अज्ञानाचे तत्त्वज्ञान

मी अज्ञानाचे समाधानकारक तत्त्वज्ञान मांडणारा वैज्ञानिक आहे; अशा तत्त्वज्ञानाने किती प्रगती करता येते, याचे मूल्य जाणणारा. या तत्त्वज्ञानाचे फळ म्हणून विचार-स्वातंत्र्य मिळते, हे जाणणारा. शंकांना घाबरायला नको. उलट नव्या शक्यता माणसांमध्ये जागवणारे मूल्य तेथून मिळते, हे शिकवू पाहणारा, जाहीर करू पाहणारा.
तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही ती स्थिती सुधारू शकता, अशी शक्यता असते. मला ही शक्यता, हे स्वातंत्र्य भविष्यातल्या पिढ्यांना मिळून हवे आहे. एक जबाबदार वैज्ञानिक म्हणून असे अज्ञानाचे तत्त्वज्ञान मांडणे मला गरजेचे वाटते. [रिचर्ड पी. फाईनमनच्या १९६३ सालच्या सीॲटल येथील भाषणातून डोंट यू हॅव टाईम टु थिंक ? (आर.पी.फाईनमन, पेंग्विन, २००५) या पुस्तकातून]