स्त्री-द्वेष, बलात्कार आणि औषधविज्ञान

आपण बलात्काराबद्दल बोलतो तेव्हा कशाबद्दल बोलतो ? आता आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. १६ डिसेंबर २०१२ नंतर भीतीचे एक राष्ट्रीय शोकनाट्य सादर झाले. स्त्रीद्वेषाचे सहसा दिसणारे परिणाम-भीती, जखमा आणि असुरक्षितता सगळीकडे व्यक्त झाले. विरोधाभास असा की, किंवा कदाचित विरोधाभास नाहीच, की दिल्लीतल्या त्या भयंकर रविवारनंतर जास्त विनयभंग, जास्त बलात्कार आणि जास्त खून घडले. या प्रश्नाच्या उत्तरातून कृती (अॅक्ट) आणि धारणा (अटिट्यूड) यातला फरक शोधण्याचा मी प्रयत्न करतो. या दोन्हीचा काही संबंध आहे का ? मला माहीत नाही. पण आपण कृती आणि धारणा समांतर आहेत असे मानतो. काहीवेळा या दोन्ही एकमेकांत मिसळतात असे आपल्याला वाटते. काहीवेळा त्या वेगळ्या ओळखूही येत नाहीत. फरक फक्त काही अंशांचा असतो. काही वेळा अशा येतात की कृती आणि धारणेची तुलना होऊ शकत नाही आणि कदाचित त्या वेळीही फरक फक्त अंशांचा असतो. संवादामध्ये अशा प्रकारच्या फरकाचा मुद्दा गौण वाटू शकतो पण काही जबाबदारीच्या अधिकार पदांवर हा फरक अतिशय महत्त्वाचा असू शकतो. पोलिस खाते, न्याय व्यवस्था आणि माध्यमे यांची भूमिका लगेच आठवते. पण मी एक डॉक्टर आहे, माझ्या शिक्षणामुळे माझ्यावर वेगळ्या प्रकारची जबाबदारी आहे. मी स्वतःलाच विचारतो, आपण बलात्काराबद्दल बोलतो तेव्हा कशाबद्दल बोलतो ? मला माझ्या दृष्टीने उत्तर देणे भाग आहे. माझे उत्तर तुच्या उत्तरापेक्षा खूप वेगळे असू शकते. मुंबईत झालेली पत्रकार तरुणीच्या सामूहिक बलात्काराची भयंकर घटना डिसेंबर २०१२ मधल्या दिल्लीतल्या घटनेची जवळजवळ पुनरावृत्ती होती. ती माध्यमां ध्ये चर्चिली जाणारी एक ‘हाय प्रोफाईल’ केस बनली. त्या तरुणीची पहिली वैद्यकीय तपासणी संवेदनशील पद्धतीने झाली असेल व त्याने तिचा मानसिक धक्का आणखी वाढला नसेल अशी आशा करू या. ‘धारणा’ म्हणजे ‘कृत्याचा’ प्रतिध्वनी नव्हता अशीही आशा वाटते. पण प्रसिद्धीपासून दूर घडणाऱ्या अशा घटनां ध्ये ही आशा नसते. याच सु रास अशीच भयंकर घटना माझ्या शहरात घडली. एका छोट्या मुलीवर बागेत बलात्कार झाला. लहान मुलींवरचे बलात्कार म्हणजे मानवी विचारशक्तीचा पराभव असतो. हा फक्त बलात्काराची प्रचंड भीषणता अन जखमां धले क्रौर्य एवढाच प्रश्न नाही. लहानगीच्या शरीरासोबत आणखी बऱ्याच गोष्टींचे नुकसान होते. हा गुन्हा भयंकर सर्वव्यापी असतो कारण माणुसकी, वात्सल्य, माया-ममता, पालनपोषण या आदिम मूल्यांवरच तो घाला घालतो. बावचळलेला समाज मग नाकारण्याच्या अन् विसरण्याच्या कोषात शिरतो. पण त्या लहानगीला जगण्यासाठी मदत करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, अशांचे काय ? त्यांच्या धारणेचे काय ? १९८० च्या दशकात एका दुपारी मी ‘जर्मेन ग्रीअर’ना ऐकण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या ‘द फीमेल युनक’ (ती स्त्री हिजडा) या पुस्तकाच्या प्रसिद्धीचा काळ मागे पडला होता आणि ‘सेक्स अॅन्ड डेस्टिनी’ (लैंगिकता आणि नियती)चा काळ येऊ घातला होता. पण उपस्थित श्रोत्यांना त्या स्त्री-जाणिवा बदलून टाकणाऱ्या पहिल्या पुस्तकाबद्दलच बोलायचे व ऐकायचे होते. त्यांची बलात्काराबद्दलची समज त्या पुस्तकाने बदलली होती. प्रत्येक दिवशी किती विविध तहेने आपल्यावर बलात्कार होतो,” एका गंभीर वक्त्याने सांगितले. श्रीमती ग्रीअर, ज्या या वेळेपर्यंत स्पष्टीकरणे देऊन थकून गेल्या होत्या, फक्त सोशिकपणे हसल्या अन् म्हणाल्या, “बलात्काराबद्दल बोलताना आपण नक्की कशाबद्दल बोलतोय यावर ते अवलंबून आहे.” मी कदाचित कमी सहिष्णपणे उत्तर दिले असते. मी त्या व्यक्तीला सांगितले असते की, ती कशाबद्दल बोलते आहे हे तिलाच ठाऊक नाही. मी गप्प राहिलो, कारण हे सांगण्यासाठी मला काही तासांपूर्वी मी पाहिलेली घटना सांगावी लागली असती, अन् ते करण्याची माझी तयारी नव्हती. त्या सकाळी एका ज्येष्ठ सहकारी डॉक्टरने मला घाईने बोलावले, त्यांचा चेहरा फुलला होता, डोळे चमकत होते. “लवकर ये, एक बलात्काराची केस आलीय, किती उत्तेजित करणारी घटना..!”
मी त्यांच्यामागे वार्डमध्ये गेलो. एका कॉटभोवती गर्दी होती आणि मधोमध होती एक भेदरलेली, आक्रसलेली, आपला रक्ताळलेला फ्रॉक वारंवार घट्ट मुडपून घेतलेल्या पावलांपर्यंत खेचणारी एक लहानगी. तिचे वय माझ्या या ज्येष्ठ सहकारी डॉक्टरांच्या मुलीइतकेच होते.
कॉटभोवती असणारे बाकी सर्व डॉक्टर्स पुरुष होते. ते एका विनोदावर खुसफुसत होते. बलात्काऱ्याने त्याच्या उन्मादात त्या मुलीच्या गालाचा जोरात चावा घेतला होता, गालाला मोठी जखम झाली होती अन त्यातून तिचे दात दिसत होते. त्या जखमेवर कुणीतरी विनोद केला अन् हे डॉक्टर्स हसत होते. त्या मुलीचा फ्रॉक काढला गेला अन् विनोदांना उधाण आले. बलात्कारी पुरुषाने काय स्थिती घेतली असेल यावर पैजा लावणे सुरू झाले. त्या मुलीला वारंवार उलटी पालटी करून एखाद्या मांसाच्या तुकड्यासारखे तिचे निरीक्षण होऊ लागले. दुसऱ्या दिवशी मी त्या गुन्हेगाराला भेटायला पोलिस कोठडीत गेलो. तो म्हणाला, ‘मैं जानवर बन गया था’. माझ्या सहकाऱ्यांना त्यांच्या धारणेचे काहीच वाटले नव्हते. ‘बलात्काऱ्याला असा एकच प्रतिवाद शक्य असतो’ असे त्यांतल्या एकाने मला सांगितलेही. “ती एक लैंगिक कृती आहे”, तो म्हणाला, “तुला एवढे संवेदनशील राहून चालणार नाही”. कोठडीतल्या बलात्काऱ्याला माहीत नव्हते की त्याच्या सावजाची तपासणी करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला पुनःपुन्हा तिच्यावर बलात्कार करण्याचे स्वातंत्र्य त्याने बहाल केलेय. फक्त शब्दांनी, किंवा कल्पनेने असेल कदाचित; पण ते प्रत्यक्ष कृतीपेक्षा कमी भयंकर होते का ? या प्रसंगात धारणा आणि कृती सारख्याच जहाल होत्या.
