दुभंगलेला समाज

मुंबईतील भा.ज.पा.च्या एका कार्यकर्त्याने अभिनेता इमरान हाशमीच्या विरोधात ३ ऑगस्ट २००९ रोजी तो जातीय द्वेष पसरवतो आहे अशा प्रकारची तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये महेश भट्ट ज्यांनी इमरान हाशमीच्या बाजूने विधान केले आहे, त्यांनाही गोवण्यात आलेले आहे. इमरान हाशमीने अलीकडे राज्य अल्पसंख्यांक आयोगाला भेट देऊन अशी तक्रार केली की ‘निभाना’ ही हौसिंग सोसायटी, जी मुंबईतील पालीहील भागात आहे त्यांच्याकडून भेदभावाची वागणूक दिली जात आहे. त्याची मुख्य तक्रार अशी होती की, त्याने फ्लॅट विकणाऱ्याला अगोदरच अॅडव्हान्समध्ये लाखभर रुपये दिले होते, पण हौसिंग सोसायटी त्याला ‘ना हरकत पत्र’ देण्यास तयार नव्हती कारण इमरान हाशमी मुसलमान आहे. अनेक लोकांनी यावर हरकत घेतली. प्रश्नही विचारले. त्यावेळी सोसायटीचे सचिवही म्हणाले की आम्ही कोणत्याही व्यक्तीसोबत धर्माच्या नावावर भेदभाव करत नाही. त्यानंतर मग एका आठवड्यानंतर हाशमी व सोसायटी यांच्यामध्ये समझोता झाला.
वर्तमानपत्रात आलेल्या वृत्तांमध्ये नेमकी कोणती बातमी खरी आहे आणि इमरानने तसे का म्हटले असे कोणालाही सांगता येणार नाही. मुसलमानांना मिश्र वस्त्यांमध्ये घर नाकारण्याचा प्रकार अगोदरही चालायचा हे माहीत आहे. कोणतीही सोसायटी किंवा बिल्डर स्पष्टपणे हे सांगणार नाहीत की विशिष्ट धर्माच्या लोकांना त्यांच्या सोसायटीमध्ये बंदी आहे, पण या गोष्टी अतिशय कुशल पद्धतीने चालतात. गेल्या वर्षी शबाना आझमी यांनाही विशिष्ट विभागातील घर विकत घेण्यास नकार देण्यात आला होता. यावर अनेक लोकांनी या प्रकारची घटना अमान्य करत वस्तुस्थितीवर शंका उपस्थित करून संबंधित कलाकारांचा उपहास केला. अनेकदा आश्चर्य वाटते की, कलाकार असूनही विशिष्ट सोसायटीत घर घेण्यावर बंदी आणली जाते यावरील प्रतिक्रियेचा कळस म्हणजे भाजपाचा कार्यकर्ता एका कलाकाराच्या नावे तक्रार देतो की तो जातीय द्वेष पसरवत आहे. अगोदर शबाना आझमी आणि इमरान हाशमी दोघांनाही या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना घडत असतीलही पण आपल्याला त्या माहीत नाहीत. जे कोणी समाजातील विविध लोकांशी चर्चा करतात, त्यांच्यापासून ही गोष्ट लपलेली नाही की मुंबईत आणि इतर अनेक ठिकाणी यासारख्या घटना घडत आहेत. जातिधर्मावर आधारित वसाहती पहिल्यापासूनच आहेत आणि स्वातंत्र्यचळवळीच्या काळात सुरू झालेल्या राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेला या प्रकारच्या घटना म्हणजे मोठा धक्का आहे. जातीयवादी ध्रुवीकरणासाठी केल्या जाणाऱ्या जातीयवादी दंगलींमुळे या प्रकारच्या वसाहती वाढतच जात आहेत.
