात ऑर्डर्स देऊ शकणारा मात्र कोणीच नव्हता. त्यामुळे सेनेत गोंधळ माजला व बरेचदा हातातोंडाशी आलेले यशही निसटून गेले. मोठ्या हिमतीने स्वतंत्र केलेली दिल्ली अशीच पडली. वीर सावरकर लिहितात, कारण त्यांची मुख्य उणीव ही कर्त्या पुढाऱ्यांचीच होती. त्यांनी नूतनोद्धृत सिंहासनावर ज्याला प्रस्थापित केलेले होते तो बादशहा शांतकालार्ह दयाशीलतेत जरी कितीही स्तुत्यचरित्र असाल तरी युद्धकाळात अत्यंत आवश्यक असणाऱ्या रणपटत्वात व नेतत्वात असमर्थ व पर्ण अनभ्यस्त होता’.
भारतीय सैन्याची अशी दुर्दशा असताना इंग्रजांकडे मात्र कसलेले, शूर व तडफदार सेनापती अनेक होते. तुटपुंज्या सामुग्रीवर आणि सैन्यावरदेखील त्यांनी लढती दिल्या. नील, हॅवलॉक, बिअर्डस्मिथ, कॉलीन, आयर, निकल्सन, लॉरेन्स, रोज अशी किती नावे घ्यावीत! या युद्धाचे पारडे इंग्रजांच्या बाजूने फिरविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा रणयज्ञ पेटला खरा, पण योग्य अन् पुरेशा अध्वदूंच्या अभावी त्याची सफल सांगता मात्र होऊ शकली नाही. ३. रणधुमाळी:
१८५७ च्या रणधुमाळीला मंगल पांडेने उठाव केला त्याला २९ मार्च रोजी सुरुवात झाली. ती नियोजित वेळेच्या २ महिने आधीच होती. कदाचित ठरल्याप्रमाणे ३१ मे रोजी जर उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र एकदम उठाव झाला असता तर बेसावध इंग्रजांना सावरायला वेळही न मिळता आणि क्रांतिकारकांच्या मनात संभ्रम उत्पन्न न होता काही वेगळाच इतिहास घडला असता.
एका युद्धामध्ये असतात तशा या स्वातंत्र्यसमरातही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेळी पुष्कळ लढाया झाल्या. त्यात लहानसहान चकमकींपासून हातघाईच लढतीपर्यंत अनेक प्रकार होते. त्यात प्रथमतः क्रांतिकारकांची सरशी होत गेली. पण नंतर युद्धाचे पारडे फिरले, आणि ब्रिटिशांनी लढाया जिंकायला सुरुवात केली. इंग्रजांची चढाई सुरू झाल्यानंतर क्रांतिकारकांची पिछेहाट होत गेली. त्यांनी दिल्ली खूप झुंजविली. पण इंग्रजांच्या माऱ्यापुढे त्यांना माघार घ्यावी लागली. या झुंजीत किती वीर धारातीर्थी पडले, किती रक्ताचा सडा पडला याची काही गणतीच नाही आणि दिल्ली पडल्यानंतर झालेल्या कत्तलीला व लुटीला सुमारच नव्हता. हीच गत कानपूरच्या आणि झाशीच्या लढाईची झाली. पण झाशीहून राणी निसटून काल्पीला गेली. पुढे ग्वाल्हेरच्या लढाईत ती बिजलीसारखी तळपली. पण तेथे ती धारातीर्थी पडली अन् ग्वाल्हेरची लढाईही हरली. या स्वातंत्र्यसमरात वीरांच्या वयाचा हिशोब नव्हता. राणी लक्ष्मीबाई अवघी २२-२३ वर्षांची होती तर जगदीशपुरचा कुंवरसिंह ८० वर्षांचा होता. ज्यांची नावेही माहीत नाहीत अशा अनेक वीरांनी रणांगण गाजवून प्राणार्पण केले.
युद्धातले नीतिनियम नेहमीपेक्षा वेगळेच असतात म्हणून युद्धात सारे क्षम्य असते असे म्हणतात. क्षम्य नसतात, त्या अगदी लहानसहानसुद्धा चुका. नियोजित वेळेआधी केलेला उठाव ही चूक क्रांतिकारकांना भोवली. लखनौच्या लढाईत ब्रिटिशांना संरक्षक तटबंदी उभारण्यासाठी मिळू दिलेला अवसर फार महाग पडला. किंवा हाती सापडलेले इंग्रजी ऑफिसर्स कृपाळूपणे जिवानिशी सोडून दिले, तेव्हा तेच काळ बनून आले. युद्धातील कपटकारस्थाने हा रणनीतीचाच भाग आहे. ब्रिटिशांनी आपल्यातले फितर केले. एतद्देशीयांची मदत मिळविली हा त्यांच्या रणनीतीचा विजय आहे. महाभारताच्या युद्धात कृष्णानेही पुष्कळ कपट केले पण ते पाप नाही. कारण युद्धात ते जिंकणे हे एकच ध्येय असते आणि असलेच पाहिजे.
