पत्रचर्चा (२)

आरक्षण प्रतिक्रिया (खिलारे) दि. २.४.२००७
मागच्या अंकात मी समानता आणण्यासाठी आरक्षणाऐवजी काय करता येईल ? अशा शीर्षकाचा लेख लिहिला होता आणि त्यामध्ये आर्थिक समानता आणण्यासाठी जातिसापेक्ष आरक्षणाऐवजी जातिनिरपेक्ष बेकारीभत्ता द्यावा असा मुद्दा मांडला होता. माझ्या लेखावर मला दोन प्रकारची प्रतिक्रिया मिळाली. पहिली अनुकूल प्रतिक्रिया एका तत्त्वज्ञानाच्या माजी प्राध्यापकाने लिहिली आणि प्रतिकूल प्रतिक्रिया पु कळ मोठ्या संख्येने आल्या. अनुकूल प्रतिक्रिया लिहिणाऱ्याने मी केलेल्या सूचनांचे मनःपूर्वक स्वागत केले. प्रतिकूल प्रतिक्रिया देणारे संख्येने खूप मोठे. त्यांची तोंडी किंवा लेखी प्रतिक्रिया समजून घेतल्यावर माझ्या असे लक्षात आले की ते शेवटपर्यन्त माझा लेख वाचूच शकले नव्हते. लेखाची सुरुवात वाचून मी आरक्षणाच्या विरोधात सगळे लिहितो आहे असा स्वतःचा समज करून घेऊन ते क्रोधावष्टि झाले आणि त्यांनी माझ्यावर कडक टीका केली.
र्मिती आणि थो
मला समाजातील आर्थिक आणि सामाजिक विषमता नष्ट करून हवी आहे. आणि त्यासाठी विविध उपायांचा शोध मी घेत आहे. जर आरक्षणामुळे आणि नवनवीन जातींचा आरक्षणात समावेश केल्यामुळे त्याप्रमाणात रोजगार आपोआप वाढला असता तर आरक्षणाला विरोध करण्याला काही कारण नव्हते.
आपण आपल्या देशात १००% रोजगार निर्माण करू शकलो असतो तर आरक्षणाची कोणालाच गरज वाटली नसती. प्रत्येकाला लायकीप्रमाणे रोजगार मिळाला असता आणि कोणालाही रोजगार देताना किंवा नाकारताना तू कोणत्या जातीचा आहेस हे विचारण्याची गरज पडली नसती. असा १००% रोजगार निर्माण करणे हे आपले उद्दिष्ट असावयाला पाहिजे हे मी नाकारात नाही. पण इतका (१००%) रोजगार कोणतेही राष्ट्र आजपर्यन्त निर्माण करू शकले नाही. प्रत्येक राष्ट्रात बेरोजगारी ही समस्या आहेच आणि ती निवारण्यासाठी पुष्कळशा राष्ट्रात बेरोजगारी भत्ता कोणत्या ना कोणत्या नावाने देण्याची प्रथा आहे. इतर व्हावी ह्यासाठी प्रत्येकाने कामाचे तास कमी करणे रजेचे दिवस वाढवणे असे उपाय करण्यात येतात. काही देशात कामाचे तास दिवसाला सहा/पाच दिवसांचा आठवडा आणि वर्षाला दोन किंवा तीन, महीने पगारी रजा स्त्रियांना कामावर घेतले तरत्यांना बाळंतपणाच्या वेळी एक एक वर्षापर्यन्तची रजा आणि ती नवराबायकोमध्ये विभागूनसुद्धा मिळेल. आपल्या देशाचे जीडीपी (Gross Domestic Product) चे शक्यतो समान वाटप व्हावे ह्यासाठी अशा काही उपक्रमांचा येथे उपयोग केला जातो. इतके करून सगळ्यांना रोजगार पुरवणे शक्य होत नाही आणि म्हणून अशा रोजगार वंचितांना त्यांचा अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य तम खर्च यायोगे निभेल इतका भत्ता येथील सरकारे देतात. हे सारे तेथे घडून येऊ शकले याचे कारण तेथील जनतेची मनोवृत्ती ह्यासाठी अनुकूल आहे.
जीडीपी चे शक्यतोवर समान वाटप आमच्या येथे शक्य होऊ शकत नाही ह्याचे कारण आम्हाला तशा परिस्थितीची कल्पना मनाने करता येत नाही. आमच्या येथे रोजगार द्यायचा म्हमजे कमीतकमी पगार कसा देता येईल किंवा दिलेल्या पगारात जास्तीत जास्त वेळ कसे काम करून घेता येईल ह्याचाच प्रयत्न होत असतो. खादी ग्रामोद्योगांखाली निर्माण केलेला रोजगार ह्याचे चांगले उदाहरण आहे. इतकेच नव्हे तर आज आमच्या सरकारने घरटी १०० दिवस रोजगार हमी देण्याचा जो नवीन कायदा केला आहे आणि त्यासाठी ते आपली पाठ थोपटून घेत आहेत त्यामागे वंचिताला कसे बरे जीवित ठेवून त्यावर उपकार केल्याचा आविर्भाव आणला जात आहे.