संवेदनाहीन (निगरगट्ट) होणे, हा शब्द आरोग्य विज्ञानात बरेचदा ऐकायला मिळतो. शिकाल डॉक्टरांना प्रेते, शरीराचे विविध स्राव, बेड़पॅन्स, कोन्डोम्स अन मानवी शरीराच्या विविध अनिवार्य क्रिया प्रतिक्रिया यांच्याप्रति संवेदनाहीन बनवण्यासाठी अनेक रूढी अन खोड्या योजलेल्या असतात. पण या सगळ्या निर्जीव गोष्टी आहेत. जिवंत व्यक्तीच्या बाबतीत संवेदनाहीन होणे हे नक्कीच औषधविज्ञानाच्या नीतिमूल्यांच्या विरुद्ध असणार. तरी वैद्यकीय अभ्यासक्रमाचा तोच छुपा हेतू असतो… हेही पूर्ण सत्य नाही. संवेदनाहीन होणे हा वरवरचा बुरखा.. वैद्यकीय अभ्यासक्रमाचा छुपा हेतू माणुसकीविहीन होणे हा असतो. दोन व्यक्ती माणुसकीविहीन होतात… दुसरा होणे अपेक्षित नसते पण ते अटळ असते.
स्त्रीचे शरीर हे खरे सावज असते. त्याला दुसरे नाव देण्यापासून माणुसकी गमावण्याची सुरुवात होते. स्त्रीला आता बाई (female) म्हटले जाते. जीवशास्त्रीय दृष्टीने योग्य अन् वैद्यकीय संदर्भात अगदी मान्य. पण हळूहळू हा शब्द बिगरवै द्यकीय संदर्भात एखाद्या शिवीसारखा कसा वापरला जातो हे त् च्या लक्षात यायला लागते.
बिगर-वैद्यकीय संदर्भात ‘बाई’ ही लाजिरवाणी शिवी आहे. कुठलीही ‘न आवडणारी’ स्त्री असेल तर तिला नावाची गरज नाही – ती बाई असते. दुसऱ्या कुठल्या विशेषणांची गरजच नाही : बाई या शब्दात बोलणाऱ्याच्या शब्दसंग्रहातल्या प्रत्येक शिवीचा अंतर्भाव होतो. आणि बऱ्याच वेळा बोलणारी व्यक्तीही स्त्री असते. मला याचे आश्चर्य वाटते. कुठलीही स्त्री बाई हा शब्द इतक्या खोल तिरस्काराने कसा वापरू शकते? आधीच्या पिढीने स्त्री हा शब्दही तितक्याच स्त्रीद्वेषाने वापरला. दोन्ही शब्दांतून स्त्रीचे वर्णन पराकोटीच्या लिंगभावविषयक पक्षपाताने केले जाते. त्याचा अर्थ होतो ‘मादी’. निदान वैद्यकीय अभ्यासक्रमात तरी स्त्रीच्या शरीराला त्यापेक्षा जास्त अर्थ असला पाहिजे ना? पण संवेदना गमावण्याचे अटळ परिणाम असतात. स्त्रीच्या शरीराबद्दल माणुसकीविहीन होण्याचा ‘प्रतिबिंब परिणाम’ होतोच. तपासणारा डॉक्टर पण बरोबरीने माणुसकीविहीन होतो. पेशंट कशीबशी या व्यवस्थेच्या तावडीतून सुटते अन् स्वतःचा माणूसपणा परत मिळवते. पण डॉक्टरला हे शक्य नसते. तिचा किंवा त्याचा माणुसकी-अभाव कायमचा असतो. लिंगाच्या वर खरे तर सगळे सारखेच असते. आम्हाला शिकवायला असलेल्या एका नामवंत बालरोगतज्ज्ञ प्राध्यापकांची मला आठवण येते. ते सध्या सुखाने स्वर्गात राहतात. त्यांनी आम्हाला स्तनपानावर व्याख्यान दिले. त्यांच्या प्रात्यक्षिकात एका तरुण पण अशक्त, उपासमारीने मरायला टेकलेल्या स्तनपान देणाऱ्या मायलेकरांचा समावेश होता. ती खरेच एक चालता बोलता सांगाडा होती, तिची त्वचा अनिमियाने राखाडी झाली होती. तिच्या छातीशी एक मूल स्तनपान करत होते. प्राध्यापकांनी मूल ओढून काढले, अन् त्या स्त्रीचा स्तन दाबून एक दुधाचा थेंब आपल्या बोटावर घेऊन दाखवला.
