पत्रलेखन

सरस्वती के. देव, १६८ एफ वैद्यवाडी, ठाकुरद्वार, मुंबई ४०० ००२. दूरध्वनी : २३८५१३३१
नोव्हेंबरचा आजचा सुधारक वाचला. नेहमीप्रमाणे चांगला आहे. त्यातील शारदा यांची सुहासिनीची सत्त्वपरीक्षा हा लेख वाचला. त्यात सुहासिनीची करुण कहाणी फारच हृदयद्रावक आहे.
अजूनही पालक म्हणजे मुलाचे वा मुलींचे आई-वडील. ते शिक्षित आहेत, सुधारक आहेत पण बौद्धिकदृष्ट्या कमकुवत आहेत. केवळ पैसा हे माध्यम आजकाल फार महत्त्वाचे आहे. मुलगी एवढी शिकलेली आहे. पण व्यावहारिक दृष्टिकोण नाही. मागणी आली म्हणून हुरुळून जाऊन आईवडिलांनी लग्न उरकले. एरवी एवढ्या-तेवढ्यावरून वाद करणारी मुलगी विचार न करता आंधळेपणाने त्या मुलाशी लग्न करते. म्हणजे शिक्षण घेऊन तिची बौद्धिक पातळी उंचावली नाही. बुद्धीने मनावर विजय मिळविण्यापेक्षा मनाने तिने कोता विचार केला आणि वरवरच्या परिस्थितीला शरण गेली आणि लग्न केले. तेव्हा पालकांनी स्वतः मुलींना किंवा मुलांना डोळस शिक्षण द्यावे. पण होते काय की, आईवडीलच मुलांच्या भवितव्याचा निर्णय घेतात. आणि मुले/मुलीही डोळे मिटून त्याला मान्यता देतात. त्यामुळे मुलांच्या संसारावर पालक पाळत ठेवतात. पण बारकाईने लक्ष देण्याचे टाळतात. दुसरे असे की, जग काय म्हणेल ? हा विचार करून मुलींना संरक्षण देत नाहीत. आणि मुलांचे पालक आपण आपली सासूसासऱ्यांची हौस भागवून घेतात. मुलांच्या संसारात किती लक्ष घालायचे आणि मुली/मुलांना आईवडिलांनी किती ऐकायचे यांचेही भान आजकाल सुटत चालले आहे. त्यामुळे विवेकी आचरण म्हणजे काय हेही समजेनासे झाले आहे. तेव्हा मुलांना शिक्षण देताना पालकांचेही प्रबोधन होणे आवश्यक आहे. पालकांनी फक्त पालकांचीच भूमिका घ्यावी कारण ज्येष्ठतेपेक्षा कर्तृत्वाचे श्रेष्ठत्व जास्त मोलाचे आहे. ज्येष्ठतेला नमस्कार करण्यापेक्षा कर्तृत्वाला सलाम करणे हीच मुलाच्याकडून अपेक्षा ठेवली पाहिजे. पण हल्ली मोठ्यांना मान देत नाहीत. म्हणून कांगावा करायचा आणि जबाबदारी टाळायची हेही समाजात दिसून येते. तेव्हा अन्याय करणारा जेवढा शिक्षेस पात्र आहे तेवढाच अन्याय सहन करणाराही गुन्हेगार आहे.