माझ्या या एका लेखामुळे आरक्षण रद्द होणार असे समजण्याइतका भाबडा मी मुळीच नाही. आणि माझ्या लेखामुळे तसे काही घडेल असे समजून माझ्यावर त्याप्रमाणे टीका करण्याचे माझ्या लेखाच्या वाचकांना कारण नाही. मी वंचितांचे कोणतेही अधिकार हिसकून घेण्यासाठई माझे लेख लिहित नाही, उलट आजच्या आरक्षणाच्या पद्धतीमुळे आजपर्यन्तच्या वंचित जातीमधील वंचितांपर्यंत पोहचण्याचा माझा प्रयत्न आहे.
येथे मला कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी ज्यावेळी त्यांच्या राज्यात त्यांनी जेव्हा आरक्षण दिले त्याचा दाखला आठवतो. ते म्हणाले होते की “एका ठिकाणी घोड्यांसाठी चंदी ठेवलेली आहे. सगळ्या घोड्यांना पुरेल इतकी ती नाही. त्यामुळे मस्तवाल घोडेच ते खाऊन जातील आणि बाकीचे कमजोर घोडे तसेच राहतील. म्हमून जी चंदी आहे ती तोबऱ्यांमध्ये भरून कमजोर घोड्यांपर्यन्त पोचावी म्हणून चंदीचे वेगळे टाके केले. मला प्रत्येकाला स्वतंत्र तोबरा द्यायचा आहे. त्यायोगे जीडीपी चे समान वाटप होईल असे माझे म्हणणे आहे. मला जे काही सांगायचे आहे ते वरील उदाहरणावरून अधिक स्पष्ट होईल. मस्तवाल घोड्यांच्या बरोबर दुबळी घोडी एका टाक्यातून चारा खाऊ शकत नाही म्हणून त्यांनी दुसऱ्यांना तोबरे दिले परंतु माझ्या मते त्यांनी माझ्या मते दोन टाकी निर्माण केलीत आणि दुबळ्या घोड्यांच्या टाक्यावर मस्तवाल घोडी येणार नाहीत अशी व्यवस्था केली. मला असे सांगायचे आहे की अशी दोन टाकी निर्माण करून सगळ्या घोड्यांचा प्रश्न सुटू शकत नाही. कारण तेथे चंदीच पुरेशी नव्हती. येथे चंदी म्हणजे रोजगार आणि दुबळ्यांचे टाके म्हणजे रिझर्वेशन आणि मस्तवालांचे टाके म्हणजे खुल्या जागा असे त्यावेळी चित्र होते. मी जी योजना मांडत आहे त्यामध्ये दोन वेगवेगळी टाकीच नाहीत तर प्रत्येकाला वेगळा तोबरा आहे. आणि शाहू महाराजांच्या काळात जी चंदी होती तिचे रोजगार हे स्वरूप बदलून मला त्या चंदीला जीडीपी चे स्वरूप द्यायचे आहे. अन्नधान्याचे, फळाचे, दुधाचे प्रमाण कमीतकमी पाच पटीने वाढले आहे. धान्य कोठारात कुजून जात आहे. तेला-तुपाचे, खव्या-माव्याचे पदार्थ खाऊन काही जणांचे वजन प्रमाणाबाहेर वाढत आहे.
मला हे सर्व चित्र सर्वांना तोबरे देऊन बदलता येईल. सर्वांना तोबरे देणे आज शक्य आहे. त्यामुळे दोन टाकी कऱ्याचा आणि त्या वेगवेगळ्या दोन टाक्यांवर रेटारेटी होण्याचा तसेच मस्तवालांना जास्त मिळण्याचा आणि कमजोरांना मागे राहण्याचा अशा प्रकारच्या कोणत्याच समस्या राहणारच नाहीत.
शाहू महाराजांच्या काळात हे करणे अशक्य होते. कारण त्यावेळी बऱ्याच गोष्टींची वस्तूंची कमतरता होती. आज ही कमतरता राहिलेली नाही. त्यामुळे सर्वांसाठी किमान गरजा पूर्ण होतील एवढी चंदी देणे माझ्या मते तरी शक्य आहे. याच्याही पुढे जाऊन असेही करता येईल की दोन टाकीही ठेवता येतील आणि प्रत्येकाला स्वतंत्र तोबराही देता येईल. असे केल्याने समाजातील विषमतेची दरी आपोआप नष्ट होईल, कोणालाही आरक्षणाची गरज वाटणार नाही. आणि हे शक्य आहे. कसे ते पुढील रूपकाद्वारे अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो.
आपण असे समजू या की बेरोजगार ही कुणी घोडी आहेत आणि उपलब्ध रोजगार ही टाकी आहेत. टाक्यामध्ये चंदी म्हणजे जीडीपी ठेवलेली आहे. ही आरक्षण आहेत. एक टाके खुल्या जागांसाठी दुसरे टाके एस.सी., एस.टी.साठी आणि आता नवीन टाके ओ.बी.सी.साठी. (आपल्याला रोजगार असल्यामुळे उपभोगावर हक्क शाबित होत नाही.) इतकी टाकी करून सगळ्या घोड्यांची पोटे येथे भरण्याइतकी चंदी तया त्या टाक्यांमध्ये मावत नाही. शाहू महाराजांच्या काळात चंदीच कमी होती आणि म्हणून ती टाक्यांतून देण्याची त्यांना व्यवस्था करावी लागत होती. आज चंदी पुरेशी आहे. सर्वांना पुरून उरेल इतके अन्नधान्य आपल्या देशात पैदा होते आहे. आणि इतरही उत्पादन भरपूर आहे पण आम्हाला ती चंदी टाक्यातूनच खायची सवय झालेली आहे. म्हणूनच आणखी टाकी निर्माण करा अशी मागणी केली जाते. माझी योजना प्रत्येकाला स्वतंत्र व पोटभर तोबरा देणअयाची आहे हे समजून घ्यावे, एकदा तोबऱ्यातून पोटभर खाणअयाची सोय झाली की टाक्यांकडे कोणी जाणार नाही. किंवा टाक्यांवर रेटारेटी करण्याची गरज राहणार नाही असे मला सांगायचे आहे. टाकी भरण्याइतके आणि तोबरेही भरण्याइतकी चंदी (जीडीपी) आज आपल्याकडे उपलब्ध आहे.
