प्रोमीथियन अग्नी

पुस्तकाचे नाव “Promethean Fire Reflections on the origin of the mind’ आहे. लेखक – Charles S. Lumsden & Edward O. Wilson. नाव तर जड आहे. [ ग्रीक पुराणांमध्ये देवांकडून अग्नी चोरून आणणाऱ्या प्रोमीथियस नावाच्या योद्ध्याची कथा आहे. तिच्या आधाराने ‘देवत्व पावण्याचा हव्यास’ याचे रूपक म्हणून प्रोमीथियसचे मिथक वापरले जाते. – सं.]
जितके नाव जड, तितकेच पुस्तकही वाजायला जड आहे. बहुतांश संदर्भ जीवशास्त्र आणि जनुकशास्त्रामधले, ज्याचा आणि मासा १० वी नंतर कधीही संबंध आला नव्हता. बरे, जेवढे कळत होते तेवढेही कितपत कळलेले आहे याबद्दल शंकाच आहे! अगदी सगळे तांत्रिक तपशील कळले नाही तरी मूळ सूत्रे मात्र कळली. हा विषयच मला नवीन असल्यामुळे नवीन बऱ्याच गोष्टी कळल्या. काही पटल्या, काही नाही पटल्या, किंवा खटकल्या. मुळात पुस्तकात जो विचार मांडलाय तोच पटला नाही.
पुस्तक वाचताना मी त्याला किती न्याय दिलाय याबाबत मला खरेच शंका आहे. पण ‘मला असे वाटते’ या बचावासोबत माझे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करते आहे. पुस्तकाचा सारांश थोडक्यात असा —
जीवसृष्टीमध्ये उत्क्रांती कशी झाली आणि माकडापासून माणूस शरीराने कसा उत्क्रांत झाला याबाबत अनेक अभ्यास झालेले आहेत. पण उत्क्रांतीतला शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा माणसाचा ‘विकसित मेंदू’ यावर समग्र असा अभ्यास झालेला नाही. विकासाच्या प्राथमिक टप्प्यातला चंडू आणि त्याच्या विकासाचा प्रवास याबबात फारच थोडी माहिती आहे. ज्यात मानवी मेंदू, मन, भावना, वागणूक यांचा संबंध आहे असे अनेक विषय आजही वेगवेगळे अभ्यासले जातात. उदा. समाजशास्त्र, जनुकशास्त्र, मानसशास्त्र इ. या पुस्तकात या शाखांना एकत्र बांधणारा धागा म्हणून मेंदूची उत्क्रांती हा विषय होऊ शकतो का, याबाबत चर्चा केली आहे.
आज पृथ्वीवर सजीवांच्या ज्या प्रजाती आहेत त्या जीवसृष्टीची उत्पत्ती झाल्यापासून अस्तित्वात येऊन गेलेल्या एकूण प्रजातींच्या एका टक्क्यांपेक्षाही कमी आहेत. ज्यांची ज्ञानेंद्रिये पूर्ण विकसित होती आणि मेंदू बऱ्यापैकी विकसित होता अशा अनेक सजीवांचा यात समावेश आहे. मग माणूसच इतका प्रगत कसा झाला! माणसाबाबत असे काय घडले की तो आपल्या मूलप्रवृत्तीच्या चौकटीला तोडून शारीरिक परिसीमांच्या पलिकडे जाऊ शकला? पुस्तकात उत्क्रांतीचे महत्त्वाचे चार टप्पे सांगितले आहेत. १) स्वतःची प्रतिकृती करू शकणाऱ्या सूक्ष्मजीवाच्या रूपात ‘जीवा’चा उद्भव होणे. २) केंद्र, मायटोकाँड्रिया व इतर अवयव असलेल्या विरचित सकेंद्री (enkaryotic) पेशींचा उद्भव, इतर जीव अशा पेशींपासूनच घडतात. ३) मोठ्या बहुपेशीय जीवांची उत्क्रांती, ज्यांच्यातून डोळे, मेंदू इत्यादी क्लिष्ट अवयव घडतात. आणि अखेर ४) माणसांची मने घडणे.