हे सर्व का घडते? कारण सामंजस्याचा अभाव. विवेकी मोकळेपणा नाही. आचरणात नुसताच स्वछंदीपणा आणि स्वैरता आढळून येते कारण, विचाराला आध्यात्मिक बैठक नाही. विचाराचे रूपांतर विवेकात झाले पाहिजे. अपरिपक्व विचारांचे परिणाम फार भयंकर होतात. तेव्हा जीवनावर विचार करताना आचरण मात्र विवेकी नसते त्यामुळे जगण्याची कला, सर्वच जण विसरत चालले आहेत. आणि त्यामुळे आत्मकेन्द्रित वृत्ती फोफावत चालली आहे. म्हणून सुहासिनी एवढी शिकलेली आहे पण लग्नाचा निर्णय उथळपणे घेतला गेला. आणि दोन्हीकडील पालक मोठेपणाला भुलले. त्यामुळे अहंकार फोफावतो आणि त्यापोटी सर्वांचाच सत्यनाश होतो. त्यामुळे एखादी संस्था अगर संघटना मदत करतील पण आपण आचरण करण्याचा निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो. कारण व्यक्तीचा वागणुकीतील ठामपणा आश्वासक नसेल तर नुसते समुपदेशन करून चालणार नाही. व्यक्तीने स्वतः स्धारले पाहिजे.

अतुल सोनक, बी/२०१, सुखनिवास, अंबाझरी गार्डन रोड, नागपूर ४४० ०३३. सुकर्णः ९८६०१११३००
आ.सु. डिसेंबर २००७ च्या अंकात विवेकवादाला एवढे नक्कीच साधेल हा ह.आ.सारंग यांचा अभ्यासपूर्ण लेख वाचला. विवेकवादाला धर्माचा अनिष्ट प्रभाव कमी करता येईल किंवा नाही, ते काळच सांगेल. गेल्या अनेक वर्षांपासून विवेकवादी धर्मवाद्यांशी वाद घालीत आहेत. निष्पन्न काय झाले ते दिसतेच आहे. धर्म माणसाला भावनिक आधार देतात, हे निश्चित’ असे लेखकाचे म्हणणे आहे. लोकांना खोट्यांचा आधार घेऊनच जगायचे असेल तर आपण विवेकवादी त्याला काय करणार ? कसलाही तार्किक किंवा वैज्ञानिक आधार नसताना स्मशानात नेताना मृतदेहाचे पाय कोणीकडे, डोके कोणीकडे असावे यावर विज्ञानयुगातही वाद घालायचा? तुमचे पटते हो, पण पचत नाही, रुचत नाही, अशी भूमिका घेणाऱ्यांकडे कशाला ‘आमचे ऐका’ म्हणून सांगायला जायचे ? ‘ज्यांच्यासाठी देव आहे, त्यांच्यासाठी देव आहे आणि ज्याच्यासाठी देव नाही, त्याच्यासाठी देव नाही!’ अशी सुस्पष्ट भूमिका घ्यायला काय हरकत आहे? ही भूमिका कुसुमाग्रजांची आहे. श्रद्धेपुढे विवेकाचे काय चालणार? तुम्ही आपल्या घरी सखी आम्ही आपल्या घरी सुखी. अशी सरळ सरळ भूमिका घ्यावी. अनेक थोर विवेकवादी विचारवंत होऊन गेले. अगदी ज्या ज्या प्रकारे शक्य होईल, त्या त्या प्रकारे त्यांनी देवाच्या आणि धर्माच्या कल्पनांवर, अनिष्ट चालीरितींवर हल्ला चढवला. काही उपयोग झाला ? अनेक धर्म-पंथ स्थापन होत गेले. धर्माचे पालन कोणीच करीत नाही. तरी धर्म टिकून आहेत. मुळात जग हे मूर्ख, धूर्त, एकमेकांचे पाय ओढणाऱ्या, दुसऱ्याचा दुःस्वास करणाऱ्या, स्वार्थी, ढोंगी, अतिरेकी लोकांनी ओतप्रोत भरलेले आहे. प्रेमळ, सहृदय, एकमेकांची मदत करणाऱ्या लोकांची इथे नेहमीच कमतरता भासते. आपण इतके ढोंगी आहोत की गांधींना महामानव मानतो पण त्यांची किती मते आपल्याला पटतात? त्यांचे फोटो लावले, पुतळे बसवले की झाले काम! ज्यांना महात्मा, महामानव किंवा देव म्हणून गणले जाते त्यांच्या निर्देशांप्रमाणे त्यांना मानणारे लोक तरी वागतात का? की लोकांनाही माहिती असते आपल्याला अमुक देतो, तमुक देतो असे सांगणारेही आपल्यासारखेच ढोंगी असतात म्हणून! कारण या सर्व गहागानवांगध्ये एकगत कधीच नसते. “अश्रश्र सीशरी शिप हळपज्ञ रश्रळज्ञश’ हे विधान गला नेहगी खोटे वाटते. तुम्हा आम्हाला कायगचे सुख (शशीरपशपी हर्राळिपशीी) देण्याच्या पोकळ वल्गना करणारे बुवा-बाबा-संत-महात्मे किंवा तथाकथित देव तद्दन खोटे बोलत नाहीत काय ? जगात सगळीकडे सुख नांदत होते अशी परिस्थिती असणारा कालावधी कधी तरी होऊन गेला काय ? पुढेही तसा कालावधी येईल, याची खात्री काय ?