सगळ्यांना आयते तोबरे मिळाल्यामुळे घोड्यांची एकमेकांशी स्पर्धा करण्याची आणि आपले स्पर्धेतले आणि इतर कौशल्ये वाढवण्याची गरज वाटणार नाही. हा एक दोष माझ्या योजनेमध्ये आहे असे माझ्या ध्यानात आणून दिले जाते. मला त्याविषयी असे सांगायचे आहे की स्पर्धेऐवजी सहकार्य हे मूल्य आपल्याला अंगी बाणवण्याची गरज आहे. स्पर्धा नष्ट झाली तर लोक ऐदी आणि ऐतखाऊ बनतील.
स्पर्धेची जागा सहकार्याने घेतल्याबरोबर आपली जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते आणि त्यामुळे आपले दैनंदिन व्यवहार पूर्णपणे बदलले जातात. ते कसे बदलले जातील ह्याची उदाहरणे देतो. ह्यातील सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे कोणत्याही कामगारावर देखरेख ठेवण्याची गरज नष्ट होते. स्पर्धा नष्ट झाली म्हणजे एकच काम करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या उघडणअयाची आपापल्या मालाची जाहिरात करण्याची आणि त्या जाहिरातीसाठी लोकांचा वेळ दूरदर्शनवरील वेळ आणि वर्तमानपत्रातील न्यूजप्रिंटरचा कागद याची नासाडी थांबेल. तेवढी जंगले वाढतील, पर्यावरण सुधारेल आणि कागद तयार करण्यासाठी नद्यांचे जे प्रदूषण होते तेही थांबेल. स्पर्धेमुळे आज मनुष्यजातीचा जितका फायदा झाला आहे त्यापेक्षा नुकसान कितीतरी पटींनी अधिक झाले आहे.
आपला एकट्याचा फायदा पाहण्याऐवजी आम्हा सर्वांचा फायदा कशात आहे हे आम्हा सर्वांना उमजू लागेल. स्पर्धा नष्ट झाली तर लोक ऐदी आणि ऐतखाऊ बनतील अशी भीती सगळ्यांना वाटते आणि ते माझ्या योजनेला विरोध करतात. याविषयी मला असे सांगायचे आहे की सगळीच माणसे तशी नसतात ज्यांची रोजीरोटीची विवंचना संपली आहे असे लोक आपल्या अंगचे कौशल्य वाढवण्याचा यत्न करतात. आज पुष्कळ कलाकार. जीवनसंघर्षामुळे आपल्या अंगच्या गुणांचा पुरेसा उत्कर्ष करू शकत नाही हे आही पाहतो आणि ही परिस्थिती कायम टिकावी अशी सगळ्यांची इच्छा नसते. गुणी माणसाच्या रोजच्या विवंचना कमी करणारी आणि त्यांना प्रोत्साहन देणारी कितीतरी माणसे आज समाजात आहेत. आज गुणग्राहक आणि गुणी ह्यांची गाठ आपापल्या जीवनसंघर्षांमध्ये क्वचित पडते हेही आम्ही पाहतो. म्हणून ह्या एवढ्या कारणासाठी माझी सूचना फेटाळून लावण्यात येऊ नये. असे साहजिकच मला वाटते. सगळ्यांचीच रोजीरोटीची विवंचना नष्ट झाली आणि ह्या पापी पोटाचा विचार डोक्यातून गेला तर ह्या जगातली पुष्कळशी लबाडी, लुच्चेपणा आणि अन्याय हे सारे दुर्गुण कमी होतील ह्याविषयी माझ्या मनात शंका नाही.
सगळीच माणसे उपजत लबाड नसतात परंतु परिस्थितीमुळे ती लबाडी शिकतात ही परिस्थिती आम्हाला दूर करायची आहे. भारत एका बाबतीत युरोपातील इतर देशांपेक्षा सुदैवी आहे असे म्हटले जाते त्याचे कारण इतर प्रगत देशांपेक्षा भारतामध्ये तरुणांची संख्या जास्त मोठी आहे. आपल्या आयुष्याची १७ ते ४७ ही अंदाजे तीस वर्षे तारुण्याचा जाणावयाला हरकत नाही. ह्या वयातली माणसे म्हणजे सगळी स्त्री-पुरुष उत्साहाने भरलेले असतात, ते रिकामे राहू शकत नाही. त्यांना कितीही ऐदीपणा शिकवला तरी ती काहीना काही करतीलच. अगदीच काही करावयाला नसले तर ते पर्वतारोहण करतील आणि आपल्या अंगजी रग जिरवतील हे मला माहीत असल्यामुळे सगळेच लोक ऐदी होतील अशी भीती मला वाटत नाही.