ही चौथी पायरी कशी ओलांडली हे कोडे फारच महत्त्वाचे आहे. यात एखाद्या अशा शक्तीचा हात आहे का, जी भौतिकशास्त्राच्या नियमांच्या पलिकडे आहे? – देवाचा हात ? ही अशी उत्क्रांती होती का की तिची दिशा आधीपासूनच ठरलेली होती? लेखक याबाबत वेगळे मत मांडतात.
त्यांच्या मते माणसाचा मेंदू (पर्यायाने बुद्धी) विकसित होण्याचे रहस्य एका अशा यंत्रणेत आहे, जे भौतिकशास्त्राच्या सर्व विषयांशी सुसंगत आहे, तरी केवळ मनुष्यप्राण्याच्याही बाबत घडलेले आहे. उत्क्रांतीसाठी सजीवांमध्ये एक असा प्रोमीथियन अग्नी आला, ज्यामुळे लेखक या प्रक्रियेला gene-culture-co-evolup (जनुक-संस्कृती-सहउत्क्रांती) असे नाव देतात. या उत्क्रांतीचा थोडक्यात सारांश असा – माणसातले जीन्स आणि त्याचा सांस्कृतिक इतिहास यांत एक घट्ट नाते आहे. जीन्स हे मेंदू कसा बनतो यावर परिणाम करतात – कुठले प्रेरक (stimuli) पकडायचे, कुठले सोडायचे, माहितीवर प्रक्रिया कशी केली जाते, कुठली साठवलेली माहिती सगळ्यात प्रथम आठवते, कुठल्या भावना जागृत होतात इ. म्हणजेच २ माणसांबाबत एखादी सारखीच घटना घडली तरी त्याला दिला जाणारा प्रतिसाद हा जीनवर अवंलबून असतो. ज्या प्रक्रियांमुळे असे परिणाम घडतात त्याना जीनबाह्य प्रक्रिया असे म्हटले आहे. या सांस्कृतिक घडणीवर परिणाम करतात.
अशा रीतीने जीन्समुळे एका विशिष्ट पद्धतीने तयार झालेला मेंदू आणि त्याचा संस्कृतीवर होणारा परिणाम हा फक्त अर्धा भाग झाला. त्यानंतरचा अर्धा भाग म्हणजे संस्कृतीचा जीन्सवर होणारा परिणाम. काही जीनबाह्य प्रक्रियामुळे (म्हणजेच ज्या प्रकारे मेंदू विकसित झाला आहे, त्यामुळे) काही मनुष्यांना जगण्यासाठी व प्रजननासाठी आवश्यक असलेल्या निवडी अधिक अचूकपणे करता येतात आणि त्यांचे पुढे नेले जातात. अशा अनेक पिढ्यानंतर असे जीनबाह्य प्रक्रिया आणि त्यांसाठी लागणारे जीन्स यांची संख्या वाढते. अशा रीतीने संस्कृती ही जनुकीय उत्क्रांतीवर परिणाम करते.
जीन्स व संस्कृती यांचे एकमेकांवर होणारे परिणाम हा या पुस्तकाचा मुख्य धागा आहे. पिढ्या Sociobiology चा एक भाग आहे. प्रकरण २ मध्ये या आधी Sociobiology मध्ये झालेल्या अभ्यासांबाबत थोडक्यात माहिती दिली आहे.
