माझे आध्यात्मिक आकलन

दोन महिन्यापूर्वी मी पुणे येथे माझे विज्ञान : माझे अध्यात्म या विषयावर भाषण दिले. कार्यकर्त्यांना व नागरिकांना ते आवडले. नवीन वाटले. यापूर्वी मी महाराष्ट्रात काही ठिकाणी ‘आम्हीच खरे धार्मिक’ या विषयावरही बोललो होतो. विषयाचे शीर्षक थोडे चकवा देणारे होते हे खरेच. धर्म न मानणाऱ्या व्यक्तीने मी खरा धार्मिक आहे असे उच्चारवाने सांगणे यात अंतर्विरोध वाटतोच. असे असतानाही हा विषय घेतला होता याचे कारण होते. एकतर धर्मभावनेचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण व राजकारण करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न चालू होता. महाराष्ट्रात व दिल्लीतही त्याच मंडळींच्या हातात सत्ता होती. धर्माच्या नैतिक भागाशी त्यांचे काही देणेघेणे नव्हते. कर्मकांडे, पुरोहितशाही, शोषण, हेच त्यांच्या धर्माचे रूप होते. मी अंनिसचा कार्यकर्ता होतो. त्यामुळे विवेकाने म्हणजेच विवेकाधिष्ठित नीतीने जगत होतो. या अर्थाने मी धार्मिकपणेच जगत होतो. मी ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्यांचा धर्म मला आपोआप लाभला होता. तो सोडून मी दुसरा अधिकृतपणे स्वीकारलेला नव्हता. तोपर्यंत मी हिंदूधर्माचाच होतो. मला आपोआपच संत आणि समाजसुधारकांचा वारसा लाभलेला होता आणि त्यांनी सांगितलेला धार्मिकतेचा उदात्त अर्थ मला मान्य होता. हिंदू धर्मातील प्रचंड लवचिकते ळे देव न मानणारा, वेद न मानणारा असूनही मी हिंदू राहू शकत होतो. मी धार्मिक नाही हे जाहीर करण्याची घाई माझ्या वैचारिक विरोधकांना होती कारण त्यांना धर्म म्हणजे काय यावर मत प्रदर्शित करणे आणि कृती करणे यावर राजकीय स्वार्थासाठी एकाधिकारशाही स्थापन करावयाची होती. धर्मासारखे प्रभावी अस्त्र त्यांच्या हातात संपूर्णपणे सोपवण्याऐवजी त्यांच्या धर्मविषयक वैचारिक भूकेत जाऊन ‘मीच खरा धार्मिक आहे तुम्ही खोटे धार्मिक आहात’ असे ठणकावून सांगण्याचा एक डावपेचात्मक पवित्राही त्या विषयाच्या मांडणीत होता. धर्म ही सामाजिक संस्था आहे हे तथ्य धर्मशास्त्रज्ञांनी स्वीकारले तर धर्माचे स्थलकालातीत निकष त्यांना शोधता येतील. त्यातून धार्मिक मूलतत्ववादाला हे दूर ठेवू शकतील. धर्माच्या समाजशासस्त्रीय अभ्यासकाने जर स्वतःच्या ठिकाणी धार्मिक सहानुकंपा विकसित केली तर विनोबा अथवा विवेकानंद यांच्यासारख्या काही थोर धर्मचिंतनकारांनी जो धर्माचा उन्नत अर्थ लावला त्यातून त्याला काही वेगळी दृष्टी लाभू शकेल. मार्क्सवादी असलेले विचारवंत दि.के.बेडेकर यांचाही याबाबत उल्लेख करावा लागेल. विज्ञान आणि अध्यात्म याबाबतचे विवेचन करताना ही भूमिका माझ्या मनात होती. ही भूमिका योग्य आहे अथवा ही संघटनेची अधिकृत भूमिका आहे असे नाही. तर या भूमिकेवर विचारमंथन घडून येणे गरजेचे आहे. या कल्पनेतून सूत्ररूपाने ही भूमिका पुढे मांडत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाबदद्दलची भूमिका सर्वज्ञात आहे. आणि त्याबाबत मतभिन्नताही नाही. निरीक्षण ते प्रयोग या प्रक्रियेतून सत्य शोधता येते. वैज्ञानिक दृष्टिकोण नेहमीच नम्र असतो. तो अंतिम सत्याचा दावा करत नाही. सत्याचे सातत्य त्याला महत्त्वाचे वाटते. हे सत्य सार्वत्रिक व वस्तुनिष्ठ असते.वैज्ञानिक दृष्टिकोण आकलनाची परिपक्वता निर्माण करतो. या आकलनाच्या परिपक्वते .ळे समाजासमोरील प्रश्नांचीही उत्तरे मिळतात. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोण प्रयोगशाळेत न वापरता सर्वत्र वापरावयास हवा.
