तापमानवाढीच्या गोष्टी

माणसांना वेगवेगळ्या वस्तू, घटनांच्या ध्वनिचित्रफिती, प्रत्यक्ष घटना वगैरे दाखवून त्या ऐकण्या-पाहण्याने मेंदूंत काय क्रिया घडतात; हे तपासायचे शास्त्र-तंत्र आता विकसित झाले आहे. त्याच्या वापरातून एक मजेदार निष्कर्ष निघाला. माणसांपुढे घडणाऱ्या दृश्यांत माणसे मनाने (मेंदुव्यवहाराने) सहभागी होतात! सिनेमे पाहताना नायक-नायिकांच्या मनांत असतील तसे व्यवहार प्रेक्षकांच्याही मनांत होतात. गोष्टी वाचताना-ऐकतानाही असे घडते. सापाचे चित्र पाहणेही साप पाहण्याला समांतर अशा शारीरिक-मानसिक प्रतिसादाला जागवते, इ.
यावरून एक मत घडते आहे, की माणसे उत्क्रांतीतून गोष्टी अनुभवण्याला अनुरूप झाली आहेत. लहान मुले गोष्टी अत्यंत मन लावून वाचतात–ऐकतात, दूरचित्रवाणी व चित्रपटांना जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. असे घडण्याचे कारण म्हणजे ती मुले हे नवे अनुभव स्वतःत सामावून घेत असतात. मोठे झाल्यावर, स्वतःचे प्रत्यक्षाधारित अनुभवविश्व घडल्यानंतरही कथा-कादंबऱ्या, दूरचित्रमालिका, नाटके-सिनेमे, यांचे परिणाम प्रत्यक्ष अनुभवांसारखेच राहतात, पण तीव्रता कमी होते.
या मानवी गुणाचा उपयोग करून माणसांना आर्थिक-सामाजिक-राजकीय-तात्त्विक विचार करायला लावता येईल का? अनेक लेखक, नाटककार, चित्रदिग्दर्शक असे प्रयत्न करताना दिसतात. विज्ञानकथा, थ्रिलर्स, ऐतिहासिक-पौराणिक कथासाहित्य, हे आपल्या ओळखीतले विचारांना चालना देणारे प्रकार आहेत. अस्थितादर्शी कथा-कादंबऱ्या (Utopian Fiction), हा यापेक्षा जरा गंभीर प्रकार. अनेकानेक लेखकांनी या प्रकारचे लेखन करून आपले विचार, हव्याशा आणि नकोशा समाजरचना, वगैरे लोकांपुढे मांडले आहेत.
इकोटोपिया (ECOTOPIA, अर्नेस्ट कॅलेनबाख, बँटम, १९७५ व नंतर अनेक आवृत्त्या) या अशा यूटोपियन कादंबरीचा आधार जर्मन पर्यावरणवादी ग्रीन पक्ष घेत असतात. ब्राझीलमधील कूरिटिबा (जीळींळलर) हे शहरही कॅलेनबाखच्या कादंबरीतील कल्पना वापरून रचले गेले आहे. त्याची लोकसंख्या ३०-३५ लाख आहे व दक्षिण अमेरिका खंडातील अनेक शहरे त्याचा कित्ता गिरवतात.
हे तपशिलात लिहायचे कारण की मराठीत विज्ञानकथा-यूटोपियन कादंबऱ्यांची परंपरा क्षीण आहे. वि.वा.शिरवाडकरांचे कल्पनेच्या तीरावर (कॉन्टिनेन्टल, १९५६) हे एक पुस्तकच दखलपात्र यूटोपियन मानता येईलसे आहे. ही परंपराच दुबळी असल्याने विचारवंतांना आपली मते प्रसृत करायचा हा मार्ग सुचत नाही. काही वर्षांपूर्वी एका ज्येष्ठ विचारवंताने “कादंबरीतून समाजाचा आदर्श नमुना कसा मांडता येईल?” असे विचारले होते – इकोटोपियाबद्दल !