याआधीचे जीन्स आणि मन यावरचे अभ्यास दोन मुख्य वादांमध्ये अडकले. १) Survival of the fittest याचाच आधार बाजारपेठी भांडवलवादाने घेतला. तुमच्या बाजारपेठा वाढवण्यासाठी तुम्ही टोकाचे (काही वेळा अनैतिक) प्रयत्न करणे हे उत्क्रांतीच्या तत्त्वाला धरूनच आहे, अशी ओरड केली गेली. २) दुसरा वाद म्हणजे माणसाचे मन ही वस्तुनिष्ठ अभ्यासाच्या पलिकडची गोष्ट आहे. त्याला भौतिक किंवा जीवशास्त्राचे नियम लागू होणार नाहीत, अशी भूमिका मांडली गेली. या वादांत अडकून Sociobiology हा विषय शक्य तितका विस्तृतपणे अभ्यासला गेला नाही. म्हणूनच हा अभ्यास करताना प्रश्नाची मांडणी नीट व्हावी याची काळजी घेतली गेली. जनुकीय उत्क्रांती आणि सांस्कृतिक उत्क्रांती यांच्यामधील नाते शोधणे हे या अभ्यासाचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रकरण ३ : जनुक-संस्कृती सहउत्क्रांतीचा पहिला अर्धा भागाची विस्तृत चर्चा आहे. जीन्समुळे सामाजिक जीवन कसे घडले असेल, याचा थोडक्यात सारांश असा की माणसाचा मेंदू हा त्याच्या जीन्सनी ठरवून दिलेल्या आराखड्याप्रमाणेच बनतो. यात मुख्य मांडलेला मुद्दा असा की – मनाचा पाया ‘जड’ (material) आहे.
माणसाच्या मनात (मेंदूत) जे विचार येतात ते मेंदूत प्रत्यक्ष घडत असलेल्या प्रक्रियांमुळे येतात. या प्रक्रियांमध्ये बदल केले तर विचारही बदलतील. प्रतिसादही बदलेल. म्हणूनच प्रत्येक माणसाचा एखाद्या घटनेला प्रतिसाद वेगवेगळा असतो. प्रकरण ४ मध्ये दुसरा अर्ध्या भागाची चर्चा आहे; संस्कृतीच्या जीन्सवरील परिट जामाची. जशी शरीरात झालेली उत्क्रांती अभ्यासण्यासाटी उत्खननात सापडलेल्या विविध सांगाड्यांवरून तर्क करतात, तसे मेंदू उत्क्रांत होताना काय घडले असेल, लेखकांच्या ठरवल्यानुसार तीन मुक्य गोष्टी, त्यामुळे मेंदूच्या विकासाला गती मिळाली त्या, म्हणजे १) हत्यार वापर (0) २) भाषेचा विकास (0) ३) दीर्घ स्मरणशक्ती (0)
त्यासाठी आदिमानवाच्या टोळ्या कशा राहात असतील. कशी शिकार करत असतील. दगडांपासन हत्यारे कशी बनवली गेली, या सगळ्यामागे आदिमानव विचार कसा करायला शिकला असेल. या गोष्टींची चर्चा आहे. प्रकरण ५ मध्ये ‘केवळ माणसच का?’ यावर चर्चा आहे. या प्रकरणात लेखक म्हणतात की १) मोठा आकाराचा मेंदू २) कपीमधील सामाजिक रचना ३) मोकळे हात, वस्तू घडवायला आणि वाहून न्यायला मोकळे. यांचा एकत्रित परिणाम म्हणजे मेंदूच्या विकासाला आलेला वेग. म्हणजेच यात जितका जीन्सचा वाटा आहे तितकाच शरीरातल्या बदलांमुळे तयार झालेल्या सामाजिक रचनांचा वाटा आहे.
त्यांच्या मते नव्या सांस्कृतिक संरचना घडणे हे एका प्रकारचे म्यूटेशनच होते, ज्यामुळे उत्क्रांतीला गती मिळाली. उदाहरण द्यायचे झाले तर तर्क वापरण्याने जीन्स सबळ झाल्यामुळे त्या प्रकारचे लोक घडणे. म्हणजे तर्क वापरणाऱ्याच्या मुलांमध्ये ती क्षमता वापरली जाऊन अजूनच सबळ होणार. आणि आजची भौतिक प्रगती ही याचाच परिणाम आहे. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञानात दोन नवीन लागणारे शोध हे आपल्या मेंदूच्या प्रचंड वेगाने होणाऱ्या उत्क्रांतीमुळे आहेत.
