विचार करण्यासाठी एक विचार

आजकाल लोकांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना का निर्माण होत नसावी, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तथाकथित विकासासोबत माणूस उत्तरोत्तर आत्मकेंद्री व स्वार्थी बनत आहे, हे आपण पाहतोच, सुखाच्या कल्पना बदलत आहेत. बुद्धिमान मध्यमवर्गीय तरुणानी विनासाची कल्पना एकदम ढूळिलरश्र आहे. आपला देश, आपल्या देशातील लोकांची प्रगती याविषयी इच्छा किंवा निज्ञासा कोणत्याही बुद्धिमान तरुणात दिसून येत नाही. व्यवस्थापन, संगणन, अशा विषयांत तज्ज्ञता प्राप्त करून एखाद्या पाश्चात्त्य देशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी करून तिथेच स्थाईक होणे, हे मध्यमवर्गीय तरुणाचे स्वप्न असते. अशा परिस्थितीत सर्वसामान्य गरीब दलित, पीडित लोकांचे जीवनमान कसे उंचावणार?त्यांना कोण जागृत करणार? एकंदरीत आपल्या देशाची प्रगती कशी व केव्हा होणारा?असे अनेक प्रश्न आपल्याला पडायला हवेत. पण असे प्रश्न बहुसंख्यांकांना पडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मग असे का होत असावे, असावे नवीन प्रश्न पडतो.
विकासाचा खरा अर्थ काय, हा प्रश्न कोणाला पडत नसतो. कारण बहुतेकांची विकासाची कल्पना त्यांच्यापुरती स्पष्ट असते. सर्वसामान्यतः सुखी व सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध व नैतिक आयुष्य जगणे म्हणजे विकसित जीवन जगणे, असा विकासाचा अर्थ असायला हवा. परंतु आता पंचज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रियांचे चोचले पुरविणाऱ्या जीवनाला विकसित जीवन समजले जाते. त्यामुळे उपभोगातील वाढ व त्यासाठी कोणाचे तरी शोषण, या बाबी अपरिहार्य ठरतात.
आपल्यासारख्या गरीब देशांत असंख्य लोकांना आपल्या प्राथमिक गरजाही पूर्ण करता येणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक गरजपूर्तीचा प्रश्नच येत नाही. भौतिक सुखाचा अतिरेक हा विकासाचा अर्थ घेऊन त्या अर्थानेच विकासदर निश्चित केला जातो. दरडोई उत्पन्न, विजेचा वापर, कॅलरीचा उपभोग इत्यादि, अशा प्रकारे वाढत्या विकासदराचा हवाला देऊन आपला देश प्रगतिपथावर असल्याचे दाखविणे ही शुद्ध फसवणूक आहे.
देश म्हणजे देशातील जितीजागती माणसे होत; खेड्यापाड्यांत, दयाखोऱ्यात, रानावनात राहणारी माणसे! देशाच्या विकास म्हणजे या माणसांचा विकास. जोपर्यंत अशा लोकांचा विकास होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास झाला, असे कसे म्हणता येईल?एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के लोकांचा फार मोठ्या प्रमाणावर भौतिक विकास होतो. त्यांचे उत्पन्न इतर नव्वद टक्के लोकांच्या उत्पन्नात मिळवून त्याला एकूण लोकसंख्येने भागणे म्हणजे दरडोई उत्पन्न. मूठभर लोकांच्या विकासाच्या आधारे देशाचा विकासदर निश्चित करणे, हे केवळ हास्यास्पद नसून दुःखदही आहे. आपली विकासाची कल्पना ही सर्वांत तळाच्या लोकांना केंद्रभागी ठेवूनच निश्चित केली पाहिजे. असे केले तर कदाचित आपल्याला शरम वाटून आपण तथाकथित विकासाचा डिंडिम वाजवणार नाही. आणि त्यातूनच आपल्याला विकासाची कल्पना व त्या अनुषंगाने करावयाचे नियोजन बदलण्याची सुबुद्धी होईल.
मूठभर लोकांचा जो विकास होतो, तोही खऱ्या अर्थाने विकास नाही. तो एकांगी आहे. त्यामुळे मानवी जीवनाचे फक्त भौतिक अंगच समृद्ध बनत आहे. सांस्कृतिक अंगाच्या विकासाचे भान कोणाला नाही. आणि ज्यांच्या प्राथमिक गरजाही नीटपणे भागू शकत नाहीत, त्याच्या सांस्कृतिक विकासाचा प्रश्नही उपस्थित होऊ शकत नाही. विकासाचे प्रचलित प्रतिमान हे आदर्श मानून जगभर सर्वांची त्या दिशेनेच वाटचाल चालू आहे. अशा विचित्र अवस्थेत आपला भारतीय समाज आज आहे.