पण अस्थितादर्शी, यूटोपियन कादंबऱ्यांच्या पातळीला न जाताही माहिती आणि विचारांची चर्चा करता येते. आज जगाला भेडसावत असलेल्या जागतिक तापमानवाढीच्या परिणामांबद्दलची अशी पाच पुस्तके वाचनात आली. त्यांचा थोडक्यात परामर्श घेत आहे. डरो मत!
मायकेल क्रिकटन (Michael Crichton) हा लेखक रेझिक पार्क या अतिशय लोकप्रिय चित्रपटाच्या कथेचा लेखक म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या इतरही अनेक कादंबऱ्या आहेत, व त्यांपैकी अनेकांवर चित्रपटही निघाले आहेत. जूझिक पार्कचे यश मात्र आगळेच. हा कादंबऱ्यांना अभ्यासपूर्ण परिशिष्टे व अधिक वाचनासाठीच्या याद्या देण्याकरिता प्रसिद्ध आहे. त्याच्या एकूण साहित्याचे वर्णन ढोबळमानाने विज्ञानकथा असे करता येईल, पण त्यात विज्ञानबाह्य अंगे व पुस्तकेही आहेत.
क्रिक्टनचे स्टेट ऑफ फिअर (State of Fear हार्पर कॉलिन्स व इंडिया टुडे, २००४) हे पुस्तक जो दृष्टिकोण मांडते, तो आज चुकीचा ठरला आहे. काही हिमनद वितळत असताना काही वाढत आहेत, हे त्याचे म्हणणे बर्फाचे प्रमाण या निकषावर टिकत नाही. शहरे वाढतात तशी त्यांची तापमानेही वाढतात, हे क्रिक्टनचे म्हणणे खरे आहे. परंतु एकूण जगाचे तापमान वाढते आहे, हा दावा केवळ शहरांच्या अभ्यासावर बेतलेला नाही. समुद्राचा पृष्ठभाग, वातावरण, साऱ्यांचेच अभ्यास वाढते तापमान दाखवतात. तो दृष्टिभ्रम नव्हे. इंटर-गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) या संस्थेचा तापमानवाढीचा अहवाल संक्षिप्त रूपात आजचा सुधारक ने प्रकाशित केला होता. त्यात तापमानवाढ व तिचे परिणाम यांचा तपशील होता.
क्रिक्टनचे म्हणणे असे होते की “जगाचे तापमान वाढते आहे’ अशी हाकाटी करून पर्यावरणवादी लोक जगातील सर्व सजग नागरिकांमध्ये एक भयगंड उत्पन्न करत आहेत, आणि असे करण्याला वैज्ञानिक आधार नाही. आता मात्र परिस्थिती खरेच घाबरण्यासारखी आहे, असे मानले जात आहे. तो पर्यावरणवाद्यांच्या कुटिल कारस्थानाचा भाग मानला जात नाही. ते वैज्ञानिक निरीक्षण आहे.
स्वतःला पर्यावरणवादी म्हणवणारेही ऊर्जेची व इतर नैसर्गिक संसाधनांची उधळपट्टी करतात, असे क्रिक्टन सांगतो. तसे कधीकधी तरी खरेच घडत असणार. पण व्यक्तींच्या करणीत आणि कथणीत फरक असतो, यातून त्यांची मते चुकीची ठरत नाहीत.
एकूण पाहता क्रिक्टनचा डरो मत! हा संदेश मर्यादित अर्थानेच घ्यायला हवा. पण कामाला लागा! या आदेशाचा पूर्वार्ध म्हणून डरो मत! म्हणणे योग्यच आहे.