आता अध्यात्माविषयी
अध्यात्म म्हणजे आत्म्याचा विाचर. आत्मा नसतोच असे मानणाऱ्या विचारसरणीप्रमाणे अध्यात्माची पोकळ चर्चा अर्थहीन असते. ‘जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते’ या लोकप्रिय वाक्याचा प्रतिवाद ‘अध्यात्म खूप जुने आहे. त्याने माणसाचे भूक, दारिद्रय, विषमता याचे कोणतेच प्रश्न सुटेनात आणि विज्ञानामुळेच हे प्रश्न सुटण्याची दिशा लाभली. त्यामुळे आध्यात्मिक जेथे साफ अपुरे ठरले तेव्हा विज्ञान मानवाच्या मदतीला धावले’ असा केला जातो. की जुगलबंदी बाजूला ठेवून आपण मान्यताप्राप्त आध्यात्मिक मांडणीच्या क्षेत्रात जाऊन त्याबाबत बोलणार आहोत. १) अध्यात्म हा आधिभौतिक विचार आहे. इहलोकापेक्षा पारलौकिकाचा विचार आहे. ऐहिक जीवनाला त्यामध्ये गौण स्थान आहे. आत्म्याचे मूळ स्वरूप काय आहे. तो व्यक्तीच्या जीवनापूर्वी व जीवानंतर कुठे राहतो? तो अनेक योनीतून फिरतो का? तो अमर आहे का? हे विश कोणी निर्माण केले? त्याचा हेतू काय ? हे विश चालवते कोण ? त्याचा आत्म्याशी संबंध काय ? मी कोण ? मी माझ्याशीच संवाद करतो म्हणजे काय ? डोळे पाहतात हे खरे पण डोळे कुणामुळे पाहू शकतात ? अशा असंख्य प्रश्नांचे उत्तर शोधमे अध्यात्मात येते. धार्मिक गोष्टी व अध्यात्मिक गोष्टी यां ध्ये थोडा फरक आहे. आध्यात्मिक तत्त्व हे भौतिक तत्त्वापेक्षा निराळे असे चेतनतत्त्व आहे. निरनिराळ्या कारणांनी ते अज्ञानात पडते, अशुद्ध होते. बंधनात पडते व दुःखी होते. या चेतन तत्त्वाला आत्मज्ञान झाले की ते सगळ्या बंधनातून मुक्त होईल व त्याला अनंत सुख मिळेल. जगाचे मूलतत्त्व आध्यात्मिक आहे. त्यालाच ईशर म्हणतात. व्यक्तीचे सारतत्त्व आध्यात्मिक आहे त्याला आत्मा म्हणतात. आत्मा व ईशर (म्हणजे परमात्मा) याचे जीवशिवाचे मीलन झाले की । आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी अवस्था प्राप्त होते. ही अवस्था सच्चिदानंद स्वरूपी असते. याचा अर्थ ती सत् म्हणजे सत्य असते. चित् म्हणजे शोशत असते. आणि आनंदरूपी तर असतेच असते. दुःखात पडलेल्या आध्यातिमक तत्त्वाला आत्मज्ञान करून देण्याचा जो मार्ग आहे त्याला धर्म म्हणतात. हे सर्वज्ञान मिळण्याचा पाया शब्द व साक्षात्कार हा आहे. शब्द याचा अर्थ, अलौकिक शब्द-वेदाप्रमाणे वा प्रेषितांच्या वचनाप्रगाणे. आध्यात्गिक तत्त्व चेतन असते. चेतन असल्यामुळेच ‘आत्गा विचार करू शकतो, त्याला रगृती असते. त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकते. ते संवेदनक्षग असल्यामुळे त्याला सुखदुःखाची जाणीव सते. दया, प्रे , परोपकार, नैतिकता या गोष्टी आध्यात्मिक तत्त्वालाच शक्य असतात. प्रत्येक व्यक्तीला आत्मा असतो. परमेशर केवळ एक आत्मा नाही तो परमात्मा आहे. तो गुणवत्तेच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. आत्म्याचे परमात्म्याशी मीलन झाले की स्वाभाविकच या सर्वश्रेष्ठ गुणवत्तेचा लाभ या आत्म्याला होतो. तो आत्मा धारण करणाऱ्या व्यक्तीला होतो. त्याची अपूर्णता भरून निघते. सर्व संपन्नता प्राप्त होते. तेव्हा प्रत्येकाने जीवनाचा हाच मार्ग अनुसरावयास हवा.
आध्यात्माची वरील कल्पना नाकारावयास हवी, उत्क्रांतीचा अभ्यास असे सांगतो की सध्याचे ब्रांड एका अमूर्त ऊर्जेतून निर्माण जाले. ब्रह्मांडातील सर्वच गोष्टींची पूर्वज जी स्वयंभू निर्जीव ऊर्जा आहे. तिच्यापासून उत्क्रांती होत होत भौतिक पदार्थ, जीवन व चैतन्य आले. आदिऊर्जेला चेतनशक्ती म्हणता येणार नाही. कारण वैज्ञानिकांनी हे दाखवून दिले आहे की, जिवंत मेंदू म्हणजेच चेतना. त्याशिवाय चैतन्याचे अस्तित्व संभवत नाही. तेव्हा विशाचे मूलतत्त्व ज्ञानी, संवेदनशील, नैतिक, न्यायी आणि