करुणानिधी आणि रॅशनॅलिझम

रॅशनॅलिझमचा कडवा पुरस्कार करणारे व त्याप्रमाणे वागणारे तामिळनाडूचे मुख्यमंत्री मुभूवेल करुणानिधी ह्यांनी सत्यसाईबाबाला आपल्या घरी बोलावून व त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून rationalism च्या तत्त्वांला तिलांजली दिली, रॅशनॅलिझमच्या तत्त्वांचा करुणानिधींनी आयुष्यभर पुरस्कार केला व डीएमके पक्षासाठी आपल्या कार्यकर्त्यांनाही त्या तत्त्वानुसार आचरण करायला भाग पाडले. आयुष्यभर लोकांसमोर ते नास्तिक व एक कडवे रीिंळेपरश्रळीीं म्हणून आले. त्यापूर्वी एकदा आपल्या पक्ष कार्यकर्त्यांनी कपाळाला टिळा लावला म्हणून त्यांचा खरपूस समाचार त्यांनी घेतला होता. ‘धार्मिकतेची खूण असणारा टिळा कपाळाला लावून आपण पेरियारच्या (१८७९-१९७३) विचारसरणीस मूठमाती देत आहोत; पक्षाच्या मूलभूत तत्त्वांपासून आपण ढळत आहोत’ असे त्यांनी पक्ष-कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते. १९९७ साली आपल्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री सेल्व्हराज ह्यांनी विस्तवावरून चालण्याच्या पारंपरिक रूढीमध्ये भाग घेतल्यामुळे करुणानिधींनी त्यांची कानउघाडणी केली. ह्या कृतीला त्यांनी ‘रानटी’ म्हटले होते आणि मंत्र्यांना व पक्ष कार्यकर्त्यांना अशा कुठल्याही प्रतिगामी-पारंपरिक-कर्मकांडाचा कृतीमध्ये भाग घेण्यास मनाई केली होती. rationalism च्या तत्त्वासाठी ते सरकारचा (मुख्यमंत्रिपदाचा) त्यागही करावयास तयार होते. अलीकडे डिसेंबर २००६ साली जेव्हा द्रविड कळघमने पेरियारचे १२८ पुतळे ठिकठिकाणचे मंदिराबाहेर उभे करायचे ठरवले तेव्हा असे पुतळे उभारण्यास त्यांनी पाठिंबा दिला होता. हिंदुत्ववाद्यांना उत्तर देताना ते म्हणाले होते, “पूर्णपणे नागड्या असलेल्या हिंदू देवतांच्या मूर्तीची पूजा करण्यापेक्षा पूर्णपणे कपडे घातलेला पेरियारचे पुतळे मंदिरासमोर बसवण्यास काहीच हरकत नसावी.’
रॅशनॅलिझमचा असा पुरस्कार करून ती तत्त्वे आचरणात आणणाऱ्या करुणानिधींनी ‘चमत्कार माझे भेट-कार्ड आहे’ असे ‘ब्रीदवाक्य’ म्हणणाऱ्या सत्यसाईबाबाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपदही भूषविले व सत्यसाईबाबाला आपल्या घरीही बोलावले. चेन्नईसाठी दोनशे कोटी रुपये खर्च करून आटलेल्या कॅनालमध्ये पाणी आणण्याची योजना पूर्ण केल्याबद्दल सत्यसाईबाबाच्या आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम चेन्नईतील साई-भक्तांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमास सत्यसाईबाबाचे नेहमीचे भक्त केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, तामिळनाडूचे राज्यपाल सुरजितसिंग बर्नाला, महाराष्ट्राचे राज्यपाल एस. एम. कृष्णा आणि केंद्रीय आय.टी. मंत्री दयानिधी मारन इत्यादि दिग्गज उपस्थित होते. करुणानिधींच्या घरी त्यांच्या पत्नीने सत्यसाईबाबाच्या पायाचे वंदन केले. मंत्रिमंडळातील पीडब्ल्यूडी मंत्री दुरायमुरुगन व केंद्रीय आयटी मंत्री दयानिधी मारन ह्यांना सत्यसाईबाबाने ‘चमत्काराने’ हवेतून अंगठी काढून भेट दिली. सत्यसाईबाबा हा आपल्या तथाकथित दैवी शक्तीद्वारे हवेतून विभूती, सोन्याची साखळी, घड्याळे ह्या वस्तू काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. करुणानिधी ह्या प्रसंगी म्हणाले, “मला खोटे बाबा आणि सत्यसाईबाबासारखी विशाल-हृदयाची व्यक्ती यातला फरक माहीत आहे. गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचणारे सत्यसाईबाबा हे संताहूनही श्रेष्ठ आहेत. खरे तर ते देवासमान आहेत.’
