जुळलेपणा, सततचा शोध आणि सत्य

इतरांच्या संपर्कात असणे, किंवा त्याचा चरित्रकार एब्राहम पेज म्हणतो त्याप्रमाणे, इतरांशी जुळलेले (लेपक्षेळपशव) असणे, ही बोरची गरज होती, जवळपास निकड होती, म्हणा. त्याच्या चर्चा सॉक्रेटिक संवादांसाररख्या असत. त्यांमधून त्याच्या कल्पना सावकाश आकार घेत जात, घडत जात. हे इतक्या जास्त प्रमाणात होई, की काही जण त्याला भौतिकशास्त्रज्ञाऐवजी तत्त्वज्ञ मानत, त्याचे विरोधाभासांवर प्रेम असे. प्रश्नांच्या अनेक बाजू समजून घेतघेतच ते स्पष्ट होतात, सुटतात, असा त्याचा विश्वास होता. तो मते कशी व्यक्त करत असे हे सांगताना त्याचा निकटवर्ती स्नेही आइनस्टाइन म्हणतो, “तो सतत इकडेतिकडे शोधत असल्यासारखे बोलायचा; संपूर्ण, निखळ साथ हाती आलेल्या माणसासारखा कधीच बोलत नसे.’ या मर्मग्राही शेऱ्यात बोरचा गाभा आहे ड्ड शोधत असणे. [फाऊस्ट इन कोपनहेगन: अ स्ट्रगल् फॉर द सोल ऑफ फिजिक्स, जीनो सेग्रे (Foust in Copenhagen : A Struggle for the Soul of Physics, Gino Segre, व्हायकिंग, २००७) या ग्रंथातील नील्स बोरचे वर्णन.]