पत्रसंवाद

राजीव जोशी, dr.rajivjoshi@yahoo.com आसु जुलै २०१३ मधील तारक काटे यांचा लेख वाचला.
आज जगभरात… २,८६,००० प्रजाती सपुष्प वनस्पतींच्या आहेत…. नवी प्रजाती (species) किंवा वाण तयार होतो…. जगात आज गव्हाच्या १४००० वाणांची नोंद झाली आहे. भारतात तांदळाचे जवळपास दोन लाख वाण अस्तित्वात असावेत. असे ते पहिल्या-दुसऱ्या परिच्छेदात लिहितात. २,८६,००० प्रजातींपैकी भारतातील २,००,००० तांदळाचे आणि जगातील १४००० गव्हाचे वाण वगळले तर इतर जगातील तांदळाच्या, मका, पालेभाज्या, फळभाज्या, फळफळावळ, कंदमुळे, शोभेची फले अशा असंख्य सपष्प वनस्पतींचे फक्त ७४,००० च वाण आहेत असा निष्कर्ष येतो.
मला वस्तुस्थिती माहीत नाही. परंतु, जगातील ७०% सपुष्प वनस्पती तांदूळच आहेत, हे तर्कास पटत नाही. शक्यता अशी वाटते की, वाण hm species Mm sub-set असावा आणि शास्त्रीय संज्ञांचा वापर ढिसाळपणे झाल्यामुळे वाण आणि प्रजातींना समकक्ष दर्जा दिला गेला असावा. दुसरे असे दिसते की, मानवी प्रयत्न (संशोधन) यांचे फायदे-तोटे आणि आर्थिक हितसंबंधाचे फायदे-तोटे यात सरमिसळ झाली आहे. गेली ७००० वर्षे टिकून राहिलेल्या (पा. १५०) शेतीचा ते उल्लेख करतात, परंतु या शेतमालाचे उत्पादन किती होते? अर्धपोषित आणि उपासमारीने मरणाऱ्या लोकांचे प्रमाण गेली ७००० वर्षे टिकून राहिलेल्या जीवनपद्धतीत किती होते? याचा विचार झालेला नाही. पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी संकरीकरण (hybridization) या तंत्राचा वापर करण्यात आला…. या तंत्राने विकसित केलेल्या वाणातील गुणसमुच्चय फक्त एका पिढीपुरताच राहतो. (पा. १५०) हे त्यांचे म्हणणे अंशतः खरे आहे. केवळ मानवाने विकसित केलेल्याच नव्हे तर हापूस आंबा, कापा फणस अशा वाणांतील गुणसमुच्चय फक्त एका पिढीपुरताच राहतो हेही लक्षात घेतले पाहिजे. निसर्गदत्त ते संपूर्ण चांगले आणि मानवी हस्तक्षेप सर्वथैव त्याज्य असा संदेश त्यातून मिळता कामा नये. चिकाटी दाखवून पाच पिढ्यांपर्यंत प्रयोग करण्याचे परिश्रम घेतले तर मानवनिर्मित सरळ वाणांचीसुद्धा इतर सामान्य वाणांसारखी लागवड होऊ शकते (पा.१५१) हे त्यांनाही मान्य आहे.
शास्त्रज्ञांनी निर्मिलेल्या वाणांवर अथवा तंत्रावर पुढे त्यांचे नियंत्रण राहिले नाही. शेवटी त्याचे व्यापारीकरण झाले ही त्यांची चिंता खरी आहे. पण याबाबत दोन मुद्दे.
एकतर “कां न सदन बांधावें, की त्यांत बिळें करिल घूस?” या केवळ प्रश्न नसून त्याचे उत्तर अध्याहृत आहे. डळवश शषषशलीी आणि नवीन समस्या असल्या तरी तशी कृति आवश्यक असते हे तत्त्व बाळगले पाहिजे. तंत्रज्ञानाचा हितसंबंधी गैरवापर करतील म्हणून तंत्रज्ञानच नको, विकासच नको ही विचारसरणी अधिक घातक आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीचा विकास होण्यापूर्वी मृत्यूचा दर आणि सरासरी आयुष्यमान किती होते याचा विचार व्हावा. जी जीवनशैली जगण्याची संधीच कमी दर्जाची देते, ती जीवनशैली निश्चितच कमस्सल असते. त्रुटी आणि नवीन समस्या यांवरील उपाययोजना आवश्यकच असतात आणि ती न संपणारी प्रक्रिया आहे. इरलज्ञीरीश पश जाणे सर्वसाधारणतः चुकीचे आणि अनावश्यक असते. आह्वाने प्रचंड मोठी आहेत. परंतु एकेका क्षेत्राचा अलगपणे विचार केला किंवा प्रगतीलाच आंधळेपणे विरोध केला तर समस्या निश्चितच अधिक जटिल होतील.