‘देवावर विश्वास ठेवणारे ते रानटी आहेत’ हे पेरियारचे म्हणणे अनेकवेळा आपल्या भाषणातून उच्चारणारे करुणानिधी सत्यसाईबाबाच्या नादी कसे काय लागले याबद्दल सत्यसाईबाबाच्या भक्तांना, पक्ष कार्यकर्त्यांना आणि देशभरच्या rationalist ना कुतूहल होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख व केंद्रीय मंत्री शिवराज पाटील हेही सत्यसाईबाबाच्या कार्यक्रमाला हजर होते. त्यांच्यावर टीका न होता करुणानिधीवरच का होते आहे हे पाहण्याअगोदर रींळेपरश्रळी चे तत्त्व काय आहे ते समजून घेऊ. रॅशनॅलिझम ह्या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ आहे आपले विचार, मत, समजुती आणि आपली कृती, वर्तणूक या गोष्टी धार्मिक श्रद्धा, धर्मग्रंथ, धर्मगुरू किंवा थोर व्यक्ती व भावना ह्यांच्या आधारे न स्वीकारता त्या शरीप च्या आधारावर स्वीकारण्याचे तत्त्व किंवा सवय.
मानवामध्ये सत्य-असत्य, चांगले-वाईट, चूक-बरोबर, न्याय-अन्याय इत्यादि भेद ओळखण्याची शक्ती आहे. त्यास आपण reasoning power (विवेकशक्ती) म्हणतो. rationalism चा अर्थ स्पष्ट करण्याचा एक सुलभ उपाय म्हणजे reason च्या विरुद्ध कोणत्या गोष्टी आहेत ते पाहणे. रीझनचा पहिला विरोध आहे निराधार विधान सत्य म्हणून स्वीकण्याला. कोणतेही विधान सत्य आहे त्याची खात्री त्या विधानाला कितपत वैज्ञानिक पुरावा आहे, हे करून करावी. याच्या विरुद्ध पुरावा आहे ते विधान असत्य मानावे आणि त्याचा त्याग करावा. धार्मिक समजुतींना (उदा. चमत्कार, मूत्यूनंतरचे जीवन, किंवा पुनरागमन जसे येशू ख्रिस्ताचे पुनर्जन्म, प्रार्थनेचे सामर्थ्य इ.) शरीप चा आधार मिळत नसल्याने अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये. ठशरीप चा दुसरा विरोध षशशश्रळपस किंवा भावनेचे वर्चस्व यांना आहे. मानवी जीवनात भावनांचे महत्त्व फार आहे हे शरीप नाकारीत नाही. ती फक्त एवढेच म्हणते की भावना हे आचार-विचारांचे नियामक तत्त्व होऊ शकत नाही. भावनांना आपल्या विचारांचे जीवनाचे स्वामित्व देणे योग्य नाही. क्रोध, भय, प्रेम इत्यादि भावनांना आवरणारी शक्ती म्हणजे reasoning power. केव्हा कोणत्या भावनेला वाव द्यायचा ह्याचा निर्णय शरीप ने घ्यावा. पेरियारच्या मतानुसार दयाळूपणा, इच्छा, प्रेम, वासना, मैत्री, आकर्षण, लैंगिक आकर्षण इत्यादी गोष्टी ह्या व्यक्तीच्या खाजगी बाबी आहेत. ह्या गोष्टीबद्दल चर्चा करू नये किंवा त्या कुणी कुणावर लादू नयेत. किंवा त्यांबद्दल तिसऱ्या व्यक्तीने काही ठरवू नये. प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार, वृत्तीनुसार व त्याला वाटणाऱ्या समाधानानुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे.