५. युद्धाचे नियोजन
युद्ध ही सामान्य गोष्ट नाही. त्याचे फार काळजीपूर्वक आखीवरेखीव नियोजन करावे लागते आणि तितकीच काटेकोर अंमलबजावणी व्हावी लागते. युद्धाच्या तयारीपासून तो युद्धजन्य परिस्थितीवर व युद्धोत्तर प्रसंगांवर ताबा ठेवण्यापर्यंत पूर्वनियोजन निदान पूर्वविचार व्हावयास हवा. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका अधिक. प्रत्यक्ष रणमैदानावर लष्कराच्या हालचालीचे नियोजन सेनापतीला करावयाचे असते.
स्वातंत्र्यसमराची पूर्वतयारी क्रांतिकारकांनी उत्तम रीतीने केली हे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे. त्यामध्ये दोन गोष्टी त्यांनी निश्चितपणे साधल्या-एक म्हणजे शत्रूला गाफील ठेवण्याइतकी गुप्तता व दुसरी म्हणजे हिंदुमुसलमानांचे ऐक्य. या युद्धात क्रांतिकारकांना सुरुवातीला जे यश प्राप्त होत गेले, त्यामागे हे यशस्वी नियोजन होते. पेशावरपासून कलकत्यापर्यंत संबंध उत्तर हिंदुस्थानात या युद्धाचा कट शिजला पण त्याची गंधवार्ताही ब्रिटिशांना लागली नाही. सैनिकांच्या गुप्त बैठकी होत, संदेशांची प्रांताप्रांतातून देवाणघेवाण होई, साधू, फकीर, मौलवी सगळीकडे हिंडून स्वातंत्र्याची चेतना जागवीत. पण वरून सारे शांत असे. मंगल पांडेच्या बंडानंतर आणि मीरतच्या उठावणीनंतरही इंग्रज शंकित झाले असते तरी बेसावध राहिले. अर्थात त्यांच्या बेसावधपणाचा पुरता फायदा उठविण्याच्या बाबतीत मात्र क्रांतिकारकांचे नीटसे नियोजनच नव्हते.
तसेच या युद्धाने ज्या हिंदु-मुसलमानांमधून विस्तव जात नव्हता, त्यांना अभूतपूर्व एकदिलाने उभे केले. ब्रिटिशांबद्दलचा त्यांचा राग इतका पराकोटीचा होता की, त्यापुढे ते आपले वैर विसरले. दिल्लीच्या तख्तावर पुन्हा वृद्ध बादशहा बहादूरशहाला बसविण्यासाठी हिंदूंनी मान्यता दिली आणि दिल्लीच्या युद्धासाठी राजपुतांचे साहाय्य मागताना दुसऱ्या कोणासाठीही गादी सोडण्याची तयारी बादशहाने दाखविली.
पूर्वतयारी व्यवस्थित झाली पण पुढे काय? वीर सारवकर लिहितात, ‘ह्या क्रांतीसाठई विघातक भागाची जरी व्यवस्थित आखणी केली होती तरी त्यानंतर उत्पन्न होणाऱ्या परिस्थितीमध्ये कसे वागले पाहिजे याविषयी विधायक, आकर्षक आखणी केली गेली नव्हती. इंग्रजी सत्ता उखडून नष्ट करावी, यावर सर्वांचे एकमत होते. पण त्यानंतर काय?’ (१८५७ चे स्वातंत्र्यसमर पान ३९८). म्हणूनच क्रांतिकारांनी गावेच्या गावे स्वतंत्र केली. ब्रिटिशांची सत्ता झुगारून दिली. पण त्याजागी स्वकीयांची सत्ता नीट स्थापन झाली नाही. कारभार चालेना. सगळी अंदाधुंदी झाली. त्यातल्यात्यात दिल्लीला बादशहाने, कानपुरला नानासाहेबांनी व लखनौला अयोध्येच्या बेगमने मुलकी कारभाराची थोडीतरी व्यवस्था लावली. पण स्वातंत्र्याच्या धुंदीत लोक ती जुमानीनात.