आनंदस्वरूप आहे असे मानण्यास काहीही आधार नाही. अमूर्त स्वयंभू निर्जीव ऊर्जेतून भौतिक पदार्थाची, त्यांच्यातून प्राण्याची व त्यांच्यातूनच पुढे चैतन्याचा विशेष विकसित स्तर लाभलेल्या मानवाची निर्मिती झाली. तेव्हा मानव हा देवाचा विशेष लाडका प्राणी आहे हे खरे नव्हे उत्क्रांतीच्या विशेष टप्प्यावर पोचू शकलेला प्राणी आहे एवढेच खरे आहे. अध्यात्माचा संबंध विवेकी, संयमी वर्तनाशी, परिग्रही जीवनशैलीशी जोडलेला आहे. आध्यात्मिक जाणिवेत आणखी एक सूत्र आहे. अखेर सत्याचाच जय होईल, मांगल्याचा विजय होईल ही मानवी जीवनाची भावात्मक गरज आहे. यासाठीचा प्रयत्न करण्याचा मार्ग म्हणूनही अध्यात्माकडे पाहता येईल. ही गोष्ट उघड आहे की सर्वच धर्माचे एक दर्शन अखेरचा विजय मानवी मांगल्याचाच होईल हे आहे. धर्मश्रद्धेचा तो एक महत्त्वाचा घटक आहे. या अर्थाने विनोबा म्हणतात की, सर्व धर्माचे अध्यात्म एकच आहे. यापुढे जाऊन विनोबांचे एक प्रख्यात वाक्य आहे ते असे की, ‘राजकारण वा धर्म जातील आणि पुढे विज्ञान व अध्यात्म राहील.’ या वाक्याचा अर्थ थोडा नीटपणे समजावून घ्यावयास हवा. राजकारण हे उघडपणे हितसंबंधाच्या झटापटीचे क्षेत्र असते. उपलब्ध साधनसामुग्रीवर स्वतःचा कब्जा करण्याची ती लढाई असते. विज्ञानाने जगातील सर्वांना पुरेसे मानवी सुख देता याईल याची उपलब्धी करून ठेवली आहे. मात्र हितसंबंधांच्या राजकीय लढायात ते आज अशक्यप्राय वाटते. विनोबा असे चित्र पाहतात की शहाणा होत जाणारा माणूस एक दिवस या राजकारणातील व्यर्थता ओळखेल आणि त्यावेळी विज्ञानाचा वापर माणसाच्या कल्याणासाठी करण्यात असलेला प्रमुख अडथळा दूर होईल. याचाच पुढचा भाग धर्माचा. राजकारण हा अल्पकालीन धर्म आहे आणि धर्म हे दीर्घकालीन राजकारण आहे असे डॉ. लोहियांचे एक मार्मिक वाक्य आहे. दीर्घ स्वरूपाचे राजकारण असलेल्या प्रत्येक धर्मात नीती आहे. धर्माचे तत्त्वज्ञान आहे. कर्मकांडे आहेत. पुरोहित आहे आणि शोषणही आहे. या धर्माचा दोन प्रकारे क्षय होईल असे स्वामी विवेकानंद अथवा विनोबा यांना वाटते.एकतर धर्माच्या ज्या बाबी विज्ञानाच्या नियमाशी उघडपणे विसंगत असतील त्या गळून पडतील. जसे गॅलिलिओच बरोबर होता म्हणून उशिरा का होईना पोपला बिनशर्त माफी मागावी लागली; परंतु सर्व धर्मातील गाभ्याचा भाग म्हणजे मानवी मांगल्याचा विजय होईल हा नैतिकतेच्या विजयावरील विशास. अंतिम विजय मांगल्याचाच होईल. हा विशास कार्यकारणभावावर आधारित नाही. तसाच तो सर्वस्वी कार्यकारणभावाच्या विरोधीही नाही. सत्याचा विजय होतो; परंतु अनेकदा सपशेल पराभवही होतो असे व्यवहारात दिसते. अशावेळी रूढ अर्थाने धार्मिक व्यक्ती अखेर सत्याचा विजय परमेशर कृपेने होईल असे म्हणतो. हे त्याचे प्रतिपादन परमेशरावरील त्याच्या असलेल्या विशासाबरोबरच मांगल्याचाच विजय व्हावा या सहजस्फूर्त माणूसकीच्या अभिव्यक्तीवरही अवलंबून असते. ज्याचा परमेशर आणि धर्म यावर विशास नाही असा माझ्यासारखा माणूस स्वतःला श्रेयस्कर वाटणाऱ्या, परंतु जी मूल्ये साकार करणे माझ्याशक्तीपलीकडची आहेत, त्याच्या पूर्ततेसाठी धडपडतो, त्यावेळी त्याला देवाधर्माचा आधार उपलब्ध नसतो हे उघडच आहे. मात्र त्याची भावना अशी असते की, माझ्या शक्तीपलिकडच्या या धडपडीत इतर माणसे मला सहकार्य करतील व मी मला इष्ट वाटणाऱ्या मूल्यांच्या समीप जाऊ शकेन. या भूमिकेतही थेट कार्यकारणभाव नाही. कारण मूल्यासाठीच्या या धडपडीत माणसे सहकार्य करतात असा अनुभव आहे. तसाच विरोधही करतात असाही अनुभव आहे. थोडक्यात, हा आशावाद हीदेखील व्यक्त होण्याची एक अभिव्यक्तीच आहे. बारकाईवरील भूमिका तपासली तर त्यामध्ये मूळ मुद्द्यातील अंतर्विरोध कमी आहे असे आढळते.
