केल्याने होत आहे रे

चांगले हेतू, चांगली धोरणे, चांगले निर्णय, या साऱ्यांतून परिणामकारक कृती व्हायला हव्या. “आम्ही अमुक करू इच्छितो” या विधानानंतर “आम्ही ते असेअसे करतो, अमुक वेळात आम्ही ते करतो. अमुक माणूस त्यासाठी जबाबदार असतो. थोडक्यात म्हणजे, आम्ही अमुक कामासाठी जबाबदार असतो.’ ही विधाने यायला हवी. परिणामकारक संस्था हे मानूनच चालतात, की सुंदर योजना आखल्याने काम होत नाही. उत्कृष्ट धोरण-विधानानेही काम होत नाही. ते केल्यानेच होते. माणसांनी केल्याने. ठराविक वेळेत केल्याने. त्यासाठीची माणसे प्रशिक्षित असल्याने. त्या माणसांची प्रगती तपासून माणसे जोखत राहिल्याने. आपण परिणामांसाठी जबाबदार आहोत असे मानणाऱ्या लोकांकडून काम होते.
ना-नफा संस्थांमधल्या लोकांनी स्वतःला व आपल्या संस्थेला वारंवार हा अंतिम प्रश्न विचारायला हवा, “कोणत्या सहभागासाठी आणि परिणामांसाठी मी स्वतःला जबाबदार मानावे ? संस्था आणि मी, दोघांचीही आठवण कशाच्या संदर्भात काढली जावी?” [पीटर एफ. ड्रकरच्या मॅनेजिंग द नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन; पॅक्टिसेस अँड प्रिन्सिपल्स या इंडो-अमेरिकन को-ऑपरेटिव्ह पब्लिशिंगने १९९० मध्ये पुनर्मुद्रित केलेल्या लेखातून.]