रॅशनॅलिझमचे हे तत्त्व आज जे प्रस्थापित झाले आहे, त्यामागे बराचसा इतिहास आहे. आधुनिक विज्ञानाच्या जन्मानंतर (१६ व १७ वे शतक) हळूहळू ही तत्त्वे प्रस्थापित झालेली आहेत. ही तत्त्वे प्रस्थापित होण्यामागे बऱ्याच तत्त्वज्ञांचा, सुधारकांचा व वैज्ञानिकांचा वाटा आहे. ह्या विचारधारेचे दोन प्रमुख कालखंड इतिहासात होऊन गेले. १८ व्या शतकातला इंग्लंड आणि फ्रान्समधला काळ व १९ व्या शतकातील सुरुवातीचा जर्मनीमधील काळ. आधुनिक विज्ञानाच्या अभ्यासाला खरी सुरुवात १६ व्या शतकात झाली, १७ व्या शतकात ती रुजली. याच काळात अनेक विचारवंत सत्य शोधण्याच्या पद्धतीचा विचार करू लागले. ख्रिश्चन धर्माचा पगडा युरोपमध्ये जबरदस्त होता. पारंपरिक ख्रिश्चन जग हे अविवेकी (irrational) आहे ह्या निष्कर्षापर्यंत काही विचारवंत आले. वैज्ञानिक शोध लावण्यासाठी पूर्वीच्या आधारभूत ग्रंथांचा आश्रय घेतला जात असे. फ्रान्सिस बेकनने (१५६१-१६२६) सत्य जाणण्यासाठी ग्रंथप्रामाण्याऐवजी प्रयोगातून निष्कर्ष काढण्याची पद्धत शोधून काढली. रेने देकार्त (१५९६-१६५०). ह्या तत्त्ववेत्त्यानेही ग्रांथिक ज्ञानाऐवजी ‘शिरीप ला महत्त्व दिले. त्या काळी बुद्धिवंतामध्ये सर्वसाधारण प्रवृत्ती अशी होती की धर्मगुरु, धार्मिक ग्रंथ, मूलभूत मानले गेलेले इतर संदर्भ ग्रंथ यांच्या जागी शरीप ची स्थापना करावी. १८ व्या शतकाच्या सुरुवातीला ‘निसर्ग हा नियमबद्ध आहे आणि यांतील व्यवहार हे नियमानुसार यांत्रिकी पद्धतीने चालतात’ ह्या रेने देकार्त व आयमॅक न्यूटन (१६४२-१७२७) यांनी पूर्वी काढलेल्या निष्कर्षाला मोठ्या प्रमाणात मान्यता मिळाली. याचा परिणाम म्हणून चमत्कार म्हणजे निसर्गात अतिनैसर्गिक शक्तीने केलेला हस्तक्षेप’ ही कल्पना विचारी माणसांना स्वीकारणे कठीण होऊ लागले. नैसर्गिक घटनांचे स्पष्टीकरण निसर्गनियमांनी देता येते, तर हाच नियम धर्माचा उगम, धार्मिक ग्रंथातील लिखाण आणि चर्च यांनाही का लावण्यात येऊ नये ? रॅशनालिस्टांना वाटते की, होय, याही क्षेत्रात निसर्गनियमांद्वारे स्पष्टीकरण मिळवले पाहिजे. ईश्वराने प्रेषितापुढे ज्ञान प्रगट केले असून त्याच्या शब्दाचा श्रद्धेने स्वीकार केला पाहिजे, ही पूर्वीची कल्पना मागे पडली आणि प्रत्येक गोष्टीची शिरीप च्या साहाय्याने शहानिशा करून तिला पटेल अशाच गोष्टी स्वीकरणीय आहेत, ही कल्पना हळूहळू प्रस्थापित झाली. नैसर्गिक घटनांचे कारणांनी स्पष्टीकरण करणे ही मानवाने आतापर्यंतच्या इतिहासात