जेथे स्पर्धा नाही, जीवनसंघर्ष नाही तेथे कंटाळणारी कामे करायला लोक पुढे येणार नाहीत. आज अशी स्थिती आहे की नाईलाज झाल्याशिवाय उपासमारीचे भय दाखवल्याशिवाय लोक हलकी कामे करायला तयार होत नाहीत. परंतु हळूहळू या जीवनाचे रहाटगाडगे फिरते ठेवायचे असेल तर सगळीच हलकीभारी कामे कोणी-ना-कोणीकेली पाहिजेत हे सर्वांना पटवून देणे फार अवघड जाणार नाही. मात्र त्यासाठी शिक्षणपद्धतीत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. अगदीच नाईलाज झाला तर ज्याप्रमाणे काही देशातून सक्तीची लष्करी सेवा सर्व लोकांकडून करवून घेता येते. तशी ही हलकी कामे सक्तीने करवून घ्यावी लागतील.
सार्वजनिक शिक्षणामध्ये जितक्या लवकर आपण हे बदल परिणामकारक रीतीने घडवून आणू तितक्या लवकर सक्तीने कामे करवून घेण्याची गरज नष्ट होईल. स्पर्धा नष्ट झाली की फसवणूक नष्ट होईल.
स्पर्धा नसलेले आणि केवळ सहकार्य असलेले असे आयुष्य आजपर्यन्त कोणालाच वाट्याला आलेले नाही. अगदी प्राचीन काळी जेव्हा माणसे शिकार करणे आणि कंदमुळे गोळा करणे एवढेच करून जगत होते तेव्हा ती स्पर्धा शून्य जगात वावरत होती. असा अंदाज आहे. कारण शिकार करणअयासाठी एकीची आणि सहकार्याची गरज पुष्कळ आहे. आजही जंगलात वास्तव्य करणाऱ्या लोकांमध्ये नागर लोकांपेक्षा सहकार्य जास्त आढळते. कित्येक अरण्यवासी समाजात शिकार केल्यानंतर जे सर्वांचे एकत्र भोजन होते त्या भोजनात प्रत्येकाला त्या प्राण्याचा प्रत्येक अवयव खायला मिळेल असे पाहिले जाते.
शेतीला सुरुवात झाल्यापासून एकेका कुटुंबातील लोकांचे एकमेकांना सहकार्य अपेक्षिले जाते. कुटुंबाबाहेरच्या लोकांची मात्र स्पर्धा असते. बलुतेदारी सुरू झाल्यावर तर श्रमविभागणी अतिशय जास्त प्रमाणात झाली आणि कुटुंबातल्या बाहेरच्या मंडळींकडून सहकार्याची अपेक्षा नष्ट झाली. उलट सहकार्यभावना अत्यंत सीमित झाली. कुंभारकामात बाहेरच्या लोकांची काहीही मदत नाही. चांभारकामातही कुटुंबियांच्या बाहेर कोणाचीही काहीही मदत घेतली जायची नाही. आणि तशी मदत लागली तर दुसऱ्या गावच्या तेच काम करणाऱ्या लोकांकडून मदत घ्यायची असा प्रघात पडला. जो भारतात अजूनही चालू आहे. माणसाचे मन मोठे झाले तर ते कुटुंबीयांच्या बाहेर जातीपर्यन्त जाऊन थांबते त्यापलिकडे नाही. सहकार्याचा भाव आकुंचित होत चालला आणि स्पर्धेचा भाव वाढत चालला. त्यामुळे एका जातीचे लोक दुसऱ्या जातीच्या लोकांबद्दल त्याचे ते पाहून घेतील असा विचार करतात. इतकेच नव्हे तर आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा भाव मनात जोपासतात. अशा एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या गटांची एकी करायची असेल तर त्यांना शत्रूची भीती दाखवावी लागते. सगळ्यांचा को एकाविषयी शत्रूत्व वाटल्याशिवाय त्याची एकी होत नाही. स्पर्धेच्या ठिकाणी सहकार्याची भावना जोपासणे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनाला पडलेल्या ह्या जुन्या सवयी मोडणे आहे. कोणत्याही गटाला किंवा व्यक्तीला कार्यप्रवृत्त करण्यासाठी पारितोषिकाचे आमिष दाखवावे लागते आणि तढाओढ लावावी लागते. स्पर्धेशिवाय प्रगती नाही. स्पर्धेऐवजी सहकार्य
आजवरची सगळी धर्मयुद्धे आणि महायुद्धेसुद्धा स्पर्धेतून उद्भवली आहेत. स्पर्धा आणि दुसऱ्याविषयीचा अविश्वास ह्यात मी फरक करत नाही. सहकार्यामध्ये परस्पर विश्वास असतो आणि तो प्रत्येक कृतीत दिसून पडतो. सहकार्य म्हणजे एखादी सहकारी सोसायटी कशीबशी चालवणे नव्हे. तेथे परस्पर विश्वास अजिबात नसते केवळ सहकार्याचे औपचारिक संबंध असतात.
स्पर्धेची जागा पूर्ण सहकार्याने घेणे आणि परस्परांचा विश्वास परिपूर्ण असणे याचा अर्थ असा की एकाने दुसऱ्याला दिलेल्या वस्तूची पावती विचारायची गरज नसणे निबंधक आणि अनिबंधक यांच्या कचेरीची आवश्यकता नसणे. साध्यासाध्या गोष्टीतसुद्धा देखरेखीची आवश्यकता नसणे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यास नेमून दिल्यावर विद्यार्थ्यांनी फक्त शंका विचारण्यासाठी शिक्षकांकडे येणे.