त्यांना वगळण्याचे आणि बाजूला करण्याचे विविध प्रकार आहेत. पारशी, जैन, समाजांनी जे त्यांच्या धर्माला मानत नाहीत त्यांना वेगळे काढले आहे. मुस्लिमांच्या प्राणहत्या आणि हिंसाचारानंतर अनेकांनी मिश्र वस्तीतून स्थलांतर करून गायरान कुरणांमध्ये राहण्यास सुरुवात केली आणि नंतर अशा जागांना ‘मिनी पाकिस्तान’ संबोधले गेले. अलिकडच्या निरीक्षणानुसार या स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याकांना त्यांच्या पूर्वीच्या घरी जाण्याची परवानगी नाही, ही गोष्ट प्रथम गुजरात आणि नंतर कंधमालमध्ये दिसून आली. याप्रमाणेच ज्या वस्त्यांमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे, तिथून हिन्दू कुटुंबे स्वतःहून तो भाग सोडून निघून जात आहेत. अल्पसंख्याक दानवी आहेत या सामाजिक भावनेतून जी संशयाची बीजे रोवली जात आहेत, ती अशा स्थलांतराच्या मुळाशी आहेत. अशा प्रकारची स्वतःहून घडत असलेली किंवा घडवली जात असलेली; दोन्ही प्रकारची प्रक्रिया राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोकादायक आहे. बंधुत्वाच्या भावनेला मारक आहे. मुंबईमधील काही भाग – मुंब्रा, भेंडीबाजार, जोगेश्वरी या भागात मुस्लिम लोक अतिशय दाटीवाटीने राहतात, ही दाटी १९९२ नंतरच्या दंगलीनंतर वाढली आहे. गुजरातमध्येसुद्धा २००२ च्या दंगलीनंतर असेच विभाग तयार झाले आहेत.
अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे समाजाचे मत कलुषित झाले आहे. सध्या संपूर्ण मुस्लिम समाजाभोवती एका विशिष्ट रंगाचे कवच निर्माण केले गेले आहे. ज्याचा सत्य परिस्थितीशी काहीही संबंध नाही अशा प्रकारचे विलगीकरण हे इतर समुदायाबद्दलचे कलुषित मत अधिकच कलुषित करते. शिवाय या प्रकारच्या भावना दोन्ही समुदायाकडून प्रतिक्रियांद्वारे वाढीस लागतात. अशा प्रकारचा भारतातील माणसांचा एकमेकांप्रती अविश्वास अतिशय धोकादायक बाब आहे म्हणून फ्लॅटच्या वाटपामधील भेदभावाच्या वागणुकीबद्दलची तक्रार आत्तापर्यंत ऐकली जायची पण वस्तुस्थिती मांडणाऱ्यांवर आता द्वेष निर्माण करण्याचे आरोप लावले जात आहेत. आपण सामाजिक प्रश्नांकडे डोळेझाक करू शकत नाही आणि ते नाहीतच असा विचारही करू शकत नाही. शहामृग पक्ष्याप्रमाणे आपण वाळूत डोके खुपसून बसून वस्तुस्थिती नाकारू शकत नाही.
आपण हे सामाजिक प्रश्न योग्य प्रकारे समजावून घेऊ शकलो तरच सोडवू शकतो. इमरान हाशमी यांनी धैर्य दाखवून जी वास्तवता दर्शवते अशी ही घटना पुढे आणली. अशा व्यक्तीला अपराधी बनवणे म्हणजे बलात्कार झालेल्या मुलीला असे म्हणणे की तूच त्यांना बोलावले असशील. पीडितांनी कशी स्वतःची दुर्दशा करून घेतली आणि ते स्वतःच त्याला कारणीभूत आहेत असे मानणाराही याच समाजाचा एक विचार आहे. असे मत पुढे येते की मुस्लिम स्वतः दंगे घडवून आणतात आणि स्वतःसाठी धोक्याची घंटा बांधून घेतात. हे मत खरेतर सत्यापासून खूप दूर आहे, कारण पोलीस अधिकाऱ्यांनी केलेले संशोधन (व्ही.एन.राय ‘कॉम्बॅटिंग कम्युनल कॉन्फ्लिक्टस्’) आणि चौकशी समितीचे अहवाल (जसा अलिकडचा श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल जो मुंबईमध्ये झालेल्या दंगलीवर आला होता) सर्व हे दर्शवतात. तांत्रिक गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला या सामाजिक प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. लहान देशांची उदाहरणे द्यायची झाल्यास सिंगापूर येथे सरकारी हौसिंग योजनेमध्ये विविध धर्मांच्या लोकांसाठी घरे राखून ठेवली जातात. विविध जाति-धर्मांच्या लोकांनी एकत्र यावे, शेजारी रहावे, समाजातील विविध गटातील लोकांचे आपापसात नाते निर्माण व्हावे, यासाठी केलेली ही रचना आहे. आपण त्यापासून खूप दूर आहोत. समाजाला वेगवेगळे करण्याचा कल असणारे बिल्डर किंवा सोसायट्यांमध्ये हे चित्र बदलायला हवे. आणि यात इतर धर्माचे लोक कसे समाविष्ट होतील यासाठी विविध स्तरावर प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. कायदेशीर संरक्षण, सकारात्मक कार्यवाही आणि चुकीच्या मतांचे खंडन करणे ही काळाची गरज बनली आहे. वरील घटनेतील कलाकार आणि सोसायटी यांच्यामधील समझोता स्वागतार्ह आहे. आणि आशा करूया की समाजाला वेगळे करणारे असे प्रवाह काळाच्या ओघात नष्ट होतील.