मराठी वाचकांसाठी मुद्दाम नोंदायच्या बाबी मात्र जरा वेगळ्या आहेत. क्रिक्टन तापमान मोजण्याची तंत्रे, सरासरी तापमान काढण्याची तंत्रे, यांची बरीच माहिती देतो. कार्बन उत्सर्जने, मीथेन उत्सर्जने, जमीनवापरातले फेरबदल, वगैरेंचा तापमानवाढीशी असलेला संबंधही क्रिक्टन ललित लेखकाच्या कौशल्याने स्पष्ट करतो. एक कादंबरी वाचून पडणारी ज्ञानातली भर, असा विचार करता क्रिक्टन चांगलाच शिक्षक ठरतो.
आणि क्रिक्टनने असे लोकशिक्षण, प्रबोधन, इतर कादंबऱ्यांमधूनही केले आहे. रॅझिक पार्क या कादंबरीतून त्याने वाचकांना बरेच रेणुजीवशास्त्र (molecular biology) व जैवतंत्रज्ञान (biotechnology) शिकवले. प्रे (झीशू, भक्ष्य) या कादंबरीतून त्याने मर्यादित बुद्धिमत्तेच्या जीवांचे स्वयंसंघटन (self-organization) शिकवले. त्याच्या अनेक कादंबऱ्यांगधून वाचकांना कोलाहलशास्त्र (chaos theory) व व्यागिश्रता शास्त्र (complexity theory) यांची तोंडओळख होते. एक क्रूर आणि उद्धट विधान करतो – एका मायकेल क्रिक्टनच्या वाचनाने बहुतांश मराठी ललित साहित्यापेक्षा जास्त शिक्षण/प्रबोधन होते! विज्ञानाची वाट
किम स्टॅन्ली रॉबिन्सन हा इंग्रजीतील एक आघाडीचा विज्ञानकथालेखक आहे. त्याची पुस्तके भारतापर्यन्त मात्र फारशी पोचलेली नाहीत. त्याने जगाच्या तापमानवाढीवर तीन पुस्तकांची एक मालिका लिहिली (Forty Signs of Rain, 2004; Fifty Degrees Below, 2005; Sixty Days and Counting, 2007, सर्व बँटम प्रकाशन). आज या तीन पुस्तकांना एकत्रितपणे Science in the Capital, राजधानीतले विज्ञान या नावाने ओळखले जाते.
रॉबिन्सनच्या पुस्तकांचा नायक म्हणता येईल असे पात्र म्हणजे फ्रँक व्हँडरवाल. हा नॅशनल सायन्स फाऊंडेशन (NSF) या संस्थेतला शास्त्रज्ञ आहे. अनेक शास्त्रज्ञ आपले संशोधनप्रकल्प या संस्थेकडे पाठवतात. अशा प्रस्तावांमध्ये अग्रक्रम ठरवून त्यांना शासकीय आर्थिक मदत किती करावी, हे ठरवणाऱ्यांपैकी फ्रैंक हा एक.
छन, राष्ट्रीय विज्ञान संस्थेची प्रमुख अॅना क्विब्लर ही कादंबरीची नायिका म्हणता येईल. तिचा नवरा चार्ली हा एका सीनेटरला पर्यावरणाबाबत सल्ला देणारा वकील. पुढे हा सीनेटर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो.
