पुस्तक परीक्षणः ‘ऑपरेशन यम्’ एकविसाव्या शतकाची कादंबरी

‘ऑपरेशन यमू’ ही मकरंद साठेलिखित अवघ्या एकशेसहा पानांमध्ये आटोपणारी कादंबरी हाती आली नि एक अप्रतिम कादंबरी वाचल्याचे अपूर्व समाधान देऊन गेली. “ही खरीखुरी एकविसाव्या शतकाची कादंबरी आहे” अशा शब्दात महेश एलकुंचवारांनी मलपृष्ठावर तिचा गौरव केलेला दिसतो.
निवेदिका ललिता नि तिचा मित्रपरिवार एकविसाव्या शतकातील जिणे जगतात. ललिता एका दूरचित्रवाणीची वार्ताहर आहे (वय वर्ष बेचाळीस). प्रत्येक घटनेत ‘स्टोरी’ शोधणारी, थोडक्यात स्पष्ट, स्वच्छ, मुद्देसूद बोलण्याची सवय असलेली पण एका विशिष्ट घटनेमुळे निराशेच्या गर्तेत गटांगळ्या खाणारी व त्यातून बाहेर पडू पाहणारी.
घटना घडते ती तिच्या मित्राच्या, सतीशच्या, जीवनात. एका आठवड्यात त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनेचे वर्णन हा या कादंबरीचा विषय आहे. सतीश ही प्रमुख व्यक्तिरेखा. मध्यम उंचीचा, हुशार, श्रीमंत, बऱ्यापैकी देखणा, प्रगल्भ, हरहुन्नरी सतीश नाटकात काम करणारा, लिहिणारा, दिग्दर्शित करणारा. पुढे सगळे सोडून अमेरिकेला गेला, अचानक. तेथून चइअ होऊन परतला. नंतर काही वर्षे अध्यापन, स्वतंत्र व्यवसाय घर गाडी,….नंतर जर्मनी… पुन्हा भारत. एकंदरीत प्रतिष्ठित प्रथितयश सतीशला आपल्यावर पाळत ठेवली जाण्याचा (रिश्रज्ञळपस) अनुभव येतो अचानक.
बहुधा चाळिशीची, बरीच बारीक, साडी नेसणारी, अपऱ्या नाकाची, सुंदर नसली तरी आकर्षक, रोखून पाहणारी ‘या’ त्याला गर्दीत अचानक भेटत राहते! आयुष्यात पूर्वी कधीतरी येऊन गेलेल्या कोणा ना कोणाचीतरी आठवण तिच्यामुळे जागवली जाते. किंबहुना तोच चेहरा दिसू लागतो. ती कधी नोकरीवरून काढून टाकावी लागलेली पल्लवी वाटते तर कधी संयोगिता. ललिताला ती ‘नलू’ वाटते. पंडाला ती दिसत नाही. अंजूला फोटो सरिताचा वाटतो. दरवेळी वेगवेगळ्या कुणाकुणाशी कुणाकुणाला साम्य वाटते!
ह्याचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण केलेले आढळते. प्रत्येकाच्या मानेवर कसले तरी ओझे असते, म्हणून अपराधी वाटत राहते; गिल्ट जाणवतो. उदाहरणार्थ, आजीकडे अखेरीस फारसे लक्ष देता आले नसल्याची खंत मनात असल्याने कधी ‘यम’च्या जागी सतीशला आजीचा तरुणपणाचा चेहरा दिसतो; तर कधी पल्लवी, संयोगिता… तो कमालीचा धास्तावतो. पत्नीशी शेअर करावे, तर तिला एकवेळ ‘भानगड’ कळेल; पण ही भानगड कळणार नाही, अशी परिस्थिती. म्हणून तो ललिताशी बोलतो.