यांपैकी काही गोष्टी थोड्या दुसऱ्या आहेत पण साध्या साध्या गोष्टींपासून आपणाला सुरुवात करता येईल. वर्तमानपत्रे आणि मासिके यांच्या विक्रीसाठी माणसांची गरज नाही किराणा दुकानातून फसवणुकीचे प्रकार न करणे.
खाजगी मालकीच्या दुकानांऐवजी सहकारी तत्त्वावर सहकारी सोसायटीच्या मालकीची दुकाने चालवायची. अशा दुकानातला माल फक्त भागधारकांनाच मिळेल. बाहेरच्या लोकांना मिळणार नाही. भागधारकांनी जी वस्तू आपल्याला लागेल तितके पैसे तिथल्या पेटीत टाकायचे आणि रोज रात्री कोणीतरी एकाने हिशेब करून विकलेल्या मालाची रक्कम आणि माल यांचा लेखाजोखा पाहावा. तेथे कोणीही देखरेखीसाठी नसणार. लोकांमधील फसवणुकीचे प्रमाण कमी होईल. परस्पर विश्वास आणि सहकार्य वाढेल, चोरी केली तर प्रत्येकाला आपलीच वस्तू चोरीला गेली असे वाटले पाहिजे. सार्वजनिक वस्तुंविषयी आपलेपणा वाटणे हे आम्ही भारतीय अजून शिकलो नाही. ते शिकण्या शिकवण्यासाठी आपल्याला काही उपाय करून पाहावे लागतील. नवनवीन उपाय शोधावे लागतील. आज भारतीयांची सर्व जगातील प्रतिमा अत्यंत हीन आहे.
जो माल इथून परदेशात जातो त्याची प्रत कबूल केल्याप्रमाणे राहील अशी त्यांना खात्री वाटत नाही. भारतीय लोक पदोपदी फसवणूक करतील अशी आपली अपकीर्ती जगभर झालेली आहे. निरनिराळे लोक आपापल्या मागण्या करतात. उदा. शेतकरी त्यांच्या मालाला योग्य भाव मागतात. स्त्रियांच्या मागण्या आहेत की दुय्यम दर्जाजी वागणूक त्यांच्यावाट्याला येते हे जग पुरुषप्रधान ते बंद व्हावे आणि सगळ्यांना समान वागणूक मिळावी. स्त्रियांच्या अजून काही मागण्या आहेत. त्यामध्ये सारख्या कामासाठी त्यांना सारखा पगार मिळाला पाहिजे. इतकेच नव्हे तर समाजाचे जितके काही महत्त्वाचे निर्णय आहेत ते घेण्यांमध्ये त्यांचाही पुरुषांइतकाच सहभाग असला पाहिजे. त्यासाठी त्या आरक्षण मागतात.
विवाहित आणि अविवाहित स्त्रीच्या संततीदर्जात फरक असू नये अशी आमची मागणी आहे. आम्ही उद्घोष करतो आणि समतेची मागणी करतो. त्यावेळी आम्ही हे लक्षात घेत नाही की ही मागणी आमची आम्हीच पुरवायची आहे. सरकारचा ह्यामध्ये फार थोडा सहभाग आहे. कारण सरकार आणि आपण वेगळे नाही. आपल्या नशिबाने आपल्या देशात आपले सरकार आहे. सरकार जरी आपले असले तरी आजपर्यन्त आमच्या मनांना सर्व भारतीयांना हिताचे काय त्याचा विचार करण्याची सवय नाही. माझ्या स्वतःच्या हिताचे काय, माझ्या कुटुंबाच्या हिताचे काय असाच विचार करण्याची सवय आहे. ही सवय मोडेपर्यन्त आम्ही आमच्या समस्यांमध्ये सतत भर टाकू. आम्ही त्यांपैकी एकही समस्या समाधानकारकपणे सोडवलू शकणार नाही. सगळ्यांच्या हिताचे काय असा विचार करताना त्यांचे ते पाहून घेतील असा विचार करून चालत नाही. आम्हाला शेतकऱ्यांचे हित पाहायचे आहे. आम्हाला दलितांचे हित पाहायचे आहे. आम्हाला स्त्रियांचे हित पाहायचे आहे. आम्हाला कामगारांचे हित पाहायचे आहे. आम्हाला हिंदूचे हित पाहायचे आहे. आम्हाला मराठी भाषकांचे हित पाहायचे आहे. आम्हाला नोकरदारांचे हित पाहायचे आहे. नोकरदाराचे पगार वाढवून पाहिजेत. अशा त-हेच्या मागण्या करून आम्ही आपापले प्रश्न सोडव्याचा प्रयत्न करतो आणि अशा बाबतीत विरुद्धपक्षी जो असतो तो साहजिकच आपली भूमिका सोडत नाही. प्रत्येक जण आपला प्रश्न प्रतिष्ठेचा प्रश्न करून ठेवतो. आणि खूप लोकांची खूप मोठी शक्ती आम्ही वाया घालवतो. या साऱ्या प्रश्नाचा आपण साकल्याने विचार करू शकतो आणि ज्यामुळे सर्वांचे हित सांभाळले जाईल असे निर्णय आम्ही सदळन सरकारला घ्यायला लाव शकतो. हा भाव सर्वांच्या मनात कसा जागत होईल हे पाहायचे आहे सध्याच्या तांत्रिक प्रगतीमुळे संवादाची अनेक प्रभावशाली माध्यमे आता आम्हाला उपलब्ध झाली आहेत. त्या माध्यमांचा आज उपयोग करून आपले प्रश्न लवकर सुटण्यासारखे आहेत पण त्यांचाही उपयोग आम्ही आमच्या समस्या वाढवण्यासाठीच करून घेत आहोत, हे पाहून विवेकीजनांना निराशा येते.