धर्म नसेल तर माणसाच्या सामाजिक-मानसिक गरजांचे काय हा विचारवंतांपुढील महत्त्वाचा प्रश्न आहे.” मला तसला काही प्रश्न पडला नाही. कुठल्याही धर्माचा कुठलाही धार्मिक विधी बघा. तिथे धार्मिक चर्चापेक्षा जेवण कसे बनले ? कपडे केव्हा घेतले? दागिने कुठून घेतले ? तुझे कसे काय सुरू आहे ? मुले कशी आहेत ? इ. अनेक प्रश्न, उपप्रश्नांचे गु-हाळ सुरू असते. जे यजमान धार्मिक विधीसाठी बसलेले असतात, ते केवळ एक उपचार म्हणून विधी उरकवत असतात. त्यांचेही लक्ष जमलेल्या लोकांकडेच असते. एकत्र जमून मौज-मजा करणे ही जर मानवाची मूळ प्रवृत्ती असेल तर त्याला धर्माची आवश्यकता काय आहे? धार्मिक कारणांशिवायही एकत्र येता येईल ना! धर्माला पर्याय देता येत नाही, असेही लेखकाचे म्हणणे आहे. पण पर्याय पाहिजे कशाला? ज्या गोष्टीची आपल्याला गरजच नाही अशा विवेकवादी लोकांना पर्यायाची गरजच नाही. आता ज्यांना धर्माची आवश्यकता वाटते त्यांचे बघू. अनेकांनी सांगून पाहिले देव-धर्म थोतांड आहे म्हणून, पण पालथ्या घड्यावर पाणी ! ज्यांना आपले हित-अहित कळत नाही त्यांना पर्याय देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे का ? मूर्खपणाला कसला पर्याय देणार?
माझ्या मते विवेकवादी चळवळ ही आपण आपल्यासाठीच चालवलेली चळवळ आहे. त्यात धार्मिक किंवा धर्मांध लोक सामील होतील याची शक्यता फार फार कमी आहे. अपवाद असतात. इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे होणारच. मोठ्या प्रमाणावर किंवा सार्वजनिक स्तरावर लोकांच्या मनाचे परिवर्तन घडवून आणू शकेल अशी कोणी व्यक्ती जगात आहे का ? तथाकथित महात्मे प्रयत्न करून करून थकले. काही उपयोग नाही. आपला आणि त्यांचा वाद हा पूर्वापार चालू आहे आणि चालत राहणार, त्याच्या शेवटाची काहीही चिह्न दिसत नाहीत. पैशाच्या अफरातफर-प्रकरणी निलंबित झालेला ग्रामसेवक धर्मगुरू बनून जगद्गुरु नरेन्द्राचार्य म्हणून मिरवतो आणि त्याच्या प्रवचनाला हजारो लोक गर्दी