‘फलज्योतिषासंबंधाने विचारी माणसांचे कर्तव्य’

चित्रमयजगत् जानेवारी १९२१ च्या अंकातील लेखात सत्यान्वेषी लिहितात.
“…. एक कमिटी स्थापन करावी व तिने गणित व तर्कशास्त्राचा अभ्यास केलेल्या विद्वानांस या शास्त्राच्या संशोधनाचे कामी निधीतून द्रव्यसाहाय्य द्यावे. या शास्त्राचा शोध करणारांस तर्कशास्त्राचे ज्ञान असणे का इष्ट आहे हे उघड आहे. कोणत्या नियमास अनुसरून सिद्धान्त केलेला खरा असतो, सिद्धान्त चूक राहू नये यास्तव कोणते दोष टाळायचे असतात हे तर्कशास्त्रास माहीत असते. यास्तव काहीतरी अनुमान काढायचा प्रमाद त्यांच्याकडून फारकरून घडत नाही. ह्या शास्त्राच्या सध्याच्या स्थितीत कोणत्या गोष्टी निश्चयाने सांगता येतात व कोणत्या नाही हे आकडेवार माहितीने ठरवून ते शोधकमिटीने प्रसिद्ध करावे, आणि व्यक्तीला उपयुक्त उद्या काही गोष्टी ज्योतिष्यात सांगता येतात अशी खात्री होईल तर फलज्योतिष शास्त्रात परीक्षा घेऊन लायक माणसास सर्टिफिकेट द्यावे व ढोंगी ज्योतिष्याविरुद्ध सरकारकडून एखादा कायदा पास करवून घ्यावा.”