प्रत्यक्ष युद्धातही नियोजन थिटेच पडत होते. भारतीय सैन्यात बाजारबुणगे अधिक, एकंदर धोरण कचखाऊ व बहुतेक सेनापतीचा अभाव असल्याने अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांचे पराक्रम व्यर्थ जात होते. लखनौच्या लढाईत आघाडीचे धाडसी वीर पडले की मागच्यांनी पुढे रेटण्याऐवजी ते मागे पाय घेत. सावरकर लिहितात, ‘हाच तर इंग्रजी सेनेत आणि बंडवाल्यांत भेद! इंग्रजी मृतांचे रक्त त्यांचे अनुयायी कधीही वाया जाऊ देत नाहीत. एक पडला की दहा पुढे ही त्यांची रीत एक पडला की दहा मागे ही आमची रीत!’ (१८५७ चे स्वातंत्र्यसमर पान ६५). इंग्रजांचा एक सेनापती पडला तरी लगेच दुसरा त्याची जागा घेऊन सैन्याचे संचालन करू लागत असे. म्हणूनच भारतीयांपेक्षा संख्याबळाने कितीतरी कमी असून-फिलिप मॅसनने हे प्रमाण एकास चार हजार असे दिले आहे. (The Mutiny, The Men Who Ruled India, पान १५४). इंग्रजांनी भारतीय सैन्याला मात दिली. स्वातंत्र्यसैनिकांचा अचानक मारा सुरू झाल्याबरोबर ज्या तडफेने त्यांनी ठिकठिकाणी तटबंदी उभारून रक्षणाचे नियोजन केले व ज्या हिंमतीने, शिस्तीने व कर्तव्यतत्परतेने लढाई चालविली, त्यासाठी ते शत्रू असले तरी प्रशंसेस पात्र आहेत. लखनौच्या रेसिडेन्सीत कोंडलेल्या अवस्थेत ते ८७ दिवस चिवटपणे लढत राहिले. ब्रिटिशांची ही बलस्थाने जाणण्यात आपण कमी पडलो हेच खरे! पण इंग्रजांच्या तोडीस तोड असा एक सेनापती भारतीय सैन्यातही होता. तात्या टोपे!
नानासाहेब पेशव्यांचा पदरी असलेला एक साधा कारकून! एकाएकी सेनापतीपदाची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. त्याच्यासमोर रणातला मुरब्बी विंडहॅम उभा! पण विंडहॅमच्या चालीवर बिनतोड चाली करीत आणि एशियाटिक सैन्याबद्दलचा त्याचा भ्रमाचा भोपळा फोडीत तात्याने त्याला कानपुरला चांगलेच मागे रेटीत नेले आणि विजय मिळविला. सावरकर म्हणतात, ‘एशियाटिकांमध्येही एखादा तात्या टोपे असतोच तर!’ युद्धातले नियोजन असे निर्णायक असते.
क्रांतिकारकांची स्वातंत्र्याची भावना चेतलेली होती हे निःसंशय पण युद्ध भावनेच्या बळावर जिंकता येत नाही. त्यासाठी शिस्तबद्ध नियोजन, कडक अंमलबजावणी आणि स्थितप्रज्ञ वृत्ती याला पर्याय नाही. म्हणून महाभारताच्या युद्धात अर्जुनाला सूडासाठी उद्युक्त न करता श्रीकृष्णाने स्थितप्रज्ञ राहण्यास सांगितले व म्हटेल, ‘ततो युद्धाय युज्यस्वः ६. युद्धाचा निर्णय __”The better side wins’ या तत्त्वाप्रमाणे नियोजन, शिस्तबद्धता, रणकुशलता इ. बाबतीत भारतीयांपेक्षा उजवे ठरलेले इंग्रज हे समर जिंकून गेले. अर्थात युद्धात जिंकणारा हरल्यासारखा असतो आणि हरणारा तर नेस्तनाबूतच होतो असे म्हणतात. तसेच झाले. इंग्रज जिंकले खरे, पण त्यांची हानीही खूप झाली अन् या उग्र युद्धाची त्यांनी धास्त खाल्ली. ताबडतोब ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपवून भारत राणी व्हिक्टोरियाच्या साम्राज्यात जोडण्यात आला. राणीने लगेच जाहिरनाम्यात भारतीयांना सवलती दिल्या. राज्यकारभाराचे धोरण मवाळ झाले. भारतीयांची तर पार रया गेली होती. पण त्यांच्या अंतःकरणात पेटलेली स्वातंत्र्याची ज्योत मात्र तेवतच राहिली.
या युद्धाचा निर्णय आपल्या बाजूने न लागण्याची अनेक कारणे सांगितली जातात. मुख्य म्हणजे या युद्धात उत्तर भारतासारखा दक्षिण भारत सामील झाला नाही आणि उत्तर भारतातही शिखांसारखे कितीतरी नेटिव्ह सैन्य इंग्रजांकडून लढले. देशद्रोह हा आपल्या देशाला जडलेला भयानक रोग आहे. शेवटी तात्या टोपेंना फितुरानेच इंग्रजांच्या हवाली केले. बाळशास्त्री हरदास लिहितात, ‘संशयित मनःस्थिती असणाऱ्या सत्तांपैकी कित्येकांनी तटस्थतेचे, कित्येकांनी सर्व सामर्थ्यानिशी इंग्रजांना साहाय्य करण्याचे तर कित्येकांनी आपल्या परिसरातील क्रांतिबीजे नष्ट करून टाकणअयाचे धोरण स्वीकारले’ (भारतीय स्वातंत्र्यसमर – सत्तावन ते सुभाष). लाचार व भीरू मनोवत्ती आणि व्यक्तिगत स्वार्थाने लडबडलेल्या अनेकांनी स्वातंत्र्यप्रेमींचे स्वप्न उदध्वस्त करून टाकले.