करतात. देवाधर्माचे थोतांड ऐकायला लोक हजारो-लाखोंच्या संख्येत गर्दी करतात. देव आणि धर्माचा भंपकपणा समजावून द्यायला तुम्ही भाषण ठेवा, पन्नास लोक जमले तरी कार्यक्रम यशस्वी झाला, असे समजावे. पूर्वीच्या सुधारकांना वाटायचे की शिक्षणाचा जसजसा प्रसार होईल तसा लोकांचा देवाधर्मावरील विश्वास कमी होईल, परंतु तसे काही झाले नाही. उलट मोठे मोठे वैज्ञानिक, तंत्रज्ञ, तत्त्वज्ञ, सरकारी अधिकारी, नेते, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री शिकून सवरून देवाधर्माचा उदोउदो करताना दिसतात. सामान्य माणूस त्यांचे अनुकरण करेल तर त्याला दोष देण्यात काय अर्थ आहे? मागणीमुळे पुरवठाही होत आहे. अनेक जाती-धर्म-पंथांचे बुवा-बाबा-महाराज-संत उदयास येत आहेत. त्यांची दुकाने जोरात चालत आहेत. साक्षात्कार झाला. अनुभूती मिळाली, ब्रह्म पाहिले असे सांगून हे धर्माचे दुकानदार पोतड्या भरत आहेत. तुम्ही आम्ही या दुकानदारांविरुद्ध जरा बोलूनच बघा. त्यांच्या धार्मिक भावना दुखावतात. तस्लिमा नसरीनला बघा कसे सळो की पळो करून सोडले आहे.
शेवटी एकच म्हणावेसे वाटते. आपण ठरवून कोणाला “विवेकवादी’ बनवू शकतो काय ? ज्याला विवेकवादी बनवायचे आहे त्याने स्वतः विवेकवादी बनायचे ठरवले तरच हे शक्य आहे ना? मनुष्याने स्वतः बिघडायचे किंवा सुधारायचे ठरविल्याशिवाय त्याला जगातील कोणतीही शक्ती बिघडवू किंवा सुधारू शकत नाही. म्हणून तर अनेक बुवा-महाराज-गुरू निरनिराळे वर्ग घेत असूनही, त्याच्या पुस्तकांची-पोथ्यांची भरपूर विक्री होत असूनही, कॅसेट-सीडी खपत असूनही समाजात काही विशेष सुधारणा झाल्याचे जाणवत नाही. माझ्या लिखाणावरून मी “निराशावादी’ असल्याचा समज होण्याची शक्यता आहे. मी निराशावादी नाही. आशावादीच आह. कोणी सांगावे, भविष्यात एखादा विवेकवादी प्रेषित जन्माला येईल आणि धर्मांच्या उकिरड्यात लोळत पडणाऱ्या मूर्ख समाजाला त्यातून बाहेर काढील.

डॉ. सुभाष आठले, २५, नागाळा पार्क, कोल्हापूर ४१६ ००३..