दिवाकर मोहनी, ५, चारुश्री, दुसरा माळा, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर.

पॅरा १: नास्तिक…. Very intersting!
सुरुवातीलाच आणि संपूर्ण परिच्छेदामध्ये हेटाळणीखोर शब्द व म्हणी वापरलेल्या आहेत. त्यावरून शेवटच्या पॅरामध्ये ‘मी नाही त्यातली…’ म्हणण्यात अर्थ नाही. पॅरा २ : मानसिकता… गुणांवरची श्रद्धा, विश्वास आदर.
पूजाऱ्यांच्या मनात त्वेष, बदमाशी, आग नसते तर प्रेम, शांतता, शीतलता असतात. ते कळवळून उठतील, करुणेने भरतील, पेटून उठणारे श्रद्धा, विश्वासापेक्षा स्वतःच्या अहं, स्वार्थ, सत्ता, संपत्ती, स्वस्थान उच्चतर/स्थिर राखण्याच्या किंवा द्वेष, दुसऱ्याचे आक्रमण परतवून लावण्याच्या दृष्टीने पेटून उठून हनुमानाप्रमाणे लंका जाळत नाहीत हे कशावरून. रावणाचा राग लंकाजनांवर ? त्यांचा दोष काय ? पॅरा ३ : आपल्याला…. मला तशी खात्री आहे.
सुज्ञाला त्यांचे दोष दाखविणे सोपे आहे. एखादवेळी अति झाले दोष नसला तरी दाखविल्यास तो सहन करून त्याचा दोष कसा नाही हे समजावून सांगेल किंवा दुर्लक्ष करेन. अज्ञाला दोष दाखविल्यास परिणाम त्याच्या अज्ञानाइतकाच मोठा असेल. अनेक श्रद्धावान तर खऱ्याखोट्याची शहानिशा न करता केवळ श्रवणानेच भडकतील. तेव्हा त्यांना समजविण्याचे अनेक मार्ग शोधावे पण त्यांच्या श्रद्धास्थानाविषयी असे अभद्र वागून दावानल चेतवू नये हे उत्तम. पॅरा ३ : कोणत्याही संकटाला …तुम्हाला वाटते का? कोणत्याही संकटाला तोंड देण्याएवढे मानसिक बळ असलेले नास्तिकत्व आपल्यात असल्याची खात्री तुम्हाला वाटते का ?
माझ्यापुरते स्पष्टपणे ‘नाही’. इतर नास्तिकांकडून नास्तिकांवर येणारी संकटे ही देवा-राक्षसांकडून किंवा अज्ञात शक्तीकडून नाही तर श्रद्धावान म्हणविणारे व भोळेभाबडे (आस्तिकता, देवभोळेपणा दिखाऊ, स्वार्थासाठी असतो अशांकडून मुर्ख बनलेले व संमोहित झालेले) यांच्याकडून अज्ञात शक्तीच्या नावावर स्वतः अज्ञात राहून, आणि तेही हे बहुसंख्येने (जवळजवळ १००० आस्तिक : १ नास्तिक हे प्रमाण असावे.) याउपरही कित्येक श्रद्धावान व त्यांचे पिट्ट छद्मयुद्ध आणि गनिमी काव्याने लढतात/लढू शकतात. बुद्धीने विचार करणाऱ्यास उघड्या मैदानामध्ये उभा राहून लढा द्यावा लागतो. दाही दिशांना शत्रू लपून त्याच्यावर वार करीत असताना ज्यात जेवढी शक्ती तेवढा तो तग धरून कार्य करून किंवा न करतासुद्धा संपतो.
आपल्या इतर शंकांविषयी उत्तरे:
(१) माणसाच्या….. (२) अमूक व्यक्ती….. या शक्तीला, चमत्काराला…. संपते.
एकूणच जीवाच्या जन्माची कथा विज्ञान (विशुद्ध ज्ञान) जीवांच्या ज्ञानेद्रियांच्या मर्यादांप्रमाणे त्या त्या जीवांना उमजली. यासाठी त्यांना निरीक्षण, प्रयोग, अनुभव यांचा आधार लागला. विज्ञानाच्या मदतीने नाही तर (मानवी मेंदूत) विशुद्ध ज्ञानातून उमजलेल्या तंत्राने योग्य उपकरण घडवून त्याद्वारे गर्भातील वाढ, वजन, हृदयाचे ठोके, लिंग आणि इतरही अनेकानेक बाबी करता आल्या, कळल्या. पण विज्ञान (विशुद्ध ज्ञान-अर्थात मानवी) आपण सांगितलेल्या पुढील गोष्टींसाठी उपकरणे घडवू शकले नाहीत. व त्या गोष्टी शोधू शकले नाहीत.