संपर्क : संतोष गोगले (भ्रमणध्वनी)९२२६४४८४८१ द्वारा, अजित पेंटर, डी १३, शंकरछाया सोसा.,
म्हात्रेपुलाशेजारी, नळस्टॉपजवळ, एरंडवणे गावठाण, पुणे ४११ ००४.

परीक्षणेः पुस्तके, नाटके, चित्रपट, इ.
आजचा सुधारक ने प्रकाशित केलेल्या परीक्षण, परिचय, (अमुक)च्या निमित्ताने, अश्या प्रकारच्या लेखांची ही सूची.
कलाकृती लेखक परीक्षक वर्ष . अंक
१) सन्मानाने मरण्याचा हक्क वि.रा.लिमये – १.७
जगायचे की मरायचे? वि.रा.लिमये – १.७
सुशीलेचा देव वा.म.जोशी प्रभा गणोरकर १.९/१०
आश्रम हरिणी वा.म.जोशी शे.मा.हराळे १.९/१०
हिंदू संस्कृती आणि स्त्री आ.ह.साळुखे सुनीती देव १.११
चार्वाकदर्शन आ.ह.साळुखे बा.य.देशपांडे १.१२
भारतीय स्त्रीजीवन गीता साने प्र.ब.कुळकर्णी २.२ व २.५
८) नरक-सफाईची गोष्ट अरुण ठाकूर व महमद खडस आरती कुलकर्णी २.२
स्त्री उवाच (वार्षिक १९९१) अनुराधा मोहनी २.३
राखीव जागाः ठोस आक्षेप,रास्त समर्थन रा.प.नेने प्र.ब.कुळकर्णी २.४
११) शास्त्रीय विचारसरणीची मीमांसा राजीव जोशी बा.य.देशपांडे
३.४ सावरकर ते भाजप स.ह.देशपांडे – ३.६
१३) सावरकरांचे समाजकारण शेषराव मोरे भा.ल.भोळे ३.८/९
स्त्री उवाच (वार्षिक १९९२) अनुराधा मोहनी ३.८/९
१५) संवाद विद्या बाळ अनुराधा मोहनी ३.१०
१६) गोपाळ गणेश आगरकर स.मा.गर्गे प्र.ब.कुळकर्णी ३.१०
गोष्ट पासष्टीची शांता किर्लोस्कर प्र.ब.कुळकर्णी ३.१०
१८) अमेरिका अनिल अवचट प्र.ब.कुळकर्णी ४.४
१९) रक्तपहाट कमळाबेन पटेल प्र.ब.कुळकर्णी ४.५
२०) मृत्यूनंतर शिवराम कारंत प्र.ब.कुळकर्णी ४.७
वैश्विक जीवनाचा अर्थ श्रीकांत कारंजेकर तारक काटे ४.११
चारचौघी (नाटक) श्रीधर घाटे ४.११
हिंदू-मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद रावसाहेब कसबे प्रमोद सहस्रबुद्धे ५.८
२४) दोन संस्कृती सी.पी.स्नो विद्यागौरी खरे ५.११/१२
२५) ज्याचा त्याचा प्रश्न (नाटक) टी.बी.खिलारे ६.५
बँडिट क्वीन (चित्रपट) सुनीती देव ७.१
२७) अंताजीची बखर नंदा खरे प्र.ब.कुळकर्णी ७.१
आगरकर य.दि.फडके प्र.ब.कुळकर्णी ७.६/७
२९) पॅडेमोनियम हफ्री जेनिंग्ज विद्यागौरी खरे ७.१०
सत्याग्रही सॉक्रेटीसचे वीरमरण वसंत पळशीकर प्र.ब.कुळकर्णी ७.१०
श्रद्धांजली विनय हर्डीकर प्र.ब.कुळकर्णी ८.४
बाराला दहा कमी पद्मजा फाटक व प्र.ब.कुळकर्णी ८.६
माधव नेरूरकर विधवाविवाह चळवळ स.गं.मालशे व नंदा आपटे अनुराधा मोहनी ८.७
३४) अनोखा उंबरठा वि.गो.कुळकर्णी सुनीती देव ८.८
आक्रोश भीमराव गस्ती प्र.ब.कुळकर्णी ८.८
नववसाहतवाद आणि आधुनिक भारत गोपाळ राणे ऋचा घाटे ८.९
अग्नी ते अणुशक्ती स.मा.गर्गे भा.ल.भोळे ८.१०
३८) समाज-संस्कृती-साहित्य-संबंधाचे अतिस्थूल परिशीलन मोतीराम कटारे भा.ल.भोळे ८.१०