पहिल्या कादंबरीत अपार पावसाने वॉशिंग्टन (डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया) हे शहर बहुशः पाण्याखाली जाते. यात समुद्राच्या पातळीची वाढ, हाही एक घटक आहे. शहरातील प्राणिसंग्रहालयातील जनावरांना एका जंगलात मोकळे सोडले जाते, कारण त्यांची पर्यायी सोय करायची यंत्रणा नसते. अशा सोडून दिलेल्यांमध्ये फ्रँकही असतो, आणि तोही वॉशिंग्टनलगतच्या जंगलांमध्ये आसरा शोधतो. जनावरे या नव्या हवामानाला जुळती नसतात. त्यांच्यासाठी उबदार आसरे निर्माण करणे, अन्न पुरवणे, या जबाबदाऱ्या शासन घेते. माणसांसाठी मात्र फार काही केले जात नाही. उदाहरणार्थ, फ्रैंक एका झाडावर एक मचाण बांधून, त्यावर तंबू ठोकून राहू लागतो. राष्ट्राध्यक्ष होऊ घातलेल्या फिल चेजचा सल्लागार म्हणून काम करणारा चार्ली हा आपल्या मुलाला सांभाळत (कारण आई छडऋ मध्ये गुंतलेली!) वकिली सल्ले देत असतो. राष्ट्राध्यक्ष आपली निवडणूक मोहीम उत्तर ध्रुवावरील बर्फ वितळून घडलेल्या मुक्त समुद्रावर बलूनमधून सुरू करतो. वातावरणातून कार्बन (CO2 रूपात, किंवा CHA रूपात) हटवण्यासाठी एक झाडांवर वाढणारे, भरपूर कार्बन बांधणारे शेवाळे (lichen) घडवण्याच्या प्रकल्पाला फ्रँक, अॅना व छडक्र मदत करत असतात, तो प्रकल्प यशस्वीही होताना दिसतो.
पण मधल्या काळात तापमानवाढीचे एक वेगळेच अंग त्रासदायक ठरू लागते. आज विषुववृत्तावरील पाणी सूर्यामुळे तापते व सागरी प्रवाहांद्वारे ध्रुवांकडे जाते. हे प्रवाह समुद्राच्या पृष्ठावर असतात. ध्रुवांजवळ हे पाणी थंड होते. त्याची घनता वाढते (म्हणजे ते जड होते!) आणि ते सागरतळाकडे बुडी मारते. मग सागरतळावर ध्रुवांपासून विषुववृत्ताकडे थंड पाण्याचे प्रवाह सुरू होतात. अशा एका चक्राकार प्रवाहाने विषुववृत्तावरची सूर्याची ऊर्जा ध्रुवांकडे जाऊन एकूण पृथ्वीचे तापमान सौम्य होते. पण जर ध्रुवीय बर्फ झपाट्याने वितळले, तर उष्ण प्रवाह ध्रुवांवर पोचूनही आणि थंड होऊनही हलकेच राहतात, कारण एरवी खारट पाण्यात आता गोडे पाणी मिसळलेले असते. या एकूण व्यवहाराला थर्मोहॅलाईन सर्युलेशन (ढकउ) उर्फ उष्णता-क्षारता-चक्र म्हणतात. ध्रुवीय बर्फ झपाट्याने वितळले, तर हे चक्र फिरणे बंद पडू शकते. तर फिल चेज राष्ट्राध्यक्ष झाल्यावर थोड्याच काळात ढकळ बंद पडण्याचा धोका उद्भवतो. यावर उपायही सुचतो – लाखो टन मीठ ध्रुवांवर नेऊन पाण्याला परत खारट करायचे!
तिसरी कादंबरी संपते तेव्हा शेवाळे-मीठ वापरून तापमानवाढीचे दुष्परिणाम थांबवण्याचे प्रयत्न सुरूच असतात. त्यांच्या परिणामांचा प्रश्न न सोडवताच कादंबरी संपते. कादंबऱ्यांमध्ये अनेक उपकथानके आहेत. एक मुळात तिबेटी लोकांचे खेम्बालुंग (Khembalung) नावाचे राष्ट्र बंगालच्या उपसागरातील गंगेच्या मुखाजवळचे एक बेट विकत घेऊन जगत असते. बांधबंदिस्ती करूनही त्यांना नाक पाण्यावर ठेवता येत नाही; कारण जास्त गरम वातावरण जास्त वादळीही असते.
सागरतीरांवरील जमीन धुपणे, कडे कोसळणे, इत्यादी प्रकारही वाढतात. दक्षिण कॅलिफोर्नियाचा लॉस एंजलिस-सॅन डिएगो परिसर असा सागराने बळकावण्याचे वर्णन आहे. हा फ्रँकचा मूळ प्रांत, त्यामुळे तो सागराशी होणाऱ्या लढाईत सामील होतो, आणि अर्थातच हरतो.
