सैनिक आणि सेनापती

सैनिक आणि सेनापती हे एकाच एककातले उपप्रकार असतात ड्ड एक मुळातला आणि दुसरा परिवर्तित रूपातला. पण त्यांचा सुटा विचार करता येतच नाही. एकेकटे पाहता त्यांना ना संदर्भ असतात ना उपयुक्तता. हे समाजातही असते ड्र सैनिक आणि त्याचा सेनापती हे समाजाचेच लहानसे चित्र असते. सैनिकाची क्षमता आणि अस्तित्वही सेनापतीवरच अवलंबून असते. सेनापतीच सैनिकाला त्याची ओळख व त्याचे स्थान देत असतो. चांगले सेनापती कमकुवत सैनिकांपासून चांगले सैनिक घडवताना दिसतात. दुसऱ्या दिशेने चांगले सैनिक कमकुवत सेनापतींनाही पुढे नेतात. सक्षम सेनापती नेहेमीच चांगले सैनिक घडवतात. चांगले सेनापती कधीकधी अयशस्वी ठरतातही, पण हे सैनिकाकडूनच्या अपेक्षांचा भंग होण्याने सहसा घडत नाही. [सोल्जरिंगः अॅन इंडियन एक्स्पीरियन्स या निवृत्त लेफ्टनंट जनरल एस. सी. सरदेशपांडे यांच्या (हर-आनंद प्रकाशन, २००८) ग्रंथातील हा उतारा २६ नोव्हें. २००८ च्या घटनांच्या संदर्भात विचारार्ह आहे.]