शौरींच्या लेखनावर क्ष-किरण विलास वाघ भा.ल.भोळे ८.१०
४०) भाषांतर-मीमांसा कल्याण काळे व अंजली सोमण गीता भागवत ८.११
४१) प्रिपेअरिंग फॉर द डेंटिफर्स्ट सेंचरी पॉल केनेडी दि.य.देशपांडे ९.२/३
मी नथुराम बोलतोय (नाटक) सुनीती देव ९.५
द ग्रेट इंडियन मिड्लक्लास पवन वर्मा विद्यागौरी खरे ९.८/१०
४४) उपेक्षित योगी मधुसूदन गोखले प्र.ब.कुळकर्णी १०.७
स्त्रीपुरुष तुलना ताराबाई शिंदे सुनीती देव १०.८
महर्षी ते गौरी मंगला आठलेकर प्र.ब.कुळकर्णी १०.९
साँस (दूरचित्र मालिका) सुरेखा बापट १०.११
४८) धी ट्रायल ऑफ सॉक्रेटीस आय.एफ.स्टोन नरेन तांबे १०.१२
४९) माझं घर (नाटक) सुनीती देव १०.१२ ५०)
सावर रे ! (नाटक) सुनीती देव ११.०१
५१) बाँबिंग बाँबे ए.व्ही.रमण नंदा खरे ११.२
५२) फिट्टम फाट तस्लीमा नसरीन प्र.ब.कुळकर्णी ११.४
५३) ग्यानबाचा सहकार सतीश आळेकर – ११.८
५४) अक्करमाशी व शरणकुमार लिंबाळे दिवाकर मोहनी ११.९* पुन्हा अक्करमाशी संजीवनी केळकर ११.९*
५५) द रिव्हर ऑफ लाइफ संजय संगवई मधुकर देशपांडे ११.११
५६) प्रा. मे.पुं.रेगे याचे तत्त्वज्ञान मे.पुं. रेगे प्र.ब.कुळकर्णी ११.११
५७) इनफ् इज इनफ् डी.एल.बुधो मृणालिनी फडणवीस ११.१२
५८) एड अॅज इम्पीरिअॅलिझम टेरेसा हेदर अंजली कुलकर्णी १२.१
५९) पॉवर प्ले अभय मेहता मधुकर देशपांडे १२.२
६०) मेरा घर बेहरामपाडा (चित्रपट) किशोर महाबळ १२.२
६१) हरी भरी (चित्रपट) सुनीती देव १२.३
६२) सीता जोस्यम् नाला वेंकटेश्वरराव चारुता नानिवडेकर १२.३
आय प्रेडिक्ट वसंत गोवारीकर द.भि.दबडघाव १२.४
भूमिसंपादन अधिनियम किशोर कुल्हेकर ल. कृ. पानसरे १२.५
६५) हंग्री फॉर ट्रेड जॉन मेडेली श्रीनिवास खांदेवाले १२.५/६
इट वॉज फाइव्ह पास्ट मिडनाइट इन भोपाल लापिएर व मोरो नंदा खरे १२.९
६७) हसरी किडनी पद्मजा फाटक प्र.ब.कुळकर्णी १२.१०
६८) एक होती बाय सुरेन आपटे विद्या विद्वांस १३.२
६९) स्वभाव-विभाव आनंद नाडकर्णी कल्याणी देशमुख १३.३
७०) व्हाय इज सेक्स फन ? जेरेड डायमंड संजीवनी केळकर १३.५
७१) आशेविण आशा सुजाता खांडेकर विद्यागौरी खरे १३.७
७२)द फॉर्म्यन अॅट द बॉटम ऑफ द पिरॅमिड सी. के. प्रल्हाद आणि एस.एल. हाटे – १३.८
७३) भारत वैद्यक शाम अष्टेकर र. वि. पंडित १३.८
७४) कुंपणापलिकडचा देश मनीषा टिकेकर प्रमोद सहस्रबुद्धे १३.९
७५) रिपिंग द फॅब्रिक डॅरिल डिमाँटे सुलक्षणा महाजन १३.९
७६) मी नथुराम बोलतोय (नाटक) मधुकर देशपांडे १३.९
७७) इंडिया, अॅन इमर्जिंग पावर स्टीफन कोहेन प्रमोद सहस्रबुद्धे १३.११
७८) द नर्मदा डॅम्ड दिलीप डिसोझा मधुकर देशपांडे १४.१
७९) वर्तमान सुरेश द्वादशीवार दि.य.देशपांडे १४.६