लेखक याची कल्पना एखाद्या पर्वतशिखराच्या निर्मितीची करतात. भूपृष्ठावरच्या अनेक बदलांमुळे त्याचा एखादाच भाग वर उचलला जातो. त्याचे एखादेच टोक हजारो मीटर उंची पार करते आणि त्यावर बर्फ पडते. तसेच मानवाचे झालेले आहे. सजीवांत विविध स्तरावर झालेल्या उत्क्रांतीच्या टोकाशी मानवी मेंदू होता म्हणून तो सगळ्या मर्यादा पार करू शकला.
प्रकरण ६ : यातून वेगळेच वळण घेते. मेंदूच्या उत्क्रांतीबद्दल चर्चा करून लेखक एक वेगळाच दृष्टिकोण मांडतात. तो थोडक्यात असा – आपण एखादी गोष्ट चूक की बरोबर हे जेव्हा ठरवतो तेव्हा ते आपल्या जनुकीय आराखड्यानुसार अवलंबून असतं.
उदा. सख्ख्या बहीणभावांनी लग्न करणे ‘चूक’ वाटते, कारण वर्षानुवर्षे तसे ठसले आहे. पण याचे मूळ कारण असे आहे की सख्ख्या बहीणभावांनी लग्न केल्यामुळे सदोष जीनरचना असलेली मुले जन्माला येऊ शकतात. ही गोष्ट लक्षात आल्यामुळे ती गोष्ट चूक मानली गेली. अनेक पिढ्यांनंतर त्याचा जीनबाह्य नियम बनला. आणि आज आपण कारण माहीत असो-नसो, ते चूकच मानतो. कारण आपल्यात ते रेखले गेले आहे. हे जीनबाह्यनियम बदलता येतात. एकदा ते नियम बदलले की आपल्याला ती गोष्ट चूक वाटणे पण बंद होईल. थोडक्यात, चूक – बरोबर असे काही नसते. आपल्याला कुठली गोष्ट बरोबर-कुठली चूक वाटते ते आपल्या जीन-आरेखनावर अवलंबून आहे.
आता, लेखकाच्या म्हणण्यानुसार आज समाजात वेळ आली आहे की सामाजिक जीनबदल करून माणसांच्या वागणुकीत फरक पाडण्याची. यावर योग्य दिशेने काम झाले तर माणसाची वागणूक चांगल्या प्रकारे प्रभावित करण्याचे मार्ग सापडू शकतील. मला काय वाटले ?
मला पहिली खटकलेली गोष्ट म्हणजे उत्क्रांतीमध्ये कुठल्याही इतर शक्तीचा हात नाही; हा विचार. एका वाक्यात सांगायचे तर तो एक संभाव्यतेचा खेळ आहे असे लेखक म्हणतात. विश्वाची उत्पत्ती झाल्यावर काय होईल याच्या अनेक संभाव्यता होत्या. त्यांपैकी विश्व आज त्या स्थितीत आहे ती एक. त्यात विशेष काही नाही. पण हे सगळे जरी असले तरी त्यातून ते ‘कसे’ याची उत्तरे मिळतात. ‘का’ची नाही.