घेतलेली मोठीच झेप होती. धार्मिक ग्रंथात सांगितलेल्या आधारभूत मानल्या गेलेल्या गोष्टींना rationalist लोकांचा विरोध होता. परंतु निसर्गातील घटनांमध्ये ईश्वर हस्तक्षेप करीत नसला तरी सृष्टीचा निर्माता व सृष्टीमध्ये नियमबद्धता ठेवणारा म्हणून त्यांचा ईश्वरावर विश्वास होता. असे मत असणाऱ्यांमध्ये इंग्लंडमधील जॉन टोलंड (१६७० -१७२२ -christianity not mysterious) आणि मॅथ्यू टीडल (१६५७-१७३३ बायबलमधील चमत्कार आणि गूढता नाकारली) तर फ्रान्समध्ये व्होल्टेर (१६९४-१७७८) हे rationalist होते. परंतु त्यांचा ईश्वरविषयीचा विश्वास थोड्याच काळात नाहीसा झाला. ब्रिटनमध्ये डेविड ह्यूम (१७११-१७७६) आणि फ्रान्समध्ये पॉल-हेन्री हॉलबाख (१७२३-१७८९) ह्यांनी ईश्वरावरील श्रद्धेला शिरीप चा आधार मिळत नाही असा युक्तिवाद केला. हॉलबाख ह्याने १७७० मध्ये ‘System of Nature’ हा ग्रंथ लिहिला. त्यात त्याने ईश्वराचे आणि आत्म्याचे अस्तित्व नाकारले. इंग्लंडमध्ये १८ व्या शतकात reason ने सर्व गोष्टीकडे पाहण्याचे तत्त्व इतक्या घट्टपणे रुजले की ईश्वराचा अभ्यास करणारेदेखील आपला युक्तिवाद श्रद्धेच्या ऐवजी reason ने करू लागले. reason ने युक्तिवाद करण्याच्या या प्रक्रियेमुळे सामान्य लोकांमध्ये असलेल्या चेटूकविद्येसारख्या विषयावरही त्याचा बदल जाणवला. सुशिक्षित व विचारी लोकांमध्ये असलेली चेटकिणीबद्दलची समजूत नाहीशी व्हायला लागली. अनेक स्त्रियांना चेटकीण समजून जाळण्यात येत असे. फ्रान्स आणि हॉलंडमध्येही चेटकिणीवरचा विश्वास कमी व्हायला लागला. आधुनिक विज्ञान आणि आधुनिक तत्त्वज्ञान ह्यांमध्ये जसजश्या सुधारणा होऊ लागल्या तसतश्या लोकांमधील या प्रकारच्या अंधश्रद्धा कमी व्हायला लागल्या. १७ व्या शतकातील इंग्लिश विचारवंत थॉमस हॉब्ज (१५८८-१६७९) ह्याने rationalist विचाराला चालना दिली. त्याने नीतीला धर्मापासून वेगळे केले. फ्रान्समध्ये दिदेरो (१७१३-१७८४) याने पहिल्या विश्वकोशाची (Encyclopaedia) रचना केली. त्या काळातील सर्व विचारवंतांनी विश्वकोश लिहिण्यात आपले योगदान दिले. ज्ञानाचे वर्गीकरण केले. अंधश्रद्धा आणि ज्ञान यात फरक केला. Rationalism चा हा अर्थ १८ व्या शतकात फ्रान्समध्ये विश्वकोशकार म्हणून प्रसिद्धी पावलेल्या तत्त्वज्ञाच्या लिखाणात व्यक्त झाला. ह्या तत्त्वज्ञांपैकी व्होल्टेअर दिदेरो, डालेंबर्ट आणि हॉलबाख हे प्रमुख असून ते सर्व स्थूलमानाने जडवादी, विज्ञानवादी आणि श्रद्धाविरोधी होते.