शासनपुरस्कृत महाविज्ञान (BIG Science) कसे चालते, याचीही मजेदार वर्णने आहेत. साधेपणाने राहण्याचा पुरस्कर्ता रॅल्फ वाल्डो इमर्सनची वक्तव्ये आहेत. घरातली बाई बाहेर पडून कामे करते, आणि पुरुष मुले सांभाळत गृहिणीपद निभावतो, यातल्या फायद्यातोट्याची उदाहरणे आहेत. स्वतः संशोधन करणारे इतरांच्या संशोधन प्रस्तावांवर निर्णय घेतात, यातले आर्थिक ताणतणाव आहेत. काही अर्थी सायन्स इन द कॅपिटल या नावासोबतच सायन्स इन कॅपिटल्स या नावानेही या त्रिखंडी कादंबरीचे वर्णन करता येईल.
या कादंबरीची (किंवा कादंबऱ्यांची ) विज्ञान लेखकांत चर्चाही झाली. रॉबिन्सनला त्याच्या एकूण भूमिकेबद्दल, विशेषतः तापमानवाढीबाबत आशावादी असणे-नसणे याबद्दल बऱ्याच प्रश्नांना सामोरे जावे लागले. उदाहरणार्थ, “तू हे जनुकांमध्ये बदल केलेले शेवाळे, लाखो टन मीठ वगैरे उपाय सुचवतोस. लोक विरोध नाही का करणार, असल्या अघोरी उपायांना?’ हा प्रश्न विचारला गेला. “विरोध करणाऱ्यांत मीही असेन!” हे उत्तर.
पण एकूण रॉबिन्सन आशावादी आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो प्रयत्नवादी आहे. “फार उशीर झाला आहे का (तापमानवाढींवर इलाज करण्याबाबत)?” या प्रश्नाला त्याचे उत्तर आहे, “या रूपात प्रश्न विचारू नका. मी ‘हो’ म्हटले तर ‘मग काही करता येत नाही’ असा निष्कर्ष निघेल. मी ‘नाही’ म्हटले तर ‘चला, फुरसत आहे’ असे वाटेल. कामाला लागा!”
जागतिक तापमानवाढीची थोडक्यात ओळख करून देणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंग : अ व्हेरी शॉर्ट इंट्रोडक्शन (मार्क मॅस्लिन, ऑक्सफर्ड, २००४) या पुस्तकाच्या संदर्भांमध्ये रॉबिन्सनची पहिली कादंबरी भेटते. प्रत्येकच माणूस प्रत्येकच विषयांमध्ये तज्ज्ञ असू शकत नाही. पण महत्त्वाच्या प्रश्नांची जुजबी ओळख तरी हवी. आणि ती कादंबऱ्या-कथा अशा रंजक रूपांतून करून घेता येत असेल, तर तेही हवेच.
निर्वाणीचा निरोप
अल्टिमेटम (मॅथ्यू ग्लास, अटलँटिक, २००९) हे पुस्तक आधीच्यांपेक्षा वेगळे आहे. त्यात विज्ञान नाही आणि सारा भर राजकारण आणि डिप्लोमसी यांच्यावर आहे. काळ आहे २०३२ अखेरचा. जागतिक तापमानवाढ होते आहे, हे आता निर्विवाद आहे. सागरांची पातळी वाढते आहे. वादळे वाढताहेत. अतिवृष्टी आणि अवर्षणे वाढताहेत. जंगलांमध्ये मोठाले वणवे लागताहेत. सर्वच देशांना सागरतीराजवळच्या वस्त्यांचे इतर जागी पुनर्वसन करावे लागत आहे.