मी स्वतः स्वाध्यायच्या पार्श्वभूमीतून आलेली असल्यामुळे मला देव न मानणे ही खूप मोठी चुकीची गोष्ट वाटते. माझे तसे जीन आरेखन झाले असणे शक्य आहे. आपण संकटात असलो आणि प्रार्थना केली की आकाशातून येऊन मदत करतो तो देव, अशी देवाबद्दलची माझी खुळचट कल्पना मुळीच नाही. पण जर आपण विश्वातल्या अनेक नियमांमध्ये असलेली सुसूत्रता बघितली तर त्याला नुसता संभाव्यतेचा खेळ कसे म्हणणार! भौतिकीचे नियम माणसांनी शोधले. पण मुळात ते आले कुठून! अर्थात् यावर चर्चा करायला ना माझा भौतिकीचा पुरेसा अभ्यास आहे, ना वेदांचा. पण तरीही माझ्यासाठी ही खूप मूलभूत गोष्ट आहे. मुळात आपण सगळेच जसे आयुष्य गायचे ठरवतो ते तसे ‘का’ ठरवतो हे खूप महत्त्वाचे आहे. तो ‘का’ जर स्पष्ट नसेल, तर ‘काय’ला विशेष अर्थ उरत नाही. माझ्यासाठी मी केलेल्या प्रत्येक निर्णयाच्या ‘का’चे उत्तर स्वाध्यायात मिळते. मला वेदाने चांगली बुद्धी दिली आहे, शरीर दिले आहे. सगळ्या संधी दिल्या आहेत. त्याचे योग्य वापर करणे, त्याचे काम करणे हे माझे कर्तव्य आहे. त्याचे काम म्हणजे आपल्या समाजासाटी काम, इतके साधे गणित.
त्यामुळे मी जेव्हा आजुबाजूला ‘देव वगैरे काही नसतं’ असे म्हणणारे लोक बघते तेव्हा मला दिसतो त्यांची ‘मीच जगाचा उद्घाटक’ ही भूमिका, आणि सुजलेला अहंभाव.
मला खटकलेली दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक अभियांत्रिकी’ करून समाजात बदल. एखाद्या मध्ये चुकीच्या दिशेने विचार करणारे जीन्स असतील तर त्यावर समाजाचा अंकुश राहू शकतो. उदा. पूर्वीच्या काळी वाळीत टाकायचे. त्यामुळे समाजाच्या आरोग्याला घातक अशा गोष्टी किंवा समाजात अमान्य गोष्टी करायला कोणी धजावायचे नाही. पण आज सगळ्या समाजाचा लंबक एका चुकीच्या दिशेकडे चालला आहे. एकीकडे पुस्तकात म्हटले आहे की आपल्या बऱ्यावाईटाच्या संकल्पना जीन-आरेखीत असतात. त्या बदलता येतात. आणि दुसरीकडे म्हटलेले आहे सामाजिक अभियांत्रिकी करून समाजात चांगले बदल घडवायचे. आता ‘चांगले-वाईट’ ठरवणार कसे? आणि कोण ? कोण तो महामानव ? मुळात माणसाला एखादे यंत्र म्हणून त्याकडे अभियांत्रिक बदलांच्या दृष्टीने बघायचे हे कितपत बरोबर आहे?
औद्योगिक सभ्यतेच्या उगमापासून आपण निसर्गातल्या अनेक गोष्टींकडे ‘वस्तू’ म्हणून बघितले. त्याचे परिणाम आज आपण बघतो आहोत. पृथ्वीचे पर्यावरण विनाशाच्या कडेवर उभे आहे. आणि विज्ञान हे एक हत्यार आहे. त्याचा वापर कशासाठी करायचा ह्याचे उत्तर ते देत नाही. अणुबाँबचा शोध आणि हिरोशिमा, नागासाकी हे उदाहरण आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. अशा वेळी हे सामाजिक अभियांत्रिकीचे हत्यार चुकीच्या हातात गेले तर? पुन्हा असे प्रयोग करणाऱ्यांना ‘गिनी पिग्ज’ लागणार. त्यांना होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोणाची?
असे प्रश्न विचारण्याइतकी माझी तयारी आहे की नाही ते माहीत नाही. पण असे प्रश्न पडतात, हे मात्र खरे. [प्रोमीथियन फायर, चार्ल्स जे लुम्स्डेन वइ.ओ. विल्सन, हार्वर्ड युनि.प्रेस, १९८३ ]