अ) माणसाच्या वासना, विकारावर मात आणि माणसाच्या मंगल नैतिक भावनांचा परिपोष. ही बाब ईशराच्या नावाने असो वा त्याच्या नावाशिवाय असो, घडून येण्याची गरज आहे. माणसाच्या मनाचे हे उन्नयन कसे घडून येईल याचा शोध धर्माने आणि अध्यात्माने आपल्या परीने घेतला. त्यातील प्रामाणिकपणा मान्य करूनही तो साफ अपुरा ठरला हे दिसतेच आहे. मात्र त्याचा आदर करावयास हवा. दुसयाबाजूला मनोविज्ञानाच्या क्षेत्रात एक आव्हान आहे की, माणूस स्वतःच्या भावभावनांचे शुद्धीकरण व उन्नतीकरण कसे करू शकेल ? बाह्य परिस्थितीमुळेच या भावभावना उद्भवतात असे जरी मानले तरीदेखील याबाबत करण्यासारखे काही मनोविज्ञानासाठी शिल्लक आहे. ब) निसर्गसुसंगत जीवन जगावे यासाठी खरे तर त्याद्वारे आपणास परमात्म्याचे दर्शन घडते असे सांगण्याची गरजही राहिली नाही आणि तसे घडते असे मानून कोणी पर्यावरण सुसंगत जीवन जगत असेल तर त्याला विरोध करण्याचेही कारण नाही. एक पर्यावरण विसंगत आत्मघातकी जीवनशैली आजचा समाज अंगीकारत आहे. यामध्ये देव आहेच मानणाऱ्यांपासून देव नाही मानणाऱ्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे. पालेभाज्या, उसळी, फळे नियमांनी सेवन करावेत. तेलकट, तिखट, तळलेले, गोड यांचे सेवन टाळावे. साधे सुती कपडे घालावेत. नैसर्गिक पेये घ्यावीत. थोडे शरीरश्रम आवर्जून करावे. डोळ्यांचा वापर सतत टी.व्ही. पाहण्याऐवजीवाचन व निसर्ग अवलोकन यासाठी करावा. हे समजण्यात काहीही आध्यात्मिक नाही. हा साधा शहाणपणाचा भाग आहे आणि याचा अवलंब कोणी आध्यात्मिक साधना म्हणून करत अल तर त्यात आक्षेपार्हही काही नाही. याच जणिवेचे विकसित रूप म्हणजे एकूणच समाज जीवनाची जडणघडण पर्यावरणसुसंगत पद्धतीने करण्यासाठी धडपडणे.
वरील सर्व मांडणणीचा थोडक्यात अर्थ असा की, अहंकार सोडण्यासाठी सतत कार्यग्न राहण्याचा सल्ला देणारे, अध्यात्म, समोरील व्यक्तीचे गुणग्रहण करून मनशुद्धीची कल्पना मांडणारे अध्यात्म, सामूहिक सुखासाठी साधना करू मागणारे अध्यात्म, यासाठी बिचकून जाऊन विरोध करण्याचे वा त्याबरोबरच भांडत बसण्याचे कारण नाही. दुसऱ्या बाजूला यातून साध्य होणार आहे जे ती अभिव्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा माणूस अधिक सहजपणे आत्मसात करू शकेल. कारण स्वतःचे मन व आत्मभान उन्नत करणे, पर्यावरण सुसंगत वर्तन करणे आणि विज्ञाननिष्ठ परिवर्तनाबाबत आग्रही राहणे या गोष्टी विवेकवादी व्यक्ती करतच असते. या अर्थाने ती व्यक्तीच खरी आध्यात्मिक नाही काय ? शेवटी एक मुद्दा चळवळीसाठी. अध्यात्माचा दावा करणाऱ्या अनिरुद्ध बापूंच्याबद्दल असा थेट खोटा प्रचार केला जातो की ते भक्तांना एका वेळी विविध देवांच्या रूपात भेटतात. दुसरे आध्यात्मिक पुरुष नरेंद्र महाराज हे तर जाहीरपणे विरोधकांचे हातपाय तोडण्याची धमकी देत असतात. आसारामबापू हे मागील जन्मातील पापामुळे या जन्मी स्त्री विधवा होते असे खुशाल सांगतात. सत्यसाईबाबा चमत्कार करतात पण तो कधीही तपासू देत नाहीत. आणि स्वतःवर हल्ला करणाऱ्या स्वतःच्या भक्तांना अटक करण्याऐवजी गोळी घालून संपवले जाईल असे पाहतात. निर्मलामाताच्या कुंडलिनी जागृतीला आव्हान दिले तर तिचे भक्त निदर्शकांवर तुटून पडतात. ह्या मंडळींना आध्यात्मिक मानणे याचा अर्थ ‘अध्यात्म’ या शब्दाचे समाजाचे आकलन अपुरे असणे आहे. दुसरे असे की, यांपैकी प्रत्येकाचे वागणे अत्यंत आलिशान असते. महाप्रचंड मालमत्ता जमा झालेली असते. थोडी समाजोपयोगी कामे करून जणू काही फार मोठी सत्कृत्ये केल्याचे दावे ही मंडळी करत असतात. व्यवस्था परिवर्तनाबद्दल ते कधी चकार शब्द बोलत नाहीत. बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, जातीयता, धर्मांधता, विषमता, स्त्री-भ्रूणहत्या हे त्यांचे विषयच नसतात. या उलट गाडगेबाबा, म. गांधी, विनोबाजी यांची परंपरा आहे. गाडगेबाबांनी कोट्यवधी रूपये जमा केले. प्रत्येक पैचा हिशोब चोख ठेवला आणि आयुष्यभर स्वतःची मालमत्ता म्हणून बाळगल्या फक्त चिंध्या, हातातील काठी आणि भिक्षा घेण्यासाठी खापराचा तुकडा. उभा महाराष्ट्र स्वच्छ करण्याचे व्रत घेऊन ते हिंडले. जातीच्या उच्चनीचतेबद्दल, अंधश्रद्धांबद्दल सतत कडाडून आसूड ओढत राहिले. विनोबाजी संपूर्ण भारतात सतत १२ वर्षे एकदाही आजारी न पडता पदयात्रा करत राहिले. ४२ लाख एकर जमीन त्यांनी दान मिळविली. त्यातील काही लाख जमिनींचे वितरणही केले. बॅरिस्टर असलेले गांधी इंग्लंडमधील कडाक्याच्या थंडीतही