डॉ. आशुतोष दिवाण यांची आसु अंक ८ (नोव्हें.२००७) मधील प्रतिक्रिया वाचून माझ्या लक्षात आले की माझे विचार इतर सुशिक्षितांनाही समजतील इतक्या स्पष्टपणे मी लिखाणात व्यक्त करू शकत नाही. हा माझा दोष मान्य करून तो घालवला पाहिजे. तरी स्पष्टीकरण म्हणून प्रत्युत्तर पाठवले आहे. राज्यघटनेत सुधारणा प्रत्युत्तर १) सुधारणा अशक्य आहेत असे म्हटले की प्रयत्न करण्याचा उत्साह व जबाबदारी संपते. खरे तर अशक्य काही नसते. विचार ही सर्व सुधारणांची गर्भावस्थाच असते. २) लोकशाही म्हणजे लोकप्रतिनिधींचे राज्य, चांगले प्रतिनिधी निवडून देण्यात आपल्याला अपयश आले आहे, गुंड प्रवृत्तीचे कु-बुद्धिवान लोक अधिक प्रमाणात व अधिक आत्मविश्वासाने निवडून येत आहेत, याबद्दल दुमत नसावे. तसे असेल तर या गोष्टीला जबाबदार असलेली निवडणूक पद्धत बदलावयास हवी की नाही ? ३) सध्याचे लोकप्रतिनिधी बुद्धीने कमी आहेत असे मला अजिबात म्हणावयाचे नाही. ते नक्कीच बुद्धिमान आहेत. मला असे म्हणावयाचे आहे की गुंड, भ्रष्टाचारी, अनीतिमान व्यक्तीच निवडून येण्यात अधिक यशस्वी होत आहेत याचे कारण सध्याची निवडणूक-पद्धती. या निवडणूक-पद्धतीला मी पर्याय सुचवला आहे. तो यशस्वी होईलच असे नाही पण प्रयोग तरी करायला हवा की नाही ? ४) श्री. दिवाण यांनी मांडलेले १ ते ४ हे मुद्दे बरेचसे गैरलागू आहेत व चालू विषयाशी संबंधित नाहीत. स्वतः बुद्धिमान् असूनही श्री. दिवाण यांनी बुद्धिमान लोकांवर बऱ्याच दुगाण्या झाडल्या आहेत. पण प्रश्न बुद्धिमान मूर्ख अशा निवडीचा नाही. सज्जन-दुर्जन, किंवा चांगले-वाईट अशा निवडीचा आहे. चांगल्या वाईटाचा येथे प्रश्नच कोठे येतो असे दिवाण म्हणतात याचे मला फारच आश्चर्य वाटते. श्री. दिवाण यांना तसे म्हणावयाचे नसावे. चांगल्या-वाईटाचा विचार करावयाचा नसेल तर आपल्या वर्तनाचा आधार काय ? मग आजचा सुधारक चालविण्याचे व वाचण्याचे कारणच काय ? का फक्त मनोरंजन ? ५) निवडणूक सुधारणांव्यतिरिक्त मी आणखी बऱ्याच सुधारणा सुचविल्या आहेत. त्यांचे काय ? नंदीग्राममध्ये झालेल्या घटनांमुळे पोलीस बळ व त्यावरील राज्यसरकारची पकड यातील सुधारणा पुन्हा अधोरेखित झाल्या आहेत.
६) कर्नाटकमध्ये नुकताच जो मुख्यमंत्रिपदाचा खेळ झाला त्यामुळे निवडणूक सुधारणा व इतर घटनासुधारणा अत्यावश्यक आहेत हे स्पष्ट व्हावे.
शारदा, फोन : (पी.पी.) २५२३०१०

श्री. रवीन्द्र द. खडपेकर यांच्या आम्ही लटिके ना बोलू या प्रतिक्रियेस लेखिकेचे उत्तर १) सुहासिनीची बाजू पूर्णपणे खरी आहे. विपर्यस्त तर नाहीच. उलट जे घडले तेही लिहिलेल्यापेक्षा थोडे जास्तच आहे.
“आमच्याकडे मुलीला शिक्षण पूर्ण करता येईल. कारण आम्ही मोठ्या मुलाकडून पैसे घेत नाही. आणि मोठ्या सुनेला काम करावे लागत नाही. मग हिला तरी काय आम्ही काम सांगणार?” अशा गोड गोड थापा मारून फसवणाऱ्या लोकांना कोणती बाज असू शकते ? त्यांना मुलगी गरिबाची आहे हे माहीत असूनसुद्धा चांदीसोन्याची अपेक्षा करणाऱ्या लोकांना काय बाजू आहे ? आपल्या सुंदर बायकोपुढे आपण सामान्य दिसतो, पण हे कबूल करणे म्हणजे तिला शेफारून ठेवणे, ते योग्य नाही म्हणून सतत तिचा अपमान करणे, तिच्यावर संशय घेणे याला कोणती बाजू असेल ? योग्य वयात लग्न करणे आईवडिलांचे कर्तव्य असते. कोणाचेही लग्न जमत असेल तर विरोधी मत कोणीही नोंदवत नाही. “कोणाचाही वेल मांडवावर जावा” अशी आपल्या समाजाची पक्की धारणा. कोणीही असहाय मुलगी कायदा शिकूनही त्याचा काहीही उपोयग करू शकत नाही. न्यायदेवता आंधळीच नाही का?