“या भारतीय मातेकडे पाहा” ते गरजले, “तुम्ही या बाईला लक्षात ठेवावे अस माझा सल्ला आहे. ती उपाशी आहे, मरायला टेकलीये. पण तिचे स्तन उत्तम दूध तयार करत आहेत. या थेंबात १.१% प्रोटीन, ४.१% स्निग्धता आणि ७% साखर आहे. ती मरेल तेव्हाही तिचे मूल ध चोखत असेल, अन् तो शेवटचा थेंबही या थेंबाइतकाच गोड असेल.’ असे म्हणून त्यांनी ते बोट आवडीने चोखले. त्या बाईने आपले मूल प्राध्यापकांकडून हिसकावले अन् ती वर्गाबाहेर चालती झाली. तिचा चेहरा लाल झाला होता. वैद्यकीय क्षेत्रातला स्त्रीद्वेष इतका खोल रुजला आहे की तो सहजपणे विद्यार्थिनी, परिचारिका आणि महिला डॉक्टरांध्ये संक्रमित होतो. त्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही कुठल्याही सार्वजनिक रुग्णालयात स्त्री-रोग विभागाच्या बाह्य रुग्ण विभागात जा. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न कुठल्याही रुग्णालयात, शिकाऊ डॉक्टर्स त्यांच्या प्राध्यापकांचे अन् ज्येष्ठ विद्यार्थ्यांचे अनुकरण करत असतात. डॉक्टरचा मोजे घातलेला हात, तपासण्यासाठी स्त्री रोग्याच्या अंतरिन्द्रियात फिरत असतो, त्यासाठी तिने कशीबशी मनाची तयारी केलेली असते, पण आता समोरची शिकाऊ डॉक्टरांची रांग तिला भेदरून टाकते. “डरो मत. यहाँ सब डॉक्टर्स हैं” असे तिला हसत सांगितले जाते अन् तिच्या योनीत शिकाऊ डॉक्टरांचे हातामागून हात धसमुसळेपणाने चाचपडत असतात. जर तिने विरोध केला तर ती ‘उद्धट बाई’ ठरते आणि अंग सैल सोडण्याची आज्ञा तिला केली जाते. त्यासाठी कधी तिच्या मांड्यांवर फटके दिले जातात. कुणालाच अशा वागण्याचा धक्का बसत नाही. पेशण्टने त्यातून स्वतःला सावरले पाहिजे अन् शिवाय डॉक्टरांचे आभारही मानले पाहिजेत. नक्कीच अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांना याचा संताप येतो. बरेच जण आपली संवेदनशीलता, विचारशक्ती ठामपणे वापरतात. पुढे जाऊन माणुसकी जपणारे अन् करुणाशील डॉक्टर्स बनतात; पण ते व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन. व्यवस्था मात्र स्त्रीद्वेष करतच राहते. बरे, स्त्रीरोगाबद्दल शिकण्यासाठी योनिमार्गात हात घालण्याची आज आवश्यकता नाही. आत्मा सोडल्यास शरीराच्या कुठल्याही भागाची तंतोतंत त्रिमिति प्रतिमा अभ्यासता येते. हे सगळे इतके क्रूर अन निगरगट कसे झाले? रुग्ण तपासणीसाठी प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थ्याला रुग्णाच्या लैंगिक संबंधांविषयी विचारावे लागते. यासाठी ‘संबंधांचा इतिहास’ ही संज्ञा सहसा वापरतात. दहापैकी नऊ विद्यार्थी हा प्रश्न टाळतात आणि ‘संबंधांचा इतिहास नाही’ असे ठोकून लिहितात. ते पकडलेही जात नाहीत. आणि तो मूर्ख दहावा मात्र कधीकधी फटके खातो.
खरेतर हा प्रश्न रुग्णाच्या ‘सेक्स लाइफ’ मधल्या सुख-दुःखाची चौकशी करण्यासाठी नसतोच. त्यात जवळीकीने आनंद-खेदाची गोष्ट करावी असेही काही नसते. रुग्णाला लैंगिक संबंधातून संक्रमित झालेला रोग नाही याची खात्री करण्याचा केवळ उद्देश असतो. आणि या प्रश्नात महत्त्वाचा शब्द गाळलेला असतो. वेश्येसोबत संबंधांचा इतिहास आहे का ?