एकाच पंचावर राहिले. बादशहालाही तसेच भेटले. आणि स्वतःच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळाले असतानाही स्वातंत्र्यदिनाला हजर न राहता नौखालीत दंगलग्रस्थांचे अश्रू पुसावयास गेले. ही सर्व माणसे अत्यंत सश्रद्ध होती. देव मानणारी होती. आध्यात्मिक उन्नतीचे एक विशिष्ट उंची कष्टसाध्यतेने मिळवलेली होती आणि आजच्या कथित आध्यात्मिक पुरुषांच्या पेक्षा संपूर्ण वेगळी आणि संपूर्ण अस्सल होती. त्यांची परिभाषा देवाची, धर्माची आणि अध्यात्माची होती. अंधश्रद्धा निर्मलन समितीची परिभाषा ती असण्याचे कारण नाही पण या विभूतींच्या जीवनातील सकारात्मकतेचा अर्थ लावताना अध्यात्म या शब्दाचा सकारात्मक (कोणी त्याला चळवळीसाठी सोईस्कर असेही म्हणू शकेल) अर्थ लावण्यास काय हरकत आहे? (साभारः अंधश्रद्धा वार्तापत्र – वार्षिक २००७)
आमचा देवा-धर्माला विरोध नाही अखिल भारतीय अंधश्रद्धा-निर्मूलन समिती
का हो तुम्ही देवाच्या धर्माच्या का विरुद्ध आहात ? अंधश्रद्धांच्या नावाखाली तुम्ही देवाविषयीची श्रद्धा व आमचा धर्मच उखडवायला निघाला आहात का? तुम्ही समाजातील देव, धर्म घालवून सारी अनीती माजवणार आहात काय ?
असे प्रश्न १९८२ पासून सातत्याने आम्हाला विचारले जात आहेत. कधी केवळ कुतूहलाने तर अनेकदा गर्भित धमकीसह, कधी व्यक्तिगत पातळीवर असे प्रश्न विचारले जातात. कधी धार्मिक संघटनांर्फत विचारले जातात. प्रश्न कसाही विचारला जावो, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी या प्रश्नाचे एक अतूट नाते निर्माण झाले एवढे मात्र खरे. का हो, तुम्ही तर देव-धर्म यांना मुळीच हात लावत नाही. देवावर व धर्मावर कठोर हल्ला केल्याशिवाय समाजातील अंधश्रद्धा कशा दूर होणार ? मूळ सोडून काय फांद्या झोडपत बसला आहात? या पद्धतीने तर प्रश्न अधिकच कडवटपणे विचारले जातात. प्रामुख्याने पुरोगामी चळवळीत वावरणारे लोक तर अक्षरशः आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करूनच अशा प्रश्नांचा भडिमार करतात. एवढेच नव्हे तर तुम्ही कसे बेअक्कल, घाबरट, तडजोडवादी आहात, असे सांगण्याचाही यामागे अट्टाहास असतो.
खरे म्हणजे १९८२ पासून या दोन्ही प्रकारच्या प्रश्नांना आम्ही समर्थपणे उत्तरे देत आलो आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या लोणावळा येथील एका शिबिरात “अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची देव व धर्मविषयक भूमिका’ या विषयावर तब्बल अडीच दिवस प्रदीर्घ चर्चा झाली. वादावादी झाली आणि नंतर एकमताने एक निर्णय घेण्यात आला. “अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही देवाच्या व धर्माच्या विरुद्ध नाही. लोक ज्याला उघड अंधश्रद्धा समजतात त्या बाबा, बुवाबाजी, चमत्कार, नशीब, फलज्योतिष,भूत, भानामती, जादूटोणा, मंत्रतंत्र, अंगात येणे, आरोग्यविषयक गैरसमजुती यांविरुद्ध जनप्रबोधन करणे आणि देवाच्या नावावर सर्वसामान्य जनतेला लुबाडणाऱ्या दलालांविरुद्ध उभे ठाकून त्यांचा भंडाफोड करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट ही चळवळ मानते.” समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यास कटिबद्ध असणाऱ्या या चळवळीत ज्यांना अंधश्रद्धा दूर व्हाव्यात असे वाटते, त्या सगळ्यांना – अगदी देव व धर्म मानणाऱ्यांनासुद्धा – प्रवेश आहे. समान प्रतिष्ठा आहे. याचा अर्थ या चळवळीच्या मंचावरून देव आणि धर्माचा प्रसार करण्याचे स्वातंत्र आहे, असा कुणी घेऊ नये. अर्थात देव व धर्म या विषयावर संघटनांतर्गत वा बाह्य व्यासपीठावर या विषयावर आपापली मते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार राहील. देव व धर्म न मानणाऱ्यांना आपली मते जेवढ्या ताकदीने मांडण्याची मुभा राहील; तेवढीच संधी देव व धर्म मानणाऱ्यांनाही राहील. पण,ही मते व्यक्तिगत समजली जातील. ती संघटनेची अधिकृत मते मानली जाणार नाहीत. असा एकमुखी निर्णय संघटनेनं घेतला आहे. यात काही नवे नसले तरी अधिकृतपणे ही संघटनेची भूमिका आहे. कारण या चळवळीत अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते देव न मानणारे आहेत. धर्माची उघडपणे चिकित्सा करणारे आहेत. त्या सर्वांना ही भूगिका रवीकारणे म्हणजे ‘आजवर गांडत आलेल्या आपल्याच म्हणण्याला गुरड घालणे होय.’ असे वाटणे रवाभाविकही होते. तरी पण त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ हे एक व्यासपीठ आहे, हे लक्षात घेऊन ही भूमिका स्वीकारली आहे.