‘खटासी असावें खट, उद्घटांशी उद्धट’ हे वचन संसारात चालत नाही. तसे आपले संस्कारही नाहीत. शिवाय मुलांवर तसेच संस्कार करायचे नाहीत. ६) छळ होत असताना तिला कितीतरी वेळा माहेरी कायम जावेसे वाटले (सुहासिनीला). पण मुलांना स्वतःचे घर राहणार नाही. आजोळी मुलांना परक्यासारखे, पोरक्यासारखे, उपेक्षित जिणे जगावे लागेल.
वडिलांचे प्रेम जेवढे मिळावे रोवढेही प्रेम मिळणार नाही. माहेरी आईवडील आहेत, तोपर्यंत ठीक आहे, पुढे काय ? परित्यक्ता, आश्रिरा म्हणून सर्वांच्या नजरा टोवरा राहतील. त्यापेक्षा मुलांच्या सुखासाठी हेय घर बरे असा तिने विचार केला! मुद्दा असा आहे की, सुशिक्षित सुसंस्कारित घरात आजही २१ व्या शतकातसुद्धा सुशिक्षित मुलींचा छळ होतो. आपल्या सुशिक्षित समाजात आणि इतर समाजात दरवर्षी भारतात ३०० ते ४०० हुंडाबळी जातात. रोज छळामुळे होणाऱ्या घटस्फोटांची संख्या वाढतीच आहे. एखाद्या स्त्रीला जर मुलीच होत असतील तर तिला आत्महत्येला प्रवृत्त करण्यापर्यंत मजल जाते. याचा अर्थ समाज अजून खऱ्या अर्थाने सुशिक्षित झाला नाही हाच नाही का?
भारतात बरीच राज्ये अशी आहेत की जेथे स्त्रीला मन नसून फक्त शरीर आहे असे मानणारेच लोक आहेत. ते स्वतः मोठी मोठी पदे भूषवीत आहेत. विदर्भ, मराठवाडा, खानदेश अजून स्त्रियांच्या बाबतीत मागासलेलेच आहेत. ‘व-हाडी माणसं’ ह्या नाटकातील एक वाक्य, ‘वहाडी बाईनं पदराखाली दिवा ठिवला पाहिजे. पदर तं पेटला नाही पायजे, दिवा तं विझला नाही पायजे.’ म्हणजे तिची सत्त्वपरीक्षाच!
पत्रलेखकाची मते योग्य असली तरी घराबाहेर त्याचा उपयोग करता येतो. घरात नाही. घरात गृहिणी ‘खटाशी खट’ झाली तर घरातला मायेचा अंश आटून जाईल, घराचे वाळवंट बाळगोपाळांचे जीवन रूक्ष बनेल.
आय.टी. ज्ञानप्रसारामुळे आज स्त्रियांची एवढी कमाई आहे पण त्यांचे संस्कार काय मोलाचे असतील ? अशाच साऱ्या स्त्रिया वागल्या तर सारे पुरुष रामा गडी व्हायला वेळ लागणार नाही. अशा नामर्द लोकांचा भारत कसा वाटेल? नवऱ्याला रामागडी बनवणाऱ्या, छळणाऱ्या स्त्रियांना तिची मुलेसुद्धा मान देणार नाहीत. मीही अशा बायका पाहते. पण त्या फार थोड्या.
बायकोच्या माहेरची माणसे, नवऱ्याला मारहाण करणारे लोकही त्या नवऱ्यावर अन्यायच करतात. अन्यायविरहित समाज हे आपले ध्येय आहे ना?