कटु गोडल्याचा ‘हर्ष’

मी आगळा वेगळा माई
न्यारीच जिंदगानी
माहे मरण आहे खरं अवकानी
पाणी काया
जमिनीतला कापूस, मले हरिक
कवितेचा त्याच्या मुईले
गोळवा, गोड उसाच्या पेराचा
माह्या मरणाले कोणी म्हणतील येळा
देह टांगता ठेवला, जसा फुलोऱ्यातला कानोला
श्रीकृष्ण कळंब
[(१) माझी, (२) अवकाळी, (३) काळ्या, (४) हर्ष, (५) मुळीला, (६) गोडवा, (७) वेडा, (८) काही पूजांमध्ये करंज्या वगैरे एका चौकटीला लावलेल्या ‘हुकां’ना (फुलोऱ्याला) टांगतात, ती प्रतिमा इथे वापरली आहे.]
[मार्च २००८ च्या उत्तरार्धाच्या अवकाळी पावसानंतर अकोल्याजवळील ‘बाभुळगाव (जहांगीर)’ येथील श्रीकृष्ण कळंब या शेतकऱ्याने आपल्या मूर्तिजापूर येथील बहिणीच्या घरात गळफास लावून, टांगून, आत्महत्त्या केली. त्याच्या आधीच्या कवनाच्या या सहा ओळीच उपलब्ध आहेत.
वरील माहिती लोकसत्ताच्या नागपूर (२८ मार्च २००८) आवृत्तीतून साभार नोंदत आहोत.]