येथे वारंवार ‘भूमिका’ हा शब्द वापरत आहे. कारण वरील निर्णय हा रणनीती अथवा सोईची तडजोड नाही तर एक स्वतंत्र विचार आहे. हा मुद्दा व्यवस्थितरीत्या समजावून घेतला पाहिजे. “देव व धर्मविषयक ही केवळ रणनीती असती तर त्याचा अर्थ असा झाला असता की, मुळात संघटना देव व धर्माच्या विरुद्ध आहे, या समाजात देव व धर्म राहता कामा नये असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते. पण, सध्या असे सांगण्यात धोका आहे म्हणून आम्ही हा मुद्दा मांडत नाही, त्याविषयी मूग गिळून राहतो. पुढे सवड मिळताच आम्ही धर्म व देव यावर कडाडून हल्ला करू” असे मत आमचे नाही म्हणूनच ही रणनीती नाही. केवळ चळवळवाढीसाठी स्वीकारलेली सोयीची तडजोडही नाही. मग अशी भूमिका संघटनेने का स्वीकारली? आमचे मुख्य उद्दिष्ट समाजातल्या अंधश्रद्धा दूर करणे हे आहे आणि ज्यांच्या अंधश्रद्धा दूर करावयाच्या, तो समाज धर्म मानणारा आहे, एवढेच नव्हे तर हे दोन्ही मुद्दे त्यांच्या दृष्टीने अगदी प्राणप्रिय आहेत. ते सर्वसामान्य माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनले आहेत. देव व धर्म मानणाऱ्या व अगदी घट्ट कवटाळणाऱ्या समाजाच्या अंधश्रद्धा दूर करावयाच्या असतील तर आपल्या देव व धर्मविषयक कल्पनांना धक्का लागणार नाही, असा विशास त्याला वाटला तरच तो अंधश्रद्धा म्हणजे काय ते समजून येईल, त्या सोडण्यास प्रवृत्त होईल. हा भाग मुळातूनच समजून घेण्यासाठी आपण आधी अंधश्रद्धा व देव, धर्माचे नाते तपासून पाह.
अनेक पुरोगामी विचार करणाऱ्यांना त्यांच्या अभ्यासाधारे प्रामाणिकपणाने वाटते की देव-धर्मा ळेच समाजात अंधश्रद्धा टिकून आहेत. देव व धर्म ही कल्पनाच अंधश्रद्धांचे खरे मूळ आहे. हे खरे आहे का? अंधश्रद्धा म्हणजे काय?
एखादी गोष्ट मुळात खरी नसतानाही तिच्यावर विशास ठेवणे, ती मानणे म्हणजे अंधश्रद्धा. अंधश्रद्धा केवळ अज्ञान नाही तर ती एक प्रक्रिया आहे. म्हणूनच देवा-धर्माशी तिचे नाते एवढे सरळ आणि सोपे नाही. खरे म्हणजे हा मुद्दा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रयोग करून समर्थपणे तपासून पाहण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देव व धर्म नाकारणारा बुद्ध धर्म १९५६ साली स्वीकारला. तेव्हापासून त्यांच्या चळवळीतील बहुसंख्य समाज खरेच देव मानत नाही. बहसंख्यांकांचा (हिंद) धर्मही मानत नाहीत. म्हणून त्यांच्यातल्या अंधश्रद्धा दूर झाल्यात का? दीक्षाभू ीवर जाणाऱ्या जनतेपैकी किमान एक-चतुर्थांश लोक तरी विक्तुबाबासारख्या एका पागल माणसाच्या देवस्थानाला व गजानन महाराजांच्या शेगावला मोठ्या भक्तिभावाने भेटी देतात, भूत-प्रेत मानतात. म्हणजे देव सुटला तरी बाकीच्या अंधश्रद्धा बहुसंख्य लोकांना तशाच गोचिडीसारख्या चिकटून राहिल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच देव व धर्म नाकारणारेही अंधश्रद्धा असू शकतात. त्याचे कारण एवढेच आहे की अंधश्रद्धांचे मूळ देव व धर्म या कल्पनेत नाही, तर अंधश्रद्धेच्या प्रक्रियेत आहे. ज्याला आपण श्रद्धेची वा शब्दप्रामाण्याची प्रक्रिया म्हणतो ती ही प्रक्रिया. अमूक-अमूक सांगतो, म्हणून ते खरेच असेल पाहिजे. तो महान माणूस म्हणतो तो शब्दच प्रमाण, वेगळ्या विचाराची आवश्यकताच नाही. चिकित्सा करण्याची गरजच नाही. शब्दप्रामाण्य आणि अचिकित्सा हे अंधश्रद्धा प्रक्रियेचे दोन प्रधान घटक आहेत.
