स्साऽऽल्या मुलींनी पब्मध्ये जायचे नसते

भारतीय मुली बरेच काही करू शकतात. विमाने उडवू शकतात आणि उडवतात. सैन्यात भरती होऊन देशाचे शत्रूपासून रक्षण करतात. त्यांना माऊंट एव्हरेस्ट चढता येते, आणि त्या चढल्या आहेत. त्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (उएज) होऊ शकतात, इंद्रा नूयींसारख्या. काही तर एखाद्या देशाच्याही मुख्य कार्यकारी अधिकारी होतात, इंदिरा आणि सोनिया गांधींसारख्या. या आणि इतरही बऱ्याच गोष्टी भारतीय मुली करतात. पण त्यांना पब् मध्ये जाऊन पिता येत नाही. श्रीराम सेना आणि त्यांचे भगवे जुळे भावंड राष्ट्रीय हिंदु सेना या संघ परिवारातल्या कट्टर संस्थांचा तसा ऑफिशियल आदेश आहे.
भारतीय मुलींनी पब्जमध्ये किंवा इतर कोठेही सौम्यशी मादक पेयेही प्यायला परवानगी नाही, कारण तसे केल्याने काही सहस्रके टिकून असलेल्या भारतीय संस्कृती वर आघात होतो. ती सिंधुसंस्कृतीपासून टिकलेली संस्कृती या आघाताने मरून जाते. श्रीराम सेना, राष्ट्रीय हिंदु सेना, बजरंग दल यांसारख्या व इतर भगव्या संस्थांच्या व्याख्येनुसारची भारतीय संस्कृती तरुण पोरांनी एकमेकांना व्हॅलेंटाईन कार्डे पाठवण्याने, बागेत फिरताना हातात हात घातल्याने, जीन्स व स्कर्टसारखी अ-भारतीय वस्त्रे नेसल्यानेही जायबंदी होण्याइतकी हळवी आहे. तिच्यात हे आघात सोसायची संसाधने नाहीत. ह्या सर्व गोष्टी भारतीय संस्कृतीला इतक्या मारक आहेत, की त्या करणाऱ्यांना वेगवेगळ्या सेना आणि दले पिटून काढतात – मंगळूरला पिटले तसे. लोकांना, विशेषतः स्त्रियांना चोप देणे मात्र भारतीय संस्कृतीच्या सेना-दल रूपाला मारक नाही. भारतीय संस्कृती खरे तर इतकी वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक चीज आहे, की तिला एक लेबल चिकटवता येत नाही. पण तिला सहनशील, सहिष्णु म्हटले गेले आहे. मतभेद सहन करणे हा भारतीयत्वाचा गाभा आहे. मग देशभर पसरत असलेल्या या असहिष्णुतेच्या अॅलर्जीचे कारण काय? भारताचे तालिबानीकरण का होते आहे?
मुस्लिम तालिबान आणि आज घडू घातलेले हिंदु तालिबान, मूलतत्त्ववादी इस्लामी व मूलतत्त्ववादी हिंदुत्वनिष्ठ, यांच्यात एक साम्य आहे : त्यांच्यात महिलांच्या सबलीकरणाच्या सौम्यशा आवृत्तीचीही खोलवर रुजलेली भीती आहे. स्त्रियांनी शाळाकॉलेजांत जाणे, नोकऱ्या करून आर्थिक स्वातंत्र्य कमावणे, राजकारणात शिरून राजकीय स्वातंत्र्य कमावणे, पब्जमध्ये जाऊन सामाजिक स्वातंत्र्य कमावायचा प्रयत्न करणे – हे सारे तालिबान्यांना असह्य आहे, मग ते मुस्लिम असोत की हिंदू.
तालिबान्यांच्या अफगाणिस्तानातील इस्पितळांमध्ये शस्त्रक्रियांसाठी भूल देण्यातही लिंगभेद केला जात असे – पुरुषांना भूल दिली जाई, तर स्त्रियांनी दुःख सहन करायलाच हवे, असे मानले जाई. हा वेडाच्या पातळीवरचा स्त्रियांवरचा अत्याचार आहे दु तो मुळातच इस्लामविरोधी आणि हिंदुत्वविरोधी आहे. प्रेषिताने धर्मप्रसाराची सुरुवातच स्त्रियांपासून केली, आणि हिंदुधर्मात शक्ती ची भरपूर दखल घेतली जाते.
तालिबान्यांच्या, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, प्रखर स्त्रीवादविरोधाचे मूळ आहे भीतीत. तो स्त्रियांच्या आर्थिक-सामाजिक मुक्तीला दिलेला भयग्रस्त प्रतिसाद आहे. त्या वृत्तीत एकूण मुक्ततेचा साठा मर्यादित मानला जातो. स्त्रियांनी जास्त मुक्ती कमावली तर पुरुषांसाठी उपलब्ध मुक्तीचा साठा कमी होईल, असे मानले जाते. कालच्या काबूलमध्ये आणि आजच्या मंगळूरात तालिबानीकृत मनांमध्ये सुशिक्षित, नोकरी करणारी, सामाजिक स्वातंत्र्य घेऊ पाहणारी स्त्री धोकादायक समजली जाते. ती पुरुषांच्या प्रतीकात्मक खच्चीकरणाची नांदी असते. ती पुरुषांच्या जीवशास्त्रीय वर्चस्वाच्या समजुतीला आह्वान देते. मानसिक खच्चीकरणाच्या मूलभूत, भयंकर भयाचा राजकीय-सामाजिक मुखवटा म्हणजे तालिबानी वृत्ती. मुलींना पब्गध्ये जायचे नसते, कारण त्यासाठी जे अंडकोष (जी हिंगत) कगवावे लागतील, ते अंडकोष, (ती हिंगत) रसाऽऽले पुरुषांकडून घेतलेले असतील. [ टाईम्स ऑफ इंडिया (२ फेब्रुवारी २००९) मधून. ]