ललिता हाडाची पत्रकार. ‘स्टोरी’ जाणवल्याने ‘बालिश उत्तेजना’ अनुभवणारी… म्हणूनच ‘मी आता पत्रकार म्हणूनच विचार केला पाहिजे, व्यावसायिक पद्धतीनं वागलंच पाहिजे’ असे स्वतःला बजावणारी. ‘थोडंसं गरगरणं हे माणूसपणाचं लक्षण” मानणारी. त्यासाठी आध्यात्मिक कोर्सेस न करता (वरकरणी) साध्यासुध्या वाटणाऱ्या गोष्टींचा संकल्प सोडणारी. तिची मैत्रीण अंजू हुशार असली, तरी पोच नसलेली, मनातले सगळे बोलून टाकणारी, अगदी सरळसोट वागणारी अंजू. समजूतदार चेहयाचा पंडा, त्याचे काम, वागणे, बोलणे, सगळेच उत्स्फूर्त पण लॉजिकच्या नावाने बोंब. स्वतःप्रमाणेच इतर माणसे, कला, जीवन एकसंध आहे, असे मानणारा व स्वतः एकसंध असणारा पंडा, नि कोणत्याही संहितेचे पटकन सीरियल करू पाहणारा संदीप. मोठीशी दाढी राखणारा ‘प्रशिक्षित बुद्धिजीवी’ सदानंद विद्यापीठात समाजशास्त्राचा प्राध्यापक आहे. त्याच्या स्वतःच्या विचारांत तर सुस्पष्टता आहेच; पण इतरांचा वैचारिक गोंधळ दूर करण्याची क्षमताही आहे. ह्या सर्व व्यक्तिरेखा एलकुंचवारांनी म्हटल्याप्रमाणे एकविसाव्या शतकातील आहेत. “ख रा रिपू शश्रींशी’ हे आधुनिकोत्तर माणसाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. पंडासारखे एकसंध अपवादात्मक. वेगवेगळ्या लोकांसमोर आणि वेगवेगळ्या प्रसंगी तो वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतो. त्याच्या आयुष्याला थोडी सामान्य सुसंगती अप्रूप वाटावे, इतकी क्वचित येते. एरवी, “अतिरेक, राग, सहानुभूती, तिहाईतपणा. सगळं एका दमात…” कित्येक आवश्यक-अनावश्यक पूर्वग्रहांमुळे एकमेकांना समजून घेणे अशक्य होते, नि नातेसंबंधांतील ताण असह्य होतो; कधी छुपेपणाने तर कधी उघडपणे. पण मित्रपरिवारात कुणाशी ना कुणाशी शेअर केले की हलके वाटते नि ‘‘सहाच्या आत मीटिंगला पोहोचून” काम करणे सतीशला शक्य होते. त्याबद्दल ‘ढहरपज्ञ ‘ म्हणायलाही तो विसरत नाही. नव्हे, सवयीने म्हटले जाते. अनौपचारिक नात्याची घट्ट वीण औपचारिकतेला सामावून घेत एकसंधतेला छेद देऊन जाते. सतीश, सदानंद, माधव, जाड्या, सगळेच तुकड्यातुकड्यात जगतात.
एकविसाव्या शतकात कुटुंबव्यवस्थेत मोठी स्थित्यंतरे झाली आहेत. “मूल म्हणजे सर्वस्व असं वाटावं असं माझं एकंदरीनं आयुष्यच नाही. माधवला (नवऱ्याला) या दोन्ही अवस्थांविषयी काहीच तीव्रतेनं वाटत नाही. त्याच्या आईला नातवंडं हवं होतं. आई मेल्यावर तेही संपलं.” वगैरे वाक्ये (नसलेल्या) कौटुंबिक संबंधांवर प्रकाशझोत टाकतात. विसाव्या शतकात आजूबाजूला माणसे होती; कुटुंबात, गावात नि शहरातही माणसे माणसांना धरून होती. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात माहिती-तंत्रज्ञानाने जग जवळ आणले पण माणूस माणसाला दुरावला! गोतावळा मिळेलच असे नाही, मिळाला तरी तारा जुळतीलच, असे नाही.