८०) द सागा ऑफ इंडियन सायन्स सिन्स इंडिपेंडन्स भार्गव व चक्रवर्ती प्रमोद सहस्रबुद्धे १४.६ ते १४.८
८१) देहभान (नाटक) सुनीती देव १४.६
८२) स्टेपिंग आऊटःलाइफ अँड सेक्शुअॅलिटी इन रूरल इंडिया मृणाल पांडे शोमा सेन १४.७
८३) इट कान्ट हॅपन हिअर सिंक्लेअर ल्युइस मोहन कडू १४.७
८४) मित्र (नाटक) सुनीती देव १४.७
८५) उंबरठा (चित्रपट) सुनीती देव १४.८
८६) स्त्रीपुरुष संबंध अश्विनी धोंगडे चारुता नानिवडेकर १४.९
८७) अक्षरधन प्र.ब.कुळकर्णी ह. चं. घोंगे १४.९
८८) व्हाय आय अॅम नॉट अ मुस्लिम इब्न बर्राक प्रतिभा रानडे १५.२/३
८९) कम्यूनल रेज इन सेक्युलर इंडिया रफीक झकेरिया स.ह. देशपांडे १५.४
९०) इस्लाम अँड जिहाद ए.जी. नूराणी स.ह. देशपांडे १५.४
९१) रॅशनल अॅप्रोच टु इस्लाम अ. एंजिनीयर स.ह. देशपांडे १५.४
९२) ह्यूमन डेव्हलपमेंट इन साऊथ एशिया महबूब-उल-हक श्रीनिवास खांदेवाले १५.५/६
नॉट ओन्ली मिसेस राऊत (चित्रपट) सुनीती देव १५.९
सलाम व्हिएतनाम ज. शं. आपटे क. रे. खांबोरकर १५.१०
श्रीराम लागू शर्मिला वीरकर १५.११
दहशतवादाची कथा ललिता गंडभीर ह.चं. घोंगे १५.१२
अर्थसृष्टीःभाव आणि स्वभाव सुलक्षणा महाजन द.भि. दबडघाव १५.१२
९८) प्रॉब्लेम्स ऑफ नॉलेज अँड फ्रीडम नोम चोम्स्की चिंतामणी देशमुख १६.१
९९) तर्कशास्त्र संतोष ठाकरे सुनीती देव १६.१
१००) मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट नोम चोम्स्की व ए.एस.हर्मन जयदेव डोळे १६.४/५
१०१) द वर्ल्ड इज फ्लॅट टॉमस फ्रीडमन भा.ल.भोळे १७.१
१०२) फायनल ड्राफ्ट (नाटक) शर्मिला वीरकर १७.७
१०३) एक होता कारसेवक अभिजित देशपांडे शर्मिला वीरकर १७.८
१०४) द इव्होल्यूशन ऑफ डिझायरःस्ट्रॅटेजीज ऑफ ह्यूमन मेटिंग डेव्हिड बस प्रदीप पाटील १७.१०
१०५) कातकरी मिलिंद बोकील प्रमोद कुलकर्णी १७.११
१०६) फेल्युअर टु कनेक्ट जेन हीली अभिजित रणदिवे १८.२
१०७) विवेकीजनी या मज जागवीलें प्र.ब.कुळकर्णी ह. चं. घोंगे १८.४
१०८) कोऽहं सुरेश द्वादशीवार प्र.ब.कुलकर्णी १८.४
१०९) इंडिया आफ्टर गांधी रामचंद्र गुहा ‘आऊटलुक’ १८.५
११०) लोकमान्य ते महात्मा सदानंद मोरे प्र.गो.दंडे १८.५
लमाण
१११) चक दे (चित्रपट) नंदा खरे १८.७
११२) मर्मभेद मे.पुं. रेगे सुनीती देव १८.७
११३) वस्ती वसंत मून मधुकर कांबळे १८.७
११४) शोध तस्लीमा नसरीन प्र.ब.कुळकर्णी १८.७
११५) डोकं कसं चालतं? प्रदीप पाटील उल्हास लुकतुके १८.१०
११६) तीन आत्मकथा (अनु.) वीणा आलासे दमयंती पांढरीपांडे १८.१०
११७) बॅबेट्स फीस्ट (चित्रपट) — १८.११
११८) मुंबई मेरी जान (चित्रपट) शर्मिला वीरकर १९.९
११९) द ग्रेप्स ऑफ रॅथ जॉन स्टाइनबेक नंदा खरे १९.११ * दोन वेगळी परीक्षणे