सुलभा ब्रह्मे, १२९ ब १२, एरंडवणे, पुणे ४११००४. स्थिरभाष : ०२०-२५४३२९३३

आजचा सुधारक, सप्टेंबर २०१३ मध्ये श्री सुभाष आठले यांनी
‘बीजस्वायत्ततेकडून गुलामगिरी’ ह्या श्री तारक काटे ह्यांच्या लेखास उत्तर देताना, जनुक-बदल वाणांच्या धोक्यांबाबत केलेल्या विवरणाचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु तसे करताना त्यांनी जी विधाने केली आहेत त्यांच्या समर्थनार्थ कोणताही शास्त्रीय पुरावा, संदर्भ लिहिले नाहीत. ज-ब वाणांच्या पर्यावरणीय आणि अन्य संभाव्य घातक परिणामांबाबत अनेक स्वतंत्र अभ्यासांधून (न-ब) वाण बनवणाऱ्या कंपन्यांपासून व स्वतंत्र) प्रश्नचिन्हे उपस्थित केली गेलेली आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात ने लेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालामध्ये (जून २०१३) काटेकोर परीक्षणाची व सावधानता बाळगण्याची गरज मांडलेली आहे. याविषयीची भारत व अमेरिका-युरोप आदि देशांधील संशोधनावर आधारित पुस्तके अहवाल/लेख यांतील निष्कर्षांची शास्त्रशुद्ध पद्धतीने छाननी करून त्यांचा प्रतिवाद कोठे केला आहे हे पाहिल्याविना आणि त्यातील युक्तिवाद सादर केल्याविना श्री आठले यांची विधाने म्हणजे केवळ त्यांची व्यक्तिगत पूर्वग्रहदूषित मते असा वाचकांचा ग्रह बनू शकतो.
श्री. आठले यांचे अणुविजेचे समर्थनही असेच एकांगी आहे. अणुविजेचा गेल्या सहा दशकांचा जगभरचा अनुभव आहे की, ती फार महाग पडते. शासनाच्या घसघशीत अनुदानां ळेच तो उद्योग चालू राहू शकतो व तसा तो आहे. अणुभट्टया या अणुकचऱ्याचे साठे यांतून होणाऱ्या किरणोत्साराच्या घातक परिणामाबाबतचे अनुभव अनेक अहवाल व पुस्तके/लेख यांतून उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ,
(1) “”Nuclear Power is not the Answer to Global Warming or anything Else” Caldicott Helen, Melbourne University Press, Australia, 2006.
(2) “”Nuclear or Not? Does Nuclear Power Have a Place in a Sustainable Energy Future?” Elliot, David, Ed, Palgrave, Macmillan, New York, 2007.
(3) “”The Economics of Nuclear Power” Steve Thomas Heinrich Ball Stiftung, 2005.
या व अशा अनेक अभ्यासांधून अणुविजेची खर्चिकता, किरणोत्साराची घातकता आदी समस्यांबाबतच्या वैज्ञानिक ज्ञानावर युरोपमधील जनतेचा विरोध आधारित आहे. जर्मनीने अणुभट्टया बंद करत शोशत ऊर्जास्रोतांकडे वळण्याचा कालबद्ध कार्यक्रम आखला आहे.
अणुभट्ट्यांना स्वदेशामध्ये मागणी नसल्याने फ्रान्स, जपान व अमेरिका येथील कंपन्या आपल्या अणुभट्या भारताच्या माथी मारत आहेत. भारताच्या पंतप्रधानांनी व्यापारी सौदेबाजी करून या देशांतील कंपन्यांकडून अणुभट्टया खरेदीबाबत करारमदार चालवले आहेत. अणुवीजनिर्मितिक्षमतेध्ये सुारे ६०,००० मे.वॅ. भर घालण्याच्या शासकीय योजनेचा भारतातील अर्थतज्ज्ञ, ऊर्जातज्ज्ञ, आण्विक भौतिकीतज्ज्ञ यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रतिवाद केलेला आहे. भारतामध्ये भरपूर सूर्यप्रकाश असल्याने ‘सौरऊर्जा’ हा शोशत व पर्यावरणस्नेही पर्याय उपलब्ध आहे. तेव्हा सम्यक विचार करता, विजेच्या उधळपट्टीवर आळा, विजेचा कार्यक्षम वापर आणि सौरऊर्जेसारख्या शोशत ऊर्जास्रोतांवर भर देऊन विजेची ‘गरज’ भागवणे हेच विवेकानिष्ठ, शास्त्रीय उत्तर होय.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.