हीच गोष्ट, आंबेडकरवादी चळवळीतील बहुसंख्य सामान्य जनतेची झाली. डॉ. बाबासाहेब सांगतात म्हणून त्यांच्या शब्दाखातर त्यांनी देव व धर्म सोडला. पण या देव-धर्म सोडण्यामागे जी एक संपूर्ण वैज्ञानिक विचार करण्याची प्रक्रिया होती, ती कधी त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. त्या काळात आंबेडकरांना वेळ कमी मिळाला आणि नंतरचे त्यांचे अनुयायी त्यांच्या नावावर राजकारणच करीत राहिले. आंबेडकरांनी सुरू केलेली प्रबोधनाची चळवळ खुंटली. सर्वसामान्य जनते ध्ये वैचारिक प्रक्रिया निर्माण होऊ शकली नाही. पर्यायाने देव व धर्म जाऊनही अंधश्रद्धा तशाच कायम राहिल्या. फक्त पंडितांचे, धर्म र्तंडांचे व ब्राह्मणांचे शब्दप्रामाण्य जाऊन त्या ठिकाणी आंबेडकरांचे शब्दप्रामाण्य आले. अर्थात चांगल्या व्यक्तीचे, विचारांचे शब्दप्रामाण्य स्वीकारले तर तेवढा त्या समाजाचा फायदा होतोच. तोच फायदा आंबेडकरांच्या विचारक्षमते ळे त्या समाजाचा झाला. पण शब्दप्रामाण्य शेवटी मानवी बुद्धीच्या विकासाचा शत्रूच असतो.
मला वाटते आपल्या लक्षात आले असेल की अंधश्रद्धेविरुद्ध आपली लढाई आहे याचा अर्थ आपली खरी लढाई शब्दप्रामाण्याविरुद्ध आहे. चिकित्सा न करण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध आहे. जो समाज शब्दप्रामाण्य स्वीकारत नाही, ज्या समाजात खुली चिकित्साप्रवृत्ती विकसित झाली आहे, त्या समाजात दीर्घकाळ अंधश्रद्धा राहणे शक्यच नाही. जसे जसे ज्ञान वाढत जाते, तसतशा या अंधश्रद्धा कमी होत जातात. खरे सांगायचे तर अशा समाजात केवळ अज्ञानच शिल्लक राहते आणि अज्ञान तर नेहमीच शिल्लक राहणार आहे. जसे जसे ज्ञान वाढत जाते तसतशी अज्ञााची जाणीवही वाढत जाते आणि इथेच पठडीतील पुरोगामी विचार करणाऱ्यांची गल्लत होते. संपूर्ण मानवजातीच्या इतिहासाचे अवलोकन केले असता आपणास आढळते की अंधश्रद्धां धूनच आजचे आधुनिक विज्ञान विकसित झाले आहे. अंधश्रद्धा म्हणजे तरी काय असते? त्या कशा निर्माण होतात ? परिसरात एखादी घटना घडते, ती घटना का घडते याचे कारण शोधण्याचा माणूस प्रयत्न करतो. अर्थात त्या काळात जेवढे ज्ञान उपलब्ध असेल, त्याच्या आधारावर तो ती कारणमीमांसा शोधतो. अनेकदा ही कारणमीमांसा अपुऱ्या ज्ञानामुळे पूर्णतः चुकीची असते.
अशी चुकीची कारणमीमांसा म्हणजेच अंधश्रद्धा. उदाहरणार्थ माणसाच्या अंगात येते हे खरे आहे. फक्त भूत येते ही त्याची कारणमीमांसा अंधश्रद्धा आहे. खोटी आहे.
सर्वसामान्य स्थितीत ही चुकीची कारणमीमांसा समाजात रूढ झाली तरी अधिक योग्य, अचूक वैज्ञानिक कारणमीमांसा मिळाल्यानंतर ती गळून पडते. अंधश्रद्धा दूर होतात. विज्ञानाचा विकास होतो. सगळ्या संस्कृतींमध्ये याच पद्धतीने हे घडत आले आहे. पण अडीच हजार वर्षांपूर्वी धर्माचा उदय झाला. त्यासोबत शब्दप्रामाण्य प्रतिष्ठित झाले. नव्हे ते अंतिम प्रमाण (देववाक्य) ठरले. परिणामतः ज्ञान वाढले, अचूक कारणमीमांसा मिळाली तरी बदलाला स्थान उरले नाही. उलट बदलणे हा अधर्मच ठरला आणि अंधश्रद्धा दृढमूल झाल्या. धर्माने शब्दप्रामाण्य रुजवले म्हणून अंधश्रद्धा दीर्घकाळ टिकल्या हे खरे आहे. यामुळेच अनेकांना धर्म हे अंधश्रद्धांचे मूळ वाटते. पण हे चुकीचे आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे. आपला खरा विरोध हा शब्दप्रामाण्याला असतो, धर्माला नव्हे.
कारण धर्म म्हणजे केवळ शब्दप्रामाण्य नव्हे. काही वर्षांपूर्वी शब्दप्रामाण्य आणि धर्म यांची फारकत करता येत नसे. पण १७ व्या शतकापासून धर्म विरुद्ध विज्ञान झगडा सुरू झाला आणि या झगड्यात विज्ञानाची सातत्याने सरशी होत गेली. संपूर्ण धर्माचा डोलारा कोसळवणाऱ्या डार्विनचा उत्क्रान्तिवादही जेव्हा धर्माने पचवला, तेव्हाच धर्म आणि शब्दप्रामाण्य यांची फारकत व्हायला सुरुवात झाली. आजवर मोठ्या प्रमाणावर ही फारकत झालीआहे. अगदी भारतासारख्या मागासल्या देशातही ही फारकत सर्वान्य झाली आहे. म्हणूनच विज्ञान सर्वान्य झाले आहे.