कार्बन उत्सर्जनांचे नियंत्रण करण्याबाबतचा ‘क्योटो करार’ लवकरच चौथ्या फेरीत जात छत्तीस वर्षे पूर्ण करणार आहे. (सुरुवात, १९९७) परिणाम मात्र झालेला नाही. आज ठोक राष्ट्रीय उत्पादन आणि कार्बन उत्सर्जने या दोन्ही बाबतींत चीन पहिल्या क्रमांकावर आहे आणि अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर. त्यांच्या मागे यूरोपियन यूनियन, भारत, रशिया, ब्राझील, अशी रांग आहे. अमेरिकेत बारा वर्षे सत्तेत असलेला रिपब्लिकन पक्ष हरला आहे. आठ वर्षे उपाध्यक्ष आणि चार वर्षे अध्यक्ष राहिलेल्या गानरला डेमोक्रॅट जो बेंटनने हरवले आहे. आणि बेंटनला एका गुप्त भेटीसाठी गार्ट्नरने बोलावले.
“तापमानवाढीचे परिणाम अपेक्षेच्या चौपट वेगाने होताहेत. क्योटो कराराच्या चर्चांमध्ये नुसतीच बकबक होते, म्हणून आम्ही चीनशी थेट द्विपक्षीय वाटाघाटी सुरू केल्या. ते आणि आपण जर काही एकत्रपणे करू शकलो, तरच स्थिती सुधारेल; पण ते नीट उत्तरेच देत नाही आहेत.’ गानरची ही माहिती ऐकून बेंटन हादरतो. त्याचा जाहीरनामा आरोग्य, शिक्षण, पुनर्वसन, रोजगार या बाबींवर बेतलेला. आता खरीच उत्सर्जने कमी करावी लागणार. तीही एखाद्दुसऱ्या देशाने नाही. तीही तात्काळ परिणाम घडवणार नाहीत. मग पुनर्वसन-रोजगार कसे आटोक्यात ठेवणार!
पण बेंटन आदर्शवादी असतो; विरोधकांच्या गते भोळसट, रडुबाई उदारमतवादी असतो. तो ठरवतो की चीनशी दुतर्फी करारच काही घडवेल, क्योटोतले वितंडवाद नेहेगीच निष्फळ ठरतील. या भूमिकेमुळे मंत्रिमंडळाचा बराच भाग ‘वैश्विक’ न होता चीनकेंद्री होतो. अंतर्गत कायदे आणि नियम यांबाबत तर जाहीरनाम्यातली आश्वासने पाळायचीच, पण सगळे परराष्ट्रधोरण चीनला करार करायला आणि पाळायला लावण्यावरच बेतायचे, असे ठरते. दबावतंत्र म्हणून व्यापारी निर्बंध, ट्रेड सँक्शन्स वापरणे, तीही चीनविरुद्ध, हे सोपे नसते. पहिल्या गुप्त दबाव-धमकीसोबत चीन पन्नासेक अब्ज डॉलर्सचे सौदे अमेरिकेऐवजी यूरोपीय यूनियनशी करतो!
रूढ मुत्सद्देगिरीच्या वाटांनी चीनशी बोलता येत नाही हे पाहून पडद्याआडच्या दुसऱ्या, तिसऱ्या मार्गांनी वाटाघाटी सुरू केल्या जातात. नॉर्वेच्या तटस्थ वातावरणातल्या या वाटाघाटी गुप्त ठेवल्या जातात, कारण त्या जर अयशस्वी ठरल्या, तर पर्यायी मार्गच नाहीत, असे मत असते. चीन सोडून इतरांना विश्वासात घेता येईल, हे सुचतच नाही, कारण तसे केले तर एकाच देशाऐवजी आठदहा देशांशी सौदेबाजी करावी लागणार असते.
चीनशी होणाऱ्या चर्चांमध्ये ‘ऐतिहासिक कार्बन उत्सर्जनां’ची जबाबदारी अमेरिकेने घ्यायची का, हा कळीचा मुद्दा असतो. एका टप्प्यावर चिनी मुत्सद्दी हा मुद्दा बाजूला ठेवण्यास तयार होतात, कारण ‘गेल्या तीस वर्षांतील तुमची उत्सर्जने पाहता आमचा इतिहास असंबद्ध ठरतो’, असे अमेरिकन मुत्सद्दी सांगतात. पण मसुदा पक्का होऊन सह्या करण्याच्या वेळी मात्र चिनी लोक नकार देतात, आणि वाटाघाटी उधळून टाकतात.