दुसरी rationalism ची लाट १९ व्या शतकाच्या सुरुवातीला जर्मनीमध्ये आली. या चळवळीमध्ये अग्रभागी होते जॉर्ज हेगेल (१७७०-१८३१). हेगेलच्या प्रभावाखाली काही विचारवंतांच्या संघांनी बायबलवर जोरदार टीका केली. डेव्हिड स्ट्रॉस (१८०८-१८७४ ; The Life of Jesus, Critically excimined – 3 Volumes) व फर्डीनंड बाऊर (१७९२-१८६०; – Paul-Apostico of Jesus Christ, History of Chrisian Church – 5 Volumes) ह्यांनी बायबलमधील नैसर्गिक घटनांचे व्यवस्थित स्पष्टीकरण करून त्या पुराणकथा आहेत हे दाखवून दिले. ह्यामुळे ख्रिश्चन जगतात एकच खळबळ उडाली. कारण बायबलमधील घटना म्हणजे ऐतिहासिक सत्य मानले जायचे. स्ट्रॉसच्या विचारधारेला पुढे अशीच चालना मिळत गेली आणि लुडविग फ्युअरबाख (१८०४-१८७६, – Essence of Christianity) ह्यांनी सांगितले की ईश्वराची कल्पना ही माणसाच्या इच्छेतून आणि गरजेतून निर्माण झालेली आहे. ‘मनुष्याची उत्पत्ती ही ईश्वराने केली आहे’ या बायबलमधील कल्पनेवर rationalists नी टीका केली होती. ह्या टीकेला डार्विनच्या Origin of Species या १८५९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाने बळकटी मिळाली. पृथ्वीवरील माणसाच्या उत्पत्तीचे कारण ईश्वर नसून तो इतर लहान लहान पेशींपासून उत्क्रांत होत होत बनला आहे, असे त्याचे नैसर्गिक स्पष्टीकरण मिळाले.
जेरेमी बेंटम (१७४८-१८३२) व जॉन स्टुअर्ट मिल (१८०६-१८७३) ह्यांनी Ethical rationalism चा पाया रचला. ही तत्त्वे ‘उपयोगितावाद’ या नावाने प्रसिद्ध आहेत. १९ व्या शतकाच्या अखेरीस व २० व्या शतकाच्या सुरुवातीस rationalism हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जाऊ लागला. आजचे rationalist जेव्हा reason चा वापर दैनंदिन जीवनात करावा असे म्हणतात, तेव्हा त्यांचा विरोध व्यक्तिसापेक्षता, गूढवाद, अधिकारी व्यक्ती (धर्मगुरु, बुवा बाबा-माता ह्यांनी सांगितलेले उपदेश-प्रवचन), धर्मग्रंथात सांगितलेले ज्ञान, रूढी-परंपरा व धर्मश्रद्धांना असतो. आपल्या समजुती आपले विचार हे पुराव्यावर (evidence) आधारलेले असले पाहिजेत. ते व्यक्तीचे पूर्वग्रह, भावना, इच्छा किंवा परंपरा-रूढी, धर्मश्रद्धा यावर आधारलेले नसावेत, असा rationalist चा आग्रह असतो. आपले कर्तव्य काय आहे व आपल्या कृतीचा अंतिम परिणाम जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख साधण्यात आहे का, हे पाहून आपली कृती व वर्तणूक ठरवावी. Rational मनुष्य न्यायनिष्ठ व वैज्ञानिक दृष्टी असलेला असतो.