सतीश-ललितामध्ये मात्र सुसंवाद होत आहे असे वाटत असतानाच त्यांच्यातील विसंवाद, वृत्ती-वृत्तीतील फरक नजरेत भरतो. सतीश थापा मारतो आहे, टिंगल करतो आहे, पाय खेचतो आहे की काय, असे वाटणाऱ्या ललितालाही ‘यमू’ दिसते आणि यमू हा सतीशचा भ्रम नसल्याची तिची खात्री पटते. मात्र, तिच्यावरचा खात्रीलायक उपाय सतीशला आपल्या पूर्वापार चालत आलेल्या ‘सामाजिक संस्थां’मध्येच सापडतो. सतीश एक यशस्वी, मध्यमवयीन श्रीमंत पुरुष आहे. त्यामुळे पैसा हा त्याच्या लेखी अत्यंत महत्त्वाचा आहे. पैशाने सगळे काही विकत घेता येते, हा त्याचा विश्वास यमूला पैसे चुकते करून त्याने परत मिळवला. म्हणूनच यमूचा बार फुसका निघाला, असे तो म्हणतो. “शी वेस हरी हळी ििळलश’ हे सतीशला माहीत असल्याने व पैसा फेकून मार्ग काढता येतो असा त्याचा यमप्रकरणातही विश्वास दृढ झाल्याने तो सहजपणे त्यातून बाहेर पडतो. “सतीश बराच जगलेला आहे जगात”, असे ललिताच्या लक्षात येते; परंतु तिचे डोके सतीशच्या डोक्याप्रमाणे शांत झाले नव्हते. “या तुझ्या अनेक बुरख्यांच्या आड तू कोण आहेस हे कळलं मला… तू पापाराझी आहेस. बातमी मिळेल म्हणून वेश्यावस्तीतही आलीस आणि पंडालाही आणलंस कॅमेयासकट”, हा आरोप ललिताला असह्य होत होता. मुळात यमूमुळे डोक्याचा झालेला भुगा, त्यात सतीशला सापडलेला उपाय, नि वर त्याच्याकडून मिळालेला अहेर पाहून ती न गरगरती तरच नवल. ह्या गरगरण्यावरचा एक रामबाण उपाय तिच्याकडे आहे, झाला प्रकार लिहून मोकळे होणे, कॅथार्सिस. एकंदरीत, सतीशची दृष्टी व्यापारी आहे, निव्वळ आर्थिक पैलूवर त्याची भिस्त आहे, तर ललिताचा उपाय सर्जनशील आहे, नवनिर्मितीला वाव आहे. मुळात स्त्रीपुरुषस्वभावातील भेद यास कारणीभूत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करता येतो. केवळ स्त्रीवादी किंवा मार्क्सवादीच नव्हे तर मानसशास्त्रीय किंवा फ्राइडप्रणीत मनोविश्लेषणाच्या अंगानेही प्रस्तुत कादंबरीची समीक्षा होणे आवश्यक आहे. विश्राम बेडेकरांच्या ‘रणांगण’ कादंबरीने ज्याप्रमाणे छोटेखानी असूनही साहित्यविश्वात आपली मोहोर उठवली, त्याचप्रमाणे ‘यमूचे ऑपरेशन’ही आपले स्थान निर्माण करेल, इतकी ताकद तिच्यात निश्चितपणे आहे. कादंबरीतील सूचक, समर्पक चित्रांचा स्वतंत्रपणे विचार करता येणे शक्य आहे. बहुविध दिशांचे सूचन करण्याची क्षमता कादंबरीत आहे. ‘यमू-सतीश’ सतीश आळेकरांच्या ‘यमूचे रहस्य’शी नाते सूचित करतात का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.
विवेकाने भावनेवर मात करत ललिताने मार्ग शोधला, लिहून मोकळे होण्याचा. अखेरीस ती लिहिते, “एकंदरीने, एकमेकांत आणि इतर कशातच गुंतण्याची प्रतच आता पूर्वीपेक्षा वेगळी झाली आहे. आमच्या सगळ्यांचीच. सगळेच तसे हुशार आहेत आमच्या ग्रूपमधले. तेव्हा बहुधा संबंध तसेच राहतील अशी आशा करते.” मानवी नातेसंबंध, त्यातील सौहार्द, जिव्हाळा, कळवळा, आत्मीयता एकविसाव्या शतकातील माणसांनाही भावतात; पण नाती निभावणे जिकिरीचे होत चालले आहे. सगळेच तसे हुशार असल्यावर मात्र बहुधा संबंध तसेच राहतील, अशी आशा करता येते.
ऑपरेशन यम : मकरंद साठे, पॉप्युलर प्रकाशन, २००४, पृष्ठे १०६ सी-२,५०१-५०२, लोकमीलन, चांदिवली, अंधेरी (पू.), मुंबई-७२.