मलाही इतर विद्यार्थ्यांप्रमाणे हा सगळा बोध झाला, जेव्हा मी त्वचा अन् लैंगिक रोग विभागात काम केले. आता या विभागाला जास्त चांगले नाव दिले आहे, पण बाकी काहीच बदलले नाही. हा विशिष्ट बाह्यरुग्ण विभाग हा सगळ्यांत जास्त निर्दावलेला व वैद्यकीय व्यवसायाचे सगळ्यांत वाईट रूप दाखवणारा विभाग असतो.
कपड्यांची बटणे सोडून तयार असलेल्या पुरुषांची रांग इथे असायची. डॉक्टर प्राध्यापकांच्या हातात एक मोजपट्टी असायची, तिच्यावर ६ इंचांवर एक ठळक लाल खूण असे. त्यांचे मोजे चढवलेले हात पट्टीच्या अगदी वरच्या टोकाला असत. त्याने ते पट्टीने हलवून डिवचून लिंगे दाखवायचे. रुग्णाला काहीही झाले असले तरी त्यांचा पहिला प्रश्न नेहमी तोच असे, “रंडी के पास कब गया था ?” माझ्या लक्षात आले की बरेच जण लगेच उत्तर द्यायचे. जणु काही उत्तर दिल्याने त्यांचा अपराध नाहीसा व्हायचा.
‘इन्फेक्शनच्या मुळाशी जा.” हाउस सर्जन आम्हाला बजावायचे, “सगळ्या वेश्यांना औषधे द्या. तोच एक मार्ग आहे.” मुंबईच्या रेड लाईट एरिया जवळ रुग्णालय होते. हाउस सर्जनचा पवित्रा वैद्यकीय ज्ञानापेक्षा कॉ न सेन्स वर आधारित होता असा मला संशय वाटायचा. पण खरेच तसे होते का ? आताच्या परीस्थितीत याचे उत्तर आहे. जे १६ डिसेंबर २०१२ च्या घटनेनंतर सतत राष्ट्रीय दूरदर्शन वरून सतत दाखवले जातेय. बलात्काराच्या घटनेनंतर केल्या जाणाऱ्या न्यायवैद्यकीय चाचण्यांध्ये एक अतिशय अपमानास्पद नावाची दोन बोटांची चाचणी (two finger test) असते. बलात्काराचे निदान करण्याशी किंवा जखमांचे गांभीर्य तपासण्याशी तिचा काहीच संबंध नसतो. ती चाचणी करताना जखमा होण्याची शक्यता असते अन् रुग्णाला लैंगिक संबंधांची सवय आहे का हे समजण्यासाठी ती केली जाते. ही चाचणी पिडीत व्यक्तीसाठी अतिशय अपमानास्पद असते. हा प्रकार शंभर वर्षांपेक्षा जुना आहे. न्यायवैद्यकीय अभ्यासग्रंथांमध्ये अजूनही या चाचणीचा उल्लेख सापडतो. या क्षेत्रातले तज्ज्ञ आजही ती चाचणी करतात अन काही न्यायालये बलात्काराच्या केस मध्ये पीडितेला ‘लैंगिक संबंधाची सवय आहे’ म्हणून खटला निकाली काढण्यात तत्पर असतात. त्याविरुद्धच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या निकालानंतरही (१८ जुलै २०१२) ही चाचणी अजूनही रद्द झाली नाही. आय.सी.एम.आर. (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च)ची नवी मार्गदर्शक तत्त्वे सांगतात, पूर्वीच्या लैंगिक संबंधांचा इतिहास अनेक बलात्काराच्या खटल्यांच्या निकालांध्ये गौण ठरवला गेल्यामुळे (पाहा: १४० भारतीय पुरावा कायदा आणि सेक्शन १५५ मधील सब सेक्शन (४)चे वगळणे) लैंगिक हल्ल्याच्या घटनांध्ये दोन बोटांची चाचणी केली जाऊ नये. या चाचणीला शास्त्रीय वैधता नाही आणि ती पक्षपाती आहे. या चाचणीच्या निष्कर्षावरून पीडित व्यक्तीला लैंगिक संबंधांची सवय आहे की नाही याचे निदान तपासणाऱ्या डॉक्टरने करू नये. पण अजूनही न्यायवैद्यकीय तज्ज्ञांनी याची अंलबजावणी केलेली नाही. आणि ती वैद्यकीय अभ्यासग्रंथांध्ये समाविष्ट व्हायला कदाचित अजून शंभर वर्षे जावी लागतील. दोन बोटांच्या चाचणीमध्ये अंतर्भूत स्त्रीद्वेष जुन्या काळापासून चालत आला आहे. आपल्या इतर सर्व वागणुकीच्या पद्धतीप्रमाणे ही परंपरासुद्धा ब्रिटिशांची देणगी आहे.