१.१) या चिमुकल्या कुडीत ‘प्राण’ आला कोठून ? १.२) हा प्राण आहे कसा ? १.३) कोठून येतो? १.४) कोठे जातो ? १.५) विज्ञानाला तो प्रयोगशाळेत तयार करता येतो का ? १.६) गर्भधारणा सहजसुलभ असतांना एखादी पतिपत्नी मेडिकली पूर्ण फिट
असताना अपत्यसुखाला वंचित का राहतात ?
२.१) अमूक व्यक्ती स्वर्गवासी झाली. २.२) तिची प्राणज्योत मालवली. २.३) देहावसान झाले म्हणजे नेमके काय झाले ?
माझ्या माहितीप्रमाणे इतर जीवांचे तर सोडाच भूतलावर बुद्धिमान गणल्या गेलेल्या मानव प्राण्यालाही ह्या गोष्टी कळल्या नाही म्हणजेच ह्याचे ज्ञान झाले नाही. पुढे मागे होऊ शकते ? (त्यावेळी हे प्रश्न समाप्त झाल्यामुळे आपण नवे प्रश्न उपस्थित करण्यास मोकळे आहात.) आमची मात्र खात्री आहे की आपल्यासारख्यांजवळ आताच ह्याची उत्तरे असून ती वेळोवेळी जाहीरही करत आला आहात. तुकारामाने कितीही ओरडून सांगितले की, ‘नवसायासे पुत्र होती, कासया करण्या लागे पति ?’ तरी नवसाने पुत्र होतातच ना. फक्त एकच विनंती की सर्वप्रकारचे शिक्षण, दवाखाने आधुनिक यंत्रे, संरक्षण व्यवस्था व मानवी श्रम थांबवून आपल्या त्या शक्तीला व चमत्काराला आपण शरण जावे व मानवी विशुद्ध ज्ञानाने प्राप्त झालेल्या सर्व सोयीसुविधा, अन्न, वस्त्र, रहिवास, सुख-सोयी वाहने, रस्ते ह्यांचा त्याग करून आपली सर्व ज्ञानेंद्रियांद्वारा होणाऱ्या ज्ञानाचा त्याग करून त्या अज्ञात शक्तीला वश करून आपण सर्व जगताला सुखी करावे ह्या रात्रंदिवसाच्या कष्टातून, दुःखातून सोडवावे ही आपणांस नम्र व कळकळीची विनंती.
विशुद्ध ज्ञानावर तपासायला कृपया आपण वैज्ञानिकांना आपले प्रश्न दुरुस्त करून समजावून द्यावेत. १) प्राण म्हणजे काय? (ह्यानंतर पुढील प्रश्न विचारले जावेत) २) अपत्यसुखाला वंचित राहण्याचे कारण अद्याप पुर्ण दोषाचे ज्ञान मनुष्याला झाले नाही. मेडिकली पूर्ण फिट म्हणजे सध्या तुम्हाला अनफिटसाठी याशिवायचे कारण आजपर्यंत कळले नाही परंतु ते पुढे कळल्यास त्या वेळी अनफिट असे सांगाल. (२.१) स्वर्ग म्हणजे काय ? (२.२) प्राण म्हणजे काय आणि प्राणज्योत म्हणजे काय ह्यात काय फरक आहे. (२.३) देहावसान प्राणज्योत मालवली. देहावसान झाले म्हणजे नेमके काय झाले ? (२) स्वर्ग, स्वर्गवास, प्राण, प्राणज्योत, देहावसान हे प्रश्नही आपलेच आणि उत्तरही आपलेच आहेत. निरर्थक शब्दप्रयोग, व निरर्थक प्रश्नोत्तरे या निरर्थक शक्तीला, चमत्काराला मानणारेच करू शकतात. आणि अशा शक्ती व चमत्कार मानण्याने स्वतःचे अधिकार व वित्तरक्षण, दुसऱ्याचे अधिकार व वित्तहरण, दुसऱ्यास गुलाम, मुर्ख, भोळेभाबडे बनविणे सोपे जाते म्हणून किंवा आपण स्वतः गुलामी, मुर्खता, भोळेभाबडे असल्याने सद्सद्विवेकबुद्धीहीन झाल्याने व असह्य परिस्थितीतून काहीच मार्ग न दिसल्यास ह्या शक्तींस शरण गेल्याने आपण आपले ज्ञानेंद्रिय कुचकामाचे ठरवले आहे यापेक्षा शोकांतिका ती काय म्हणावी. पण एकीकडे आपण मात्र ह्या ज्ञानेंद्रियांचाच उपयोग करत आपली मुक्ताफळे झोडतो त्याचे काय ? आपण एवढे (?) का बरे झालोत एकीकडे ज्ञानेद्रियांचे महत्त्व नाकारत त्याचा वापरही सुरू ठेवला आहे. काही पॅरा …..: मला वाटते ईश्वरवाद, निरीश्वरवाद, बुद्धिवाद असे गट करून मान्य नसलेल्या जातिसंस्थेत आणखी भर आपण तरी घालू नये. यावर विश्वास ठेवू नका, हे नाकारा ते नाकारा असा नकारात्मक विचार आपण नकोच ठेव या. असे वेगळे गट करून राहण्यापेक्षा आपण काही वेगळे काम करू या. अगदी निर्हेततूकपणे.
हे मात्र सोळा आणे सत्य बोललात इंदियांना पूर्ण शाबूत ठेवून.