भौतिक सुखाबरोबर सांस्कृतिक समृद्धीने युक्त नैतिक जीवन जगणे, हे आपले ध्येय असणे आवश्यक आहे. त्या ध्येयाप्रत जाण्याचे प्रयत्न समाज करीत आहे, असे दिसले पाहिजे. या समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्यांना आपल्या अनुयायांच्या किंवा जनतेच्या खऱ्या हिताची चिंता असल्याचे दिसत नाही. आणि त्यांच्याविरुद्ध उठाव करण्याची प्रेरणा देणारे एकही समर्थ व्यक्तिमत्त्व दिसत नाही. साधारणतः मध्यमवर्गीयांतून असे नेतृत्व निर्माण होण्याचा इतिहास आहे आपली संपूर्ण स्वातंत्र्याचळवळ ही मध्यमवर्गीयांनी चालवलेली चळवळ होती. तथापि आजच्या मध्यमवर्गाकडे पाहिल्यास त्यांच्यामध्ये असे कोणतेही लक्षण दिसत नाही. उलट परदेशातील विकासाच्या प्रतिमानाकडे डोळे लावून बसलेला आत्मकेंद्रित मध्यमवर्ग संस्कृती भ्रष्ट करायलाच निघालेला आहे. म्हणूनच नेतृत्वाची निर्माण झालेली ही पोकळी कशी भरून निघणार, हा एक चिंताजनक प्रश्न आहे.
२५-३० वर्षांपूर्वी समाजात सामाजिक जबाबदारीची बऱ्यापैकी जाणीव होती. एकंदर साहित्य, कला, नाट्य, चित्रपट, व्याख्यानमाला, उत्सव, समारंभ यातून ही जाणीव प्रकट होत असे. कंदर समाजालाही त्याविषयी एक आपुलकी, आस्था वाटत असते. ङ्गगावातल्या साळला मजला चढवायचा म्हटल्यावर आपणबी धा रुपये घालाय पायजेफ, ही भावना सामान्यातल्या सामान्यात वसत होती. सामाजिक बांधिलकी मानणारी विचारवंत मंडळी ही अशा विचारांना प्रोत्साहित करीत होती. त्यामुळे त्यावेळी आपल्यासमोर एक आशादायक चित्र सातत्याने राहत असे. आज असे चित्र क्वचितच दिसते राजेंद्रसिंहजी जिोहडवाले, गरज्जूभैयाफ नव्हे! , सं., बाबा आमटे, मेधा पाटकर यांना बघण्यात, ऐकण्यात लोकांना उत्सुकता वाटत नाही. परंतु मल्लिका शेरावतसारखी नटी कुठे येणार असल्याची एखादी जरी अफवा जरी आली तरी तेथे तिचे ओझरते दर्शन घेण्यासाठीही लोकांची झुंबड उडते. त्या व्यक्तीचे समाजाला काय योगदान आहे, समाजविकासात तिची एकंदर काय भूमिका आहे, याचा किंचितही विचार केला जात नाही. ही निरोगी समाजाची लक्षणे नाहीत, हे सांगायची गरज नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे म्हणजे वस्तुस्थितीकडे डोळेझाक करणे नव्हे.
अशा रोगट समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी त्याला जनआंदोलनाच्या मात्रेचीच गरज आहे. ज्यांच्या संवेदना अद्यापि बोथट झालेल्या नाहीत, त्यांनी एकत्रित येऊन असे आंदोलन उभारण्याची आवश्यकता आहे. आसुसारख्या नियतकालिकाला या संवेदनांना सातत्याने जागृत ठेवण्याचे काम करायला हवे. या सर्व जाणिवांना एका दिशेने वळवून त्यांमध्ये सामर्थ्य निर्माण करण्याचे काम सर्वांनीच करण्याची गरज आहे. कदाचित अशा प्रयत्नांतूनच अखिल समाजाला कवेत घेणारा जाणिवेचा विशाल प्रवाह निर्माण होऊ शकेल.
या दृष्टीने संपूर्ण समाजाला प्रबोधित करणे एकट्या आ.सु.ला शक्य होणार नाही. तथापि आ.सुच्या संवेदनशील वाचक-लेखकांतून उद्याची नेतृत्वे निर्माण होऊ शकतात.
३२, सुभाषनगर, हॉटेल अश्वमेधच्या पाठीमागे, एम.आय.डी.सी. रोड, लातूर ४१३५३१.