सभ्यता आणि राज्यशास्त्र

सभ्यता आणि राज्यशास्त्र
क्रिस्टफर डी. कुक
सभ्यता (civilizaton) म्हणजे जे नगरांत घडते ते; आणि नगरे अन्नोत्पादकाकडे गरजेपेक्षा जास्त अन्न असण्यावर अवंलबून असतात. ते ज्यादा अन्न उत्पादकाकडून घेणारी संस्थाही असावी लागते. या ज्यादा अन्नातून ती राजकीय संस्था राजांची पोटे भरते ……. सैन्याची, वास्तुशिल्पींची आणि बिल्डरांचीही पोटे भरते. आणि यांतून नगर जन्माला येते. अन्नोत्पादकापासून त्याचे ज्यादा उत्पन्न फारसा काही मोबदला न देता कसे घ्यावे, हे राज्यशास्त्राचे सर्वांत प्राचीन रूपातले ज्ञान आहे.
[चार्ल्स वॉल्टर्स, ज्यूनियरच्या अँग्री टेस्टामेंट (१९६९) मधले हे अवतरण, क्रिस्टफर डी. कुकच्या डायट फॉर अ डेड प्लॅनेट (२००४)मध्ये उद्धृत केलेले. मुळातला builder हा शब्द जसाच्या तसा ठेवला आहे!]