पण होते ते बऱ्यासाठी असे काहीसे झाले. ब्रिटिशांची सत्ता भारतातून गेली नाही याचे भारताला काही लाभही झाले आहेत. ब्रिटिश अंमलाखालीच भारत एकसंघ देश म्हणून प्रथम उदयाला आला. त्यापूर्वी तो संस्थानांत व शाह्यांमध्ये विभागलेला होता. त्यापूर्वीही मौर्य वगैरे सम्राट असले तरी त्यांचे मांडलिक राजे व त्यांची वेगळी राज्ये असत. ब्रिटिशांनी एवढ्या मोठ्या देशाला एकसंघ करून त्याचा कारभार सुव्यवस्थित चालविला. कायद्याचे राज्य आणले. न्यायव्यवस्था, शासनप्रणाली, पोलिसयंत्रणा यांचे नियम लागू केले, ते आजही आपण पाळतो आहोत. लष्कराची शिस्तशीर रचना केली. तीही आपल्याला त्यांच्याकडूनच मिळाली. ब्रिटिश पुरोगामी होते आणि त्यांनी भारतालाही आपल्याबरोबर पुढे नेले. रेल्वे, पोस्ट व तारखाते सुरू केले. रस्त्यांचे जाळे, नद्यांवर पूल व कालवे, मोठमोठ्या इमारती बांधल्या. संपूर्ण भारताचे काटेकोर नकाशे तयार केले. एवढेच नव्हे तर समाजसुधारणाही केल्या. सतीची चाल बंद केली, बालविवाहाविरुद्ध कायदा केला आणि मुख्य म्हणजे नव्या काळाचे इंग्रजी शिक्षण आणले. त्याने लोकांना नवीन विचार दिले. स्वातंत्र्यानंतर भारताची जी प्रगती झाली, तिची सुरुवात ब्रिटिशांनी करून दिली हे विसरता येत नाही.
तरीही स्वातंत्र्याचे मूल्य आहेच. अरिीश ळप ळीशष म्हणतात तसे ते त्यातच आहे. कितीही सोन्याचा झाला तरी पिंजरा तो पिंजराच! ब्रिटिशांनी आपल्याला आधुनिक वाटेवर आणून सोडले खरे, पण स्वातंत्र्यानंतर आपण जो उत्कर्ष करू शकलो, आर्थिक प्रगती साधू शकलो, अवकाशात अगदी चंद्रापर्यंत उड्डाण घेण्याची स्वप्ने पाह शकलो, ते ब्रिटिशांच्या अंमलाखाली कधीही शक्य झाले नसते हेही तितकेच खरे!
७. उपसंहार
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराने एक धडा दिला. – ब्रिटिशांना सशस्त्र संग्रामात परास्त करणे दुरापास्त हे सिद्ध झाले. पुढे भगतसिंगासारख्या क्रांतिकारकांनी एकट्यादुकट्याने चढविलेले हल्ले निष्फळ झाले. नेताजींनी तयार केलेली आझाद हिंद सेना निष्प्रभ ठरली. पण गांधीजीनी चालविलेली आगळीवेगळी निःशस्त्र चळवळ मात्र यशस्वी झाली. कारण अशा लढाईला कसे तोंड द्यावे हेच ब्रिटिशांना कळेना. लोकांची स्वातंत्र्याची ऊर्मी हेच गांधीजीचे शस्त्र होते आणि ते १८५७ ने त्यांच्या हाती सोपविले होते. लॉर्ड माऊंटबॅटन गांधीजींना जपश रप री म्हणत. पण या आर्मीच्या पाठीमागे संबंध राष्ट्राची स्वातंत्र्याची ऊर्मी उभी होती. ती एकवटण्याची ताकद मात्र फक्त गांधीजींमध्ये होती, इतर कोणात नाही. अखेर सर्व राष्ट्रे जिची अत्यत आतुरतेने वाट पाहत होते ती स्वतंत्रता १९४७ मध्ये भारतात अवतरली. त्या महन्मंगल स्वतंत्रतेचे वीर सावरकरांच्या शब्दात यशोगान करू या. ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे ।’
रवि खानविलकर, सेक्टर ३, सी५/६/ओ-२, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.