घरकाम करणाऱ्या बाईच्या मुलीला एक तास शिकवून किंवा तिची फक्त प्रशंसा करून आपली इतिकर्तव्यता मानले की कर्तव्य संपते का ? तिला आपल्यासारख्या सर्वच सुविधांचा हक्क नाही का ? सुविधांवर आपल्या अपत्याइतका अन्यांच्या मुलीचा अधिकार नाही का ? सेवा केल्याचा गर्व आपल्याजवळ व मिंधेपणाने, याचकवाणे, दीनवाणे जगणे त्यांच्या नशिबी द्यायला आपली शक्ती एवढी निष्ठूर का असा एकदा तरी प्रश्न मनात येतो का?
शेवटी ज्ञान, विज्ञान, अज्ञान, शब्द, वागणे हे सर्व कुठेतरी आपण स्वार्थाला धरूनच असते दुसऱ्यांवरचा आपण करत असलेला अन्यायातही ती शक्ती, चमत्कार आपल्याला साथच देते हाच खरा चमत्कार माझा त्या शक्तीला व चमत्काराला साष्टांग दण्डवत व कृपया आमची पाठ सोडा ही विनंती.
माझ्या निरीक्षणाप्रमाणे लोक दुसऱ्यास हीन व स्वतःस उच्च ठरविण्यासाठी जास्त व क्वचित आवडत नाहीत म्हणून अनावश्यक तिरस्कार करतात. सोळा आणे खरे ‘चांगली कामे आपली वाट बघताहेत. आपले दोनही हात आणि आयुष्य पुरे पडणार नाही.’ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक(सेवेचा / चांगल्या कर्तव्यांचापण का ?) होणार नाही याची काळजी आपण घेऊ या. पॅरा… : “विचारधारा विवाह मंडळ’ वाचून …..प्रयत्न.
आपण म्हणता म्हणून दुखवण्याची भावना नसेल पण सुरुवातीचे ‘अति झाले अन् हसू आले’ हे वाक्य हेटाळणीदर्शक आहे हे तरी मान्य आहे का ? मग काय दर्शविते. विरुद्ध विचारसरणींच्या व्यक्तींचा एकमेकांबद्दलचा (एकमेकांच्या विचारांबद्दलचा) भाव तुमचा माझ्यासारखा असल्यास त्यांचा संसार सुरळीत चालेल काय हा पुढचा प्रश्न. अशा विरुद्धस्वभावी व्यक्तीसोबत सोबतीची अपेक्षा ठेऊन एकत्र येणे तरी शक्य आहे काय ? तेव्हा समविचारी व्यक्तींनी एकत्र येण्याचे ठरविल्यास ते गुणमिलन, राशिमिलन, जातिमिलन इ. त्या दोघांच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींचे मिलन झाले म्हणजे मग स्वभाव व विचारांत कितीही तफावत असली तरी सुयोग्य जीवननिर्वाह पार पडतो का ? ह्याचा वाचकांनीच विचार करावा. प्रश्नकर्तीस उत्तर विचारण्याचे व उत्तर देण्याचे धारिष्ट्यही मला यापुढे नाही.
शेवटी संपादकाचे अत्यंत संक्षिप्त उत्तर ते माझ्या व आपल्यासारखे उथळ व भडकाऊ नाहीत हे दर्शविते.
शेवटची विनंती आपणही दुसऱ्या बाजूनेही विचार करून पाहावा. शब्द, वस्तू, जीव, प्राणी, स्वर्ग, नरक, सत्य, असत्य, देव, ईश्वर, चांगले, वाईट सार्वकालिक सत्य किंवा असत्य असतीलच असे अजिबातच नाही असे वाटते. प्रय्तन केला आहे. त्यात कोणालाही, कोणत्याही विचारप्रणालीला दुखवण्याची भावना मनात नाही. फक्त असाही एक विचार असू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न.
[ नास्तिकता, निरीश्वरवाद इत्यादींवर पत्रलेखेिचे आक्षेप लोकप्रसिद्धच आहेत. त्यांना आमची उत्तरे याआधी अनेकदा देऊन झाली आहेत. मात्र निरर्थक प्रश्नांची काथ्याकूट करीत बसण्यापेक्षा काही विधायक कामे करण्यासारखी आहेत हे पत्रलेखिकेचे म्हणणे पटण्यासारखे आहे यात शंका नाही. सं.]
अज्ञानी, प्रतिक्रियेवरील प्रतिक्रिया

विचारधारा विवामंडळाचे स्वागत करू या.
एप्रिल २००७ च्या अंकातील विचारधारा विवाहमंडळाची बातमी वाचली. नेत्रदानाची सर्वसामान्य लोकांना माहिती देण्याचे कार्य श्री. वि. आगाशे गेली पंधरापेक्षा अधिक वर्षे करीत आहेत.
त्यांनी नास्तिक तरुण-तरुणींसाठी विचारधारा विवाहमंडळ सुरू केले आहे त्याचे आपण सर्वांनी स्वागत करावे. नास्तिक व्यक्ती जीवनात येणारी व्यक्तिसुखदुःखाला आत्मविश्वासाने सामोरी जाते. आपल्या विचारांचा जोडीदार मिळाला तर जीवनात आकाश ठेंगणे वाटते. विवेकवादी विचारासोबतच मानवतावाद महत्त्वाचा. नास्तिकतेसोबतच अधिक चांगला माणूस. सुजाण प्रेमळ प्रियकर, खेळकर पिता, जबाबदार पालक होणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
रवि खानविलकर, सेक्टर ३, सी५/६/ओ-२, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.