रॅशनॅलिझमची तत्त्वे थोडक्यात ही अशी आहेत. भारतात पेरियार, आगरकर, फुले, आंबेडकर, एम.एन.रॉय इत्यादींनी rationalism ची तत्त्वे रुजवायचा प्रयत्न केला. दक्षिण भारतात पेरियारच्या विचारसरणीतूनच करुणानिधींच्या डीएमके पक्षाचा जन्म झालेला आहे. जाहीरपणे पेरियारनी सांगितलेल्या rationalism च्या तत्त्वाचा पुरस्कार करणारे, पक्ष कार्यकर्त्यांना त्याप्रमाणे वागायला लावणारे, प्रसंगी आपले सरकारही rationalism च्या तत्त्वासाठी बरखास्त करायला मागेपुढे न पाहणारे करुणानिधी अचानकपणे सत्यसाईबाबा सारख्या मुरब्बी, चमत्कारी बाबाचा उदोउदो कसा काय करायला लागले याचे कोडे अनेकांना पडले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख व केंद्रीय मंत्री शिवराजपाटील हे सत्यसाईबाबाचे भक्त असूनही त्यांच्यावर टीका न होता करुणानिधींवर का होते ह्याचे कारण आहे ते कारण म्हणजे विलासराव देशमुख व शिवराज पाटील हे काही rationalism नाहीत व तसा दावाही त्यांनी कधी केलेला नाही. आपल्या बुद्धीला तर्काला-स्मरून ते जीवनात वागताना दिसत नाहीत. लोकांच्या हिताचे निर्णयही rational पद्धतीने घेताना दिसत नाहीत. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेणे असे दर्शन घेतले नाहीतर आपले मुख्यमंत्रिपद जाईल असे मानणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगसारख्या बुवाची मदत घेणे ह्यासारखे अंधश्रद्धेचे व ळीीरींळेपरश्र निर्णय विलासराव देशमुखांनी जनतेचा पैसा खर्च करून घेतले आहेत. विमानतळांच्या जागेसाठी झोपडपट्ट्या उठवणे, धरणग्रस्तांचे पुनर्वसन योग्यरीत्या न करणे, मल्टिनॅशनल व इतर खाजगी कंपन्यांना स्पेशल इकॉनॉमी झोनच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी कमी मोबदला देऊन बळकावणे असेही irrational निर्णय विलासराव देशमुखांच्या सरकारने घेतले आहेत. याउलट करुणानिधींनी जनहिताचे अनेक rational निर्णय घेतलेले आहेत. भूमिहीनांना प्रत्येकी २ एकर जमीन मोफत देणे, (आतापर्यंत २ लाख एकरांच्या उद्दिष्टांपैकी ४०,००० एकरांचे वाटप करण्यात आलेले आहे.), बेघरांना घरे देणे, दोन रुपये प्रतिकिलो दराने गरिबांना तांदळाचे वाटप, गरिबांना मोफत कलर टी.व्ही., गॅस कनेक्शन, सिनेमाघरातील तिकिटाचे दर ५ रुपये ते ५० रुपयांच्या दरम्यान ठेवणे, शाळेतील गरीब मुलांना मोफत सायकली देणे, सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास व शिंकरण्यास मनाई करणे, असे अनेक जनहिताचे ीरींळेपरश्र निर्णय करुणानिधींच्या सरकारने घेतले आहेत. असे असले तरी सत्यसाईबाबाची एखाद्या प्रकल्पासाठी मदत मागणे म्हणजे करुणानिधींचे शासन, शासन चालवण्यास अपयशी ठरले आहे ह्याचीच कबुली दिल्यासारखे आहे. ठरींळेपरश्रळींीं म्हणून ते पक्ष-कार्यकर्त्यांच्या मनातून उतरले आहेत. पेरियारच्या rationalism च्या वारशाशी त्यांनी विश्वासघात केला आहे. याबद्दल देशभरातील rationalist, DMK चे सच्चे पक्ष-कार्यकर्ते व करुणानिधींचे सहकारी त्यांना कधीही माफ करणार नाहीत.
राजविमल टेरेस, रामनगर कॉलनी, बावधन, पुणे-४११ ०२१.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.