दोन्ही देशांत अंतर्गत प्रश्न असतातच. बेंटनने इतरांपुढे वाटाघाटींची माहिती देणे टाळलेले असते. जर वाटाघाटींमधून करार घडला नाही, तर पर्याय उरणार नाहीत, या धास्तीतून गुप्तता राखलेली असते. पण अशा गोष्टी ‘फुटतात’च; आणि विरोधक व प्रसारमाध्यमे बेंटन सरकारला धारेवर धरतात. चीनमध्ये बेकारी, अपुरे पुनर्वसन हे प्रश्न गंभीर असतात. अशात वाटाघाटींमध्ये ‘आम्ही जिंकलो, ते हरले’ हे स्वतःच्या प्रजेला भासवून देणे दोन्ही पक्षांना गरजेचे, नव्हे, निकडीचे असते.
अखेर बेंटन एका जाहीर भाषणातून सारा प्रकार उघड करतो. वाटाघाटी पूर्णत्वाजवळ जाऊन फिस्कटल्या. पण आम्ही एकतर्फीच उत्सर्जन कपात करायला लागू. दोन महिन्यात चीनने तसे न केल्यास चिनी व्यापारावर निर्बंध लादू. इतर देशांना कालमर्यादा तीन महिने असेल, कारण त्यांनी करायची कपातही आम्ही जाहीर करत आहोत; असे सारे बेंटन बोलतो.
बहुतांश जग या एकतर्फी कृतीने नाराज होते, आणि अमेरिका एकटी पडते. रशियाशी काही बेटांबाबत जपानचे भांडण सुरू असते. त्यात जपानची बाजू घेऊन जपानला अमेरिकेच्या पक्षाला वळवले जाते. श्रीलंकेसारखे काही नगण्य आकारांचे देशही अमेरिकेला मदत करायला तयार होतात. पण एकूण चित्र अमेरिका विरुद्ध इतर जग, असेच राहते. (कादंबरीकार मॅथ्यू ग्लास (हे टोपणनाव आहे!), हा जन्माने ऑस्ट्रेलियन, पण आज इंग्लंडात रुजलेला डॉक्टर आहे. तो अमेरिकन नाही. क्योटो करारप्रक्रियेपासून अमेरिका आजही (२००९) फटकून आहे, आणि या बाबतीत आजही अमेरिका विरुद्ध इतर जग, असे चित्र आहे.)
चीनमधले अंतर्गत तणावही अमेरिकन निर्बंधामुळे वाढतात. चिनी नेते एक वेगळीच दिशा धरतात – तैवानची नाकेबंदी व आक्रमणाची धमकी! (तैवानवरचा आपला दावा चीनने गेली साठ वर्षे (२००९ मध्ये) कायम ठेवला आहे. आणि अमेरिकाही तैवानला लष्करी मदत ‘हात राखून’च करते.). भांडण वाढत जाऊन अणुयुद्ध सुरू होते. चीन प्रथम सॅन फ्रान्सिस्कोजवळील ‘बे एरिया’वर अणुबाँब टाकतो. अमेरिकन सेना व संरक्षणमंत्री यांना शेकडो अण्वस्त्रांनी ‘पलटवार’ करायचा मोह होतो, पण बेंटन त्यांना आवरतो. त्याची खात्री असते की त्याच्या उत्सर्जन-कपात योजनेवर सही करण्याची चीनला इच्छा आहे, आणि एकच अण्वस्त्र डागणे, हे केवळ शड्ड ठोकणे आहे. यामुळे अमेरिकेचा प्रतिसाद सौम्यच राहतो; केवळ (!) शांघायवर अणुबाँब टाकण्याचा. चीनचा प्रतिसाद असतो एका फार कमी वस्तीच्या, लष्करी महत्त्व नसलेल्या अमेरिकेतील गावावर अणुबाँब टाकण्याचा. सोबत एक निरोप येतो, “आमच्यावर, अमुक चार गावांपैकी एकावर अणुबाँब टाका !” बेंटनला जाणवते, की अमेरिकेला आक्रमणकारी ठरवण्यासाठी हे केले जात आहे. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांचा विरोध पत्करूनही तो प्रतिसाद देण्याचे टाळतो.