धर्मात सांगितलेला प्रत्येक शब्द खराच असतो वा आहे असा दुराग्रहआज कोणताही सामान्य माणूस ठेवत नाही. म्हणूनच शब्दप्रामाण्याविरुद्धची आपली ही लढाई धर्मविरोधी लढाई ठरतेच असे नाही. नीतीशिवाय समाज जिवंतच राह शकत नाही आणि धर्माने त्या-त्या काळी ही नीतिमूल्ये प्रभावीपणे रुजविली, हा धर्माचा सर्वांत मोठा कार्यभाग आहे. त्यामुळेच धर्म आणि नीतिमूल्ये यांचे अतूट नाते निर्माण झाले. आजही नीतिमूल्ये आवश्यक आहेत आणि ती समाजात हवीच आहेत. मतभेद आहे तो फक्त तपशिलांबाबतचा. दुसरा आपला विरोध धार्मिक तत्त्वज्ञानाला नसतो तर, त्यातल्या अवैज्ञानिक भागाला असतो. कदाचित संपूर्ण तत्त्वज्ञान अवैज्ञानिक ठरत असेल तर आपला विरोध ते धार्मिक आहे म्हणून नसतो तर अवैज्ञानिक, असत्य आहे म्हणून असतो.
हा समाज, धर्माला विरोध म्हणजे नीतिमूल्यांना विरोध समजतो. अशा अवस्थेत मुळात धर्माच्या विरोधात नसताना, उगाच धर्मविरोधी भूमिका घेऊन ‘नीतिमूल्ये विरोधी आहोत’ अशी स्वतःची प्रतिमा निर्माण करून आपल्या कार्याची हानीच आपण करून घेत नाही काय? त्यामुळे धर्मविरोधी भूमिका घेणे हे मुळातच कसे अशास्त्रीय ठरते, ते आपण पाहिले आहे. तीच गोष्ट देवविषयक श्रद्धेची. मानववंशशास्त्राचा अभ्यास आपणास सांगतो की, निसर्गाविषयीच्या अज्ञानातून माणसानं देवाची कल्पना निर्माण केली. देवाने माणसाला निर्माण केले की नाही याविषयी वाद होऊ शकेल. पण माणसाने देव निर्माण केला हे एक निर्विवाद सत्य आहे. देवाची कल्पना केवळ अज्ञानापोटी निर्माण झाली नाही, तर ती एक मूलभूत अशी मानसिक गरजही होती. माणूस जन्मतःच आईच्या नाळेपासून तोडला जातो. त्याला एकटे एकटे असुरक्षित वाटायला लागते. म्हणून तो प्रथम आईला व नंतर मानवी समाजाच्या प्रगल्भ अवस्थेत सर्वशक्तिमान देवाशी वा ईशराशी स्वतःला जोडून घेतो. स्वतःची नाळ कधीही न तुटणाऱ्या चिरंतन, सर्वव्यापी अशा ईशराशी त्याने जोडली, म्हणूनच ईशराची कल्पना सर्वदूर व सर्वच समाजात प्रस्थापित झाली.
आजच्या कालात इतिहासात कधीही नव्हती एवढी अधिक सुरक्षित समाजव्यवस्था निर्माण झाली आहे, त्यामुळे ही नाळ आज समाजातल्या माणसांशी जोडून घेणे सहज शक्य आहे. देव या कल्पनेशिवायही नीतिमान व सुसंस्कृत समाज राहू शकतो, हे आज काळाने सिद्ध केले आहे. मग अशा अवस्थेत देवाला का विरोध करायचा नाही ? तर ह्याचे उत्तर असे की, नव्या माणसासमोर ज्यावेळी आपण देव व धर्मावर हल्ला करतो, त्यावेळी जागृत मनाने विचार करून ही गोष्ट स्वीकारायची की नाही हे ठरवण्याआधीच सुप्त मन वा अंतर्मन एकदम आपला दरवाजा बंद करून टाकते. आणि ते स्वतःच्या संरक्षणाची भक्कम फळी उभे करते. म्हणून माणसात खरेच बदल घडवून आणायचा असेल तर त्याचे अंतर्मन दुखावणार नाही अशा पद्धतीनेच, पायरी पायरीने घडवला पाहिजे. प्रत्यक्ष जागृत मनाला प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याची सवय लावली पाहिजे. एकदा जागृत मनाला वैज्ञानिक पद्धतीने विचार करून स्वतःत बदल घडविण्याची सवय लागली की तो स्वतःत आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. या पद्धतीने एक एक व्यक्ती एक एक गैरसमज/अंधश्रद्धा सहजतेने पण प्रयत्नपूर्वक दर करू शकते. या प्रक्रियेत त्याच्या जागृत मनाला तर्कशुद्ध विचार करण्याची सवयच लागते. प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक कसोटीवर तपासून स्वीकारण्याची सवय एकदा त्यांच्या व्यक्तिमत्तवाचा अविभाज्य भाग बनली की धर्म व देव यासारख्या नाजूक मदद्यांबाबत तो तीच चिकित्सक कसोटी वापरतो आणि या गोष्टी या कसोटीवर न टिकल्यास तो त्या सोडण्यास वा त्याची सुधारणा करण्यास तयारही होतो. अंधश्रद्धा निर्मूलनाचे खरे काम म्हणजे ही मेंदूची तर्कशुद्ध विचार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे काम आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.