१८६० च्या संसर्गजन्य रोग अधिनियमाचे प्रत्यक्ष वाचन ब्रिटिश संसदेत होण्याच्या कितीतरी आधीपासून तो छुपेपणाने भारतीय लष्करी छावण्यांमध्ये अं लात आणला जात होता. या कायद्यांची प्रत्यक्ष भाषा अन् नंतर त्यांचे रद्द होणे या दोन्हींचा अभ्यास भारतीय इतिहास अभ्यासकांनी केलेला आहे, पण त्यांनी वैद्यकीय नीतितत्त्वां ध्ये घडवून आणलेला बदल मात्र अजिबात चर्चेत आला नाही. या कायद्यांचा परिणाम म्हणून भारतीय बायका ब्रिटिश सैनिकांसाठी वेश्या म्हणून गृहीत धरल्या गेल्या. सैन्यामध्ये पसरणारे लैंगिक रोग नियंत्रित करण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला. ब्रिटिशांनी भारतीय स्त्रियांना वेश्यालयांध्ये डांबले. तिथे नियमित काळानंतर त्यांची तपासणी होत असे. दोन बोटांच्या चाचणीची सुरुवात इथे झाली. कुठलीही योग्य वाटणारी स्त्री दलालांकडून वेश्यालयात आणली जात असे, तिथे तिची ही अवमानास्पद चाचणी करून तिला वाईट चालीची घोषित केले जाई, अन् मग तिला सैनिकांच्या सेवेला जुंपले जाई. अशा घोषित वेश्यांवर मग पुन्हा नियमितपणे रुग्णालयात चाचण्या केल्या जात. ‘लॉक हॉस्पिटल’चे दस्तावेज अगदी ‘राणी’च्या उच्चभ्रू दरबारी इंग्रजी भाषेत असले तरी आज वाचताना हृदय पिळवटून जाते.
अनेक भारतीय अन् ब्रिटिश डॉक्टरांनी संतापून या निष्ठुर, कुरूप कायद्यांच्या विरोधात आवाज उठवला, पण वैद्यकीय अभ्यासक्रमाने मात्र त्यांना फार तत्परतेने आपल्यात सामावून घेतले. वैद्यकीय विद्यार्थ्यांना ज्याप्रकारे स्त्रीचे शरीर समजावले जाते, त्याचे स्वरूपच या कायद्यांनी बदलून टाकले. या संसर्गजन्य रोग कायद्याची नक्कल करून विद्यार्थ्यांची धारणा बनली. वैद्यकीय व्यवसायातल्या स्त्रिया या स्वतः सुद्धा या स्त्रीद्वेषाच्या शिकार बनतात हे निश्चित, विशेषतः ज्या परंपरागत पुरुषी क्षेत्रात असतात. त्यांनाही अत्यंत कडवट लढा द्यावा लागतो, पण इथे मी त्याबद्दल लिहीत नाही. जेव्हा मी बलात्काराबद्दल बोलते तेव्हा एकूण व्यवस्थेकडून स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाबद्दल बोलते. वैद्यकीय क्षेत्र हे संरक्षण करणारे विज्ञान आहे. पाठ्यपुस्तकातील व नेहीच्या तपासणी-प्रक्रियेतील स्त्रीद्वेषाला विरोध करणे विद्यार्थ्यांना शिकवले जात नाही तोपर्यंत, कदाचित पूर्ण अजाणतेपणी, त्यांच्याकडून बलात्काराचा गुन्हा पुनःपुन्हा घडेल. कारण औषधविज्ञानात धारणा म्हणजेच कृती असते. टीपः इशरत सईद आणि कल्पना स्वामिनाथन या शल्यविशारद आहेत. त्या एकत्र ‘कल्पिश रत्न’ या नावाने लिहितात. त्यांची कादंबरी ‘द क्वारन्टाइन पेपर्स’ आता पेपरबॅकमध्ये उपलब्ध आहे. हा लेख प्रकाशित झाल्यावर त्यात सुधारणा केली गेली.
साभारः द ओपन मॅगेझिन, ऑक्टोबर २०१३

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.