अखेर ‘मी जिंकलो!’चा उद्घोष करत चीन तैवानवर कब्जा करतो, व सोबतच संदेशही देतो. “आता आम्ही महासत्ता आहोत. आमच्या जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे. आणि म्हणून आम्ही आमची कार्बन उत्सर्जने कमी करणार आहोत.” किती? तर अमेरिकेने आखून दिल्याप्रमाणे – पण अमेरिकेला घाबरून नव्हे! अशा रीतीने कार्बन-प्रेरित तैवानवरचा झगडा मिटतो.
या पर्यावरणीय-राजकीय-आर्थिक थरारकथेचे परीक्षण ‘द इकॉनॉमिस्ट’ ने केले, ‘अ कट् अबव्ह द रेस्ट’ मानून त्याची दखल घेतली. एखादे थ्रिलर वाचकाला अनेक दिशांनी सज्ञान कसे करते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
सोबतच इतरही काही बाबी नोंदायला हव्या.
(i) एका जागतिक पाहणीनुसार ४४% अमेरिकनांना तापमानवाढीबद्दल कृती करावी असे वाटते. चीनमध्ये हे प्रमाण ९४% आहे. (टाईम, २४ ऑगस्ट ०९)
(ii) आजचा अमेरिकेचा ऊर्जामंत्री जन्माने चिनी आहे. भौतिकीचा नोबेल पुरस्कार मिळवलेला आहे. अमेरिकेचे ऊर्जाधोरण भविष्यातील स्थितीवर बेतावे, आजपुरते नको, असे या स्टीव्हन चूचे मत आहे. गंमत म्हणजे, त्याचे भौतिकीतले संशोधन वायूंना थंड करण्याबाबतचे आहे!
(iii) यावेळी प्रथमच भारताच्या पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात ‘जलवायू’ (= तापमानवाढ) हा मुद्दा आला.
(iv) कारण तापमानवाढीचा सर्वाधिक फटका चीन आणि भारताला बसण्याची शक्यता आहे. जगातील उत्सर्जनांमध्ये आजही चीनचा वाटा १०%, भारताचा ३%, एवढाच आहे. ‘विकसित’ देश मिळून ६५% होतात. पण चीन-भारत यांची अन्नसुरक्षेबाबतची स्थिती हळवी आहे, आणि त्यापेक्षाही पिण्याच्या पाण्याला धोका जास्त आहे. (इंडियन एक्स्प्रेस, ३० ऑगस्ट ०९).
(v) भारताला तर चीनपेक्षाही जास्त काळजी करायला हवी, कारण हिमालयाचे तापमान जागतिक सरासरीच्या सुमारे तिपटीने वाढते! जर तापमानवाढ लवकर आटोक्यात आली नाही, तर हिमालयावरचे बर्फ संपून जाईल. भूगोलात जे पूर्वी तरी शिकवले जाई, की पावसाळ्यात पावसाने आणि उन्हाळ्यात बर्फ वितळून उत्तर भारतातील नद्या बारमाही होतात, ते संपेल. एखादेवेळी आजच हिमालय वाचण्याच्या पलिकडे गेला असेल.
तर – कथाकादंबऱ्यांतून का होईना, जागतिक तापमानवाढ, हवामानबदल यांबद्दल जनजागृती होणे निकडीचे आहे!
१९३, मश्रूवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर.