वाहतूक सेवांची वाढ

दीर्घकालीन वार्षिक वाढ/विकास अल्पकालीन वार्षिक वाढ/विकास
काळ १९९०/९१ ते २००३/०४ वार्षिक% काळ२००२/०३ ते २००३/०४ वार्षिक%
रस्त्यांची लांबी “ १.७ “ ०.७
ट्रक्सची संख्या ,, ८.१ “ ८.४
बसेसची संख्या ,, ६.७ ,, ६.६
वाहनांची विक्री २००२/०३ ते २००६/०७ २००५/०६ ते २००६/०७
क) कार-जीप “ १८.७ “ २२.०
ख) मध्यम भारवाहक “ १९.८ “ २२.६
ग) जड भारवाहक “ २४.८ “ ३२.८
घ) दुचाकी ,, ११.९
ङ) तिचाकी “ १४.९ “ १२.२
रेल्वे १९९०/९१ ते २००५/०६ २००४/०५ ते २००५/०६
क) टन-किमी मालवाहतूक ७.९
ख) प्रवासी-किमी वाहतूक ६.९
ग) टन-किमी भाडे ,,
घ) प्रवासी-किमी भाडे ,,
विमान वाहतूक २००५/०६ ते२००६/०७
क) प्रवासी २८.२
ख) माल
लोकसंख्या १९९०-२००८ १.७८
२००७-२००८ १.३२
[आधारः स्टॅटिस्टिकल आऊटलाइन ऑफ इंडिया २००७-०८ टाटा सर्व्हिसेस लि. (मार्च २००८)]
एकूण चित्र असे की विमाने व कार्स-जीप्स ही थोड्याशा लोकांची वाहतूक साधने झपाट्याने वाढताहेत, तर बस-रेल्वे या अनेकांच्या वापरांच्या सोई तुलनेने सुस्तपणे वाढताहेत. खाजगी वाहनांपैकीही दुचाकी-तिचाकी ही सर्वसामान्यांची वाहने कार्स-जीप्सपेक्षा कमी वेगाने वाढताहेत. जड वाहनांची वाढ हा वाढत्या औद्योगिकतेचा परिणाम असावा. आणि हे बहुतेक बदल नजीकच्या भूतकाळात वेगवान होत आहेत. मंदीच्या पहिल्या परिणामांत विमानसेवा त्रासात आहेत, हा सुष्ट परिणाम मानता येईल. जड वाहतुकीतील ट्रक्सचा भागही मंदीने ग्रस्त आहे, हे एखादेवेळी दुःश्चिह्न असेल.

श्रद्धांजली
दिवाकर मोहनी
आमचे मित्र डॉ. रघुनाथ विनायक पंडित (पीएच.डी. – पेन्सिल्व्हेनिया) ह्यांचे मागील महिन्यात निधन झाले. पंडित आजचा सुधारक शी जवळजवळ सुरुवातीपासून संबंधित होते. ते त्याविषयीची आपली मते परखडपणे आमच्याजवळ व्यक्त करीत असत.
र.वि. पंडित हे मुळात पशुवैद्य पण त्यांच्या बुद्धीचा संचार अनेक विषयांत सहजपणे होत असे. त्यांचे वाचन साहजिकच विविध विषयांशी संबंधित असे आणि त्यांची मते आग्रही असत.
आजचा सुधारकसाठी त्यांनी वेळोवेळी आपणहून लेखन केले. क्वचित आम्ही सांगितलेल्या विषयांवरही ते अभ्यासपूर्ण लेख लिहून देत असत.
गेल्या सात आठ वर्षांपासून त्यांनी मृत्यूला आपला सखा बनवून ठेवले होते. त्यांची मृत्यू स्वीकारण्याची कधीचीच तयारी झाली होती. अत्यंत मोकळेपणाने ते ह्या विषयावर हिरिरीने बोलत. त्यांचे हे धैर्य प्रत्यक्ष मृत्यू दिसायला लागल्यानंतर टिकेल का असा प्रश्न माझ्या मनात येत असे. पण त्यांनी त्या बाबतीत आदर्शच निर्माण केला. गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांना विविध शारीरिक व्याधी जडल्या होत्या. त्यांवर ते उपचारही करून घेत असत. त्यांना थोडे बरे वाटले की त्यांची गाडी पूर्वपदी येई. दवाखान्यात जाण्यापूर्वी आमचा शेवटचा निरोप घेत आणि आम्ही त्यांना तुम्ही परत येणार असे म्हणत असू. या खेपेस मात्र त्यांनी आम्हाला अखेरचा रामराम केला. जातानाचे त्यांचे धैर्य व मनाची अविचलता मला स्तंभित करून गेली.
दिवाकर मोहनी